संपादकीय

.

संपादकीय


नमस्कार,

'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळाचा हा पहिलाच विशेषांक. प्रसिद्ध बालसाहित्यिक भा. रा. भागवत यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त प्रकाशित होणार्‍या या अंकाचं महत्त्व खास आहे ते फक्त पहिलेपणामुळेच नव्हे. 'ऐसी'च्या सदस्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये एखाद्या नव्या उपक्रमाची कल्पना मांडावी आणि संपादकांनी त्यात सर्वतोपरी सहकार्य करून त्याचं एका देखण्या विशेषांकात रूपांतर करावं ही या संकेतस्थळाच्या खुल्या स्वभावाचं द्योतक असलेली खरीखुरी विशेष बाब आहे.

इथे वेळोवेळी होणार्‍या गप्पांमधून लहानपणीच्या वाचनाचा आढावा घेताना भा. रा. भागवतांचं नाव वारंवार पुढे येत होतं. इथल्या अनेक बहुश्रुत सदस्यांच्या, पुढे विस्तारत गेलेल्या वाचनामध्ये आणि अनुभवविश्वामध्ये भारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे स्मरणरंजनातून आलेला जिव्हाळा तर होताच, पण कृतज्ञताही होती. माहितीची देवाणघेवाण करताना असं लक्षात येत गेलं, की अतिशय मोलाची कामगिरी करून जाणार्‍या या लेखकाबद्दल आंतरजालावर कुठेही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या समग्र लेखनाची सूचीही कुठे संदर्भासाठी मिळत नाही. त्या माहितीसाठी म्हणून या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि जसजसं साहित्य गोळा होत गेलं, तसतसा भारांच्या लेखनाचा नि बालकुमारांसाठी त्यांनी केलेल्या विविधांगी उपक्रमांचा आवाका पाहून आम्ही अवाक होत गेलो. मग 'भारा'वलेल्या अनेक 'भागवत'पंथीयांच्या नवनव्या कल्पनांची भर त्यात पडत गेली. त्यातून हा अंक आकाराला आला आहे.
.
भारांच्या कुटुंबीयांनी या प्रकल्पाला भरभरून मदत केली. महत्त्वाच्या पूर्वप्रकाशित साहित्यापासून ते भारांच्या छायाचित्रांपर्यंत अनेक प्रकारचं साहित्य त्यांनी विनासायास उपलब्ध करून दिलं. 'उत्कर्ष' प्रकाशनाच्या सुधाकर जोशी यांच्याकडून काही महत्त्वाचे संदर्भ मिळाले. सौ. नीला धडफळे यांच्याकडून समग्र साहित्यसूचीसारखं महत्त्वाचं साधन मिळाल्यामुळे कामाला सुरुवात करता आली.

संपादनाच्या कामात 'ऐसी अक्षरे'च्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ऋषिकेश, राजेश घासकडवी, मुक्तसुनीत व चिंतातुर जंतू या संपादक मंडळाबरोबरच - मेघना भुस्कुटे, अमुक, आदूबाळ आणि अस्वल या सदस्यांचा आणि सलिल बडोदेकर या 'ऐसी'बाह्य मित्राचा सहभाग होता. देखणं मुखपृष्ठ करून देऊन आशीष पाडलेकर यांनी अंकाची दृश्य बाजू जिवंत केली आहे. अमुक यांची रेखाटनं, सुलेखनं तर आता 'ऐसी'च्या अंकांचा एक अविभाज्य भागच झाली आहेत. मुद्रितशोधनाचं काम मेघना भुस्कुटे, अमुक आणि नंदन यांनी पार पाडलं आहे आणि तांत्रिक बाजू नेहमीप्रमाणे ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सांभाळली आहे.

या सगळ्यांचे आणि अंकात निरनिराळ्या प्रकारे सहभागी होणार्‍या इतर अनेकांचे आभार मानणं जरा औपचारिकच होईल, पण ते आवश्यक आहे.

भारांनी आपल्या विपुल लेखनातून आपल्याला भरभरून दिलं. या अंकाद्वारे ते अंशत: का होईना, अधिकाधिक लोकांत वाटलं जावं आणि मराठी बालसाहित्याचं दालन अधिक समृद्ध व्हावं, अशी काहीशी उजळून टाकणारी नि नम्र करणारी भावना हा अंक वाचकांच्या हाती देताना आहे.
.
या अंकासोबतच भारांचं मराठीतलं विकीपिडिया-पान अद्ययावत करून मराठी-विकीच्या माध्यमातून होणार्‍या प्रसारास आम्ही हातभार लावत आहोत. 'ऐसी अक्षरे'च्या अंकांमध्ये अशा अनेक विशेषांकांची भर पडत राहो आणि त्यातून मराठी आंतरजाल नवनव्या विषयांनी, संदर्भसंपृक्त लेखनानं आणि विविधरंगी दृष्टिकोनांनी समृद्ध होत राहो, अशी आशा करू या.

संपादक

***

रेखाटन : अमुक
***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मुखपृष्ठ बहु सरस छे! एटले एकदम चोक्कस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुखपृष्ठ फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषांक उत्तम दिसतो आहे. सजावट व मांडणीही मस्त. संपादक मंडळाचे कौतुक व टीमचे. आता एकेक करत वाचतो सगळं.
Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुखपृष्ठ आवडले. आता रोज नवनव्या लेखांची मेजवानीच असणार आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अंक आवडतो आहे. असा एखाद्याचा लेखाकाचा विशेषांक काढण्याची कल्पना आवडली. यात योगदान देणार्‍या सर्वांना आणि 'ऐसी' चालकांना धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसी चमूचे आभारही अन पाठीवरती शाबासकीची थाप देखील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषांक सुरेख जमून आला आहे. मुखपृष्ट आणि रंगसंगतीपण आवडली. एकेक करून लेख वाचतेय. संपादन टीमचे हार्दिक अभिनंदन.
आता पुढच्या विशेषांकासाठी कुठला/ई लेखक/इका निवडणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषांक खूपच आवडला. भा.रा.भागवत वाचून खूप वर्षे झाली. दोनतीन वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व पुस्तकांचा संच विकत घेऊन ठेवलाय पण वाचायला वेळ मिळाला नाही. मुखपृष्ठ अत्यंत दर्जेदार. संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन.

पुढील विशेषांकाची वाट पाहत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंक वाचतेय आणि आत्तापर्यंत खूप आवडलाय. भा.रां. बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे म्हणून या उपक्रमाबद्दल सर्व सहभागी मंडळींचे विशेष आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुखपृष्ट खूपच छान आहे. आवडले. आता अंक वाचायला घेतला आहे. आणि आतापर्यंत आवदला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंक सुरेख झाला आहे. प्रत्येक धाग्यावर वेगळी प्रतिक्रिया दिली नसली तरी वाचन चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दोन दिवसात आणि आज सकाळपासून प्रकाशित झालेले सगळे लेख वाचून काढले. 'कुटुंबातले भारा' आणि गणेश मतकरींचा 'जुनी मैत्री' हा लेख खासच आवडला. जुनी मैत्री जवळपास माझेच मनोगत आहे असे वाटले आणि कुटुंबातले भारा अतिशय भावला आणि अशा आवडत्या लेखकाला आणि उमद्या माणसाला भेटता आले नाही घ्याबद्द्ल खरंच वाईट वाटले.

आशीष पाडलेकर यांचे मुखपृष्ठ फारच सुंदर झाले आहे. हा 'भारा'वलेला विशेषांक अतिशय देखणा आणि दर्जेदार आहे, कित्येक मुद्रित विशेषांकांपेक्षाही! जमल्यास ह्याची PDF देऊ शकाल का किंवा जर ह्याचे एखादे पुस्तक बनवता आले तर फारच छान! कायम संग्रही ठेवता येईल. Smile

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भारावलेले' विशेषांक अतिअतिशय आवडला. दिवाळी अंकांना नेहमी दिवाळीतल्या फराळाची उपमा दिली जाते. पण हा अंक वाचताना खरंच उत्तमोत्तम पदार्थांची मेजवानी मिळाल्यावर व्हावा तसा आनंद झाला. 'आज काय आलंय? आज काय आलंय?' अशा उत्सुकतेनी रोज रोज साइटीवर येऊन नवा नवा पदार्थ चाखत होते. 'एकैकमत्र मोदाय किमु यत्र चतुष्टयम्' अशी अवस्था झाली. सगळ्या आचार्‍यांचे आणि यजमानांचे आभार आभार आभार!
आदूबाळांनी लिहिलेली कथा विशेष आवडली. नुसत्या कथा किंवा स्मरणरंजनात्मक लेख न देता संपादकांनी वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश केलाय - इदं न मम सारखा वेगळी बाजू दाखवणारा लेख, मुलाखती, आताच्या पिढीतल्या लहान मुलीचा तिला आवडणार्‍या सुपरहिर्विनीवरचा लेख, भारांचं साहित्यसंमेलनातलं भाषण इ.- हेही आवडलं.
आमचा लायब्ररीवाला एका दिवसात दोन-तीन वेळा पुस्तक बदलून नेली तरी नेऊ द्यायचा. त्यामुळे लहानपणी सुट्टीच्या दिवसांत फाफे, बिपिन बुकलवार आणि ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांचे अनुवाद वेड लागल्यासारखे वाचले होते. फाफेतल्या जुन्या काळामुळे कथा वाचताना 'हे काहीतरी दूरचं आहे' असं वाटायचं, असं कसं याच्यावर नेहमी संकटं येतात असा अविश्वास वाटायचा. तरी आपणपण फाफे व्हावं अशी माझी तीव्र इच्छा होती. तशी दिवास्वप्नंही मी पाहिल्याचं आठवतंय. दोन लहान मुलं स्वतः फाफे व्हायचं ठरवतात, काहीतरी साहस करायला जातात, पण त्यांची फेफे होते अशी एक गोष्टही मी मनातल्या मनात रचली होती. त्या काळात अपरिचित नावं असलेली भाषांतरं मला फारशी आवडायची नाहीत, अनोळखी पार्श्वभूमी असेल तर कळायची नाहीत. पण भारांची ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांची विशेषतः रूपांतरं माझ्या फार आवडीची होती. बुकलवार म्हणजे बुक लवर हे तेव्हा कळलं नव्हतं, पण बिपिन मीच आहे असं वाटायचं. हे सगळं कधी आणि कसं मागे पडलं आणि फाफे माझ्या भावविश्वात कधी पुसट झाला हे लक्षात आलं नव्हतं. हा विशेषांक वाचताना आता पुसट झालेलं ते जुनं विश्व परत मिळालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून अंक पूर्ण वाचून झाला नाही. एखाद्या (बाल)लेखकाला संपूर्ण समर्पित असा अंक ही संकल्पना बहुधा मराठीत पहिल्यांदा असावी. (पु. ल. इ. सन्मानानीय अपवाद वगळता)

अमेरिकत डॉ. सुस यांच्या वाढदिवशी (२ मार्च) त्यांनी लहान मुलांच्या वांग्मय विश्वाला दिलेल्या बहुमोल योगदानाप्रित्यर्थ "Read Across America Day" साजरा करतात. प्राथमिक शाळामध्ये आपले आवडीचे पुस्तक त्यादिवशी घेवून जाण्याची आणि इतराबरोबर शेअर करण्याची संधी मिळते. या अंकनिमित्त तसे काहीसे वाटले. इथे मुलांच्या विभागात "Something About the Author" चे खंड दिसतात. ज्यामध्ये लेखकाचा परिचय, त्याची जीवनी आणि त्याने केलेले संपूर्ण काम याची विस्तृत माहिती मिळते. हा अंक तशा स्वरूपाचे काम सुरु करायची नांदी आहे. किबहुना त्याहूनही काकणभर सरस आहे.

बाल-वांग्मय हा तसा बराच दुर्लक्षलेला विषय आहे. ते कसे असावे यावर चर्चा करता आली तर आनंद होइल.

बँगलोर मध्ये "हिप्पोक्यम्पस" नावाची एक "library-cum-activity center" संकल्पना काही एक वर्षे राबवत आहेत. खूप सुंदर काम चालू आहे. वाचनालयात मुलांसाठी पुस्तके कशी निवडावी, विकत घ्यावी आणि मांडून ठेवावी याचे फोर्मल प्रशिक्षण भारतात नाही. पण मुलाच्या विश्वात रस असलेल्या मदतीस चुणचुणीत लायब्ररीन (अपवाद) मला इथे भेटल्या. "library in a box" चा उपक्रम ही काही ठिकाणी मुलांसाठी सुरु झाल्याचे दिसते. ही बदलत्या काळाची आणि अवेअरनेस ची चाहूल आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म बाल-वाड्ग्मय कसे असावे? चांगला प्रश्न आहे.
आजच खालील बालकविता वाचनात आली. खूप आवडली. अतिशय निरागस आहेच पण आईबद्दलचे लहान मुलास वाटणारे प्रेम छान शब्दबद्ध कलेले आहे.

मला वाटते

मला वाटते बसुनी विमानी
अफाट गगनी हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधूनी
समुद्रातुनी भटकावे
निळा निळा तो समोर डोंगर
चढूणी त्यावर पाहावे
राज्य परयांचे जाऊनी
तेथे राज्य पदाते मिळवावे

परी भूमीवर संध्याकाळी
छाया काळी जो धावे
तेव्हा वाटे सोडूनी सकला
निजमातेला बिलगावे..
_________________
डॉक्टर सुस यांच्या बर्‍याच पुस्तकांनी काही काळ घरावर अधिपत्य गाजविले होते नंतर मग स्पंजबॉब चा काळ आला, सध्या पॉप म्युझिकचा आहे.
डॉक्टर सुस यांची पुस्तके व त्यातील शाब्दिक कोलांट्याउड्या मस्त आहेत. स्पंजबॉब मध्ये ह्युमर छान आहे.
एकंदर बालसाहीत्य चमकदार अन लहानांना अपिल करणारे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंकावर प्रतिक्रिया द्यायला भयंकर उशीर झालेला आहे पण देर आये दुरुस्त आये असं समजून थोडक्यात प्रतिक्रिया देतो.
१) मुळातंच ही कल्पना आणि त्यातही भारा हे पार छान आहे
२) संपादकांनी घेतलेले कष्ट अगदी दिसून येतात. छान नटवुन सजवुन काढलेला अंक आहे
३) बहुतांश लेख खोलात जाऊन लिहीलेले आहेत. स्मरणरंजनाची भिती असते पण ती ईथे कन्स्ट्रक्टीव झालेली आहे
४) मुखपृष्ठ १००/१००. मी आजही कितीतरी वेळा नुस्तेच ते न्याहाळत बसतो

संवेद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रात कोणकोणत्या लेखकांची घरे स्मारके -संग्रहालये झाली आहेत याची एक यादी बनवावी.फोटो टाकून कसे जायचे तेही। द्यावे.उदाहरणार्थ:-केशवसूत :मालगुंड ,
टिळक-रत्नागिरी,सिंहगड.
पर्यटन आयोजकांनी याचा समावेश त्यांच्या आराखड्यात करावा.परदेशी नाही का शेक्सपिअर चे घर बघायला लावतात तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0