'कविता' म्हणजे काय वेगळे

खोल दरीतले वाहते पाणी
उंच डोंगरावर पक्षी प्राणी

कानावर घोंघावणारे वादळ
नितळ दिसणारा सागरतळ

फांदीवर हळूच फूल डुलणारे
वाऱ्यावरून पान तरंगणारे

नभात चांदणी चमचमणारी
सागरात बोट हेलकावणारी

झाडावरून खार तुरुतरुणारी
रोपट्यावर कळी मोहावणारी

सशाचा डोळा लुकलुकणारा
वाळूतला शिंपला चमकणारा

कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे
एका झुरळाचे सहस्र डोळे

शब्दात रंगवणे हेच सगळे
"कविता" म्हणजे काय वेगळे ..!
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुमार वाटली.
____

Poetry Is....

how do I define, describe,
make it come alive so that you
might see what it is to me.....

poetry is an unfinished dream, a
thought given wings, and that
moment almost forgotten... it is

a reflection of self, a breath never
taken, and a memory I cannot
forget... poetry is a glimpse into

the past, vision of tomorrow,
and truth of today... it bleeds
sorrow and radiates joy, marks

time and remains timeless, is rich
tapestry and blank canvas, and
it is the music that fills my heart

and what it means to me is
....everything.

- जालावरुन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काव्या,
प्रतिसादाबद्दल आभार..
इंग्रजीची आवड नाही..
त्यामुळे आपल्या त्या कवितेबद्दल काहीच लिहू शकत नाही.
क्षमस्व !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी नाही हो जालावरुन आहे ती कविता.
____
माझा किंचितसा दुखावेल असा प्रतिसाद, खिलाडू वृत्तीने घेतल्याबद्दल आपलेही आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काव्या..

"सुमार वाटली" .. जे वाटले ते परखडपणे आपण लिहिले.
त्यामुळे दुखवण्याचा प्रश्न आला नाही. आभार .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0