मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४९

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करतात आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालले आहे. खरे तर कुणाचीच विचारधारा परिपूर्ण आणि पूर्ण सत्य नसते. वेगळ्या विचारधारा वेळोवेळी स्वीकारल्या तर जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळत राहते. कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेत आपल्या समस्यांचे उत्तर सुद्धा दडलेले असू शकते. पण वेगळी विचारधारा स्वीकारण्यात आडवा येतो तो अहंकार. कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

हा धागा , "मनातील छोटे-मोठे प्रश्न व विचार" मध्ये merge करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला सध्यातरी, वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा आणि ऐसीकर असल्याचा अहंकार आहे. आणखी दिवस जातील तसे 'न'व'न'वीन अहंकार चिकटण्याची दाट शक्यता आहे. शेवटी अहंकार असल्याचाच अहंकार होईल तो सुदिन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL आई ग्ग!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शीर्षक आणि धागा वाचून पुढे "सटाssssssक" लिहायचं राह्यलंय हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मोबाइलबद्दल आहे-
फोन मेमरी ४ जीबी लिहितात परंतू दीडच वापरायला मिळते ,ड्युल सिम अधिक मेमरी कार्ड एकाचवेळी वापरता येत नाही(काही सॅमसंग माडेलस) ही फसवणूक आहे का?

-अॅपस मेमरी कार्डावर टाकता न येणे ही हँडसेटस बनवणाय्रांची लबाडी आहे का अँड्रॅाइडची असमर्थता आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याकडे एचटीसी वन व्ही मोबाईल होता त्यावर अ‍ॅप्स मेमरी कार्डावर ठेवता येत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे अॅपसवाले अथवा फोनवाले काटछाट करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एसडीकार्डवरचे अॅप्स अनेक महत्त्वाच्या गोष्टींना पूर्णपणे न्याय देत नाहीत. (उदा. ब्याकग्राऊंड नोटिफिकेशन). बहुसंख्य यूजर्सना अशा टेक्निकल अडचणी समजत नसल्याने अॅपच्या लोकप्रियतेला बाधा पोचू शकते. त्यामुळे हा ऑप्शन बऱ्याच अॅप्समध्ये उपलब्ध नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी एक समाजशास्त्रिणी (sociologist) मैत्रीण आहे. sociology of childhood हा तिचा पिएचडीचा विषय होता, आणि ती सध्या बालरंगभूमी या विषयावर संशोधन करत आहे. मुंबईत किंवा महाराष्ट्रात बालरंगभूमीच्या संदर्भातील archives कुठे उपलब्ध आहेत, कोणाला माहीत आहे का? NCPA, आविष्कार, पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाचं केंद्र किंवा आणखी कोणाकडे काही दस्तावेज आहेत का? आम्ही बरीच दारं इमेल द्वारे ठोठावली, या क्षेत्रातल्या बर्‍याच दिग्गजांना इमेला पाठवल्या, पण कोणीच काही उत्तर दिलं नाही. अभ्यासक्षेत्राला प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी हातात माहिती असेल तर बरं होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पेसिफिक बालरंगभूमी हा अंमळ ट्रिकी टॉपिक झाला राव....निव्वळ मराठी रंगभूमी म्हणत असाल तर त्याबद्दल बर्र्याच नोंदी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी व्यनि करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वि० भा० देशपांडे यांनी संकलित केलेल्या नाट्यकोशामध्ये बालरंगभूमीविषयी एक सेक्शन आहे असं अंधुक स्मरतं.

आर्काईव्ज म्हणजे नक्की काय पाहिजे आहे? मौखिक इतिहास/आठवणी या सदराखाली बरंच मिळू शकेल. चित्रीकरण वगैरे अवघड असावं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हस्तलिखित इ. अपेक्षित असावे असे वाटते. इन दॅट केस, काही गोष्टी आहेत. पण त्यांतून बालरंगभूमी वेगळी निवडली गेली नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. मौखिक इतिहास, आठवणी चालतील. लहान मुलांचा रंगभूमीवरचा सहभाग, लहान मुलांनी साकारलेल्या भूमिका, प्रतिमा तसंच लहानांसाठी मोठ्यांनी सादर केलेली नाटकं - याविषयीच्या मुलाखती, फोटो, नाटकाची परीक्षणं इ. हवंय. मराठीत असलं तर जरा पंचाईत होईल, पण तरी चालेल. इंग्रजीत असेल तर अधिक बरं. (मैत्रीण मराठी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौखिक इतिहासासाठी सातत्याने बालनाटकं/एकांकिका लिहिणार्‍या लोकांना संपर्क साधावा असं वाटतं. पुण्यातल्या सुदर्शन रंगभूमीच्या प्रमोद काळे यांच्याकडून बरीच माहिती मिळेल. (ते माझे शिक्षक होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ" या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे उत्तर आहे की प्रतिप्रश्न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हांला काय वाटतं? ROFL

सिर्यसली: उत्तर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जॉब इंटरव्युमधे हा प्रश्न विचारणार्याला काय माहिती हवी असते? रिझ्युमेत लिहीलेल्याची समरी की तेसोडून इतर काही?

---------------

काय लोकयत तिज्यायला! हा प्रश्न इंटरव्यु सोडून कुठे विचारला जातो का? Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेंज लग्नातही हा किंवा याचा व्हॅरियंट विचारल्या जातो असे निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अच्छा. हे माहीत नव्हतं. मला वाटलं तेव्हा फक्त "स्वैपाक येतो का" विचारतात आणि सही जवाब "मॅगी बनवता येतं" असा आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मॅगी बनवता येतं"

या (आमच्याच) पाककृतीच्या तुलनेत फारच पुढारलेले कौशल्य म्हणावयास हवे हे! खरोखर पाककलानैपुण्याचा कळस आहे हा!

कमलाबाई ओगले, झालेच तर त्या कोण त्या धुरंधरबाई या सर्व मंडळींनी चरणाशी बसून कित्ता गिरविण्यासारखा आहे. ' एक हजारातील एक मॅगी पाककृती' या आगामी पुस्तकाची आगाऊ ऑर्डर कोठे नोंदविता येईल, ते जरूर कळवावे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची पद्धत चुकीची आहे. पाणी उकळल्यानंतर त्यात चमच्याने अंडी सोडायची असे http://www.maayboli.com/node/53938 या धाग्यातून कळले.

म्यागी म्यागी म्यागी http://www.maayboli.com/node/25148

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय डोन्ट हॅव टाईम असे.

हे प्रश्नाचे उत्तर आहे, टाळणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सीरियस इंटरव्ह्यूमध्ये मी शिक्शान, अणुभव वगैरे रिझुमेतल्याच गोष्टी सांगतो. गंमत म्हणून दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये या दोन गोष्टी सोडून बाकी काहीही सांगतो. (एकदा "यू फर्स्ट" असं कोणाला तरी म्हणायची विच्छा आहे!)

एका इंटरव्ह्यूअर ट्रेनिंगमध्ये सांगितलं होतं की असा प्रश्न हा "लेझी इंटरव्ह्यूअर्स क्वेश्चन" आहे. "समोर ठिवलाय सीव्ही तर वाच की भाड्या" असं इंटरव्ह्यू देणारा मनातल्या मनात म्हणतोच!

पण यापेक्षा माझ्या सणकून डॉक्यात जाणारा प्रश्न म्हणजे "व्हेर डू यू सी युवरसेल्फ फाईव इयर्स फ्रॉम नौ?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रैट मीपण रिझ्युमेची समरीच सांगते. पण कुठेतरी वाचलं की "मुलाखत घेणार्याने ते आधीच वाचलेलं असतं त्यामुळे वेगळं काहीतरी सांगा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढ्यातच (बोले तो काही महिन्यांपूर्वी) मी एका इंटरव्ह्यूत 'अलीकडे मी घरी दारू गाळू लागलेलो आहे' हे सांगितले होते. (रुचीतै, धन्यवाद.)

अर्थात, आजवरचा माझा दारू गाळण्याचा नेट अनुभव एक यशस्वी प्रयोग, एक फसलेला प्रयोग आणि पैपलैनीत मुरत पडलेले तीनचार बुधले इतकाच आहे, पण तरीही. गाळतो तर गाळतो; खोटे कशाला बोला?

(बादवे, ती नोकरी मिळाली, बरे का!)

(पण तरीही, या किंवा अशा प्रश्नांस नेमके काय उत्तर द्यावे हा प्रश्न मला अनेक वर्षे - अगदी अलीकडेअलीकडेपर्यंत भेडसावत असे, हे कबूल करतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत घेणार्याने ते आधीच वाचलेलं असतं त्यामुळे वेगळं काहीतरी सांगा

हे बहुतांश वेळा खोटं असतं! मुलाखत सुरू होण्यापूर्वी अर्धा एक मिनिट रेझ्युमे हातात पडतो.

वरील प्रश्न मी मुलाखतकार म्हणून विचारतो तेव्हा माझ्या मनात हा रेझ्युमे कशाला वाचत बसा, हा/ही आहे की समोर, सांगेलच सगऴ्ळं सगळळं!
शिवाय त्या बोलण्यात विसंगती दिसली की लगेच ती पकडून प्रश्न विचारता येतात. समोरचा/ची जितके अधिक बोलतील्त तितके प्रश्न विचारायला अधिक वाव असतो.

मी हा प्रश्न आला की फक्त तीच माहिती देतो ज्यासंबंधित प्रश्न मला चालणार असतात. साधारणतः या उत्तरावरून पुढे काय प्रश्न येणार हे आपण एका मर्यादेत डायरेक्ट करू शकतो. आणि र्का प्रश्नाच्या उत्तरात पुढल्या अपेक्षित प्रश्नाची बीजे गोवायची असतात - ती मी गोवतो

===

मात्र हे फेस टु फेस इंटरव्ह्युत सोपे जाते. टेलिफोनिक इंटरव्ह्यूत मला माझा इंटरव्ह्यू (म्हणजे मी इंटरव्ह्यू देतोय) फारसा दिग्दर्शित करणे जमलेले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वसाधारणपणे,

ज्यूनिअर मॅनेजमेंटची पोजिशन असेल तर तुमचे नाव देखिल वाचले गेलेले नसेल/आठवत नसेल.

मिडल मॅनेजमेंटसाठी प्राथमिक माहिती नक्कीच त्यांनी वाचली असेल. (नाव, मागच्या कंपन्या, कॉलेजेस, स्किल्स, इ)

टॉप मॅनेजमेंटसाठी सी वी चा कसून अभ्यास झाला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कंपन्यांमध्ये फकस्त म्यानेजमेंटच्या पोझिशन्स असतात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला वाटते कामगाराला हा प्रश्न विचारत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही.
-------------------------------------------
व्यक्ति एम बी ए असो वा नसो, लेबर अ‍ॅक्टच्या बाहेरच्या सार्‍या लोकांना या तीन श्रेणींत विभागायची 'सर्वसाधारण' पद्धत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रश्नाचं इथे उत्तर दिलं तर ते खासगी (पुन्याकडे खाजगी?) माहिती दिल्यासारखं होईल.
--------------------------------------------------------------------------
पण तरीही -

१. आय अ‍ॅम अरुण जोशी (कोणतेही विशेषण नाही, फक्त नाव), आय अ‍ॅम बॉर्न and brought up in ... अशी सुरुवात करावी. पहिली लाईन काय असावी हे अशा मोघम प्रश्नाच्या उत्तरात ठरवणं खूप अवघड जातं म्हणून सहसा असं करावं.
२. आपला सी वी चॅप्टर वाईज असतो. मंजे अनुभव, शिक्षण, स्किल्स, रुचि, रेफरेन्सेस, इ इ इ. म्हणून साधारणत हे "समथिंग" सी वी चं प्रतिरुप असलं तरी ते चॅप्टर वाईज न ठेवता टेम्पोरल ठेवावं. Information by topic reconfigured to information by time. पण आत्मचरित्राचे वर्णन करताना सीवीत नाही ते फार सांगू नये. बालपणाचे वर्णन करून नये. I did my 10th from ...वर सरळ यावे.
३. पर्सनल माहिती आणि प्रोफेशनल माहिती मिक्स करू नये. सारी पसर्नल माहिती एकत्र नि सारी प्रोफेशनल एकत्र सांगावी. टेम्पोरल फ्लोला तितका अपवाद चालावा.
४. या समथिंग मधे असं काहीही सांगू नये ज्याने उर्वरित "ओळख" बाजूलाच राहिल.
५. तुम्हाला जे लै भारी येतं आणि ते पुढचा अज्जिबात विचारायची शक्यता नाही त्याचा विशेष उल्लेख करावा. म्हणजे नोकरी सी++ प्रोग्रामिंगची असेल नि तुम्ही पॅशन म्हणून प्रोसेसर्स बद्दल २-३ पुस्तके वाचली असतील, ज्यांचा नोकरीशी संबंध तसा नाही, तर ते सांगायला हरकत नाही. पुढच्याला तुमच्या गल्लीत बोलावण्यासाठी हा 'समथिंग' वाला प्रश्न सर्वात सुलभ आहे.
६. मुलाखतीसाठी आपला जे डी नीट वाचावा. कंपनीची प्रोफाइल नीट वाचावी. कर्मधर्मसंयोगाने जर आपल्या प्रोफेशनल आयुष्यात यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा संबंध आला असेल तर त्याचा उल्लेख आवर्जून करावा.
७. 'समथिंग' चा शेवट संदिग्ध करू नये. बॉल तुमच्या कोर्टात पडला आहे, नीट पाहून घ्या असे व्यवस्थित जाणवले पाहिजे. म्हणजे शेवटी "and here I am today before you to seek an opportunity to work as ..." असा करावा.
८. जनरली मुलाखतकार समथिंग नंतर शिक्षणात गॅप असेल, किंवा अचानक मेरिट बंद झालं, किंवा एखादी नोकरी १-२ महिन्यात सोडली, आज लालाकडे खातेवह्या लिहिल्या, उद्या नासामधे प्रोजेक्टाइल ट्रेजेक्टरी काढली असले प्रकार असले तर लग्गचे असे का तसे का म्हणून विचारू लागतात. हे सगळे समथिंग चाच पार्ट मानावे.
९. समथिंग चे उत्तर देताना काय कृति घडल्या, काय कृति केल्या हे सांगावे. प्रत्येक कृतिमागे 'कारण कि...' असे म्हणू नये. त्यांनी सकारण समथिंग विचारले नाही. आता समजा तुम्ही ४ नोकर्‍या पटापट सोडल्या, वा तुमचे ८ प्रोजेक्ट्स अर्धवट राहिले, व त्याने पहिल्यानंतर का राहिले म्हणून विचारले, इ तर दुसर्‍यानंतर का राहिले हे स्वतःहून सांगू नये. पुन्हा विचारायचं असेल तर विचारेल. त्यालाही पुन्हा पुन्हा विचारायचा गिल्टी फिलिंग येऊ द्यावा.
१०. समथिंगचे उत्तर स्टँडर्ड नसावे. समोरच्याशी ते रिलेट होत आहे असे वाटले पाहिजे.
११. उत्तराप्रारंभी तुमचा जसा शिरस्ता आहे तसं - ब्रीफ, इलॅबोरेट, किंवा विचारून - किती वेळात उत्तर द्यायचे आहे ते ठरवावे. ते तुम्हाला आणि त्यांनाही माहित नसेल तर - आपण समथिंग पेक्षा समथिंग इंटरेस्टींग आहोत असं भासवावं. आपण घेतलेला वेळ समोरच्याला अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षा कमी जास्त निघाला तर संभाषण किती छान होते त्यावर डिपेंडिंग त्याकडे दुर्लक्ष होते.
१२. वर्णन मोघम करावे. हे उत्तर कोणताही फॉर्म भरून घेण्याकरिता वापरले जात नाही. जन्म २००५ ला झाला म्हणावे, रविवार दिनांक २५-०९-२००५ इ इ नाही.
१३. वर्णन हलकेसे ड्राय (पुण्याकडे याला शिष्ट म्हणत असावेत)करावे. मै सचिन कि बहुत बडी फॅन हूं म्हणत वेगवेगळ्या प्रकारे ओठ करू नयेत. आपल्या सर्वोत्कट भावना काय काय नि कुठे कुठे आहेत हे सांगायचा तो फोरम नव्हे. असला सगळा चहाटळपणा ऐसीवर करावा.
१४. I am very honest. I am very ethical असली विधाने करू नयेत. एका प्रोफेशनल माणसाने (म्हणजे बाईने सुद्धा) कसे असावे हे ठरलेले आहे. त्यामुळे ही विधाने रीडंडंट आहेत. शिवाय याचा अर्थ बाकीचे साधारणतः ऑनेस्ट नसतात इ इ तुम्ही मानता असा निगेटीव काढला जाऊ शकतो.
१५. "समथिंग" च्या उत्तराची एकवेळ रिहर्सल करावी. चांगला मोठा आरसा असला तर त्यासमोर (चांगला मित्र असेल तर आरश्यापेक्षा छान.). आपला फ्लो कुठे कुठे तुटतो, कुठे कुठे आपण at the loss of words, phrases असतो याची नोंद करावी. मंजे प्रत्यक्ष वेळी एकूणातच बोंबाबोंब असली तरी दृश्य बोंबाबोंब कमी भासेल.
१६. मुलाखत घेणारा एकच असेल तर, अनलेस यू हिज (यात हर सुद्धा आले) प्रोफाईल, फार तांत्रिक बोलू नये. ४-५ असतील तर, या प्रश्नाच्या उत्तरात, बोलल्यास चालेल. ते परस्परांत कोण्या दुसर्‍याला समजत असेलच असे समजतात. एकटा असेल तर मात्र त्याला काँशसली बोर व्हायला व्यवस्थित कारण मिळते.
१७. पॅनेलमधे स्त्री असेल तर बाबा इंजिनिअर आहेत इथेच पर्सनल माहिती बंद करू नये. It looks curt. आजकाल बायका फार संवेदनशील झाल्या आहेत. आई गॄहिणी आहे असे/इ अवश्य नोंदवावे.
१८. आपली राजकीय, सामाजिक मते नि अफिलिएशन्स सांगू नयेत. किमान स्वतःहून.
===================================================================================================
लक्षात घ्या कि तुमचा अनुभव जेव्हा १०-१२ वर्षांपेक्षा जास्त असतो, तेव्हा, जनरली, मुलाखतकार फक्त "समथिंग" हा एकच प्रश्न, प्रश्न म्हणून विचारतो. अन्य तांत्रिक, इ प्रश्न विचारणे अशिष्ट मानले जाते. या प्रश्नानंतर चर्चा करायची असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद ऑफ दी डे! टाळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दिवसभर ऐसी वर पडुन असतो/असते हे लपवून कसे ठेवायचे अजो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नेमके काय? सकाळी लॉगिन केलेले असणे आणि अधूनमधून चेक करणे याला पडीक म्हणावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या - मी काही ऑफेंसिव्ह बोलले का? इतके का लागावे मनाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही. मनाला लागले थोडीच. फक्त व्याख्या विचारली इतकेच. आंजावरचे इतके काही मनाला लावून घेतले असते तर आतापर्यंत आत्महत्याच करायला पाहिजे होती. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तू अगदी झी मराठी वरच्या जान्हवीचा पंखा दिसतोयस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै बा. "काहीही हां अनु राव" म्हटल्यावर मग पंखा, अदरवाईज़ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करीयर मधे आपल्या सेक्टरचे (जसे आय टी, सिमेंट, एनर्जी) ज्ञान होण्यासाठी ३-४ वर्षे रिगरस मेहनत करावी लागते. त्यानंतर आपल्या डोमेनचे (जसे सेल्स, स्ट्रॅटेजी, डिजाइन, इ)ज्ञान होण्यासाठी अजून ३-४ वर्षे लागतात. इतकी वर्षे तरी देवाला वाहायचीच असतात. त्यानंतर मात्र ज्या प्रमाणात आपल्या सेक्टर्-डोमेन इंटर्सेक्टमधे नविन ज्ञान येते त्यापेक्षा आपल्याकडे जास्ती वेळ असतो. चाणाक्ष मुलाखतकार असेल तर त्याला पटकन समोरच्याच्या ज्ञानाची खोली लक्षात येईल.

करीयरची पहिली ६-८ वर्षे टाइमपास केला, किंवा सेक्टर आणि डोमेन बदलेले आणि तरीही तिथे सुरुवातीला टाईमपास केला, मुलाखत घेणारा कडक निघाला, त्याच्या कंपनीला घाई, डेस्परेशन नसले तर ...काही लपवता येत नाही...वार्डरोब मालफंक्शन सुनिश्चित.
---------------------------------------------------------------------------------------------------
आणि समजा लपवले तरी त्याची दोन अंगे आहेत. १. एंट्री मारणे. २. नंतर सुखाने नोकरी करणे.
जी कामे हमालीची असतात यात तसेही मागे तुम्ही काय केले याने फरक पडत नाही. त्यात लर्निंग नसतेच. एक विशिष्ट प्रोसिजर शिकली कि संपले. कंपनीला जनरली आयडीया असते किंवा नंतर होते कि किती पगारवाला किती वेळात किती हमाली करू शकतो. म्हणून हमाल जॉब इ असेल तर लपवायचा वैगेरे विचार करायची गरज नाही.

आता काही ठिकाणी व्यक्तिच्या क्षमतेवर गोष्टी अवलंबून असतील. इथे लपवणूक करून एंट्री मारणे अवघड असते. नसले तर नंतर सुखाने नोकरी करणे अवघड असते. म्हणून असं करू नये. असं करणारे कसं करतात याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हल्ली अनेकदा टेलिफोनिक इंटरव्ह्यूची पद्धत बोकाळल्यामुळे कधी कधी फोनवरून एक इसम टेक्निकल इंटरव्ह्यू देतो आणि नंतर दुसराच जॉइन होतो. (पृवी लग्नात असे प्रकार केले जात असे म्हणे).

इंटरव्ह्यूई हैदराबादचा असेल तर शक्यता बरीच वाढते. (विसुनानांची माफी मागून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हैद्राबादस्थित उमेदवारांकडून खालील दोन अनुभवही आले आहेत.

१. टेलिफोनिक इंटरव्यूमध्ये खोटेपणा होतो म्हणून स्काईप वापरुन व्हिडिओ इंटरव्यू घ्या. असा आदेश आला. या व्हिडिओ इंटरव्यूमध्येही उमेदवार व्यक्ती केवळ तोंड हलवत होती व एक ब्याकग्राऊंड प्लेअर उत्तरे देत होता.

२. प्रत्यक्ष उपस्थितीतच इंटरव्यू घ्या असा आदेश आला. यातही इंटरव्यू पास होणारी व्यक्ती आणि नंतर जॉईन झालेली व्यक्ती या वेगवेगळ्या होत्या. अर्थात मोठ्या कंपनीत इंटरव्यूचे ठिकाण (पुणे), जॉईनिंगचे ठिकाण (बंगळूर), प्रत्यक्ष कामाचे ठिकाण (हैद्राबाद) असा बराच घोळ असल्याने हा प्रकार उमेदवार व्यक्तीच्या ब्याकग्राऊंड तपासणीत फारच उशीरा लक्षात आला. तोपर्यंत त्याचे मीटर टाकून कंपनीने बिलिंगही सुरु केले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड ओल्ड लॉजिकचे दिवस संपले. मध्यकानुवर्ती (Mean Reverting) आशावादी लॉजिकचे दिवस आलेत. सगळं कसं मध्यकानुवर्ती आहे आता. पूर्वी वर जाणारी गोष्ट कधी ना कधी खाली येणार असं म्हणायचे. आता खाली जाणारी गोष्ट कधी ना कधी वर जाणार यावर ठाम विश्वास आहे. मग एखाद्या कंपनीच्या प्रस्थापित ब्रॅंडची वाट लागत असली तरी गडगडलेला शेअर स्वस्तात विकत घेणे कसे शहाणपणाचे आहे यावर चर्चा घडतात; क्युईच्या काळात अर्थव्यवस्थेचे स्थितीनिर्देशक खराब निघाले की क्युई चालू राहणार म्हणून शेअरबाजार आणखी तेजीत येतो; आणि आता हा माणूस म्हणतो की लॉंग टर्ममध्ये युद्धाचे फायदेच फायदे आहेत. लॉंगटर्मवर किती भरवसा ह्यांचा!
http://www.washingtonpost.com/opinions/in-the-long-run-wars-make-us-safer-and-richer/2014/04/25/a4207660-c965-11e3-a75e-463587891b57_story.html
या मध्यकानुवर्ती लॉजिकला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे दोन लाख वर्षांच्या मध्यकापासून शेकडो मैल दूर आलेली लोकसंख्या कधीही मध्यकानुवर्ती होणार नाही हा विश्वास!
शेवटी,
"अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम्।
अन्यानि स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यं अत:परम्।।"
हेच खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यानिमित्ताने :

तुम्हाला जॉब/इतर इंटरव्हिऊमध्ये विचारला गेलेला आजवरचा सर्वात विनोदी प्रश्न कोणता?

मला एकदा जात विचारली होती! मला तिथेच बेकार हसू यायला लागलं होतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'आर यू मॅरीड?' असा प्रश्न टेक्निकल इंटरव्यूमध्ये विचारला होता. एचआरने वगैरे (इन्शुरन्स इ. भानगडींसंदर्भात) विचारला तर ठीक आहे. पण टेक्निकल इवॅल्युएशन करताना हा प्रश्न ऐकून हहपुवा झाली. कंपनीला नक्की कुठला परफॉर्मन्स अपेक्षित होता याबाबत माझा गैरसमज झाला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आर यू मॅरीड?' किंवा 'आर यू प्लानिंग टू गेट मॅरीड?' हे प्रश्न टेकनीकलमधेदेखील विचारतात. खासकरून मुलींना... किती काळ कंपनीत टिकेल, रात्री उशिरा थांबून काम करेल का, वटपौर्णिमेला वडाची पुजा करायला जायचे आहे म्हणून सुट्टी मागेल का हे जाणून घेण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात काहीही चालते, अमेरिकेत हे दोन्ही प्रश्न इंटरव्यूमध्ये बेकायदेशीर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय स्त्रीया लग्न झालं की पटकन नोकर्‍या सोडून देत असाव्यात म्हणून विचारत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इंटरव्यू कसा घ्यावा ह्याबद्दल नुकतच एक ट्रेनिंग झालं आमचं. त्यातला एक मुद्दा होता :-
विवाहित असण्या नसण्याने काही फरक पडतो का ?
तर होय. फरक पडतो; हे सामान्य निरीक्षण आहे; विशेषतः स्त्री उमेदवारांमध्ये ह्याची टक्केवारी अधिक आहे.
मग? "लग्न व मूलबाळ ह्यांच्याबद्दलचे काय प्लान्स" असे थेट विचारायचे का ?
अजिब्बात नाही. असे विचारणे चूक आहे.
पण रात्री उशीरापर्यंत काम करण्याची तयारी आहे का?
शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी आहे का ?
हे प्रश्न मात्र नक्कीच चालण्यासारखे आहेत; अवश्य विचारावेत.
त्यावरुन काय तो अम्दाज बांधावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पण रात्री उशीरापर्यंत काम करण्याची तयारी आहे का?

हे विचारणे बेकायदेशीर असायला हवे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्त्रियांकडून रात्री उशीरपर्यंत काम करवून घेणे बेकायदेशीर नाही. फक्त त्या सेफली घरी पोचतील ही जबाबदारी कंपनीची आहे. ie रात्री ८ नंतर डोअरस्टेप ड्रॉप, शेवटचा ड्रॉप स्त्रिचा न ठेवणे, घरी पोचल्यावर अॅडमीनला कॉल करणे इ सेफ्टी मेजर्स घ्यावे लागतात. ज्योती कुमारी चौधरी केसनंतर हे कायदे फॉलो करणे पुण्यातदेखील सुरू झाले. बंगळुरात त्याआधीच हे होत होते डिसेंबर ०५ HP कॉलसेंटर एम्प्लॉयीच्या केसनंतर. आणि हे कायदे सिनेक्रॉन फॉलो करत नव्हती. म्हणूनच नयना पुजारीची केस झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पण त्या केसमध्ये टाइमलाइनच वेग़ळी असते. उशीरापर्यंत काम म्हणजे एक्स्टेंडेड आवर्स काम करणे. तसे (पुरुषालाही) विचारणे बेकायदेशीर असायला हवे.

मी एका प्रॉजेक्टवर असताना मॅनेजरने सर्वांना Let's stretch ourselves and work on Sunday असे मेल पाठवले होते. तेव्हा पेरेंट कंपनीकडून मॅनेजरची हजेरी घेण्यात आली. अर्थात हे हजेरी घेणे रविवारी काम करून घेण्याबद्दल नसून "मेल लिहून लेखी पुरावा ठेवण्याबद्दल" असणार हे उघड आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उशीरापर्यंत काम म्हणजे एक्स्टेंडेड आवर्स काम करणे. तसे (पुरुषालाही) विचारणे बेकायदेशीर असायला हवे. >> सहमत आहे. खरंतर आयटीमधे रेअर स्कीलची गरज नसलेल्या कामांसाठी एकाच व्यक्तीला भरघोस पगार देऊन १०+ तास काम करून घेण्यापेक्षा दोन व्यक्तींना निम्मा पगार देऊन ६ तास काम करणे बरे पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे (पुरुषालाही) विचारणे बेकायदेशीर असायला हवे.

salaried exempt असाल तर ते बेकायदेशीर नाही. Typically, only executive, supervisory, professional or outside sales positions are exempt positions. Exempt employees are generally expected to devote the number of hours necessary to complete their respective tasks, regardless of whether that requires 35 hours per week or 55 hours per week. Their compensation doesn't change based on actual hours expended. Exempt employees aren't paid extra for putting in more than 40 hours per week; they're paid for getting the job done.

एकाच व्यक्तीला भरघोस पगार देऊन १०+ तास काम करून घेण्यापेक्षा दोन व्यक्तींना निम्मा पगार देऊन ६ तास काम करणे बरे पडेल.

कंपनीच्या दृष्टीने निम्मा पगार देणे फायद्याचे नाही. कंपनी निव्वळ पगार बघत नाही, तर त्यांची टोटल कॉस्ट बघते ज्यात पगाराव्यतिरिक्त इतर बेनिफिट्स, सुट्ट्या, पीएफचे काँट्रीब्यूशन, एम्प्लॉयी ट्रेनिंग वगैरे बरेच खर्च असतात. निम्मा पगार देऊन आज नोकर मिळू शकेल, पण उद्या त्याला त्याची बाजारातली किंमत कळली की तो/ती नोकरी सोडून जाण्याचा धोका असतो. नवीन माणसाला कामात तरबे़ज होण्यासाठी वेळ लागतो, कंपनीचे अजून नुकसान होऊ शकते. म्हणून चांगल्या कंपन्या शक्यतो बाजारभावाप्रमाणे पगार देतात, ज्यामुळे एम्प्लॉयी टर्नओवर कमी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात हे हजेरी घेणे रविवारी काम करून घेण्याबद्दल नसून "मेल लिहून लेखी पुरावा ठेवण्याबद्दल" असणार हे उघड आहे.

आणि आपल्याला नवयुगीन संस्थांचा सार्थ अभिमान असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्थात हे हजेरी घेणे रविवारी काम करून घेण्याबद्दल नसून "मेल लिहून लेखी पुरावा ठेवण्याबद्दल" असणार हे उघड आहे.

नॉट नेसेसरिली. मी एका फ्रेंच कंपनीसाठी काम करतो. त्यांच्या फ्रांसमधल्या हपिसात कोणी वीकांताला काम करतं असं एचारला समजल तर म्यानेजरची हजेरी घेतली जाते. जरी तो म्यानेजरला न सांगता काम करत असेल तर. अजून एक हाइट म्हणजे त्या लोकांना वर्षाला ६ आठवडे वेकेशन्स असतात. तो कोटा पूर्ण न केल्यास एचार जाब विचारतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फ्रान्सला कायमस्वरूपी इमिग्रेट करण्यासाठी नक्की काय प्रोसीजर आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच हा लेख वाचला http://www.theguardian.com/news/datablog/2015/jun/05/french-more-holiday...

भारतातपण टेकएममधे ३२ की ३५ सुट्ट्या होत्या म्हणे + १० पब्लिक हॉलीडे. जनरली प्रोडक्ट कंपणींत २४ आणि सर्विस कंपणींत १५ सुट्ट्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नॉट नेसेसरिली. मी एका फ्रेंच कंपनीसाठी काम करतो. त्यांच्या फ्रांसमधल्या हपिसात कोणी वीकांताला काम करतं असं एचारला समजल तर म्यानेजरची हजेरी घेतली जाते. जरी तो म्यानेजरला न सांगता काम करत असेल तर. अजून एक हाइट म्हणजे त्या लोकांना वर्षाला ६ आठवडे वेकेशन्स असतात. तो कोटा पूर्ण न केल्यास एचार जाब विचारतं.

सॅडिस्ट मनोवृत्ती आहे.. ( ही माहिती सांगणार्‍याची Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एका प्रॉजेक्टवर असताना मॅनेजरने सर्वांना Let's stretch ourselves and work on Sunday असे मेल पाठवले होते

तुमच्या त्या मॅनेजर ला डीमोट करायला पाहीजे होते. त्याला इतके सुद्धा माहीती नाही की अश्या गोष्टी मेल वर लिहायच्या नसतात, तर फक्त तोंडी सांगायच्या असतात. कसा काय मॅनेजर झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रश्न टेकनीकलमधेदेखील

टेक्निकल इंतर्व्ह्यू घेणारेच थेट बॉस असतात, अनलेस यू आर जॉइनिंग एच आर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीवर गरीब, दलित, पिडित, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित, गावकरी इ इ ना झोडण्याची फॅशन आहे.

इथले काही समज, गैरसमज असे आहेत-
१. त्यांचे जीवन आपल्यावर निर्भर आहे.
२. ते काही करत नाहीत.
३. ते नसावेतच. त्यांचा खातमा केला पाहिजे.
४. आपल्या कष्टाचे लाभ, सरकारने, त्यांना देऊ नयेत.
५. त्यांचा उद्धार न झाल्याने काहीही फरक पडत नाहीत.
६. ते आपले नाहीतच.
७. त्यांच्यावर अन्याय करणे नॉर्मल आहे.

यातल्या बर्‍याच गोष्टी मांडताना काहीही तारतम्य बाळगलं जात नाही. अशा तत्त्वज्ञानातलं एखादं उपविधान वा विदा सत्य असू शकतो, पण तरीही एकूणातच भाषा वापरायची पद्धत योग्य असली पाहिजे.

Such people should be lobbied against.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उलटेही खरे आहे.. केवळ पॉईंट पूर्ण करण्यासाठी.. दरी दोन्हीकडून तयार होऊन बहुधा वाढते आहे.

गावगाड्यात, गावकर्‍यांमधे, कष्टकरी समाजात (जिथे एकत्र येणं होतंय तिथेच अर्थात) - शहरी मनुष्य म्हणजे सुखासीन, कमी श्रमात जास्त कमावणारा, एसीत बसून शहाणपण / तत्वज्ञान उपदेश झोडणारा, आर्मचेअर पंडित, हस्तिदंती मनोर्‍यातला (हे एक्झॅक्ट शब्द नसतील तरी..) इत्यादि अशा असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Really? Do you mean these classes are adequately represented here, by themseleves or by third parties?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नॉट हिअर.. बट व्हेअर दे आर.

सॅम्पल साईझ छोटा असला तरी अ-शहरी व्यक्तींकडून कोणत्याही संवादात "तुम्हाला एसीत बसून बोलायला काय जातंय", "पोट भरलेलं असलं की हे बोलणं सोपं आहे", "मातीत हात न घालता तुम्ही..", "जमिनीवर या आणि परिस्थिती बघा" , "तुम्हाला गावगाडा कळणार नाही साहेब" यासम आशयाची वाक्यं येतातच.

बरोबर आहे.. शहरी माणूस एक्झॅक्टली मातीत हात घालत नाही.. तो कदाचित काही प्रमाणात जास्त कमावतही असेल.. पण एकूण त्याला जाणीवच नसते हे मत अ-शहरी भागात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच. बहुतेकवेळा स्वतःची अक्षमता झाकण्यासाठी अशी वाक्ये फेकली जातात. त्यामुळे गावकर्‍यांबद्दल अढी असणे नक्कीच समजू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं हे मुद्द्याला अवांतर आहे.
---------------------------------------
गवि, शेतकरी काय म्हणतो याबद्दल चर्चा करा. तुम्ही कशा परिस्थितीत त्याच्याबद्दल बोलताय हे तो कसे वर्णितो ते नाही. कदाचित भिन्न परिस्थितीत (से एसीत) बसून तुम्हाला जे सुचते ते अग्राह्य आहे असे शेतकर्‍याचे मत चुकीचे असेल. तो भाग वेगळा. पण शहरी लोक मारून टाकावेत, ते काहीच करत नाहीत, आमच्या पैशावर जगतात, इ इ ते बोलतात का? ती सात विधाने पुन्हा का? ती शेतकर्‍यांची शहर्‍यांबद्दल प्रातिनिधिक मते आहेत का?

प्रश्न असा आहे कि अत्यंत असंवेदनशील मते मांडून अनेक लोक या फोरमवर स्कॉट फ्री सुटतात. त्यांना ट्रोल मानले तरी, डू नॉट फीड द ट्रोल ला पण एक मर्यादा असावी अशा केसेसमधे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण शहरी लोक मारून टाकावेत, ते काहीच करत नाहीत, आमच्या पैशावर जगतात, इ इ ते बोलतात का? ती सात विधाने पुन्हा का? ती शेतकर्‍यांची शहर्‍यांबद्दल प्रातिनिधिक मते आहेत का?

गब्बर आणि अनु राव यांची मते म्हणजे ऐसीकरांची प्रातिनिधिक मते कशावरून? हाईट आहे राव. दोन लोकांची मते पाहून 'शहरी लोक कसे ट्रोल' इ.इ.
सूतस्वर्गन्याय लावणे म्हणजे कहर आहे. बेनिफिट ऑफ डौट का नै देत तुम्ही शहरी लोकांना? की ते फक्त गावकर्‍यांचे प्रिव्हिलेज आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सूतस्वर्गन्याय लावणे म्हणजे कहर आहे.

माझ्या पाहण्यातल्या जवळजवळ सर्वच शहर्‍यांना गावकर्‍यांबद्दल सहानुभूती वा आपुलकी वा तत्सम भावनाच पाहिली आहे. पण असो, तुमच्याशी बोलणे म्हणजे निरर्थक आहे. मला जे म्हणायचे नाही तेच मला म्हणायचे आहे म्हणून लिहिल्यास मी काय करू शकतो?

हे दोन सदस्यांबद्दल नाही. अनेक लोकांची अशी मते आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मलाही माझ्या सर्कलमध्ये जाळा-मारा छाप भावना कुठे दिसली नाही, त्यामुळे तुमच्याशी बोलणे निरर्थक आहे असे समजावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण एकूण त्याला जाणीवच नसते हे मत अ-शहरी भागात आहे.

गवि - मुळात असली टोचणी लागणारी जाणिव असाविच का हा प्रश्न आहे. तुमच्या, बॅट्याच्या, मनोबांच्या, गब्बरच्या आणि कदाचित ऐसी वरच्या ९८% सदस्यांच्या गेल्या ४-५ पिढ्यातल्या कोणी सुद्धा आदीवासी, शेतकरी,..... अश्यांना नाडले नसेल.
त्यांची जी काही सो-कॉल्ड वाईट (?) परीस्थिती आहे त्याला सुद्धा ह्या सेट मधल्या कोणी दुरुन सुद्धा जबाबदार असेल असे वाटत नाही. मग उगाचच ही जाणीव, टोचणी वगैरे कशाला?

आणि इतकेच जर संवेदनशील मन असेल तर मग सोमालिया, छाड, बुरुंडी वगैरे मधली लोक तर जास्त वाईट स्थितीत आहेत, मग त्यांचे उल्लेख आधी यायला पाहीजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुमच्या, बॅट्याच्या, मनोबांच्या, गब्बरच्या आणि कदाचित ऐसी वरच्या ९८% सदस्यांच्या गेल्या ४-५ पिढ्यातल्या कोणी सुद्धा आदीवासी, शेतकरी,..... अश्यांना नाडले नसेल.

याबद्दल साशंक आहे. म्हणजे आपण नाडतो आहोत असं त्यांच्या लक्षात येऊनही ते नाडतच राहिले असे नसेल. पण नाडले नसेल (असंच असतं अशा समजुतीने) असे खात्रीने सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमच्या ४-५ पिढ्यात नक्की नाही नाडले वगैरे. उलट बर्‍याच नातेवाईकांना ह्या गावकरी लोकांमुळे जमिन सोडुन शहरात पळुन यावे लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..चोक्कस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आणि शहरे विस्तारली, प्रकल्प आले, धरणे आली ती हवेतच बरं का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> तुमच्या, बॅट्याच्या, मनोबांच्या, गब्बरच्या आणि कदाचित ऐसी वरच्या ९८% सदस्यांच्या गेल्या ४-५ पिढ्यातल्या कोणी सुद्धा आदीवासी, शेतकरी,..... अश्यांना नाडले नसेल. <<

४-५ पिढ्या म्हणजे सुमारे १२५-१५० वर्षं. तेव्हाचे माझे पूर्वज बहुभूधारक (पक्षी : जमीनदार) होते. त्यांची बक्कळ शेती होती पण मातीत हात बरबटून घेत ती त्यांनी स्वतःहून कधीच कसली नाही. कुळांकडून शेती कसून घेण्याची तेव्हाची पद्धतच होती. कुळं म्हणजे (साधारणतः) ज्यांना स्वतःच्या मालकीची जमीन नाही आणि जे रोजीरोटीसाठी इतरांच्या शेतात मजुरी करत असे लोक. त्यांचं सामाजिक स्थान निम्न असे. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असे. हे सगळं पाहता आणि माझ्या घरच्यांचा एकंदरीत (सामाजिक, आर्थिक वगैरे) माज पाहता त्यांनी कुळांना नाडलं नसेलच असं छातीठोकपणे मी तरी म्हणू शकत नाही. किंबहुना नाडलं असण्याचीच शक्यता जोरकस आहे. त्यामुळे तुमच्या ९८% सदस्यांमध्ये मी बसत नाही. तद्वत माझी दिलगिरी कबूल करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आणि हिशेब ४-५ पिढ्यांचाच का करायचा? एकूण सगळा हिशेब केला, अनादि अनंत हिशेब केला, तर त्यांचे जागी आपण आणि आपल्या जागी ते असते, किंवा ही विषमता नसती. तेव्हा अनुजी, सोयिस्कर हिशेब देखिल चुकीचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुळांकडून शेती कसून घेण्याची तेव्हाची पद्धतच होती. कुळं म्हणजे (साधारणतः) ज्यांना स्वतःच्या मालकीची जमीन नाही आणि जे रोजीरोटीसाठी इतरांच्या शेतात मजुरी करत असे लोक

चिंज - म्हणजे दुसर्‍याला नोकरीला ठेवणे म्हणजे नाडणे असे तुमचे मत आहे. सध्या माझ्या कंपनीचा मालक पण मला आणि तुमच्या कंपनीचा मालक तुम्हाला नाडतो आहे असे समजायला पाहीजे.

त्यांची बक्कळ शेती होती पण ती त्यांनी स्वतःहून कधीच कसली नाही. कुळांकडून शेती कसून घेण्याची तेव्हाची पद्धतच होती

मी जिथे नोकरी करते तिथला मालक पण काय काम करतो की नाही कुणास ठावूक.

त्यांचं सामाजिक स्थान निम्न असे, त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असे.

माझे सामाजिक स्थान ही मला नोकरी देणार्‍या आणि माझ्या मॅनेजर पेक्षा निम्न आहे, आर्थिक परीस्थिती पण वाईट आहे त्यांच्या पेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> म्हणजे दुसर्‍याला नोकरीला ठेवणे म्हणजे नाडणे असे तुमचे मत आहे. <<

  1. जेव्हा नोकराचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा मालकापे़क्षा खूप खालचा असतो;
  2. जेव्हा नोकराला नोकरीचे इतर पर्याय फारसे किंवा अजिबात उपलब्ध नसतात;
  3. जेव्हा नोकराला कायदेशीर हक्क आणि सामाजिक सुरक्षितता नसते;

अशा परिस्थितीत नोकर-मालक नात्यामध्ये मालक नोकराचं शोषण करत असण्याची शक्यता वाढते असं माझं मत आहे. आणि १२५-१५० वर्षांपूर्वी कुणबी-कुळं आणि जमीनदार ह्यांच्यात अशी परिस्थिती होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ऐसीकरांबद्दल बोलतोय. वरील ७ पैकी कोणते समज गावकर्‍यांचे शहरवासियांबद्दल असावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे गावकरी फार दिसत नैत म्हणून गावकरी शहरी लोकांना भगवान समजतात असे तर मत नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर मांडलेली मते गावकर्‍यांची शहर्‍यांबद्दल नि शहर्‍यांची गावकर्‍यांबद्दल नसावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्ही तर समजत होतो की ऐसीवर पुरोगाम्यांचे वर्चस्व आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो - तुम्ही काहीही लिहीताय. कोणाचाच खातमा वगैरे करा असे माझे मत नाही (पॉइंट ३ ). कोणावरच्या अन्यायाला नॉर्मल म्हणत नाही मी (पॉइंट ७ ).

बाकी आदीवासी आणि कुणी काय करतात, काय करत नाहीत ह्याच्याशी माझे काही घेणे देणे नाही. त्यांनी मजेत रहावे आणि मला पण मजेत राहू द्यावे.

मनोबांनी एकदम त्यांच्या धाग्यावर आदीवासींना आणले म्हणुन लिहायला भाग पडले मला की "आधी स्वताची काळजी करा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो - तुम्ही काहीही लिहीताय.

काहीही हं अजो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या अँटी पूअर लॉबीच्या प्रत्येकाची ही सगळी मतं नाहीत. प्रत्येकाची चार वेगवेगळी मते असतात. तुमची ७ पैकी ५ आहेत हे देखिल कॉज फॉर फाइट असायला हवे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अँटी पूअर

मी पण पूअरच आहे हो अजो, फक्त रेफरन्स पॉईंट बदलायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅगीमध्ये लेड सापडल्याबद्दल नेसलेवर कारवाइ होइल. भाज्यांमध्ये पेस्टिसाइड्स सापडल्यावर शेतकर्‍यांवर कारावाई होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुपभौ, भाजी कधी उभ्या आयुष्यात बनवलेली दिसत नाही.
अ‍ॅनि वे, शेतकरी विथ पेस्टीसाईड भाजी विकतो. ती तुम्ही घरी आणून धुवायची असते नीट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धुतल्यावर सगळी पेस्टिसाइड्स जातात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जी काय उरतात त्यांनी माणसांना काही होत नसावे.

एका पेस्ट कंट्रोल कंपनीवर एका ग्राहकाने खटला दाखल केला. तुमच्या पेस्टिसाइडने माझा कुत्रा मेला. कंपनीने बचाव केला, "आमच्या कंपनीवर लोकांनी आमच्या औषधाने झुरळे आणि इतर किडे मरत नाहीत असे हजारो दावे लावले आहेत. झुरळे मरत नसतील तर कुत्रा कसा मरेल?" ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लॅपटॉपच्या किबोर्ड मधे चिकार जीव जंतू असतात. ते काढायची सोय ठेवली नाही म्हणून डेल, आयबीएम वर कारवाई होते का?
-----------------------------------------------------------------------------------------
अ‍ॅनि वे, धुतल्यानंतरही इतके पेस्टीसाइड उरते कि माणसे आजारी पडतात, रोगी होतात, मरतात असा विदा असता तर किमान एफ डी ए ने अमेरिकेत तरी फक्त ऑर्गॅनिक भाज्याच ठेवल्या असत्या ना? बाकीच्या बॅन केल्या असत्या. अमेरिकेत ऑर्गॅनिक भाज्यांचे खाण्याचे प्रमाण एकूणाच्या फार कमी, अमेरिकेत जगापेक्षा भाज्यांचे भाव कमी आहेत, तरी असं का?
उगं बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं?
आन उद्या लोक मरू लागले तर शेतकर्‍यांना कोण सोडणार आहे?
सरकार म्हणते का लावा पाहिजे तेव्हढा गांजा, तुम्हाला शेतकरी आहात म्हणून आम्ही काही करणार नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लॅपटॉपच्या किबोर्ड मधे चिकार जीव जंतू असतात. ते काढायची सोय ठेवली नाही म्हणून डेल, आयबीएम वर कारवाई होते का?

खाण्यालायक कीबोर्ड विकणे सुरू झालेय का? नसल्यास वडाची साल मंगळाला जोडलेली पाहून खतरनाक मनोरंजन झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो किबोर्ड खातात असे कुठे म्हणालो मी? खाताना किबोर्डवर हात पडतो, पडू शकतो नि ते प्रचंड डेंजरस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खाताना किबोर्डवर हात पडतो, पडू शकतो नि ते प्रचंड डेंजरस आहे.

हातावर इतकाही ताबा नसणे म्हणजे हाईट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे मात्र खरं हं. आपण मुक्त करू या डेलला सार्‍या दोषांतून. खुश?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याचा काय संबंध आहे ओ. मी डेल कंपनीचा सीईओ का चेरमन थोडीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वैसे होमिओपॅथीवालों की मानो तो गंगोत्री में लोहा भागीरथी में डूबोया तो उसका (लोहे का) एकाद अणू ढाका के पास मिलेगा, और वो पानी आप की सेहद पे असर करेगा. तेव्हा कशाने काय होते नि काय नाही हे कंपिटंट ऑथॉरिटीजनी सांगू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होमेपदी म्हशीलाच काय, माणसालाही चालत नाही असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. पण ते तुम्हांला कधीच पटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजचा कंच्या ब्रँडची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचा ब्रँड एकच- अमूल किंवा तत्सम कंपनीचे दही आणून त्यापासून बनवलेले, जलजिरा पूड व मीठ घातलेले ताक.

तदुपरि- होमेपदी इज़ बकवास. अ‍ॅज़ इन, जो कै इफेक्ट होतो तो प्लासिबो इफेक्टपेक्षा वेगळा नाही असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. पण ते पटणार नाही हेही माहिती आहे. सबब समजावायच्या भानगडीत पडत नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जास्त पेग झालेत, असो.
----------------------------------------------

होमेपदी इज़ बकवास. अ‍ॅज़ इन, जो कै इफेक्ट होतो तो प्लासिबो इफेक्टपेक्षा वेगळा नाही

+१
असेच मत मी देखिल कैकदा इथेच व्यक्त केले आहे.
============================================================================
१. I just cited their philosophy.
(अवांतर 2. सारी होमो. औषधे प्लेसबो इफेक्ट वाली नसतात. काही काही त्या कॅटेगिरी मधे मानली जातात पण त्यांचा फॉर्म्यूला (म्हणजे बेसिक प्रिन्सिपल) अ‍ॅलोपॅथिक सारखे असते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जास्त पेग झालेत, असो.

नाही. कंपनीतले क्यांटीन चांगले ताक बनवत नाही.

(अवांतर 2. सारी होमो. औषधे प्लेसबो इफेक्ट वाली नसतात. काही काही त्या कॅटेगिरी मधे मानली जातात पण त्यांचा फॉर्म्यूला (म्हणजे बेसिक प्रिन्सिपल) अ‍ॅलोपॅथिक सारखे असते.)

मी तर उलटे ऐकलेय. होमेपदी के अनुसार, जितके डायल्यूशन जास्ती तितका इफेक्ट जास्ती. सबब वरील औषधे कोणती हे जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या, तुला झालंय काय?

(अवांतर 2. सारी होमो. औषधे प्लेसबो इफेक्ट वाली नसतात. काही काही त्या कॅटेगिरी मधे मानली जातात पण त्यांचा फॉर्म्यूला (म्हणजे बेसिक प्रिन्सिपल) अ‍ॅलोपॅथिक सारखे असते.)

मी तर उलटे ऐकलेय. होमेपदी के अनुसार, जितके डायल्यूशन जास्ती तितका इफेक्ट जास्ती. सबब वरील औषधे कोणती हे जाणून घ्यायला आवडेल.

सकाळपासून कोणी भेटला नाही म्हणून माझी खेचतोस का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आईरक्ताची शप्पथ खेचत नाहीये. वरील विचार मी मिपा/ऐसीवरच पाहिलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे मग मी काय म्हणतोय? तेच तर म्हणतोय. हे विचार इथेच आढळत आहेत, ट्रोल म्हणून (डू नॉट फीड पॉलिसी) वा पटले म्हणून दुर्लक्षित होत आहेत. पण त्यांचा प्रतिवाद करणारे स्त्राँग लोबी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देन जॉईन द रिबेलियन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो+++१०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0