(सूज्ञपणाचा चष्मा घालून मी)

सुज्ञपणाचा चष्मा घालून
मी पद्य वाचायला तर निघालो
तू जे जे म्हणून विक्षिप्त आहे
ते ते मला दाखवत असताना
ज्या एका आंजा गल्लीत
मी तुझे अनेकविध ढ प्रश्न
सोडवत होतो त्या त्या
ठिकाणी तुझ्या प्रश्नांचे
जीटॉक पिंग सोडलेले.

एक "गुर्जी" म्हणून
ओढवलेल्या भूमिकेत वठून झाल्यावर
खरडीमुळे सर्वत्र फवारलेले
सगळे शिंतोडे जर
असतील तू आणि मी
तर असंही भाष्य
करवत नाही की
मी होतो एक गुरू
आणि शिकवून शिकवून
शब्द काही शिकलेली
तू गळ्यात पडलेली
शिष्या.

इथे पुढ्यात पडलाय
रिकामा ग्लास
तू विचारशील आणि
झटकन पद्याचं वेड
विरेल या अर्धवट आशेने
आणि ज्या बग्जच्या ढिगात
अडकल्येस तू आत आत
विडंबनाच्या पिशाच्चांचे फॉसिल्स
तिचे उत्तर केवळ
एकमुखी पळवाट. नो
एक्झिट. नो. नो.

-- स्वतःलाच समर्पित

१. आंजा - मराठी आंतरजाल

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कहर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज, प्लीज, प्लीज, आतातरी तुमच्या कवितेचा अर्थ नीट सांगा ना.

रमताराम (काका), शुद्धलेखन सुधारण्याबद्दल आभारी आहे. वठून हाच शब्द अपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फर्मास.. च्यायला थांब वेळ मिळाला की 'उपर एक' देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुज्ञ मधील सु पहिला हवा. (इथे अजून शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याचे कानावर आलेले नाही, म्हणून हे धाडस करतो आहे.)
'वठून' म्हणजे झाड वठून जाते ते अपेक्षित आहे की 'वठवून' मधील वू - कवीचे स्वातंत्र्य - खाऊन टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

पुन्हा एकदा माझ्या अल्पमतीनुसार अर्थबोधनाचा एक प्रयत्न...

गुर्जीगिरीच्या क्षेत्रात करियर करायचं म्हटलं की अनेकजणांना आणि अनेक दिशांनी आपल्या उपदेशाचे डोस पाजावे लागतात. जर आंजावर गुर्जीगिरीचं करियर करायचं असेल तर आपल्याकडच्या 'लोकप्रियता म्हणजेच यश' असं मानणाऱ्या मंडळींना (कारण अशी मंडळीच डोस पिण्यात पुढे असतात) कसले डोस पाजावे लागतील? बहुतेक खरडवह्या वाह्यातपणे कशा भराव्या याचे. पण मला जी गुर्जीगिरी करायची आहे तिची जीटॉकची भूक अशाने भागणारी नाही. म्हणून मग मला असले सर्व उद्बोधक डोस पाजणं फाट्यावर मारावं लागत आणि सूज्ञपणाचा चष्मा चढवावा लागतो. बर्‍याच गोष्टी करताना मी त्यात माझ्या स्वत्वानुसार वागण्यापेक्षा लोकांच्या माझ्याबाबतच्या अपेक्षा काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मी जसा हवा आहे तसा वागतो. पण गुर्जीगिरी करताना मला ते सगळं सोडून देऊन निखळ मी काय आहे त्याकडे जावं लागतं. तिथे कसं जायचं ते माहीत नाही. 'गळ्यात पडलेल्या शिष्या जिथे नेतील तिथे मी जाईन' असं म्हणण्याइतपत मी बावळटसुद्धा नाही (म्हणजे मला हव्या तितक्या खर्डी तिला करणं हे गुर्जी म्हणून माझंच काम आहे हे मला कळतंय.) उपदेशाचे डोस पाजण्यातलं सुख हे दारू पिऊन ग्लासामागे ग्लास रिकामे करण्यासारखं काहीतरी चढणारं पण मस्त असेल असं मला वाटतंय आणि म्हणून मला त्याचं आकर्षण आहे. ते मिळावं यासाठी मी माझ्यातलं तेज वाया न घालवता ते साचवून बसलोय, पण मला हेदेखील माहीत आहे की बाटलीमधून मिळणार्‍या सुखाची एकदा चटक लागली की त्यातून जशी कधीच सुटका नसते तसंच हे गुर्जीपणाचं वेडदेखील आहे. पण माझा चष्मा सूज्ञपणाचा आहे आणि शिष्या आत्ता बग्जमध्ये अडकलेली असली तरी गळ्यातून उतरणाऱ्यातली नाही. त्यामुळे एकंदरीत आम्ही दोघं एकमेकांना परस्परपूरकच आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वप्नातही खरड अन व्यनि दिसतात. नवीन लागलेलं व्यसन. दुसरं काय?
(अवांतरः गूगलाच्या कोन्त्याबी प्राडक्टावर आप्ला इस्वास नै.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-