लोकसत्ता: 'वाचावे नेट-के'मध्ये मराठी ब्लॉगलेखकांची दखल

'लोकसत्ता'मध्ये जानेवारीपासून 'वाचावे नेट-के' म्हणून नवीन सदर सुरू झालेलं आहे. आंतरजालावर मराठीत लिखाण करणार्‍यांचा लेखाजोखा त्यात दर सोमवारी घेतला जातो. गेल्या सोमवारच्या लेखात नंदन आणि संवेद या मराठी आंतरजालावरच्या जुन्या खेळाडूंची त्यात दखल घेतली गेली होती. 'हेतू तपासणारं विश्लेषण' या शीर्षकाच्या आजच्या सदरात आपल्याइथे लिहिणार्‍या आणि आपल्या नैसर्गिक शैलीत सहजसाधे पण अंतर्मुख करणारे अनुभव लिहून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आतिवास यांच्या ब्लॉगची दखल घेतली गेली आहे. या सर्वांचं अभिनंदन!

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

छान रे माहितगारा.आपल्या नोकर्‍या,व्यवसाय सांभाळून मायमराठीच्या विश्वजालात योगदान देणार्‍या ह्या नवपिढीचे कौतुक करावे तेवढे थोडे.मध्यंतरी युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात एका ब्लॉगधारकाने मराठीचा आग्रह धरल्याची बातमी ब्लॉगवरच वाचल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनंदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

नंदन, संवेद आणि आतिवास यांचे हार्दिक अभिनंदन!
सदर सदर चालवणार्‍यांची आवडनिवड उत्तम असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविता ताई,

हार्दिक अभिनंदन

तुमचे लेखन आहेच तेवढे उस्फूर्त, निर्मळ आणि रोखठोक थेट मनात उतरणारे.

'लोकसत्ता' सारख्या लोकप्रिय दैनिकाने तुमच्या लेखनाची "नेट-के" मध्ये दखल घेतली नसती तरच नवल.
खूप खूप आनंद झाला

मनापासून अभिनंदन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिघांचेही अभिनंदन.
या निमित्ताने नंदन लिहीता व्हावा. आतिवासचं लेखन वाचायला आवडतंच. संवेदचा ब्लॉग यादीत नव्हता, आणि अशीच भर नेट-के सदरातून पडेल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिन्ही ब्लॉगलेखकांचे अभिनंदन! आंतरजालीय वाचकांना दर्जेदार लेखनाची ओळख करून देण्याचा हा उपक्रम आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही लेखकांचे अभिनंदन.
आनंदात थोडा मिठाचा खडा टाकत असल्याबद्दल आगाऊच क्षमस्व. परिचय करून दिला हे खरे पण लिखाणाची शैली मुळीच आवडली नाही. स्तुती करताहेत की टोपी उडवतायत, टर उडवतायत असा संभ्रम निर्माण करणारे लेखन वाटले. लेखनाची नि लेखकाची अशी आडून टर उडवण्याआधी त्या लेखनाने स्वतःचा प्रत्यक्ष परिचय द्यायला हवा असे वाटते. टीका करणार्‍याने आपली इलिजिबिलिटी दाखवून द्यायला हवी. अन्यथा जालावर धुमाकूळ घालणार्‍या डुप्लिकेट आयडींपेक्षा महोदय अभिनवगुप्त वेगळे नाहीत असे म्हणावे लागेल. आणि असले लिखाण जर वृत्तपत्रे छापू लागली तर ती गॉसिप मॅगजीन्सच्या नि न्यूज चॅनेल्सच्या उथळ मार्गाने चालली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
(याच वृत्तपत्रसमूहातील नियतकालिकाने अशोक जैन यांचे उथळ नि उच्छृंखल असे ज्येष्ठांचा परिचय या नावाखाली टवाळी करणारे सदर चालवले होते बहुधा. त्यांना सोडले नाही तर हे ब्लॉगर्स तर बिचार किस झाड की पत्ती.) वर उल्लेख झालेल्या ब्लॉग्सपैकी दोघांचा माझा चांगला परिचय आहे त्यामुळे हे कदाचित अधिक खटकले असावे मला.

फक्त मलाच असे वाटले असेल तर क्षमस्व आधीच म्हटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तीनही लेखकांचे अभिनंदन.
परिचय करून दिला हे खरे पण लिखाणाची शैली मुळीच आवडली नाही.

सहमत आहे. शिवाय एका विवक्षित संकेतस्थळाची सवंग जाहिरात कशासाठी हेही कळाले नाही...
पण तरीही या तीघांचे अभिनंदन.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ररांशी अत्यंत सहमत. काय वाटेल ते आणि हरकत नाय या अत्यंत सुपरिचित आणि उत्तम ब्लॉग्जविषयीही छद्मी उल्लेख वाचला होता याच सदरात.

कायवाटेलते या ब्लॉगराज म्हणावा अशा पायोनियर ब्लॉगचे कर्ते महेंद्र कुलकर्णी हे आवर्जून आणि आस्थापूर्वक आपल्या प्रत्येक वाचकाच्या प्रतिसादाला उचित अशी पोच देत असतात. या गुणाचा हेटाळणीने उल्लेख करुन वपुंच्या प्लेझर बॉक्स वगैरेशी तुलना केली आहे आणि त्याला गुडी गुडी म्हटलेलं आहे. (कोणाला झोडताना बिचार्‍या वपुंनाच मधे आणून टीकेसाठी का धरतात काही कळत नाही.. मध्यमवर्गीयाला समोर ठेवून लिखाण करणं म्हणजे मागास का? असो तो वेगळा विषय.) तेव्हाही प्रचंड विषयविविधता असलेल्या (खादाडी, करंट इव्हेंट्स, पुराणकालीन शहराचे उत्खनन, भटकंती, नातेसंबंध आणि काय नाही..?) काय वाटेल ते या ब्लॉगचा उल्लेखित सदरातला असा उल्लेख फार खटकला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>स्तुती करताहेत की टोपी उडवतायत, टर उडवतायत असा संभ्रम निर्माण करणारे लेखन वाटले.<<

आतिवास यांच्याविषयी जे लिहिलं आहे ते असं अजिबातच वाटलं नाही. 'ताजी नोंद जरा माहितीपर वाटणारी आहे' असं म्हणतानाच -

दोन भागांची, वाचण्याआधी फक्त ‘मोठय़ा इव्हेंटचं वर्णन’ भासणारी आणि प्रत्यक्षात जंतरमंतवर ‘मी’ काय पाहिलं याचा धांडोळा घेणारी ही नोंद. मी स्त्री आहे, मी इथं एकटी आले आहे, यापेक्षाही अखेर ‘लोक असे वागत होते हे मी पाहिलं आहे’ हा भाग महत्त्वाचा ठरतो.
अमुकच लोकांचं वागणं पाहायचं, हा तिचा व्यवसाय असेल. पण एकंदर लोकांचं वागणं पाहणं, हा छंद-व्यवसाय यांच्या विभागणीपलीकडे गेलेला, जीवनमार्ग असू शकतो.

असं म्हटलेलं आहे. यात मला तरी स्तुती की टर असा प्रश्न पडला नाही. तुम्हाला यात काही वेगळं दिसलं का?

किंवा नंदनबद्दल लिहिताना 'अशा लेखकांवर कधी ना कधी ‘फार कठीण लिहिता’ अशी टिप्पणी कुणी ना कुणी केलेली असू शकते' असं म्हणतानाच -

‘कठीण लिहिणं’ या शब्दप्रयोगाचे मराठीतले आजचे समाजशास्त्रीय अर्थ शोधून पाहण्याचा प्रयत्न कुणी केल्यास, ‘आम्हाला कमी श्रमांत वाचता येईल, फार डोकं चालवावं लागणार नाही, असं लिखाण करा’ हा सर्वाधिक प्रचलित अर्थ आहे, असं लक्षात यावं. उद्भवलेली प्रतिक्रियेची छटा म्हणजे ‘धड मराठीत लिहिता येत नाही का?’ असा- उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न. ‘धड मराठी’ म्हणजे काय, याचा विचार करण्याची गरज ज्यांना भासत नाही, ते भाषेला निराळे ‘आयाम’ देतात. अशा आयामांनी भाषा समृद्धच होत असते, वगैरे आपण वाचलं असेलच. पण ‘धड मराठी’ विरुद्ध ‘डोकं’ वापरून लिहिलेलं मराठी’ असा शिर-धडाचा सामना अनेकदा सुरू असतो. मराठी वाचन, वैचारिक लिखाण वा नियतकालिकं यांच्या अभावाबद्दल मराठीत जेव्हा चिंता/ खंत व्यक्त केली जाते, तेव्हा मराठीत विचार करणारं डोकं आणि आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या मराठीजनांच्या भाषेचं ‘धड’ यांची एकमेकांपासून फारकत झाली आहे, असंही दृश्य डोळय़ांसमोर तरळायला हरकत नाही.

यातही मला काही संभ्रमात टाकणारी शैली जाणवली नाही. नंदनच्या लिखाणाविषयी ही स्तुतीच वाटते, कारण त्याचं लिखाण वाचण्यासाठी डोकं चालवावं लागेल असंच लेखकाला म्हणायचं आहे असं वाटलं; आणि डोकं चालवावं लागेल असं लिखाण नको असणार्‍यांची टर उडवली आहे असं वाटलं.

थोडक्यात, लिखाणाविषयीचा आक्षेप रास्त असू शकेल पण नंदन आणि आतिवास यांच्या लेखनाच्या संदर्भात मला तरी तो नीटसा कळला नाही असं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'हरकत नाय' मधे घेतलेली 'अभिनवगुप्ताची दखल' Smile
http://www.harkatnay.com/2012/03/blog-post_27.html

ब्लॉगर महेंद्र कुलकर्णींच्या ब्लॉगची टर उडवल्यानंतर त्यांनी लोकसत्ताला लिहिलेले पत्र (आता त्यांच्या ब्लॉगवरील लेखाचा दुवा सापडला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हे ठीक आहे, पण अभिनवगुप्त टर उडवताहेत की स्तुती करताहेत असा संभ्रम कुठाय? ‘काय वाट्टेल ते’ किंवा ‘हरकतनाय’ची टर उडवताहेत अन् नंदन-संवेद-आतिवास यांची स्तुती करताहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अभिनवगुप्त टर उडवताहेत की स्तुती करताहेत असा संभ्रम कुठाय?
आमच्या मनात. (आमची समज तोकडी पडत असण्याचा संभव आहे. Smile )
अन् नंदन-संवेद-आतिवास यांची स्तुती करताहेत
या वाक्याशीच आम्ही असहमत आहोत. लेट्स अग्री टू डिस-अग्री.
तुम्ही दिलेल्या दुव्यांवरचे हे लेख वाचल्यावरच आम्ही हा प्रतिसाद दिला होता. बाकीची माहिती मागाहुन मिळाली.

(पुन्हा उप-प्रतिसादांची हनुमान-उडी सुरू झाली वाट्टं. दुय्यम स्थान आवडत नसावं बहुधा. हा चिंतूशेटच्या खालील प्रतिसादाल उप-प्रतिसाद आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

एकूण विनोद आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एकूण' विनोद आहे, हे खरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'एजंट विनोद'ची (आणखी एक) छुपी जाहिरात ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही दखल पाहिली. अभिनवगुप्तांनी केलेल्या टीकेशी सहमत व्हावे वा नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे. (मला ही टीका अस्थानी वाटली नाही. आतिवास, नंदन आणि संवेदचं कौतुकच केलेलं आहे असा माझं मत झालेलं आहे.) अभिनवगुप्त यांनी टीका करताना ती फक्त लेखनावरच केलेली आहे. कुठेही पातळी सोडून लेखकांवर व्यक्तिगत टीका केलेली नाही. 'हरकतनाय'च्या त्या पोस्टवर अनेक प्रतिक्रियांमधे इतर प्रतिसादकांनी आणि बर्‍याच प्रमाणात ब्लॉगचालकाने अभिनवगुप्त यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आहे. (उदा: १. अगदी अगदी कांचन. पहिल्या धारेची मारून लिहिला होता तो लेख (!!!).. , २. बिच्चाऱ्याला क्रिटीक म्हणून स्वतःची लाल करून घेऊ दे अजून काही दिवस तरी..नंतर मग कधी तरी सांगतो तूला तो कोण आहे ते...) टीका करताना निदान ती दखलपात्र असेल याची काळजी ब्लॉगलेखक आणि तिथले प्रतिसादक घेतील अशी अपेक्षा होती.

आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेले संपूर्ण वाचावे नेट-के इथे सापडेल.

अवांतरः प्रत्येक प्रतिसादकाला व्यक्तिशः प्रतिसाद देऊन आभार मानणारे प्रतिसाद ट्यार्पी वाढवतात, पण ते स्क्रोल करणंही मला रटाळ वाटतं.
अतिअवांतरः वाक्यावाक्यांत, लेखाच्या शीर्षकातही तीन (किंवा अधिक) टिंबं, "..." देण्याची पद्धत साधारण कोणत्या काळात रूढ झाली आहे? त्यावरून डोळे स्क्रोल करण्याने वाचनाचा आळस येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बऱ्याच हिट्स या युआरएल वरून आलेल्या दिसल्या म्हणून कुतूहलाने बघायला आलो. वैयक्तिक टीकेबद्दल काही आक्षेप दिसले म्हणून त्यांचा शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नच कारण मी दिलेल्या कारणांशी सहमत व्हावे वा नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे. असो.

अतिवास या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉगलेखिका आहेत आणि त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिलेलं आहे आणि ते पाहून खूप बरं वाटलं. नंदन आणि संवेदच्या लेखनाबद्दल १००% कौतुकच केलं आहे असं कोणी म्हणत असेल तर मी खेदपूर्वक असहमत आहे. ९०% कौतुक आणि १०% अकारण खरडपट्टी असं स्वरूप मला तरी दिसलं. तुम्ही नेटकेचे सगळे लेख वाचलेत की नाही याची मला कल्पना नाही पण हाच त्याचा/तिचा Modus operandi आहे. प्रत्येक लेखात त्या त्या ब्लॉगरला आधी काही प्रमाणात नावं ठेवून झाल्यावर मग कौतुक केल्यासारखं केलं आहे. आणि हे मी माझ्या लेखात सोदाहरण स्पष्ट केलं आहे.

>> त्यानंतर दोन चार क्लिक करून अर्धा/पाऊण लेख वाचून झाला की मग गुप्तेबाई/बुवा त्या ब्लॉगरवर, त्याच्या लिखाणावर, चुकून झालेल्या एखाद्या र्‍हस्व/दीर्घाच्या चुकीवर, लेखनाच्या पद्धतीवर, शब्दांच्या निवडीवर, भाषेच्या साधेपणावर, प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर अशा ज्या दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर शेलक्या विशेषणांचा शब्दबंबाळ मारा करणार.

यातला कुठला मुद्दा चुकीचा वाटतो ते कळवावे म्हणजे मी निरसन करेन. ती व्यक्ती ब्लॉग पूर्ण वाचत नाही हे तर तिने लेटेस्ट लेखात कबुल केलेलंच आहे. पटत नसल्यास http://goo.gl/R4wD9 येथील हे वाक्य वाचणे.

>> अशा ब्लॉग वा संकेतस्थळांवरल्या ताज्या नोंदींआधारे त्यांवर टिप्पणी आणि भाष्य करताना, हेतू तपासण्यासाठी अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील, तेवढय़ा वाचणं इष्ट ठरतं. टिप्पणी पटली नसल्यास ‘तुम्ही आमचं काही वाचलंच नाही.. फक्त एक नोंद घेताय आणि बोलताय’ अशी ओरड होते, पण त्याची आता या सदराला सवय झाली आहे.

"तसेच मागे एका लेखात ब्लॉगर्सना झोडपणे हा या सदराचा हेतू नक्कीच नाही" असाही उल्लेख होता. जर असा हेतू नाहीये तर मग कोणीही काही आक्षेप घेण्यअगोदर तुम्हाला ( नेटकेला) हे का स्पष्ट करावं लागतंय? आणि हा उल्लेख त्याच्या लेखात आला होता तो मी त्याला झोडपण्याअगोदर.

मी वैयक्तिक टीका केलीच आहे. त्याला मी नाही म्हणतच नाहीये पण ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे हे विसरू नका. "तुमने अप्पुनको बहोत मारा, अप्पुनने तुमको एकहीच मारा.. पर सॉलिड मारा ना?" या प्रकारची टीका आहे ती.

>> काहीवेळा ‘काय वाट्टेल ते’ किंवा ‘हरकतनाय’ सारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते.

माझ्या मते तरी हे निश्चितच खोडसाळ वाक्य आहे. एक तर मी त्याला आवताण दिलेलं नाही की प्लीज माझ्या ब्लॉगबद्दल लिही म्हणून. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे महेंद्र कुलकर्णीसारख्या ज्येष्ठ ब्लॉगरबद्दल मुर्खासारखं बरळताना काही भान राखणं आवश्यक होतं.

तुम्ही स्त्री ब्लॉगर/संस्थळ लेखिका आहात म्हणून एक मुद्दा आवर्जून उपस्थित करतो. ज्या लेखात माझ्या ब्लॉगबद्दल चुकीचं लिहिलं आहे त्याच लेखात (http://goo.gl/NpbS7) स्त्री ब्लॉगर्सबद्दल इतके आक्षेपार्ह उल्लेख आहेत की प्रत्येक स्त्रीब्लॉगरच्या तळपायाची आग मस्तकात वगैरे असं झालं पाहिजे. त्यावर आक्षेप घेण्याऐवजी मी केलेल्या टीकेवर आक्षेप घेतलात हे पाहून खचितच मनोरंजन झाले. असो.

हा तो आक्षेपार्ह उल्लेख
>> अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो.

धन्यवाद. मी पुन्हा प्रतिक्रिया द्यायला येईनच असं नाही. तेव्हा शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गंमत आठवली.

माझी एक मावशी, आईच्याच वयाची. लहानपणापासून तिची आठवण म्हणजे ती सुद्धा इतर काकू, माम्या, आत्या, मावशांप्रमाणे अधूनमधून घरी बोलावायची आणि खायला घालायची. सुगरण आणि प्रेमळ बाई. माझं तिला विशेष कौतुकही होतं, आहे. माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी फोनवर विचारलं, "ते तुझं नाव काय ठेवणार आहेत?" ती पुरूषप्रधान संस्कृतीची पाईक, अर्थात शॉव्हनिस्ट आहे असं मी तिच्याबद्दल म्हटल्यावर अनेक नातेवाईकांना रूचलं नाही. तिचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे मी तिच्याबद्दल असा विचार करू नये असं अनेकांचं मत पडलं. ती समजून उमजून अशी वागत नाही हे मलाही मान्य आहे. पण ती शॉव्हनिस्ट नाही हे मला पटत नाही.

----

अभिनवगुप्तांनी केलेली १०% टीका तुम्हाला पटली नसेल तर त्याच्याशी असहमत असण्याचा तुम्हाला निश्चित हक्क आहे. नंदन कठीण भाषेत लिहीतो ही काही नंदनवर केलेली टीका असू शकत नाही. सोप्या भाषेत लिहीलेलं एक बेस्टसेलर "A brief history of time" समजायला अजिबात सोपं नाही. आतिवासची भाषा सोपी आहे, पण ती लिहीते ते ही "कमल नमन कर"प्रमाणे सोपं नाही. नंदन बोजड शब्द वापरतो अशी टीका म्हणा, गंमत म्हणा पिवळा डांबिसांनी अनेक वर्षांपूर्वी मिसळपाववर केली होती (ज्याचा उल्लेख 'नेट-के'च्या लेखातही आहे.) आणि तेव्हा पिडाकाकांना "तुम्ही निष्कारण टीका करता" असं ऐकावं लागलं नव्हतं.

बरं, ही १०% टक्के टीकाही का करू नये? जगात परिपूर्ण असं काहीही नाही हे तत्त्वज्ञान अनेक शतकं, सहस्रकं पचवलं गेलेलं आहे, तर आज का त्याबद्दल एवढा कंठशोष होतोय? एखादा मनुष्य वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहे म्हणजे त्यावर टीका करूच नये का? लोकमान्य टिळकांच्या सामाजिक सुधारणांवर अनेक ठिकाणी टीका झालेली आहे, एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. सदानंद मोरेंचं लोकमान्य ते महात्मा. लेखनाचा अनुभव, वय यांच्यात लोकमान्य ज्येष्ठ (त्यातून ते स्वातंत्र्य या प्रचंड मोठ्या कारणासाठीही लढले) म्हणून त्यांच्या इतर चुकांबद्दल डॉ. मोरेंनी टीका करायचीच नाही का? कोणावर टीका केली/झाली आहे यापेक्षा काय टीका आहे हे महत्त्वाचं आहे. "राजा नागडा आहे" हे लहान मुलगा म्हणतो म्हणून काय ते खोटं म्हणायचं का?

----

माझ्या मते तरी हे निश्चितच खोडसाळ वाक्य आहे. एक तर मी त्याला आवताण दिलेलं नाही की प्लीज माझ्या ब्लॉगबद्दल लिही म्हणून.

सॉरी. लेखनाबद्दल लेखकाच्या मताप्रमाणेच मतप्रदर्शन हवं असेल तर world-wide-web / www वर ते टाकू नये. निवडक लोकांसाठी intranet बनवावं आणि तिथे टाकावं किंवा इमेलवर प्रसृत करावं. अर्थात व्यवहारात हे ही ठराविक लोकांपर्यंतच मर्यादित असण्याची खात्री नाही. इंटरनेटवर प्रसृत केलेली कोणतीही बाब (लिखाण, फोटो, माहिती) खासगी, मर्यादित वितरणापुरती रहात नाही, असू शकत नाही. ही इंटरनेटची मर्यादा म्हणा नाहीतर शक्ती, इंटरनेट हे असंच आहे. छत्री न घेता पावसात गेल्यावर भिजण्याची तक्रार केल्यास हास्यास्पद ठरते.

तुम्ही स्त्री ब्लॉगर/संस्थळ लेखिका आहात म्हणून एक मुद्दा आवर्जून उपस्थित करतो. ज्या लेखात माझ्या ब्लॉगबद्दल चुकीचं लिहिलं आहे त्याच लेखात (http://goo.gl/NpbS7) स्त्री ब्लॉगर्सबद्दल इतके आक्षेपार्ह उल्लेख आहेत की प्रत्येक स्त्रीब्लॉगरच्या तळपायाची आग मस्तकात वगैरे असं झालं पाहिजे. त्यावर आक्षेप घेण्याऐवजी मी केलेल्या टीकेवर आक्षेप घेतलात हे पाहून खचितच मनोरंजन झाले. असो.

मी स्त्री आहे ही बाब (मी स्त्रीवादी असले तरीही) बरीच मागची आहे. लिखाण वाचताना लिखाण चांगलं आहे का वाईट, अशाच प्रकारचं मूल्यमापन केलं जावं. हालअपेष्टांना तोंड देणार्‍या, लिंगभेदाचा सामना करावा लागणार्‍या मेरी क्यूरीचं अधिक कौतुक मला आहे. पण समानतेने वागवल्या जाणार्‍या स्त्रिया गृहशोभिका टाईप लिखाण करतात तेव्हा त्याचा स्टीरीओटाईप होणं फार अतर्क्य नाही. प्लेबॉय प्रकारच्या मॅगझिन्सवरून किंवा सिल्क स्मिता, राखी सावंतच्या दर्शक पुरूषांवरून पुरूषांचे जसे स्टीरीओटाईप्स बनवले गेलेले आहेत तसेच हे स्त्रियांच्या बाबतीत. स्त्रिया म्हणून टीका झाली, अशा प्रकारचा तुच्छतावाद अभिनवगुप्तांना दाखवायचा होता तर इंद्रधनू गटाचा आस्वाद हा ब्लॉग आणि आतिवासबद्दल गौरवोद्गार काढले नसते. किंबहुना हे दोन उल्लेख नसते तर या मुद्द्यावरून मी ही अभिनवगुप्तांच्या लिखाणास झोडपलं असतं. त्यातूनही अभिनवगुप्त यांचं एक वाक्य "अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत-..." इथेही स्टीरीओटायपिंग नाही हेच दिसतंय.

माझ्या स्त्री असण्याचा शॉव्हनिस्टांचा राग येण्याशी संबंध नाही; यात माझं स्त्री असणं हा फक्त योगायोग आहे. लिंग-समानतावादाचे पुरस्कार करणारे माझे अनेक मित्र या आणि इतर संस्थळांवर आपली मतं मांडतात.

त्यातून अभिनवगुप्तांची खरडपट्टी काढणार्‍या तुमच्या उपरोल्लेखित ब्लॉगपोस्टात सुरूवातीला "अनावृत्त नटव्या" असा उल्लेख आलेला आहे. तुमचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य आहे तरीही हा उल्लेख खटकला निश्चित.

----

आपल्या अपत्यावर (लेखन, संगीत, अभिनय, संस्थळ, ब्लॉग, मूल, कलाकृती इ. काहीही) टीका झाल्यानंतर राग येणं, वाईट वाटणं स्वाभाविक आहे. अभिनवगुप्तांनी लेखनावर टीका केली होती, त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या लेखनावर टीका अपेक्षित होती. (याच धाग्यावर त्याचं उदाहरण दिसत आहे. रमतारामने लेखनावर टीका केली आहे, व्यक्तीवर नाही.) तिरकसपणे शालजोडीतले मारणे हा प्रकारही असभ्य समजला जात नाही. पण सध्याच्या समाजमान्यता पहाता "दारूच्या नशेत काहीतरी बरळणे", "पेद्रट आहे" अशा प्रकारची टीका फार उचित समजली जात नाही. माझा मूळ आक्षेप असभ्य टीकेवर होता आणि आहे.

----

मेघनाने अभिनवगुप्तांच्या सदरावर घेतलेले आक्षेप मला पटले आहेत.

अवांतरः स्टीरीओटाईप यासाठी चांगला मराठी प्रतिशब्द काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला एक कळत नाही उडवली कोणी कुठे टर तर त्यात एव्हढं नाराज होण्याचं कारणच काय? तुम्हाला जर वाटत असेल की टर उडवणार्‍याची इलिजीबीलीटी नाही तर त्याच्या मताला किंमत देऊ नका. रोज कोणी ना कोणी काही ना काही म्हणत असतो, ज्याचं तुम्हाला पटतं ते घ्या ज्याचं पटत नाही ते घेऊ नका. टर उडवलेली आवडली तर हसा नाही आवडली तर पुढे जा!

नंदनला मी वैयक्तिक ओळखतो म्हणून त्याचं नाव घेऊन म्हणतो, जर कोणी त्याची चांगली टर उडवली आणि त्याला मी हसलो म्हणजे काय आभाळ कोसळतं का? जर कोणी त्याच्यावर उगाचच चिखलफेक केली तर लगेच त्याच्याबद्दलचं माझं मत बदलणार आहे का?

लोकसत्तामध्ये लेख लिहला/टर उडवली म्हणून इंटरनेटवर नसणार्‍यांचा या ब्लॉगधारकांबद्दल विपरीत समज निर्माण होईल अशी भिती आहे का? असेल तर त्याने तर काय बिघडणार आहे? आणि जे इंटरनेटावर आहेत त्यांना ब्लॉग वाचून आपापला निर्णय घेता येतोच आणि ज्यांना आपपला निर्णय घेता येत नाही त्यांना काय वाटेल याची पर्वा करतो कोण?

जगामध्ये टर उडवू शकत नाही असं काही असावं/आहे हे काही मला पटत नाही. त्याबरोबरच वैयक्तिक चिखलफेक करणारे नाहीतच असेही मी म्हणत नाही. पण असेनात का बापडे! बीग डील!

तळटीपः माझ्या या प्रतिसादामुळे मीच तो अभिनवगुप्त असा गैरसमज कोणी करू नये. एव्हढे ब्लॉग वाचून त्यावर लिहण्यापेक्षा इतर अनेक चांगले धंदे आहेत आम्हाला. Wink

रसातळाची टीप: विनोद आहे तो. अभिनवगुप्तांच्या समर्थनकांनी लगेच नाराजीच्या खरडी, व्यनी आणि उपप्रतिसाद देऊ नयेत. उत्तर देत बसण्यापेक्षा चांगले धंदे आहेत आम्हाला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला एक कळत नाही उडवली कोणी कुठे टर तर त्यात एव्हढं नाराज होण्याचं कारणच काय?
का बरं. त्या लपूनछपून वावरणार्‍याला टर उडवण्याचा हक्क असेल तर आम्हाला नाराज होण्याचा का नसावा?

तुम्हाला जर वाटत असेल की टर उडवणार्‍याची इलिजीबीलीटी नाही तर त्याच्या मताला किंमत देऊ नका.
करेक्ट, एवढेच तर म्हणत होतो आम्ही. ओठात ओवी नि पोटात शिवी असलेल्यांच्या लेखनाची दखल घेण्याचे 'आम्ही' नाकारतो. आम्ही 'आम्हाला तो सूर रुचला नाही' एवढंच तर म्हणत होतो. आमचा हा हक्क नाकारता तुम्ही?
(अवांतरः त्या 'कोण कुठल्या' अभिनवगुप्ताच्या समर्थनार्थ एवढी फौज जमा झालेली पाहून मौज वाटली....... पण आश्चर्य वाटलं नाही. Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

का बरं. त्या लपूनछपून वावरणार्‍याला टर उडवण्याचा हक्क असेल तर आम्हाला नाराज होण्याचा का नसावा?

आहे की, तुम्हाला नाराज होण्याचा हक्क आहेच. तुम्ही हवं तितकं नाराज व्हा. पण आमचं म्हणणं असं आहे की पाँईट नाय हो नाराज होण्यात!

करेक्ट, एवढेच तर म्हणत होतो आम्ही. ओठात ओवी नि पोटात शिवी असलेल्यांच्या लेखनाची दखल घेण्याचे 'आम्ही' नाकारतो. आम्ही 'आम्हाला तो सूर रुचला नाही' एवढंच तर म्हणत होतो. आमचा हा हक्क नाकारता तुम्ही?

आम्ही कुठे नाकारला? आम्ही फक्त लोकांना याचा वैयक्तिक त्रास झालेला दिसला म्हणून म्हणालो. लोकांना वैयक्तिक त्रास करून घेण्याचाही अधिकार आहे. आम्ही तेही नाकारत नाही. पण पाँईट नाय हो तसं करण्यात!

अवांतरः त्या 'कोण कुठल्या' अभिनवगुप्ताच्या समर्थनार्थ एवढी फौज जमा झालेली पाहून मौज वाटली....... पण आश्चर्य वाटलं नाही.

बोंबला तिच्यायला! आम्ही इन मिन एक लेख वाचला त्याचा. बाकी तुम्हाला आम्ही त्याचं समर्थन करतो आहोत असं वाटायचं असेल तर तसं. पण आम्ही त्याचं समर्थन केल्याचं मात्र नाकारतो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निळे यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. असाही एक प्रश्न पडतो कि जर या अभिनव गुप्त ने ब्लॉगर्स चे (फक्त) कौतुकच करणारे लेखन केले असते तर एवढा प्रतिवाद करण्याची गरज पडली असती का? प्रा येरकुंठवारांचे कौतुक वा आदर व्यक्त करणारे पुलंचे लेखन आठवले बरका नंदन? असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

इथली मंडळी चतुर आहेत. मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जाताहेत.

मुद्दा टीका करण्याचा हक्क आहे की नाही असा नाहीच. अहो गांवभर टीकाकार असतात. टीका करण्याचा हक्क प्रत्येकाला असतोच. चुका काढणे याला एक थोडा तरी अभ्यास लागतो, विचारांचा नेमकेपणा लागतो, मुद्दे नीट मांडता यावे लागतात. तसे करायला काहीच हरकत नाही. याच्या उलट निव्वळ आवडीनिवडीच्या पातळीवर 'मला आवडले नाही' असे म्हणता येतेच.
इथे महामहीं अभिनवगुप्त या दोन्ही ऐवजी तिसराच प्रकार अवलंबत आहेत.ते टवाळी करतानाही अशा प्रकारचे लिखाण करताहेत की टीका झाली की मी हसतखेळत, हलक्याफुलक्या फॉर्ममधे लिहित होतो असा दावा शहाजोगपणे करू शकतात. शिवाय अपेक्षित टवाळी वाचकांपर्यंत पोचतेच. याला 'दुटप्पीपणा' म्हणतात. टीका करायची आहे ना तर सप्रमाण करा. निव्वळ ओळख करून द्यायची असेल तर लिखाणाचा बाज वेगळा असायला हवा. इथे जाणीवपूर्वक संदिग्ध लिखाणशैली अवलंबली आहे जेणेकरून उथळ टीकाही करता यावी नि वर आपण त्या गावचेच नाही असा दावाही करता यावा.

मुद्दा हा आहे की टवाळी करण्याने आपल्याला सप्रमाण मुद्दा खोडून काढण्याच्या किचकट जबाबदारीतून मुक्तता मिळते. त्यामुळे फारशी अक्कल नसली तरी चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मुद्दा हा आहे की टवाळी करण्याने आपल्याला सप्रमाण मुद्दा खोडून काढण्याच्या किचकट जबाबदारीतून मुक्तता मिळते. त्यामुळे फारशी अक्कल नसली तरी चालते.

म्हाताऱ्या, का पेटलायेस इतका? इतकं स्पष्ट लिहू नये राव. लई वंगाळ हे. आता काय सांगू तुलाही! Wink
च्यायला, आजकाल एक मुख्य संपादक, एका वृत्तसंस्थेत आलेली जुनीच बातमी आपल्या अंकात पान १ वर देताना स्वतःची, आणि आणखी दोघांची बायलाईन घेतात राव.
तुझ्या किती अपेक्षा? वृत्तपत्रीय लेखनासाठी या अपेक्षा, आणि तू ठेवाव्यात? छोडो यार... माफ करून दे त्याला. दुर्लक्ष कर त्या लेखनाकडं. त्या लेखनाची किंमत फार मोठी नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहे का. हे असं आहे. आम्ही आपले उगाच नसलेली अक्कल पाजळत कायतरी लिवतो ती दोस्त लोक उगाच नाराज होतात.
अहो 'अक्कल नसलेली पुरते' याचा अर्थ लेखकाला 'अक्कल नाही' असा होत नाही. आणी एकुण त्या शैलीचे फायदे सांगत होतो आम्ही. तुमच्यासारख्या झंटलमन मानसान्ला यवडं शिंपल गोस्ट कस्काय सांगावी लागते ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अभिनवगुप्त या दोन्ही ऐवजी तिसराच प्रकार अवलंबत आहेत.ते टवाळी करतानाही अशा प्रकारचे लिखाण करताहेत की टीका झाली की मी हसतखेळत, हलक्याफुलक्या फॉर्ममधे लिहित होतो असा दावा शहाजोगपणे करू शकतात. शिवाय अपेक्षित टवाळी वाचकांपर्यंत पोचतेच. याला 'दुटप्पीपणा' म्हणतात

अशा प्रकारातल्या लेखनाला संशयाचा फायदा मिळतो. असो पण या प्रकरात स्तंभलेखकाचे उद्दीष्ट मात्र साध्य झालेले दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो. <<

हे फारसं आक्षेपार्ह वाटलं नाही कारण ते वास्तवदर्शीच वाटलं. असं आहे म्हणूनच थोडे बरे ब्लॉग नजरेत भरतात. मासल्यादाखल ही काही ताज्या (गेल्या २४ तासांतली) ब्लॉगलिखाणाची उदाहरणं :

श्री महालक्ष्मी उत्सव, केळशी, २०१२:
लहानपणापासून कोकणात जातो आहे—चिपळूण, दापोली, आडे, पाडले, आंजर्ले, आणि आमचं केळशी. शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपली की जे पळायचं कोकणात ते थेट जूनच्या पहिल्या आठवड्यात परतायचं असा कार्यक्रम असायचा. त्यात मुक्काम आणि म्हणूनच जास्त वेळ घालवला आहे तो अर्थातच केळशीला.

हिंदोळेच मनाचे.
एका साध्या सोप्या आयुष्यात एक नवी नोकरी येते...येत नाही ती आपण निवडली असते...."आई" व्हायची.....जगात सगळ्यात कठीण काम आई होणं आहे हे आजवर फ़क्त ऐकलेलं असतं....

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर...
आज तशी सकाळी ६ वाजताच जाग आली होती, पण उबदार अंथरुण सोडून उठायला ७ वाजले... मग पटकन फ्रेश होवून, नाष्टा केला आणि लाडघरचा निरोप घेतला...
(दुरर्‍या दिवशीची मुक्कामाची जागा...)
(तीसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी सज्ज)

जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे
जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे,,,,,,,,
जी व्यक्ती आपल्याला अगदी मनापासून ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टीकेचं ठीकच आहे. मराठी ब्लॉग्सच्या गोतावळ्यात खरोखरच दुपारच्या मासिकांच्या जातीचा मजकुराचा प्रचंड भरणा असतो, त्याबद्दल जहाल टीका झाली, तर तिचा फायदाच होईल. पण एखाद्या वृत्तपत्रातल्या अग्रलेखाच्या पानावर ब्लॉगांवर लिहून येणार टिपण म्हणून 'वाचावे नेटके'कडून खरं तर जास्त अपेक्षा होती. 'तुम्हांला हव्या त्या शिफारशी आम्हांला पाठवा, आम्हांला आवडलं तर आम्ही छापू (नाहीतर चिरफाड करू)' ही त्यांची भूमिका बघूनच विरस झाला.

दुसर्‍या बाजूला 'हरकत नाय'वरची टीकेला उत्तर देणारी भाषाही अगदीच अव्यावसायिक होती. वैयक्तिक टिपण्ण्यांचा पाऊस आणि जराही टीका न पचवणारा बालिश आवेश.

कुणी कुणावर दुगाण्या झाडायच्या हाच एक प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुणी कुणावर दुगाण्या झाडायच्या हाच एक प्रश्न.

नाही. हा प्रश्न नाही. माझ्या मते, 'गाढवांनी एकमेकावर दुगाण्या झाडल्या तर बिघडलं कुठं?', असा हा प्रश्न आहे. कारण दुगाण्या झाडणारे गा़ढव असतातच.
अवांतर: 'लिहिणाऱ्याने लिहित जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे, वाचणाऱ्याने एक दिवस, वाचता वाचता लिहिते व्हावे' असे झाले आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. त्याला व्यक्त होणे, अभिव्यक्ती वगैरे म्हणतात. त्याला जर एखाद्याची हरकत असेल तर त्याने ते वाचू नये. एकूण लेखनावर त्या अनुषंगाने भाष्य करण्यात अर्थ नाही. अगदी वपु, पुल लिहिते होते तेव्हाही 'वाचकांची पत्रं' असायचीच. त्याला 'बहुतांची अंतरे' असे उगाच म्हटलेले नसावे. त्याची काही मोजपट्ट्या लावून दखल घ्यायची आणि मग त्या मोजपट्ट्यात ते कसं बसत नाही यावरून गदारोळ उठवायचा, याला ट्यार्पी (लोकसत्ता असल्यानं अंकाचा खप किंवा वाचकसंख्या) पलीकडे काही किंमत नाही. त्यामुळं, त्यात झालेला उल्लेख गौरव नसतो किंवा त्यात झालेली टीका अवमूल्यन करणारी नसते. नेट-के मधले लेखनही 'बहुतांची अंतरे' याच जातकुळीचे आहे. ते तेथेच ठेवावे हे उत्तम.
(खुशवंतसिंग यांच्या सदराच्या 'विथ मॅलीस टुवर्ड्स वन अँड ऑल' या नावाची आठवण जरूर व्हावी, पण साला खुशवंत सिंग आहे तरी कोण म्हणा! म्हणूनच प्रश्न बदलावा लागला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी पटले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>त्या 'कोण कुठल्या' अभिनवगुप्ताच्या समर्थनार्थ एवढी फौज जमा झालेली पाहून मौज वाटली....... पण आश्चर्य वाटलं नाही. <<

यात काही गर्भितार्थ असला तर तो समजला नाही. शैलीविषयी आक्षेप असू शकतात, पण मराठी ब्लॉगलेखकांवर प्रखर सार्वजनिक टीका होणं गरजेचं आहे असं मात्र वाटतं.

>>जगामध्ये टर उडवू शकत नाही असं काही असावं/आहे हे काही मला पटत नाही.<<

>>मराठी ब्लॉग्सच्या गोतावळ्यात खरोखरच दुपारच्या मासिकांच्या जातीचा मजकुराचा प्रचंड भरणा असतो, त्याबद्दल जहाल टीका झाली, तर तिचा फायदाच होईल. <<

दोन्ही विचारांशी सहमत.

>>एखाद्या वृत्तपत्रातल्या अग्रलेखाच्या पानावर ब्लॉगांवर लिहून येणार टिपण म्हणून 'वाचावे नेटके'कडून खरं तर जास्त अपेक्षा होती.<<

मराठी वृत्तपत्रांकडून मूलगामी लिखाणाची अपेक्षा उरलेली नाही. 'म.टा.'च्या अधःपतनानंतरच (नव्वदच्या दशकातल्या) ही अपेक्षा संपली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आजच्या 'वसुधैव मार्केटकम' (हा सा. साधनाच्या दिवाळी अंकातून उधार घेतलेला वाक्प्रचार) जमान्यात "घटं भिंद्यात पटं छिंद्यात..." करून का होईना प्रसिद्धी मिळतेय ना?
मग कशाला उगाच कंठशोष?
अर्थात ही टीका स्वयंसिद्ध ब्लॉग्जसाठी नाही, हे स्पष्ट करतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याची आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आजच्या 'वाचावे नेट-के'चा विषय 'आरागॉर्न'चा ब्लॉग आहे. माझ्या मते सदरात ब्लॉगची स्तुती आहे, पण मतभेद असले तर जाणून घ्यायला आवडतील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राजच्या ब्लॉगची स्तुती आहे याबद्दल मतभेद नाही. ते एक बेष्ट झालं.
शिवाय, पहिल्या परिच्छेदात 'वाचावे नेटके'चा सूर काहीसा बचावात्मकही झाल्याचं जाणवलं, तेही आवडलं. (याबद्दल मतभेद आहेत का? ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना, बचावात्मक हा शब्द फारच सरळ. अर्थात, आपण कसे पाहतो त्यावर शब्दाचा प्रयोग अवलंबून. ररांचा आक्षेप मानायचा ठरवला तर तो सूर बचावात्मक नाही. त्याऐवजी, जे लिहायचं आहे ते त्याला कळत नाही, असं म्हणता येतं. कारण आज ब्लॉगची समीक्षा झालेली दिसते.
हा 'अभिनवगुप्त' लोकसत्तातील संपादकीय विभागाचा माणूस नसावा. किंवा मग एखादा मूळचा ब्लॉगरच संपादकीय विभागात जाऊन बसला असावा. कसेही असो, त्याच्यावर वृत्तपत्री संपादकीय संस्कार अद्याप पुरेसे झालेले नाहीत इतकं नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अभिनव गुप्तपणे इथे येऊन गेलेले दिसतात. त्याचेच पडसाद काही टिप्पणींमध्ये पहायला मिळाले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांचा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. Smile नानांकडे माहिती असतेच म्हणा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याकडे माहिती असते हा 'आरोप' बिनबुडाचा आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुप्तपणे कशाला येतील, इथे सारेच गुप्त उघडपणे येतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

रमताराम यांचा हा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे. Wink त्यांच्याकडेही माहिती असतेच म्हणा. ते यावर हा आरोप आहे, आणि तो बिनबुडाचा आहे, असे नक्की म्हणणार नाहीत, अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मतभेद असले तर जाणून घ्यायला आवडतील
मला पण. बादवे, कोण सांगणार आहे?
आमचे म्हणाल तर आम्ही काही 'मोले घातले लिहाया' स्थितीत नसल्याने सांगूच असे नाही. तसेही आमचा मुद्दा फक्त नंदन नि आतिवास यांच्यावरील लेखाबद्दल होता. प्रत्येक लेखाबद्दल आमचे मत छापणार असाल तर देऊ बापडे. रेमुनरेशन किती देणार बोला. गुप्तांपैकी कोणीही एकाने संपर्क साधला तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

लोकसत्ताने मराठी ब्लॉज / ब्लॉगर्स ची दखल का आणि कशी घेतली तो त्यांचा प्रश्न. मात्र ऐसीअक्षरे ने 'लोकसत्ता'ची दखल घेतलेली बघून ड्वाले पाणावले.

बाकी माझे टिचभर आंतरजालीय आणि वर्तमानपत्रीय ज्ञान चुकत नसेल तर हे 'गुप्त' कोण आहेत आणि त्यांचा ऐसीअक्षरेशी काय संबंध असावा हे आकलन आम्हास झाले आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

माहितगार लोक इथे वावरत असल्याने अशी दखल घेणे परस्परांना क्रमप्राप्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माहितगार लोक इथे वावरत असल्याने अशी दखल घेणे परस्परांना क्रमप्राप्त आहे.

फक्त मग 'दिगु टिपणीस'चा आव आणू नये येवढीच अपेक्षा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

आमच्या मते मराठी आंतरजालावरील सन्माननीय सदस्य ररा उर्फ रमताराम हेच अभिनवगुप्त आहेत. आणि आपल्या सदराकडे ट्यार्पी खेचण्यासाठी इथे भडकाऊ कमेंटा टाकत आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आरशाचं मुखदर्शन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हाताऱ्या, का पेटलायेस इतका? इतकं स्पष्ट लिहू नये राव. लई वंगाळ हे. आता काय सांगू तुलाही!
हे समजावणारे श्रामो ते तुम्हीच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अंदाज आरशाचा... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंतूशेट पण बाजार उठवण्यात प्रवीण झालेले पाहून (आणि पहिला फटका आम्हालाच पडल्याने घाईघाईनेच) त्यांना 'आपले' म्हणावे लागते आहे. हे राम.

आमच्या मते मराठी आंतरजालावरील सन्माननीय सदस्य ररा उर्फ रमताराम हेच अभिनवगुप्त आहेत. आणि आपल्या सदराकडे ट्यार्पी खेचण्यासाठी इथे भडकाऊ कमेंटा टाकत आहेत
मेलो. ROFL एक लुहारकी म्हणतात ती ही.
बादवे आपलं काय ठरलं होतं चिंतूशेट, मी तुमची खोडी काढायची नाही नि तुम्ही माझी. (आता तुम्हीच अभिनवगुप्त असलात तर मात्र मी आधी तुमची खोडी काढल्याने माफी मागणे क्रमप्राप्त आहे.)

अवांतरः जाऊ द्या हो. चार दिवस टीपी तर झाला चांगला. टीका म्हणजे काय नि टर/थट्टा म्हणजे काय यातील फरक निदान काही लोकांना तरी समजला असावा. शेवटी काय ताटातलं वाटीत नि वाटीतलं ताटात. तुम्ही अभिनवगुप्त असला काय नि मी असलो काय, फरक काय पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

--एक लुहारकी म्हणतात ती ही.
अच्छा! त्यांचं हे वर्णन म्हणायचे की आपण सोनार आहोत हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न? Wink
पण असो, दोन मोठे लोक बोलताना आपण गप्प बसलेलं बरं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमताराम, कवडसे वगैरे पाड की, त्यात अधिक मजा येते. हे अभिनवगुप्त वगैरे काय भानगड लावली आहेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कवडसे वगैरे पाड की, त्यात अधिक मजा येते. हे अभिनवगुप्त वगैरे काय भानगड लावली आहेस?

जुन्या संस्थळावरच्या जुन्या मालकांची आठवण आली आणि ड्वाळे पाणावले! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>>जुन्या संस्थळावरच्या जुन्या मालकांची आठवण आली आणि ड्वाळे पाणावले!
नका हो काहीही आठवू! उगाच भ्रातृभजन आठवू लागतो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरकत नाय कोमेंट पहा. अत्युच्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचा...
विनाकारण नको तिथे बोटं घातली की कसं होतं ते पहा.
http://www.harkatnay.com/2012/05/blog-post_16.html?showComment=133716537...
जय ब्लोगिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

<< " काहीवेळा ‘काय वाट्टेल ते’ किंवा ‘हरकतनाय’ सारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. " >>

या इतक्या परिच्छेदाशिवाय इतर कुठेही 'हरकतनाय' या ब्लॉगचा थेट उल्लेख नाही. पुढे एके ठिकाणी हरकत नाही असा शब्दप्रयोग आहे परंतू हा शब्दप्रयोग म्हणजे कुणा एका विशिष्ट व्यक्तीची खासगी मालमत्ता नव्हे. असो, तर वरील परिच्छेदात 'लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून 'पुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते' या वाक्यात खटकण्यासारखं काय आहे? वपु ही काय शिवी आहे की जिचा इतका राग यावा? वपुंसारख्या मोठ्या लेखकाची उपमा दिल्याबद्दल आनंदच व्हायला हवा. की आपण वपुंपेक्षाही मोठे लेखक आहात? ज्यामुळे वपुंच्या पंक्तीला बसविलं जाणं हा आपल्याला स्वतःचा अपमान वाटावा? शिवाय वाचावे नेटके या सदरात कुठेही हरकतनाय च्या ब्लॉगलेखकाचे नाव घेतलेले नाहीये मग ह्या टीकेला वैयक्तिक टीका असं का म्हणावं?

बरं ही जी काही तथाकथित टीका आहे ती झोंबावी तरी किती तर त्याविरुद्ध तीन भलेमोठे लेख लिहावे लागण्याएवढी? माहीतगरम आणि खबरी या सारखे बोगस आयडी काढून आपला सल व्यक्त करण्याएवढी? (तीन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी या दोन आयडींची वाटचाल या धाग्यावर आगीत तेल ओतण्याशिवाय इतर काहीच नाहीये)

किती दिवस तेच रडगाणं गाणार? तुमची खरंच मानहानी झाली असेल (किंवा तसं तुम्हाला वाटत असेल) तर न्यायालयात जा. पत्रकार परिषदा घ्या. काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा. नपेक्षा असं वाटत राहणार की दोघं (एकाच उपनगरातले असल्यामुळे तर ही शक्यता जास्तच) ठरवूनच भांडणं वाढवितायत आणि वाचकांची मजा पाहून हसतायेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेगु
तुझ्या ब्लोग वर लिहिल तो लोकसत्ता मधे . तु त्याची चमचेगिरी कर.. काळजी करू नकोस.
तुझ्या सारख्या चमच्यांनीच तर तो सोकावलाय. नाही तर त्याची हिम्मत झाली असती का अशी ओपन कोमेंट करायची.
आणि जर तुला इतकं वाईट वाटत असेल तर जा, जा हेरंबच्या ब्लोग वर जा.. आणि कोमेंट वाच सगळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< चेगु
तुझ्या ब्लोग वर लिहिल तो लोकसत्ता मधे . तु त्याची चमचेगिरी कर.. काळजी करू नकोस.
तुझ्या सारख्या चमच्यांनीच तर तो सोकावलाय. नाही तर त्याची हिम्मत झाली असती का अशी ओपन कोमेंट करायची. >>

खबरे, मी कधी त्याची चमचेगिरी केली ग? आणि त्यानं माझ्या ब्लॉगवर लोकसत्तात लिहावं अशी माझी अपेक्षाच नाही मूळी. (तसंही तीन वर्षात पावणेदोनशे पोस्टस मला माझ्या ब्लॉगवर कधीच टाकता आल्या नाहीत / येणार नाहीत. काम धंदे असणार्‍या मला हे छंद इतक्या मोठ्या प्रमाणावर जपता येणं शक्यही नाही.)

<< तुला इतकं वाईट वाटत असेल तर जा, जा हेरंबच्या ब्लोग वर जा.. आणि कोमेंट वाच सगळ्या. >>

तो त्याचाच ब्लॉग आहे. तिथे त्याला प्रतिकूल प्रतिक्रिया प्रकाशित होतील का?

बाकी तू ज्याची चमचेगिरी करते आहेस त्याने खोट्या नावाने लिहीणार्‍यांवर टीकाच केलीय स्वतःच्या ब्लॉगवर. तो स्वतः आपण खर्‍या नावानिशी समोरून वार करतोय याचा अभिमान बाळगतोय. मग तू तरी का अशी खोट्या नावाच्या बुरख्याआड लपून माझ्यावर गलिच्छ शब्दांत टीका करते आहेस? मी तर स्वतःचे खरे नाव, पत्ता, छायाचित्र, ईमेल, मोबाईल प्रकाशित करूनच इथे आणि जालावर सर्वत्र वावरतो. तुझी तर ओळखच काय? तुझ्यावर मी टीका करावी इतकीही तुझी लायकी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चला, या आयडी चे कार्य संपले. Smile भेटू या पुन्हा कधी तरी असेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< चला, या आयडी चे कार्य संपले. >>

तुझ्या आयडीला श्रद्धांजली. बाकी स्वतःच्या प्रतिसादास संपादित करून तू फिरून पुन्हा उगवू नये म्हणून तुझ्या या प्रतिसादास मुद्दाम बूच मारून ठेवत आहे.

<< भेटू या पुन्हा कधी तरी असेच... >>

असेच म्हणजे पुन्हा वाद घातले जातील तेव्हाच तुझा पुनर्जन्म होणार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुमच्या या प्रतिसादाला बूच मारलेलं आहे.

>>तुझ्या आयडीला श्रद्धांजली.

अरे काय ही पातळी.. छ्या!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

खबरीचे प्रतिसाद वाचलेले दिसत नाहीयेत.

http://www.aisiakshare.com/node/743#comment-11680
<< विनाकारण नको तिथे बोटं घातली की कसं होतं ते पहा. >>
http://www.aisiakshare.com/node/743#comment-11684
<< तु त्याची चमचेगिरी कर.. काळजी करू नकोस.
तुझ्या सारख्या चमच्यांनीच तर तो सोकावलाय. >>

या शब्दांत प्रतिसाद देणार्‍या खबरीची पातळी कशी वाटते?

आणि ज्या आयडीचे कार्य संपले (असे स्वतः त्या आयडीनेच घोषित केले आहे) त्या आयडीला श्रद्धांजली वाहिली तर त्यात काय बिघडले?

श्रद्धांजली वाहणे ही तर उच्चतम पातळीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

आजच्या 'वाचावे नेट-के'मध्ये 'ऐसी अक्षरे'च्या सदस्य मेघना भुस्कुटे यांच्या http://meghanabhuskute.blogspot.in या ब्लॉगचा उल्लेख आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा जुना धागा वर काढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

आजच्या लोकसत्तात 'वाचावे नेट-के'मध्ये 'ऐसी अक्षरे'चे सदस्य 'आळश्यांचा राजा' यांच्या http://ase-vatate-ki.blogspot.com/ या ब्लॉगचा उल्लेख आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

या दोघांचेही अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा