पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - खरा अर्थ

नुकताच ऐसी अक्षरे या संस्थळावर स्वघोषित विचारजंत श्री. चिंतातुर जंतू यांनी 'पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - एक अन्वयार्थ' हा मोदीद्वेषाने ठासून भरलेला लेख वाचनात आला. एफटीआयआय या संस्थेच्या संचालकपदी थोर कलावंत श्री. गजेंद्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून वामपंथीयांनी मोदींचा तेजोभंग करण्यासाठी आपल्या डाव्या हाताने विडाच उचलला आहे. तीच अफजलखानी परंपरा चालवत श्री. जंतू यांनीही आपल्या लेखणीला भलतेसलते अन्वयार्थ काढायला भाग पाडलेलं आहे. ते पाहून मला याविरुद्ध आवाज उठवला पाहिजेच असं कळकळीने वाटायला लागलं. तेव्हा माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांना एकदा नमो नमः म्हणून मी त्यांच्याविरुद्ध, खरं तर सार्वत्रिक उघडलेल्या डाव्या आघाडीविरुद्धच दंड थोपटून उभा राहात आहे.

आपला अन्वयार्थ काढताना श्री. जंतू (खरं तर श्री. क्षुद्र जंतू असंच लिहिणार होतो, पण विचार सोडून दिला.) यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय पॉर्न निर्माण करण्यासाठी गजेंद्र चौहान यांची नेमणुक माननीय श्री. मोदीजी यांनी केली आहे असा अन्वयार्थ काढलेला आहे. जाता जाता त्यांनी मेक इन इंडिया या पवित्र ध्येयघोषणेवरदेखील दुगाण्या झाडलेल्या आहेत. त्यांची काही मुक्ताफळं खालीलप्रमाणे -

आज पॉर्ननिर्मितीमध्ये आपण मागे असणं ही भारताला भेडसावणारी एक फार जगड्व्याळ आणि बहुआयामी वगैरे समस्या आहे.

भारंभार पोरं काढणाऱ्या आपल्या दीर्घ आणि समृद्ध परंपरेकडे पाहता मनुष्यबळाची कमतरता ही आपली समस्या नाहीच.

तसंच 'कोकबॅनप्रमाणे कॉकबेन करा' वगैरे थिल्लर विधानंही ते करतात. हे पाहून त्यांच्या तथाकथित बुद्धिमत्तेची कीव आल्यावाचून राहात नाही. फिल्म फेस्टिवलांच्या नावाखाली अश्लील चित्रपट पाहाण्याची खाज भागवून घेणारे आणि इतरांनाही खाजवून त्यांची खरूज जागृत करणारे जंतू हेच खरे कॉकप्रेमी असून त्यांचा कंटरव चोराच्या उलट्या बूबांप्रमाणेच आहे.

वर उद्धृत केलेल्या दोन परस्परविरोधी विधानांतूनच त्यांची कलाजाणीव किती थिटी आहे हे कळतं, आणि कलाजाणीवेच्या बाबतीत साइज मॅटर्स! ही विधानं इतकी उलटीपालटी आहेत की जणू 69 चा आकडाच! जे पडद्यावर चित्रित होतं तिलाच कला म्हणण्याचा वेडगळपणा ते करतात. अरे, या आसिंधुसिंधु पसरलेल्या देशात पूर्वापारपासूनच पॉर्ननिर्मिती जोरात चालू आहे. गेली कित्येक सहस्रकं भारताचा लोकसंख्यावाढीचा दर जगात अग्रेसर राहिला आहे तो उगीच का? पण भारतात निर्माण होणारी पॉर्ननिर्मिती ही केवळ कलाकारांच्या सुखासाठी, स्वांतसुखाय होते. जी कोणीच पाहात नाही ती खरी अस्सल कला हे १०० करोडचे धंदे करणाऱ्या चित्रपटांची रेवडी उडवणाऱ्या जंतूंना आम्ही सांगावं? या स्वांतसुखाय कलेत प्रोड्युसर, दिग्दर्शक, मेकपमन, लाइटमन, कलाकार, आणि नंतरचा पसारा आवरणारे या सर्व भूमिका निभावणारेच त्यात प्रेक्षकांची, आणि नंतर समीक्षकाची भूमिका बजावतात. दररोज रात्री ही कलानिर्मिती देशाच्या कोनाकोपऱ्यात होते - पण तथाकथित कलाविश्वाच्या तथाकथित समीक्षकांनी त्याची दखल तरी घेतली आहे का? आपण पॉर्ननिर्मितीत मागे नसूनही त्याची दखल पुरेशी घेतली जात नाही ही भारताला भेडसावणारी एक फार जगड्व्याळ आणि बहुआयामी वगैरे समस्या आहे.

महनीय श्री. गजेंद्र चौहान यांनी ज्यांची भूमिका केली त्या धर्मराजाने आपली पत्नी जुगारात लावली. त्यानंतर जो प्रकार घडला तो पॉर्न नाही तर दुसरं काय? महाभारतातच पराशर ऋषी आणि मत्स्यगंधेचं चित्रण आहे, ते पॉर्न नाही तर दुसरं काय? वात्स्यायनाने पॉर्नच्या महत्त्वावर भर दिला नाही असं जंतू सदसद्विवेकबुद्धीला स्मरून म्हणू शकतील काय? आणि ज्या इराणपासून ते जपानपर्यंत भारताची सत्ता पसरली होती त्या इराणात घडलेल्या १००१ रात्रींमध्ये काही पॉर्नमय घडतच नाही काय? आपल्या महनीय देशाच्या दुर्दैवाने आपण आपल्या परंपरा विसरलो आहोत. त्या परंपरांचा पाईक होणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे याची आठवण करून देण्यासाठी गजेंद्र चौहानांची नेमणूक झालेली आहे.

ही नेमणूक पॉर्ननिर्मितीसाठी आहे असा श्री. जंतूंचा समज झालेला आहे. याला काय म्हणावं हेही समजत नाही. आता फिल्म इंस्टिट्यूटमधून निर्माते-दिग्दर्शक तयार होतात हा एक मोठ्ठा गैरसमज. जे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके तयार होतात, त्यांच्या कलाकृती लोकांना समजतात हा दुसरा गैरसमज. अशा डायरेक्टरांनी पॉर्न तयार केली तर त्यात इतक्या गोष्टी निव्वळ रूपकात्मक ठेवलेल्या दिसतील की आत्ता जे पाहिलं ते पॉर्न आहे हे लोकांना समजणारही नाही. आणि अशा पॉर्न सिनेमातून आपण परकीय बाजारात उतरण्याचं धाडस करू ही कल्पनाही त्यांच्या खास समीक्षकी बुद्धीच्या सीमा दाखवते. एफटीआयआय मधून पॉर्न अॅक्टर तयार होणार? या दाढी वाढलेल्या, झब्ब्यावर शबनम बॅगा बाळगणाऱ्यांकडे पाहिलं तर यांनी आंघोळ केली आहे की नाही अशीही शंका निर्माण व्हावी. यांच्याकडे पाहताना डिसबिलिफ सस्पेंड करायचा म्हणजे प्रेक्षकावर इतका ताण पडेल की पॉर्नच्या हेतूवरच घाव पडेल. अहो, एफटीआयआयमधून तयार करायचे आहेत ते केवळ समीक्षक. त्यांचे डोळे उघडून त्यांना देशाच्या कोनाकोपऱ्यात चालू असलेल्या गृहोद्योगी पॉर्ननिर्मितीकडे डोळसपणे पाहायला लावण्यासाठी श्री. गजेंद्र चौहानांची नेमणूक आहे.

प्रातःस्मरणीय गांधीजींनी कुटिरोद्योगाचं स्वप्न बाळगलं. स्वयंपूर्ण खेडं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी तरुणाईला 'गावाकडे जा' असा सल्ला दिला होता. मास प्रॉडक्शनपेक्षा त्यांचा प्रॉडक्शन बाय मासेसवर अधिक विश्वास होता. ही गांधीजींची शिकवण ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांना गावोगावी कुटिरोद्योगांतून खऱ्या अर्थाने मासेस प्रॉडक्शन कसं करतात याचा अभ्यास करायला लावणार आहेत. अस्सल भारतीय संस्कृतीचं दर्शन तिथे घडेल. मग त्यांना मेनस्ट्रीम लादण्याच्या टॉप डाउन अॅप्रोचऐवजी या लघुउद्योगालाच मेनस्ट्रीममध्ये स्वीकारता येईल. मेक इन इंडियाचा हा खरा अर्थ आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

"कंटरव चोरांच्या उलट्या बूबांप्रमाणे"!
आता यावर काय बुवा (बूबा नव्हे) उलट लिहिणार! सगळे बाबू लोक गार!
'फिल्म फेस्टिवल च्या नावाखाली अश्लील चित्रपट' !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आई ग्ग!!! सॉलिडे!

जंतू हेच खरे कॉकप्रेमी असून त्यांचा कंटरव चोराच्या उलट्या बूबांप्रमाणेच आहे.

अरारारा. आवरा. ROFL

अशा डायरेक्टरांनी पॉर्न तयार केली तर त्यात इतक्या गोष्टी निव्वळ रूपकात्मक ठेवलेल्या दिसतील की आत्ता जे पाहिलं ते पॉर्न आहे हे लोकांना समजणारही नाही.

हाण्ण्ण!!! त्रिवार सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास!! एकदम कडक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरेंद्र चौहान?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माफ करा, पण माननीय श्री. मोदींचं नाव घेण्याची सवयच लागली आहे. दुरुस्ती केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन गुर्जींचा कलगीतुरा रंगणारसं दिसतंय. त्याचंही चित्रीकरण करा रे कोणीतरी. मला आवडेल बघायला. त्यात गुर्जींनी हा असा फक्त आवाजच उठवू नये, अशी मागणी -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण भारतात निर्माण होणारी पॉर्ननिर्मिती ही केवळ कलाकारांच्या सुखासाठी, स्वांतसुखाय होते.

फार्फार पुर्वी पॉर्नच्या नावाखाली चाललेला दाक्षिणात्य कलाप्रकार पाहिल्यानंतर आपल्याला* बरंच काही शिकणं अजून बाकी आहे याची तीव्र जाणीव मला झाली होती.

*आदरार्थी बहुवचन वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार्फार पुर्वी मेनस्ट्रीम , "कौटुंबिक" दाक्षिणात्य चित्रपटांमधल्या स्वप्नदृष्यांच्या नावाखाली चाललेला पोर्नप्रकार पाहिल्यानंतर आपल्याला बरंच काही शिकणं अजून बाकी आहे याची तीव्र जाणीव मला झाली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ह्या ह्या ह्या ... Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

>> महनीय श्री. गजेंद्र चौहान यांनी ज्यांची भूमिका केली त्या धर्मराजाने आपली पत्नी जुगारात लावली. त्यानंतर जो प्रकार घडला तो पॉर्न नाही तर दुसरं काय? महाभारतातच पराशर ऋषी आणि मत्स्यगंधेचं चित्रण आहे, ते पॉर्न नाही तर दुसरं काय? वात्स्यायनाने पॉर्नच्या महत्त्वावर भर दिला नाही असं जंतू सदसद्विवेकबुद्धीला स्मरून म्हणू शकतील काय? आणि ज्या इराणपासून ते जपानपर्यंत भारताची सत्ता पसरली होती त्या इराणात घडलेल्या १००१ रात्रींमध्ये काही पॉर्नमय घडतच नाही काय? आपल्या महनीय देशाच्या दुर्दैवाने आपण आपल्या परंपरा विसरलो आहोत. त्या परंपरांचा पाईक होणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे याची आठवण करून देण्यासाठी गजेंद्र चौहानांची नेमणूक झालेली आहे.

ह्या परिच्छेदात श्री घासकडवींचं निळ्या कातडीखालचं ढोंगी लाल कॉमी रूप उघडं पडलं आहे. कितीही सोंग आणलं तरी हे पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे विचारजंत आहेत हे उघड आहे. कारण जाता जाता त्यांनी आपल्या कॉमी धर्माला आणि संस्कृतीला अनुसरून भारताच्या पूजनीय इतिहासात कशी घाणच घाण आहे ते दाखवून दिलंय. अजोंचे शब्द वापरायचे, तर -

 • तुम्हाला स्वतःला सगळी मायथॉलॉजी हिंदू आहे म्हणून कोणता उज्वल इतिहास प्रस्थापितच होऊ द्यायचा नाही
 • आजपर्यंतच्या कॉमीजनी हे हेतूतः केले
 • भारतीय इतिहासात थोर मानली जाणारी व्यक्तित्वं हे लोक अशी belittle, disparage करतात कि विचारता सोय नाही.
 • मूळात कॉमी इतिहासकारांचा लेखनाचा टोन असा असतो कि भारताच्या इतिहासात प्रेरणादायी असं काहीच नाही.
 • इतिहासातून प्रेरणाच घ्यायची नाही तर इतिहास अभ्यासायचा कशाला?
 • कॉमी इतिहासकारांनी न्यूनगंडी देशवासीयांची फौज पैदा करून ठेवली आहे.

स्रोत

शाब्दिक खेळांमध्ये गुंतून पडलेल्या ऐसीकरहो सुज्ञ व्हा, घासकडवींचा हा कॉमी डाव वेळीच लक्षात घ्या!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कॉमी म्हंजे - Muttahida Qaumi Movement - यातलं Qaumi की Communist या शब्दाची मोडतोड करून त्याचं केलेलं Commi ?

"लाल कॉमी ते कम्युनिस्ट" म्हंटलंत तरी Qaumi Movement - ही रक्तरंजित क्रांती असल्याने ती लाल रंगाची आहे असं म्हणायला (अल्ताफभाई) पुढे सरसावणार नाहीत कशावरून ??

----

आणि घासकडवी "निळे" म्हंजे काय ? निळा रंग हा ज्ञानाचे प्रतिक आहे, किंवा दलित चळवळीच्या प्रतिकाचा रंग आहे किंवा इस्रायलच्या ब्लू स्टार चा रंग आहे. यातला नेमका कोणता ??? की घासकडवींनी त्यांची स्वतंत्र ब्रिगेड्/प्लॅटून्/बटालियन्/कमांड उभी करायचा निर्णय .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. नक्की कुठच्या सायटींवरची बंदी काढायची हे ठरवणाऱ्या समितीत मी असल्यामुळे सर्व सायटी व्यवस्थित तपासून पाहाण्याचं काम माझ्या अंगावर येऊन पडलं होतं. त्यामुळे फारच थकवा आला होता.

त्यांनी आपल्या कॉमी धर्माला आणि संस्कृतीला अनुसरून भारताच्या पूजनीय इतिहासात कशी घाणच घाण आहे ते दाखवून दिलंय.

घाणच घाण? तुम्हाला माझा युक्तिवादच समजलेला नाही हे उघड आहे. अहो मी तर म्हणतोय की या पवित्र पूजेला 'पॉर्न' असं नाव देऊन तिला गलिच्छपणा चिकटवणं हेच मुळात पाश्चात्यांनी केलं. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांच्यामागे आंधळेपणाने चालणं हेच आपल्या समीक्षकांचं कर्तव्य ठरलेलं आहे. भारतीय कलाविष्काराच्या स्वतंत्र वाटा समजून घेण्यासाठी हा आंधळेपणा टाळू शकणारे आणि सत्याकडे नवीन दृष्टिकोनातून बघू शकणारे समीक्षक तयार करायचे आहेत. हेच माननीय पंतप्रधान श्री. मोदी साधू पाहात आहेत. भारतीय सत्य वेगळं कसं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी इतिहास संशोधन संस्थेवरही सुदर्शन रावांसारख्या महनीय व्यक्तीला स्थानापन्न केलेलं आहे ज्यायोगे वातावरणात भरून राहिलेलं सत्य लोकांच्या मनातच नव्हे तर इतिहासाच्या पुस्तकातही समाविष्ट होईल. त्यासाठी पुरावे वगैरे क्षुद्र, तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून पडण्याची गरजच राहाणार नाही. ही गरज तशीही पाश्चात्त्य विचारसरणीतून निर्माण झालेली आहे.

अरुणजोशींनी मांडलेले विचार माझ्याविरुद्धच वापरण्याचा तुमचा कुटिल डाव लक्षात आलेला आहे. ऐसीकरांनाही तो लक्षात येईलच. आम्हाला केवळ उज्ज्वल इतिहासच नव्हे तर डोळे दिपवून टाकणारा भविष्यकाळही बनवायचा आहे. त्यामुळे विकास हा भविष्याप्रमाणेच इतिहासात मागे जाऊनही करणं जमेल अशी खात्री आहे. जर भारतीय इतिहासात काही प्रेरणादायी नसेल तर आम्ही ते बनवू. तेही भारतातच - मेक इन इंडिया या स्लोगनखाली. मग तुमच्यासारख्यांच्या कॉमी न्यूनगंडी फौजेचा कसा धुव्वा उडेल ते पाहा. नाही उडला तर अर्थातच इतिहास बदलून तो उडला हे सिद्ध करणं काहीच कठीण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यामुळे फारच थकवा आला होता.

सायटी आवश्यकेपेक्षा जास्त व्यवस्थित चेक केल्या कि काय? Wink

===================================================================

जर भारतीय इतिहासात काही प्रेरणादायी नसेल तर आम्ही ते बनवू.

कोणीही काँगी, कॉमी, समाजवादी (च्यायला, माझ्या हातून हे कधी झालं म्हणून) हरखून जाईल इतकं तूप तुम्ही भारतीय इतिहासात प्रत्येकाला खावू घातलं आहे. अन्न धान्य, कपडे लत्ते, शिक्षण्-सुरक्षा देखिल रोज दिवाळी असल्याप्रमाणे दिलेले आहेत. शिवाय असाधारण न्याय आणि समता यांचा दाखला देखिल अन्यत्र मिळणार नाही. यावर्षी पाउस पडला नाही म्हणणारास जगात समुद्रांत किती लिटर पाणी आहे ते सांगून परत वाटे (किंवा वाट) लावायची क्षमता आहे आपली. जो माणूस इतकं प्रेरणादायी शून्यातून उभं करू शकतो, तो कशातून काहीही बनवू शकतो, म्हणून आम्हाला दिलेल्या वचनाचा निर्वाह आपण कराल याबद्दल आमचे दुमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सायटी आवश्यकेपेक्षा जास्त व्यवस्थित चेक केल्या कि काय?

काय हे अजोकाका... अशा भलत्यासलत्या डिटेली उघड करायच्या का? अहो वात्रट विनोदही पॉर्नच्या चित्रिकरणासारखा किंचित अनावृत्तच जास्त चविष्ट वाटतो. असो.

जो माणूस इतकं प्रेरणादायी शून्यातून उभं करू शकतो, तो कशातून काहीही बनवू शकतो,

नाही हो. मी आकडेवारी वगैरे वापरून भारताची परिस्थिती कशी सुधारते आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला खरा. पण दुर्दैवाने त्यातून फक्त गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्येच परिस्थिती सुधारली आहे असा निष्कर्ष निघाला. कॉंग्रेसच्या राज्यात एवढाच निष्कर्ष काढून चालत होतं. पण आता नवीन राजवटीत इतिहासाकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. हजारेक वर्षांपूर्वी कसं सगळं सुंदर होतं असं सिद्ध करण्याची गरज सध्या आहे. मग परकीय राजवटी आल्या आणि त्यांनी वाटोळं केलं; तसंच स्वातंत्र्यानंतर आणखीनच महाभयंकर राजवटी आल्या आणि त्यात मधली चारपाच वर्षं सोडता बाकी काळात देशाचं आणखीनच वाटोळं झालं... हे सिद्ध कसं करणार? म्हणूनच आता सत्य हे बाह्य पुराव्यांनी, आकडेवारीने न दाखवता प्रत्येकाच्या 'आतल्या आवाजावरून' सिद्ध करायचं आम्ही ठरवलेलं आहे. तेव्हा नव्या राज्याबरोबर ही नवी विटी आम्ही घेतलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आकडेवारी वगैरे वापरून

चरणी प्रणाम !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मस्त विनोदी !

कलाजाणीवेच्या बाबतीत साइज मॅटर्स! ही विधानं इतकी उलटीपालटी आहेत की जणू 69 चा आकडाच

.
दादा कोंडके शिकवणी लावतील हे वाचून ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मायबाप सरकार आता 'पॉपकॉर्न' या शब्दातही पॉर्न दडलेला आहे असा संशय येऊन, त्यावर बंदी घालणार आहे अशी अफवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सिनेमा बघताना पॉर्न खायचं! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या पर्तिसादास पॉपकॉर्नव अशी ष्रेणी का देवू नये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आजच अदिती आणि घासुगुर्जींचा लोकसत्ता मधला लेख वाचला. चांगला लिहिला आहे. कदाचित भोपटकरी* लोकांना धक्का वगैरे बसेल.

(* फार्फार पूर्वी पुण्यांत,'भाला' कार भोपटकर होते. ते कायम अश्लीलते विरुद्ध आवज उठवत. 'यमुनाजळी' गाण्याला त्यांनीच आक्षेप घेतला होता. अत्र्यांनी त्यांचे नांव 'अश्लीलमार्तंड' असे ठेवले होते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अश्लीलतामार्तंड हे कुणा कृष्णराव मराठ्यांना म्हणायचे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेल, असेल. नक्की आठवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अश्लीलमार्तंड हे कृष्णराव मराठेच. हे गृहस्थ अगदी भक्तिभावाने साहित्यसंमेलनामध्ये अश्लीलताविरोधी ठराव नेमाने मांडीत. साहित्यातले अश्लील शब्द कटाक्षाने शोधून काढून त्यावर आक्षेप घेण्याचे कामही ते निष्ठेने करीत. अश्लीलसाहित्यवाचनात त्यांनी पारंगतता मिळवल्यामुळे त्यांना थट्टेने अश्लीलमार्तंड म्हणत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॉर्नवरील बंदी उठवण्यासाठी कदाचित या चित्रफितीचा उपयोग झाला असेल असे वाटते.

हिट्लर आणि पॉर्न बॅन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्तए. नानावटींनी हा व्हिडीओ दाखवण्याबद्दल आणखी गंमत वाटली.

विशेषतः "कोण साला सत्यकथा वाचतो हल्ली" हा भाग (किंचित कालबाह्य असला तरीही) फारच आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> विशेषतः "कोण साला सत्यकथा वाचतो हल्ली" हा भाग (किंचित कालबाह्य असला तरीही) फारच आवडला.

फ्युरर हिट्लर मराठीतील 'कालबाह्य' सत्यकथेऐवजी हिंदीतील सत्यकथा या मासिकांवरील मुखपृष्ठाबद्दल 'टीका' करत असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हणालात म्हणून गूगल केलं. हे आणखीनच थोर निघालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.