चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी

दृश्यकलेबद्दल सर्वसामान्य माणूस सहसा विचारच करत नाही. चुकून तशी वेळ आलीच, तर त्याला अगणित प्रश्न पडतात. अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न जसे : दृश्यकला कशाला म्हणतात? तिची व्याख्या काय? ही कला निर्माण करावी असे एखाद्याला का वाटते? त्याच्या डोक्यात नेमक्या कोणत्या घडामोडी होत असतात? तो जी कला निर्माण करतो, तिच्यातील चांगले-वाईट, सुंदर-असुंदर कसे आणि कुणी ठरवायचे असते? ते माझे मला ठरवता येणार नाही का? त्यासाठी मला स्वतःला घडवावे, खुले व्हावे लागेल का? कोणत्या क्षमता विकसित कराव्या लागतील? मुळात या कलांचा माझ्याशी संबंधच काय? तो संबंध असण्या-नसण्याने माझ्या जगण्यात काय फरक पडणार आहे? कुणाच्या जगण्यात तो तसा पडतो?...

सर्वसामान्य माणसाला पडणार्‍या अशा प्रश्नांची उत्तरे त्याला समजेल अशा भाषेत मिळत नाहीत. मग, हे प्रकरण आपल्यासाठी नाहीच, असा त्याचा समज होतो. अशा गोष्टींसाठी मी माझी बुद्धी आणि शक्ती खर्च का करावी, असा शेवटचा प्रश्न तो स्वतःला विचारतो आणि ‘करू नये’ असे उत्तरही स्वतःच देऊन ‘दृश्यकला’ नावाच्या विषयाकडे पाठ फिरवतो.

एवढ्याने हे संपत नाही. जे आपल्याला माहीत नाही, समजत नाही, किंवा ज्या गोष्टीचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही, त्या गोष्टीकडे तुच्छतेने बघण्याची, तिची टिंगल करण्याची फडमारू वृत्ती त्याच्यात बळावते. इतरांनाही तिचा संसर्ग फार वेगाने होतो आणि हाच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जातो. गणित किंवा विज्ञान-तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा दबदबा असतो, तसा कलांचा नसल्यामुळे हे सहज शक्य होते.

हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्याची मुख्य जबाबदारी अर्थातच दृश्यकलांच्या क्षेत्रात कार्यरत असणारे कलाकार, कलाशिक्षक, समीक्षक, अभ्यासक अशा मंडळींचीच आहे यात शंका नाही. हे लक्षात घेऊन पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘सु-दर्शन कलादालन’ आणि ‘पालकनीती परिवार’ ह्या दोन संस्थांनी एकत्र येऊन ‘चित्रबोध’ ह्या दृश्यकला रसग्रहण वर्गाचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे.

रसग्रहणवर्ग कोणासाठी?

जून २०१२ च्या आरंभी होणारा हा तीन दिवसांचा वर्ग शालेय विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक ह्यांच्यासाठी असेल. ह्यांच्यासाठीच का, ह्या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. मुलांच्या घडण्या-बिघडण्याविषयीची काळजी हेच दोन घटक वाहत असतात. त्यामुळे माणसाच्या जगण्यात असलेले दृश्यकलांचे स्थान आणि महत्त्व त्यांना उमगले, की ते आपोआप मुलांपर्यंत झिरपेल. हे झिरपणे मुलांना एखाद्या क्लासात अडकवून टाकण्याने साधत नाही. त्यासाठी मूळचा झराच जिवंत व्हावा लागेल, म्हणून हा वर्ग पालक-शिक्षकांसाठी. खरे तर ‘पालकनीती’सारख्या संस्थेचा यातील सहभागच पुरेसा बोलका आहे.

पालक-शिक्षकांसाठी असलेल्या ह्या रसग्रहण-वर्गाला केवळ पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्रभरच्या पालक-शिक्षकांनी यावे अशी संयोजकांची अपेक्षा आहे. त्यासाठी वर उल्लेखलेल्या दोन्हीपैकी कुठल्याही एका संस्थेकडे प्रवेश अर्ज भरून नोंदणी करावी लागेल. सहभागी होण्यासाठी दृश्य-कलांमधे काही विशेष शिक्षण घेतलेले असणे, किंवा चित्रकलेचे शिक्षक असणे अशी पूर्वअट मुळीच नाही. मात्र, यायचे असेल तर सुरुवातीपासून यावे आणि पूर्ण तीन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती मात्र जरूर आहे.

कार्यक्रमाची सुरुवात ३१ मे रोजी संध्याकाळी होईल व कार्यक्रम ३ जूनला संध्याकाळी संपेल.
या रसग्रहणवर्गासाठी रु. १०००/- प्रवेशमूल्य आहे. यामध्ये कार्यशाळेच्या वेळातील दुपारचे जेवण व दोन वेळचा चहा यांचाही समावेश आहे. प्रवासखर्च मात्र करावा लागत असल्यास आपला आपल्यालाच करायचा आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या मुलांसोबत काम करणार्‍या व्यक्तींनी, धडपडणार्‍या शिक्षकांनी या रसग्रहण वर्गात सहभागी व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे.

या रसग्रहण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी कला क्षेत्रातील अतिशय नामवंत व्यक्ती येणार आहेत. त्यांची नावे, व्याख्यानाचे विषय आणि ओळख पुढे दिलेली आहे.

सुधीर पटवर्धन : कला, व्यक्ती आणि समाज
(आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, आधुनिक भारतीय कलेचा आढावा घेणार्‍या 'विस्तारणारी क्षितिजे' या चित्रप्रदर्शनाचे महाराष्ट्रातल्या प्रमुख आठ शहरांत आयोजन)

दिलीप रानडे : समकालीन भारतीय कला
(छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे मुख्य व्यवस्थापक, प्रदर्शन सल्लागार अशा पदांवर काम.)

वसंत आबाजी डहाके : दृश्यकला आणि साहित्य
(नामवंत लेखक, कवी, अनेक महत्त्वाच्या संदर्भग्रंथांचे संपादक, २०१२च्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष)

नचिकेत पटवर्धन : जागतिक कलाविश्व
(नामवंत चित्रपट दिग्दर्शक, वास्तुरचनाकार, कलादिग्दर्शक)

समर नखाते : दृष्टी-सृष्टी-कलासृष्टी
(पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या टेलिव्हिजन विभागाचे माजी प्रमुख, थिएटर अ‍ॅकॅडमीने सादर केलेल्या घाशीराम कोतवाल, महानिर्वाण अशा अनेक नाटकांचे प्रकाशयोजनाकार, नाट्यशिक्षण, माध्यमशि़क्षण या क्षेत्रांत कार्यरत)

वर्षा सहस्रबुद्धे : दृश्यकलेची जाण, आपण आणि आपली मुले
(शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ)

नितीन कुलकर्णी : दैनंदिन जीवन व कला
(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे केंद्र संचालक, साहित्यिक)

सचिन कुंडलकर : दृश्य कला व प्रयोगजीवी कला
(चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, कादंबरीकार)

नितीन हडप : भारतीय कलापरंपरेची ओळख
(फॅशन डिझाईन, कला आणि डिझाईन क्षेत्रातले जाणकार)

ऋचा कुलकर्णी : भारतीय कलापरंपरेची ओळख
(कलेचा इतिहास व सौंदर्यशास्त्र या विषयांत अध्यापक)

वैशाली ओक : कलासाहित्य
(कलाकार)

प्रवेश अर्ज ५ मे पूर्वी भरून पाठवावा.

प्रवेश अर्ज मिळण्यासाठी :
सु-दर्शन कला दालन फेसबुक पान
पालकनीती परिवार

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा रोचक माहिती. कार्यक्रम भरगच्च दिसतोय!
पालकनितीच्या संस्थळावर डोकावलो पण फॉर्म दिसला नाही. नेमका दुवा मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पालकनितीच्या संस्थळावर डोकावलो पण फॉर्म दिसला नाही. नेमका दुवा मिळेल का?

सु-दर्शन कलादालनाच्या फेसबुक पानावर अर्जाची प्रतिमा आहे (दुवा वर पाहावा).
या दोनही संस्थांच्या कार्यालयात प्रवेशअर्ज मिळेल. कदाचित इमेलवरसुद्धा मिळेल.

सु-दर्शन कला दालन - टेलि: 24430803 (वेळ : सायं. ७ ते ९) किंवा नितीन हडप : 9372418615
पालकनीती : palakneeti@gmail.com टेलि : 25441230, 25673596 (वेळ : स. ११ ते सायं ६)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

पालकनीतीच्या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे त्या पानावर प्रवेशअर्जाचा नमुना मिळाला:

प्रवेशअर्ज
नाव:
पत्ता:
चलध्वनी (मोबाईल):
ईमेल:

- आपण कोणत्या भूमिकेतून या वर्गाला येऊ इच्छिता?
१) पालक २) शिक्षक ३) पालक व शिक्षक

- या वर्गात आपल्याला काय शिकायला मिळेल अशी आपली अपेक्षा आहेे?

- यापूर्वी दृश्यकलेसंदर्भात आपण कधी काही वाचन केले आहे वा काही अनुभव घेतलेला आहे का? असल्यास, त्यापैकी कोणत्या विषयातला? (असल्यास सांगा, नसल्यास स्पष्टपणे तसे लिहा.)

- आपण चित्र, शिल्प असे काही कलाप्रकार स्वतः कधी हाताळलेले आहेत का? असल्यास कोणते?

- वर्गाच्या प्रवेशशुल्कांमध्ये आपल्याला सवलतीची अपेक्षा आहे का? असल्यास का? किती?

संपर्कासाठी पत्ता पूर्ण लिहावाच, शिवाय चलध्वनी (मोबाईल) किंवा ईमेलचा पत्ता आवश्यक आहे.
मर्यादित जागा असल्याने सहभाग घेण्याची इच्छा असलेल्यांची निराशा होऊ नये यासाठी ही सूचना आहे.
प्रवेश-अर्ज 5 मेपूर्वी भरून पालकनीतीच्या पत्त्यावर पाठवावा.
संपर्कासाठी - palakneeti@gmail.com प्रियंवदा बारभाई - 9822475823 शुभदा जोशी ड्ढ 9822094095

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

सदर रसग्रहण वर्ग कसाकाय पार पडला, किती लोकांची उपस्थिति होती, कायकाय मार्ग दर्शन केले गेले, वगैरे माहिती हा कार्यक्रम पार पडल्यावर द्यावी.

सुरुवात म्हणून वरील सर्व नामवंत मान्यवरांनी विविध संस्थळावरून दृष्यकलेबद्दल प्रारंभिक माहिती विनामूल्य दिल्यास उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरेसा वेळ देऊ शकले असते तर इथे यायला नक्की आवडले असते, पण.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोंदणी केली आहे.
खरंतर मी आठवड्यापूर्वीच नोंदणी केली होती. पैसे मात्र काल भरायला गेलो असता, आता (माझ्यासारख्या आधी नोंदणी केलेल्यांचे अपवाद) केवळ फॉर्म घेत आहेत व जागा भरल्याने पैसे घेणे थांबवले आहे असे कळले.
योग्य वेळी माहिती दिली त्याबद्दल माहितगाराचे विषेश आभार!

आणि कोणी येतंय का तिथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कार्यशाळेत ज्यांची व्याख्यानं होणार आहेत त्यांची नावं पाहता 'ऐसी अक्षरे'च्या अनेक वाचकांना कार्यशाळेविषयी कुतूहल असेल असं वाटतं. शक्य असलं तर रोजच्यारोज कार्यशाळेचं वार्तांकन करा अशी ऋषिकेश यांना आग्रहाची विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वार्तांकन जरूर करेन. मात्र तीनही दिवस रोजच्या रोज करू शकेन की नाही ते व्याख्यानांचा डोस किती हेवी/लाईट आहे त्यावर ठरवेन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!