"वाचा लेको" ऐसीवर टंकुन.

"ऊठ बाबा, चुलीतली राख घीऊन दात घास" जख्खड म्हातारी, आज्जी कुठली.
"बग माजा कसा भिंगतुय!" सकाळपारी भोवरा फिरवायचा रोजचा पराक्रम.
"आये, मी न्हाय जाणार साळंला" खाकी चड्डी पाढरा शर्ट. शेंबुड पुसणारा गबाळा अवतार.
"चल रै भावड्या, कालची गणितं सोडवलीका?" दोन वेण्या घातलेली थोरली बहीण. गुडीगुडी.
"तायं, मला गाभुळ्या चिच्चा दि की काढुन" वाटेतल्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करत.
" पाटीवर बदकाचे चित्र काढा" फळ्यावर छडी ठेवत मास्तरीण. ढबरी.
"चौघडे वाजले .......सुरवंटराव उदास झाले.......सोनुताई सोनुताई..." एका सुरात अख्खा वर्ग.
"आज डब्यात शिरा आणलायं" बोरीच्या झाडाखाली पंगत.
"सरयं बाजुला, मला ध्वु दी आधी" बारकुल्या तोटीवर डबे धुवायला गर्दीच गर्दी. तिच्यात मुसंडी मारत.
"पुं..गी .. कु..णाची.." आतल्या गड्यांना औट करायच्या नादात. रिंगणाबाहेर फिरत फिरत.
"सुकडी घ्या रे" शाळा सुटण्याची चाहुल. डबे काढुन तयार.
"ये आता तुज्यावर राज्य, यी शिवायला" परतीच्या वाटेवर शिवनापाणी.
"आयं, म्या चाल्लु खेळायला" दारातुन दप्तर घरात भिरकावत बाहेरच्या बाहेर सुसाट.
"मलाबी घ्या रै" आता लौंपाट खेळाय मजा येणार.
"आज्जे, राकीसाची गोष्ट सांगकी" निद्रादेवीच्या कुशीत शिरत. मायेची ऊब पांघरत.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

झकास, एक जुनी आठवण ताजी झाली. खुर्चीवर बसून मास्तर डुलक्या घ्यायचा आणि आमच्यासारखी उनाड मुले वर्गात कंचे खेळायची. आवाज वाढला कि मास्तरांची झोप मोड व्हायची आणि आमचे तळहात लाल व्हायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद विवेकभाऊ!
चिंचेच्या ओल्या फोकाने आम्हीही कित्येकदा हात लाल करुन घेतले आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हीही कित्येकदा हात लाल करुन घेतले आहेत.

हातच ना! आमच्याकडे विधात्याने केवळ फटके खाण्यासाठी निर्माण केलेल्या अवयवाचा वापर होत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Blum 3

होस्टेलवर असताना कॉमन पनीशमेंट नंतर कित्येकांना चालता/ऊठता/बसता येत नसे. Cray 2
नको त्या आठवणी जाग्या झाल्या. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! जव्हेरगंज जी,
ऐसीवर पोळी अन्‌ अन्य संस्थळावर नळी ???
का हो अस्सं ? Wink ROFL
.
समझनेवालोंको इशारा काफी है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला पडत्या फळाची आज्ञा मानुन लगेच लगेच एका नळीची व्यवस्था करतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे नको नको मी तिथे वाचली हो ROFL
ओह शूट!!! Sad Smile Sad Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देन ओके!
कालांतराने एखादी मसालेदार नळी ईकडेच टाकतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हाहाहा ओह नो!!!
___
बरय मग आम्ही (मी) मानभावीपणे म्हणू - सारखा तोच्च तोच्च विषय काय गडे? Wink
____
बाय द वे लहानपणी पाहुण्यांकडे गेल्यावरती कोणी जर खाण्याचं विचारलं तर नाही म्हणायचं असं आई-बाबांनी शिकवलं होतं. पण माझ्याच्याने कधीही खोट्ट खोट्ट मानभावी नाही म्हणवलच नाही. Wink
च्यायला जिकडेतिकडे प्रांजळपणा नडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! बोली नेमकी पकडलीये! मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!