माहिती हवी आहे- मदर तेरेसा यांचे संतपद

मदर तेरेसा यांचे चमत्कार पोप यांनी 'अप्रूव्ह'केल्यामुळे आता त्यांना येत्या सप्टेंबरमध्ये 'संतपद' बहाल करण्यात येणार आहे अशी बातमी आहे.

http://www.ndtv.com/india-news/mother-teresa-to-be-made-catholic-saint-in-september-report-1256308

मला या गोष्टींच्या मेरीट्समध्ये शिरायचे नाही आहे.

या बातमीला आता तीन-चार दिवस झाले.हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमीप्रमाणे विरोध केला.पण ते विवेकवादासमोर जन्मसिद्ध,कर्मसिद्ध आणि धर्मसिद्ध पापी (किंवा बौद्धिक-नैतिक गुन्हेगार म्हणा हवे तर),मनुवादी,ब्राह्मणवादी,संघी इ.इ. असल्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही.

परंतु अंनिस,नास्तिकांच्या संघटना,निरनिराळे विवेकवादी वगैरे विचार मंच इत्यादींनी याचा मुखर विरोध संघटनात्मक पातळीवर पत्रके, निषेध मार्च, कोपरा सभा,पथनाट्य, विद्वज्जड फेसबुक पोस्ट, ज्ञानपाजक अग्रलेख इ.इ.द्वारे केल्याची बातमी माझ्या तरी वाचनात आली नाही.

इथल्या काही जागरूक सदस्यांच्या माहितीत असे काही असेल तर त्यांनी कृपया शेअर करावे ही विनंती.

वि.सू.: या पोस्टची कॅटेगरी जरी चर्चाविषय असली तरी मला कुठलीही चर्चा अपेक्षित नाही. निखळ,शुद्ध माहिती अपेक्षित आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अंनिस,नास्तिकांच्या संघटना,निरनिराळे विवेकवादी वगैरे विचार मंच इत्यादींनी या प्रकाराबद्दल काही आवाज उठवला नसेल तर या लोकांनाही हिंदू समजायला हरकत नसावी. आवाज उठवला म्हणून ते आपसूक अहिंदू ठरत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माफ करा.पण नेमके कळले नाही.
पण स्पष्ट करण्याचीही गरज नाही. कारण आधीच म्हटल्याप्रमाण मी चर्चा करणार नाही.असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मला माझ्या घरात पसारा आणि कचरा दिसला की मी ते सगळं आवरून माझं घर साफसूफ करून टाकते. कोणाकडे पाहुणी म्हणून गेले असता त्या घरातल्या लोकांचं वर्तन बघते, त्या लोकांना स्वच्छतेसाठी (माझ्याइतपत) कष्टांची हौस असेल तर कधी काम करते; घरातल्या लोकांना हौस नसेल तर अजिबातच काम करत नाही. पसारा-कचऱ्याकडे डोळेझाक करते.

(अतिअवांतर - 'तुम्ही लहान मुलांना मारून खाणं थांबवलं का नाही' या प्रश्नाचं उत्तर मी हो किंवा नाही एवढ्या एकाच शब्दात देऊ शकत नाही. तद्वत इथेही असली-नसलेली फक्त माहिती देऊन थांबू शकत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नक्की कसला निषेध करायचा हेच मला कळलेले नाही. मी तर तुकाराम, रामदासांपासून अनेकांना संत म्हणतो. एखाद्याला कोणी संत म्हटले तर नक्की कसला निषेध करावा?
संतपद दिल्याने असे नक्की काय होते ज्याचा निषेध करायला हवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय संदर्भात 'संत' या शब्दाचा अर्थ वेगळा आहे.फ्लेक्सिबल आहे. ते बेसिकली एक आदरार्थी संबोधन आहे.ज्ञानेश्वर-तुकाराम यांसारख्या संतांनी काही चमत्कार दाखवले असे वाद असले तरी 'वाद' आहेत हे महत्त्वाचे.ते पूर्णपणे नाकारले तरी त्यांच्या विचारपरंपरेला व पर्यायाने संत या संबोधनाला बाधा पोचत नाही.कुणाला संतपद द्यावे वा न द्यावे असे काही नियम हिंदू धर्मात आहेत याची मला तरी माहिती नाही.आधुनिक काळाचा विचार केला तर एकीकडे चमत्कार दाखवण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराजांनाही 'लोक' संत म्हणतात त्याचवेळी अंधश्रद्धांवर टीका करणार्‍या, सामाजिक जनजागृती करणार्‍या गाडगेमहाराज, तुकडोजीमहाराज अशांनाही लोक संत म्हणतात.

माझ्या अल्पमाहितीप्रमाणे रोमन कॅथलिक पंथात 'संतपद' हे 'बहाल' करण्यात येणारी एक पदवी आहे.त्यासाठी या व्यक्तीला 'संतपद' देणे विचारार्थ आहे तिने तिच्या निर्वाणापरांत किमान दोन चमत्कार दाखवले असणे आवश्यक आहे.यासंदर्भातील काही लिंक्स मी दुसर्‍या एका प्रतिसादात दिल्या आहेत.त्या कृपया नजरेखालून घालाव्या.

मी आधीही म्हटल्याप्रमाणे 'आपल्या तो बाब्या...' या चालीवर निरर्थक चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ओके. आता कळले.
या संतपद देण्याला इतके महत्त्व का द्यावे कळले नाही. जर लोकांना एखादी व्यक्ती संत वाटली तर ते अशा कोणत्याही अधिकृत आदेशाची वाट बघत नाहीत. हे असे संतपद वगैरे 'बहाल करणे' अत्यंत हास्यास्पद आहे.

अर्थात, जर एखादी संस्था एखादे पद काही अंधश्रद्धांना पोषक अशा निकषांनी बहाल करते आहे तर त्याचाही निषेध व्हायला हवे हे पटते. त्यामुळे "चमत्कारा" सारख्या निरर्थक गोष्टींच्या आधारावर (जादुगार म्हणवणे वगळता) कोणतेही पद बहाल करण्याचा माझ्यातर्फे कडकडीत निषेध करतो. त्याच बरोबर "चमत्काराशिवाय नमस्कार नाही" या म्हणीचाही निषेध करतो. Smile

मात्र ज्या लोकांना कोणतीही व्यक्ती संत वाटत आहे त्यांना ती तशी वाटत रहाण्याचा अधिकार आहे - मग ते पद कोणी बहाल केले असो वा नसो. मग ते तुकाराम असोत, गाडगेबाबा असोत, राष्ट्रसंत असोत, साबरमतीचे संत असोत वा मदर टेरेसा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मदर तेरेसा यांचे चमत्कार?????

काही उदाहरणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅथलिक चर्चकडून संतपद मिळण्याच्या मार्गातील चार पायर्‍या,क्रमांक तीन व चारवर विशेष लक्ष द्यावे: http://www.catholicdoors.com/faq/qu221.htm

https://en.m.wikipedia.org/wiki/Canonisation

मदर तेरेसा यांचे चमत्कार आणि त्यासंदर्भातील वाद याबाबतीत:https://en.m.wikipedia.org/wiki/Mother_Teresa#Miracle_and_beatification

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

आजच्या लोकसत्तामधे याबद्दल चांगले लिहिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

काही संदर्भ येथे सापडतील.

(हाच दुवा खाली एम्बेड करतो आहे.)
-----------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लेखातील विचाराची दिशा योग्य आहे ह्यामध्ये शंका नाही. कसाहि विचार केला तरी चमत्काराधिष्ठित संतपद आक्षेपार्हच म्हणावे लागेल.

पण पुढे काय? ह्या 'संत' परंपरेमागे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. कॅथलिक आणि अन्य ख्रिश्चन पंथांच्या विणीमध्ये हा एक महत्त्वाचा धागा आहे. जगभरचे कोट्यवधि श्रद्धाळू त्यावर विश्वास ठेवतात. अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत, दरिद्री भिकार्‍यापासून सरदार-राजेरजवाडयांपर्यंत कोटयवधींचा अनेक शतके त्यावर विश्वास आहे. (संत ग्वादालूपेच्या चमत्कारांवार शब्दशः विश्वास असणारे लाखो गोरगरीब मेक्सिकोमधील तिच्या चर्चकडे कसे आकृष्ट होतात हे प्रत्यक्ष पाहण्याजोगे आहे. असेच अन्य शेकडो संत जगभर पसरले आहेत.) धर्मापलीकडे ख्रिश्चन कलाविश्वातहि हा धागा आहेच. सिस्टीन चॅपेलमधील मिकेलँजेलोच्या प्रख्यात भित्तिचित्रामध्ये संत पीटर आणि संत बार्थोलोम्यू पुण्यवान आणि पापी ह्यांचा निवाड करीत येशूच्या पायाशी बसलेले आहेत असे दाखविले आहे. टोलीडोमधील एल ग्रेकोच्या The Burial of the Count of Orgaz ह्या masterpiece चित्रामध्ये सोनेरी वस्त्रे परिधान केलेले संत ऑगस्टीन आणि स्टीफन हे दफनाला मदत करण्यासाठी जातीने स्वर्गातून उतरलेले आहेत असे चित्रण आहे. ही अलीकडेच मी पहिलेली दोन उदाहरणे पण जगभर अशी हजारो दाखविता येतील.

थोडक्यात म्हणजे ह्या 'संत'पदवीमागे परंपरेचा आणि (अंध)श्रद्धेचा फार मोठा रेटा आहे. त्याविरुद्ध आवाज उठवायचा असला तर जरूर उठवा पण तो मुंगीने मेरू पर्वत गिळण्याचा आविर्भाव करण्यासारखे वाटू शकते ह्याचीहि तयारी ठेवा.

जगातली प्रत्येक लढाई आपण लढू शकत नाही आणि जगातील प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठावहि करू शकत नाही कारण आपली शक्ति, उपलब्ध वेळ आणि उपलब्ध साधने हे तुलनेने अतिमर्यादित आहेत. जगभर रोज आगी लागतात पण त्या विझवण्यासाठी तत्परतेने धावून जाणे हे शेजारच्या घरामध्ये आग लागली तरच आपण करतो. तसेहि ह्या 'संत'प्रकारामुळे आपले काही नुकसान होत नाही. मदर तेरेसा संत ठरल्या काय वा न ठरल्या काय, त्यमुळे दूरगामी असा काहीच बदल होत नाही. ज्यांना त्यावर विश्वास ठेवायचा असेल त्यांना ठेवू द्यावा.

येथे मला पंचतंत्रामधील सल्लेखोर माकडाची गोष्ट आठवते. एका अरण्यामध्ये बराच पाऊस पडला आणि हवा थंड पडली. काही माकडांना त्यामुळे थंडी वाजू लागली. उबेसाठी शेकोटी पेटवावी म्हणून ते इकडेतिकडे शोधू लागले तेव्हा त्यांना गुंजेची लाल फळे दिसली. हे निखारेच आहेत असे वाटून त्यांनी त्यांवर काडयाकुडय टाकून विस्तव पेटवण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काहीच फलित मिळेना. शेजारी काही चिमण्या हे बघत होत्या आणि माकडांना वृथा प्रयत्नांपासून वाचवावे असे त्यांना वाटले. म्हणून माकडांपाशी जाऊन त्यांचे हे काम कसे वेडेपणाचे आहे असे त्या सांगू लागल्या. त्याचा अपेक्षित परिणाम तर झाला नाहीच पण चिमण्यांच्या आगाऊपणामुळे माकडे चिडली आणि त्यांनी चिमण्यांना दगडावर आपटून मारून टाकले. तात्पर्य - नापृष्टः कस्यचिद् ब्रूयात्.

(हा सल्ला पळपुटेपणाचा आहे हे मलाहि जाणवते पण सद्य परिस्थितीमध्ये अन्य काही करायची आवश्यकता दिसत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही पटले. किमान आपल्यापुरता निषेध तरी नोंदवु शकतोच - शक्य तितका जाहिर नोंदवू शकतो. न जाणो अशा एकेक निषेधातून जो अपेक्षित "रेटा" आहे तो निर्माण होईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत...
मला या ख्रिस्तिसंतपरंपरेबद्दल आक्षेप नाहीच आणि चमत्काराबद्दलही नाही.त्याचाही अभ्यास झाला पाहिजे या मताचा मी आहे.

पण जी माहिती या धाग्याद्वारे मिळवायची होती ती मिळत नाही ही खंत आहेच.असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक