भोकातला मंडूक - ब्रिटीश पाक-साम्राज्याचा मेरुमणी

पूर्वसूचना :
अ. एवढं भारी, सूचक, रोचक शीर्षक असलं तरीही त्यावर भलसलते विचार करण्याआधी हे वाचा - मी बनवलेली पाककृती शाकाहारी होती. तेव्हा चावटपणा करायचा असेल तर दुसऱ्या धाग्यांवर जाऊन करा.
आ. पाक या शब्दातून पाकिस्तान, साखरेचा/गुळाचा पाक असे अर्थ काढू नयेत.

---

मध्ये एक दिवस आमचा माहेरवासा मला विचारायला लागला; "ब्रिटीश कुझीनमधलं तुला काही बनवता येतं का?" मी त्यावर उगाच, आचरट आवाज काढत हसले आणि म्हटलं, "हो! बटाटावडा, पावभाजी, सगळं बनवता येतं मला." मुद्दा त्याच्या लक्षात आलाच. ब्रिटीशांकडे स्वतःचं म्हणावं असं पाककृती भांडार, पाकभांडार फारसं नाही. जे आहे ते आमच्यासारख्या घासफूस लोकांसाठी फार उपयोगाचं नाही. पुण्यातल्या 'पोल्का डॉट्स'मध्ये शाकाहारी शेफर्ड्स पाय मिळतो, पण ते काही खरं नाही. ब्रिटीश पब्ज, सुपरमार्केटात जर शाकाहारी शेफर्ड्स पाय मिळत नाही तर त्याला भारतीय शेफर्ड्स पायच म्हणावं लागणार. 'चिकन दो पियाजा' हा प्रकार जसा भारतीय नसून ब्रिटीश आहे तसंच.

पण तेव्हा विचार करताना मला आठवलं. माझा ब्रिटीश मित्र, सुपरमार्केटातून फ्रोजन 'टोड इन द होल' आणून, गरम करून मला खायला घालत असे. ते प्रकरण तसं बरं लागतं. समाधानाचं गुणांकन ०-१० या पातळीवर पावणेसहा असं करता येईल, कारण तो भोकातल्या मंडूकासोबत फ्रोजन चिप्सही खायला घालत असे. आता वाढत्या वय-वजन-व्याधींचा विचार करता भोकातल्या मंडूकासोबत पालापाचोळा खाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातून बऱ्या अर्ध्याला हा खाद्यप्रकार असतो, तर तो प्रकार काय असतो याचीच काही कल्पना नसल्यामुळे त्याची भूमिका 'कुत्ता जाने चमडा जाने' अशी होती. आणखी थोडं टोकल्यावर "ठीक आहे, तू काय बनवायचं ते बनव. मी भांडी घासेन," अशी प्रतिक्रिया आली तेव्हा समाधानाचं गुणांकन निदान पाचपर्यंत जाईल याची खात्री मला पटली.

आता मुख्य प्रश्न - पाककृतीसाठीचं सामान.
तुम्ही ब्रिटनमध्ये राहत असाल तर सोपं आहे. 'टेस्को'मध्ये जा आणि 'टोड इन द होल' मिळेल फ्रीजरमध्ये, ते घेऊन या. घरी ओव्हन असेलच; त्यात ते पॅकेजिंग सरकवा...

पण बहुसंख्य मराठी लोकं ब्रिटनबाहेर राहतात त्यांच्यासाठी थोडी मोठी पाककृती देणं भाग आहे. मी वापरलेली पाककृती बीबीसीवरून उचलली.

आमची सुरुवात झाली शाकाहारी सॉसेजेस शोधण्यापासून. नीट लक्ष ठेवून वाचा. शा-का-हा-री सॉ-से-ज! हिंसा, बंदुका, मांसाहार या सगळ्या गोष्टी एकत्र येतात त्यामुळे मी शाकाहारी आहे (बै)! अमेरिका टेक्सास दूश्ट (दूश्ट, वैट्ट) असल्यामुळे नेहेमीच्या वाण्याकडे शाकाहारी सॉसेजेस मिळाले नाहीत. म्हणून इंटरनेटवर शाकाहारी सॉसेजेस शोधावे लागले. सॉसेजेस फ्रोजन असतात, त्यामुळे इंटरनेटवरून मागवता येत नाहीत; विशिष्ट दुकानात जाऊन आणावे लागतात. आम्ही 'होल फूड्स'मधून आणले. हिंसा, बंदूका आणि मांसाहाराचं वावडं नसणाऱ्यांची सोय चटकन होईल.

(मी वापरलेलं) सामान -
अ. मोठ्या आकाराचे ४ सॉसेज. अर्थात्, size doesn't matter. तुमचे सॉसेजेस लहान आकाराचे असतील तर ६ सॉसेजेस वापरा.
आ. १५० ग्रॅ पीठ. मी मैदा वापरला. कणीकही चालेल.
इ. १५० ग्रॅ. दूध.
ई. १ छोट्या आकाराचं अंडं. इथे साईज म्याटर्स, बरं का!
उ. थोडं तेल.

(मी न वापरलेलं) सामान -
ऊ : एक कांदा
ए. किंचित साखर
ऐ. २५० मिली पाणी

(मी बदलून वापरलेलं) सामान -
मोहरीच्या पावडरीच्या ऐवजी मी तिखट वापरलं.

न वापरलेल्या सामानाबद्दल आधी. सॉसेजेस आणि कांदा एकत्र करणं हे काही माझ्या बुद्धीला फार झेपत नाही. कांद्याचा तोंडाला फार वास येतो आणि तो मला अजिबात आवडत नाही. कोणी म्हणेल, सॉसेज खाताना सॉसेज खा आणि कांद्याचा विचार करू नकोस. पण माझं नाक (खास बायकी) तीक्ष्ण असल्यामुळे, ते एक असोच. तर कांद्याचे तुकडे करायचे आणि ग्रेव्ही बनवायची. कशी बनवायची आणि वापरायची ते बीबीसीने लिहिलंय. मी वेगळं कशाला लिहू? (वास मारणाऱ्या गोष्टींचा मला आधीपासूनच तिरस्कार.)

कृती -

सुरुवात सॉसेजेस गरम करण्यापासून होते.

लोफ बनवण्याच्या ट्रेला आतून तेल लावायचं. त्यात सॉसेजेस घालून ओव्हनमध्ये सारायचे. सॉसेजेसना एकटंच ओव्हनमध्ये सोडायचं. तापमान २०० से/३५० फॅ. शाकाहारी सॉसेजेस पाच मिनीटांत गरम होतात. मांसाहारासाठी म्हणे १५ मिनीटं गरम करावं लागतं. खरं खोटं मांसाहारी लोक जाणे!

पीठ, अंडं, दूध आणि तिखट/मोहरी पावडर एकत्र करून त्याचं दाट मिश्रण बनतं. सॉसेजेस गरम होईस्तोवर हे मिश्रण बनवायचं. (फोटो दाखवण्याचं एकमेव कारण, हे मिश्रण किती दाट बनतं ते दाखवण्याचा हा क्षीण प्रयत्न आहे.)

पुडींगचं पीठ

ओव्हनमधलं गरम भांडं काढून त्यात हे मिश्रण ओतायचं. मिश्रण आणि सॉसेजेस साधारण ३० मिनीटं ओव्हनमध्ये शिजवायचं. या फोटोतून स्पष्ट दिसतंय की यात पीठ अधिक बनल्यामुळे भोकातला मंडूक दिसत नाहीये. (पुढच्या वेळेस १२५ ग्रॅ पीठ वापरून बघेन.) पण कल्पनाशक्ती (खूप म्हणजे खूपच्च) ताणली बीबीसीच्या सायटीवर ताटलीत भोकातला मंडूक दिसेल.

टोड इन द होल भोकातला मंडूक

या सगळ्यात प्रकारात घासफूस, पालापाचोळा अर्थात जीवनसत्त्वं, चोथा अशा (कागदोपत्री) महत्त्वाच्या गोष्टी नसल्यामुळे बरोबर आम्ही टोपभर सीझर सॅलड खाल्लं. फोटो काढताना हिरवा-पिवळा रंग बघून भगवे पेटतील म्हणून ताटलीच्या बाजूला का होईना, संत्रं ठेवलंय. (ते यथावकाश, जेवणानंतर खाल्लं. उगाच सहिष्णू-असहिष्णू मारामाऱ्या इथे करू नका... दुसरीकडे करा.)

उगाच आपलं

बऱ्या अर्ध्याला हे प्रकरण बऱ्यापैकी चाललं. "समाधानाचं गुणांकन ०-१० या पातळीवर पावणेपाच आहे, पण ते अजून वाढवता येण्याची तुझी क्षमता आहे", असं तो म्हणाला. थोडक्यात, माझ्याकडून आणखी काम करवून घेण्याचा त्याचा डाव आहे. अशा रीतीने भोकातला मंडूक सुफळ संपूर्ण.

या वीकान्ताला जरूर करून बघा. आणि शाकाहारी फोटो इथे जरूर दाखवा. मांसाहारी फोटो दाखवायचे असतील तर पुरेशी पूर्वकल्पना देऊन दाखवा. (मला काय, बघायला सगळं चालतं.)

---

१. ही एक निराळी गोष्ट आहे, पुन्हा कधीतरी. सध्यापुरता अर्थ - आमच्या घरी अधूनमधून येऊन, माझ्या हातचं जेवणारा, आणि "तुझ्या हातच्या बेचव अन्नाचीही फार आठवण येते" असं म्हणणारा आमचा मित्र.
२. इथे काही खाजगी संवादांचा संदर्भ निघू शकतो. म्हणून तो लिहिलेला नाही.
३. हे ब्रिटीश चिप्स. म्हणजे अमेरिकन फ्राईज. अमेरिकन फ्राईज म्हणजे ब्रिटीश क्रिस्प्स. हे सगळं आता सांगावं लागतं. भारतात लोक इंग्लिश सोडून फार अमेरिकन बोलायला लागले आहेत. फार वैताग येतो ... पण ते असो.
४. लोकांच्या अस्मिता पिसाळतात म्हणून खोडलं हो हे!
५. या वाक्याचा मला एकच अर्थ अभिप्रेत आहे, पण ...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

शुद्ध तुपातलं, भारतीय संस्कृतीतलं काही येतं का तुम्हांला? अन्नपरब्रह्माच्या नावाखाली हे असले विदेशी चाळे; नाही नाही त्या शब्दांची बदललेली लिंगं, अश्लील नावं आणि फोटो आणि विशेषणं आणि द्व्यर्थी वाक्यं... शी शी शी... ऐसीच्या वैचारिक दर्जाचा काही विचार? बरं, रेसिपी देताय - त्या शीझर का शिकंदर कोशिंबिरीचीही द्या की मग. उगाच अर्धवट काहीतरी खरडून ठेवाचं. मग ते अस्वलासारखे वात्रट लोक करतात दिवाळी अंकातून ऐसीच्या पाकविभागाची टिंगल... लाज आणलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला सॉसेजेसच्या आकाराचं अप्रूप नसल्याने की काय कोण जाणे विकीपिडीयापेक्षा तुझ्या चित्रातीलच पदार्थ अधिक खावासा वाटला! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

- आपल्याला एके काळी एक ब्रिटिश मित्र होता
- तो अशा विक्षिप्त नावांचे पदार्थ ओव्हनमध्ये भाजून देत असे
- आता आपण स्वयंपाक घरीच करतो
- आपण सॉसेजं खातो पण तीही मेली शाकाहारीच
- आपलं वय-वजन-व्याधी वाढत आहेत (थोडक्यात आपण मोठे होत आहोत)

वगैरे वगैरे अनेक गोष्टींची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न.

शेवटी काय, या पदार्थात भोकं दिसली नाहीत आणि मंडूक तर नाहीच नाही. शंकरपाळ्यात जसा शंकर नसतो किंवा पाळाही नसतो, तसं काहीसं. बरं, खर्रीखुर्री सॉसेजं न घालता त्यात शाकाहारी सोया प्रोटिनच्या चुऱ्याची वगैरे बनवलेली काहीतरी वस्तू घातली. नुसता आकार साधला म्हणजे काय झालं का? हे सॉसेज आमचं कुत्रं तरी खाईल का? एरवी तो नुसत्या सॉ वरून सॉसेज ओळखतो, आणि जरा जरी वास आला तरी मागच्या दोन पायांवर उभा राहून आमच्या अंगावर उड्या मारत मागे मागे येतो. पण हे व्हेज प्रकरण पाहून तो भुंकूनसुद्धा पाहाणार नाही.

असो. पण आता अदितीने एवढं कष्ट घेऊन लिहिलंय तेव्हा वा वा, चान चान असं काहीतरी म्हटलंच पाहिजे.

वा वा. चान चान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हेज सॉसेज हे अल्कोहोल विरहित बिअर किंवा आयुर्वेदिक म्हणून विकल्या जाणार्‍या सिगारेटींसारखं वाटतय. मूळ पदार्थ रोचक वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

व्हेज सॉसेज हे अल्कोहोल विरहित बिअर किंवा आयुर्वेदिक म्हणून विकल्या जाणार्‍या सिगारेटींसारखं वाटतय.

वेज बिर्याणीबद्दलदेखिल माझे हेच मत आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी! व्हेज बिर्याणी इज अ‍ॅन अबॉमिनेशन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हेज सॉसेज? अरेरे...पण योग्य पदार्थ वापरून बनवण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश सुग्रणींच्या कृति करून खायची इतकी आवड तुम्हाला असली तर असले बेडूक खायची काय गरज आहे. फिश अँड चिप्स खा. ते सगळीकडे मिळतात, गेला बाजार मलिगाटॉनी सूप खा, केजेरी खा. असे एकाहून एक नामांकित ब्रिटिश-इंडियन पदार्थ उपलब्ध आहेत. Tea and cucumber sandwiches तर कोठेच गेली नाहीत!

त्यावरून आठवले. ब्रिटिश स्वैपाकाचा एक आवश्यक घटक वोर्चेस्टरशायर सॉस (चुकलो- वूस्टरशर सॉस) हा प्रकारहि हिंदुस्तानातून तेथे पोहोचला. त्याची कथा मी दुसर्‍या एका संस्थळावर काही वर्षांपूर्वी लिहिली होती. भाषान्तर करण्याचा कंटाळा आल्याने साहेबाच्या भाषेतील तो मजकूर आहे तसाच येथे चिकटवत आहे.

Worcestershire sauce apparently is a gift of the Raj and of India to the world! I accidentally came across the following story and toss it to the List should someone know more about this piece of useless knowledge.

A widely reported legend has it that "Lord Marcus Sandys, ex-Governor of Bengal" encountered this sauce while in India in the 1830s, missed it on his return, and commissioned the local apothecaries Lee and Perrin to recreate it.

The Wikipedia entry at http://en.wikipedia.org/wiki/Worcestershire_sauce has the following:

"We quote the following history of the well-known Worcester Sauce, as given in the World. The label shows it is prepared "from the recipe of a nobleman in the county." The nobleman is Lord Sandys. Many years ago, Mrs. Grey, author of The Gambler's Wife and other novels, was on a visit at Ombersley Court, when Lady Sandys chanced to remark that she wished she could get some very good curry powder, which elicited from Mrs. Grey that she had in her desk an excellent recipe, which her uncle, Sir Charles, Chief Justice of India, had brought thence, and given her. Lady Sandys said that there were some clever chemists in Worcester, who perhaps might be able to make up the powder. Messrs. Lea and Perrins looked at the recipe, doubted if they could procure all the ingredients, but said they would do their best, and in due time forwarded a packet of the powder. Subsequently the happy thought struck someone in the business that the powder might, in solution, make a good sauce. The profits now amount to thousands of pounds a year."

There seems to be a lot of confusion about the names. There never was any 'Lord Marcus Sandys, Governor of Bengal', though several other sites credit him with bringing the recipe from India. I think Sir Charles, Chief Justice of India and uncle of Mrs. Grey mentioned above would be the same as the one mentioned in the following quote, taken from p. 297 of the 'Asiatic Journal and Monthly Register, January-April 1832. If this is so, it was his recipe, passed on to his niece Mrs. Grey, that came in the possession of Lady Sandys and from her went to the chemists Lee and Perrins of Worcester, who eventually made huge profits from it. Lee and Perrins is now a part of the Heinz food empire and the sauce continues to bring in a steady flow of profit to Heinz. If this is so, we now know to whom thanks are due for the Worcestershire sauce!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिश अँड चिप्स खा.

क्या बात है!
ब्रिटनमध्ये नावाजून खाण्यासारखा हा एकच इंग्लिश पदार्थ उरला आहे.
तो ही नखर्‍याच्या रेस्टॉरंटमध्ये न खाता, रस्त्याकडेच्या एखाद्या खास देशी पबमध्ये!
बरोबर मटार किंवा मटारचे पुरण चालेल! आणि सोबतीला एखादी एल!!
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये गेलेलो असतांना मी आणि माझ्या लेकाने (आमच्यातल्या स्त्रीसभासदाला अजिबात न जुमानता!) दररोज नवनव्या पब्जमधले फिश आणि चिप्स हाणले!!!!
मुलं मोठी होण्यातला हा एक फायदा!!!!

बाकी मंडूका-बिंडूकांच्यात काही तथ्य नाही हो ब्रिटनच्या!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(आमच्यातल्या स्त्रीसभासदाला अजिबात न जुमानता!)

ते तेवढे कसे जमवता, ते जर सांगू शकलात, तर आयुष्यभर आपली शागीर्दी पत्करावयास तयार आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते शिक्रेट आहे, पण तरी सांगतो! Smile
आम्हां उभयतांच्या खाण्यातल्या आवडी-निवडी अगदी वेगवेगळ्या आहेत. तेंव्हा सुरवातीच्या (ते काय ते प्रणयाराधन का कायसंस म्हणतात ना, त्या) काळात हाटेलांत आम्ही अर्थातच तिच्या आवडीचे पदार्थच खात असू.
हा प्रकार अगदी मुलगा लहान असेपर्यंत बिनतक्रार चालला.
नंतर आमच्या असं लक्षात आलं की मुलाच्या आवडी थेट माझ्यासारख्या आहेत! (अल्ला के घर देर है लेकिन अंधेर नही!!)
आता तो मोठा झाल्यामुळे तिने काही प्रपोजल मांडलं की तोच परस्पर ठाणकन नकार देतो, माझ्यापर्यंत विषयच येत नाही...
मी आपला माझं हसू ड्रिंकच्या ग्लासात लपवतो!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश सुग्रणींच्या कृति...

'ब्रिटिश सुग्रण' (किंवा फॉर द्याट म्याटर बल्लवाचार्य) हे वदतो व्याघात:चे उदाहरण नसावे काय? (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृची शाकाहारी आवृत्ती रोचक वाटली तरी प्रत्यक्ष करून बघण्याची शक्यता नाही. म्हणायला "वरीजिनल" पाकृ करण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

वर राघांनी म्हटल्याप्रमाणे, आमचाही टफी सॉसेजचा वास लागला तरी, घरात जिथे असेल तिथून किचनमध्ये येऊन ठाण मांडून बसतो.

जाता जाता - नुकताच (३१ डिसेंबरलाच) शेफर्ड्स पाय घरी बनवला होता. मटणाचा खिमा न मिळाल्यामुळे चिकनचा वापरला. नववर्षाच्या धांदलीत फोटो काढणे जमले नाही. लवकरच पुन्हा करतोय तेव्हा सचित्र कृती टाकीनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तळटीपांमध्ये अंड्यांच्या अपरिहार्यतेचा अनुल्लेख खटकला; शिवाय टेक्सन परंपरेप्रमाणे 'फ्रीडम फ्राईज' न म्हटल्याने अजून एक फाऊल!
बाकी पाकृ चान चानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तळटीप ५ ही दोनदा संदर्भाला वापरली आहे. त्यामुळे फाऊल झाला आहे.

१ = संदर्भ हा शब्द लिहिला की मला विदर्भ हा शब्द आठवतो आणि विदर्भ उच्चारला की गर्दभ शब्द आठवतो. निव्वळ योगायोग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! हसून पोट भरलं खरं पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे! खाल्ल्याशिवाय अभिप्राय देता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

पाकृ भारी आहे, पण हा भोकमंडूक फारसा चवदार नसतो हे आपलं माझं वै० मत. फिश आणि चिप्सबद्दल पिडांकाकांशी सहमत आहे. ब्रिटिश क्युझिनमधला "कॉर्निश पास्टी" नावाचा मुरड घातलेल्या (मटार) करंज्यांसारखा प्रकार झकास लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खरंतर प्रत्येक प्रतिक्रियेला प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रियांचा आकडा वाढवता येईल. पण एवढ्या प्रतिक्रियांमुळे ऐसीचा सर्व्हर ढपतो, म्हणून ऐसीवर प्रत्येक धाग्यावर दोन-चार प्रतिक्रियांपुढे मजल जात नाही असं ऐकून आहे. तर ऐसीच्या भल्याखातर एकच प्रतिक्रिया -

भोकातला मंडूक हा प्रकार फार चविष्ट नसतो याबद्दल आदूबाळाशी सहमती. अगदी वाईटही नसतो. मी ग्रेव्ही बनवली नव्हती म्हणून जेवण थोडं कोरडंही झालं होतं. क्वचित कधी, बदल म्हणून खायला चांगला आहे एवढंच. घरात ब्रॉकली, लेट्यूस, अॅस्परॅगस अशा चिकार परदेशी भाज्या (आपल्याच आगाऊपणामुळे) येऊन पडल्यात आणि त्याबरोबर खायला मुख्य पदार्थ नाही अशी पंचाईत असेल तरीही हा पदार्थ चालेल. विशेषतः शाकाहारी मंडळींची अशी पंचाईत होते.

आता मुख्य मुद्दा - अरे ****नो, सांगितलं ना एकदा, हा धागा शाकाहारी पाककृतीचा आहे. तरीही कसं रे/गं या पाककृतीतून दुसरे, तिसरे, चौथे अर्थ लावता! इव्हँजेलिस्ट ख्रिश्चन नसाल तर अशाने मरणानंतर नरकात जाल! (इव्हँजेलिस्ट ख्रिश्चन असाल तर जित्तेपणीच नरकात जाण्याची सोय होते.) पाककृती ही काय "चान चान", "भारी" म्हणण्यासारखी गोष्ट असते काय? एकदा करून बघा, शाकाहारी फोटो दाखवा, कुगरणींना (सुगरण वि. कुगरण) प्रोत्साहन वगैरे द्या, तर ते नाही.

वर आणखी भारतीय संस्कृती काय, परब्रह्म काय, कसल्या अवांतर मुद्द्यांबद्दल क्षीण प्रदर्शन काय, किती हा अवांतरपणा लावलाय! संपादकांनी अशा प्रतिक्रिया अप्रकाशित केल्या पाहिजेत. खरंतर अशा सदस्यांना ब्लॉक करण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. (बाय द वे मेघना, बाईच्या जातीने केलेली फाजील बडबड; आणि राजेश, इंटरनेटवरून खरेदी करता येते याची क्षीण जाहिरात हा मुद्दा सुटला. तिरशिंगराव, द-र-भ या अक्षरांमध्ये दळभद्री हा शब्द सुटलाय.)

ऑस्टिनात मिळणारे शाकाहारी सॉसेजेस अगदीच ह्यँ आहेत. ब्रिटनमध्ये मिळणारे शाकाहारी सॉसेजेस दिसण्याच्या बाबतीत तरी 'वरिजनल' होते; चवीच्या बाबतीत शाकाहारी, मांसाहारी कोणीच फार मत देऊ शकेल असं वाटत नाही.

फिश अँड चिप्स हा प्रकार एकतर मी मत्स्यप्रेमी नाही म्हणून आणि दुसरं म्हणजे तळणीच्या तेलाचा घशाला त्रास होतो म्हणून माझ्या प्रीतीचा नाही. कॉर्निश पास्टीबद्दल आदूबाळशी सहमत. दुसरा चविष्ट प्रकार म्हणजे बेक्ड पटेटो. रसेट किंवा तत्सम बेकिंगचा बटाटा आणि त्याबरोबर मश्रूम+चीज बेक करून त्यातला शाकाहारी पदार्थ ओरपून मी वजन चिक्कार वाढवलं आहे. यात बरेच मांसाहारी प्रकारही मिळतात. बटाटा, चीज आणि सोबतीला चविष्ट मांस/भाजी असं काही असेल तर वाईट लागेल कशाला! कधीतरी "दिवाळी म्हणत" करून बघितलं पाहिजे (आणि पुढे महिनाभर रोज पंधरा मिनीटं वाढीव व्यायाम करावा लागला तरी बेहत्तर)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकतर मी मत्स्यप्रेमी नाही म्हणून

अरेरे, मग तर तुम्हाला इव्हॅन्जेलिस्ट असायचीही आवश्यकता नाही, तुमचं 'तिथलं' ध्रुवपद अढळ आहे!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या जोक्सपासून सवयीपर्यंत सगळं शाकाहारी, शुद्ध दुधातुपातलं असतं. मेघनाने निष्कारण संशयाची राळ उडवून दिल्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"बिळातला" चालेल का "भोकातल्या"पेक्षा.

उगाच भोकातले कायसेसे आणि दाट मिश्रण, वगैरे, वाचून सेनेटर सँटोरम वगैरे, आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकेतील डोनट होल आठवला. (अर्थात फक्त शिर्षकावरून. पाककृती वगैरे वाचण्याइतकी वाईट वेळ अजून आलेली नाही.) बाकी अंड्याशिवाय हीच कृती करता येईला का? का पुरेशी चिकट होणार नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दंडक-"मंडूक" बंड माजविशी "छिद्रा"न्वेषी फुका ।
न सार्थक लटक्या सार्‍या गपा ॥
शिस्नाकार सॉसेजाकार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ आकारांस टाळिशी पुन्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना "कुळकर्ण" कळेना कसा |
राजेसा, करा विक्षिप्तावर कृपा ! ॥

- राबाजोशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

( तुम्ही तुमच्या घरी पावसाळी वातावरण तयार केले असते तर कदाचित मंडुक दर्शनाचा लाभ झाला असता . )

पाककॄती एकदा करून बघायला हवी ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पदार्थ बरा दिसतोय पण ज्या मित्राच्या सन्मानार्थ ही मेजवानी झाली होती तो कसा आहे आता? म्हणजे मित्र अजून आहे का? अजून मित्र आहे का? वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मित्राने फक्त कल्पना दिली; खायला आला नाही. बरा अर्धा बराच बरा आहे. एवढ्या वर्षांच्या अनुभवाचा फायदा, चटकन सावरलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हाही हसू आलं होतं. पण ब्रिटिशांना तेवढी खाद्य संस्कृती नसली तरी ज्या दोन-चार चवीच्या गोष्टी आहेत त्यातली ही एक. खासकरुन ओनियन ग्रेव्ही बरोबर तर मस्तच लागते हो. तेव्हा सर्वप्रथम या छिद्रमंडूकाची चेष्टा केल्याबद्दल तुमचा णिशेढ..!!

तुम्ही ब्रिटनमध्ये राहत असाल तर सोपं आहे. 'टेस्को'मध्ये जा आणि 'टोड इन द होल' मिळेल फ्रीजरमध्ये, ते घेऊन या. घरी ओव्हन असेलच; त्यात ते पॅकेजिंग सरकवा...

हे तर सरळ सरळ रुचिहीनतेचे लक्षण होय. फ्रोजन पदार्थ खावून कसली लज्जत ती कळणार?
त्यात वेज सॉसेजेस म्हणजे तर विषयच संपला.
खरंतर सॉसेजेस आणि त्यांचे प्रकार, चवी हा एक लेखमालेचा विषय होऊ शकतो त्यामुळे ठिकठिकाणची छिद्रमंडुके आणि इतर पदार्थ हे त्या त्या एरियातल्या पबात जाऊन जर टेस्ट केले तर खरी लज्जत कळते. अगदी सॉसेजेस, ग्रेव्ही सगळं त्या त्या लोकेशनचं खास असं.

यॉर्कशायर पुडींग, स्टेक, टोड इन द होल ह्या आणि अशा इतर आयकॉनिक पदार्थाबद्दल बरंच बोलता येईल पण सध्या फकस्त णिशेध नोंदवून खाली बसतो..

(आंग्लदेशात राहून इंग्रजांच्या (गरीब पण सालस) खाद्यसंस्कृती बद्दल थोडी सहानुभुती असलेला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..