नवीन कपडे 'ट्राय' करण्यासाठी आधुनिक पद्धती

मी जेव्हापासून इंटरनेट नियमितपणे वापरत्ये, म्हणजे ठाण्यात केबलनेट आलं तेव्हापासून, साधारण २००३ चा काळ, तेव्हापासून अधूनमधून एक इमेल (बहुतेकदा पुरुषांकडून) येतं. दुकानांच्या चेंजिंग रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावलेले असतात, बायकांनी कशी काळजी घ्यावी. खरंतर आमच्यासारख्या निर्लज्ज तरीही मिरवण्याची हौस नसणाऱ्या लोकांना असल्या प्रकारांमुळे काही फरक पडत नाही. पण कपडे बदलणं हा एक उच्छाद वाटतो. अशा अनेक आळसांची काळजी घेण्यासाठी आता तंत्रज्ञान आलेलं आहे. कपड्यांची ट्रायल घेण्याऐवजी हे काही उपाय करता येतील -

१. लेझर - एकेकाळी जे महत्त्व नारळाला होतं, कल्पतरू म्हणून, ते आता लेझरला आलेलं आहे. माडाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर होतो. झावळ्या मारायला किंवा खराटा बनवायला उपयुक्त, झावळ्या घरं शाकारायला वापरतात, नारळ खाता-पिता येतो, नीरा-माडी बनवता येतात इत्यादी. तसा लेझर सर्वगुणसंपन्न आहे. चष्म्याचा नंबर, नकोयत ते केस, अतिरिक्त चरबी, चेहेऱ्यावरचे डाग घालवायला किंवा हव्येत तिथे केस उगवायला लेझर वापरतात. झालंच तर मांजराला खेळवायला, विमान/वैमानिकांना त्रास द्यायला, वजन तोलून धरायला, प्रकाश-संगीताचे खेळ करायला, आकाशातले तारे दाखवायला किंवा स्लाईडवरच्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी लेझर वापरता येतो. मग कपड्यांच्या फिटिंगसाठी लेझर का वापरता येणार नाही?

लेझर वापरून दोन भिंतीमधलं अंतर मोजता येतं. तशी उपकरणं अमेरिकेत सामान्य जनांना परवडतील अशा किंमतीला मिळतात. तसं उपकरण वापरून आपल्या सध्या फिट होणाऱ्या कपड्याचा आकार मोजायचा. नवीन कपड्याचा आकार मोजायचा आणि voila! काम तमाम.

२. फोटोशॉप पद्धत - 'सब का विकास' न करूनही चीन किंवा बोगोटाचे फोटो અમદાવાદની પ્રગતિ म्हणून खपवता येणारं आधुनिक काळातलं विश्वकर्मा सॉफ्टवेर कपड्यांसाठी का वापरता येऊ नये?

इथे कोणी तंत्रज्ञानी किडा म्हणेल की आपली प्रतिमा घ्यायची, कपड्याची प्रतिमा घ्यायची, दोन्ही एकमेकांवर कपडे घातल्यासारख्या जोडायच्या आणि तो कपडा आपल्याला कसा दिसतो ते बघायचं आणि मग कपडा विकत घ्यायचा का नाही हे ठरवायचं. चूक, साफ चूक. (मोठा फाँट) फोटोशॉपची बदनामी थांबवा. (मोठा फाँट संपला.) (श्रेय - नेहेमीचेच 'न'वी बाजू.)

आपल्याला सध्या अंगासरशी, व्यवस्थित बसणारा कपडा घ्यायचा, तो आपल्याला हवा तसा, हवा तिथे पसरायचा, उदाहरणार्थ ट्रेनची सीट, बसची खिडकीवर पसरवायचा किंवा झाडाची फांदी किंवा एखादी बुटकी कंपाऊंड वॉल यांना टांगावा. त्याचा फोटो काढावा. (कंपाऊंड वॉलला कपडा कसा टांगायचा? बहुतांश भिंती एक-दोन पावसाळ्यात खराब होतात, त्यांच्यावर लायकेन जमतं. पावसाळा संपेस्तोवर वाट बघावी. भिंत कोरडी झाली की लायकेन असलेल्या भागात कपडा पसरावा. स्टॅटिक फ्रिक्शनमुळे कपडा भिंतीवर उभा राहण्याची दाट शक्यता आहे. नाहीच जमलं तर दुसरी भिंत शोधा.)

आता दुकानात जाऊन नवीन कपडा घ्यावा, त्याचा फोटो काढावा. आम्ही एक नवीन अॅप विकसित करत आहोत ज्यात असे दोन फोटो भरले की आकार किती जुळतो हे समजेल. हे अॅप फुकट डाऊनलोड करता येईल; वापरताना प्रत्येक वेळेस रु. १० द्यावे लागतील.

---

सध्या आम्हाला एवढ्या पद्धती सुचत आहेत. वाचकांनी प्रतिसादक बनावे आणि आपल्याला आवडतील त्या सर्व पद्धतींचं वर्णन इथे करावं. आम्ही, आमच्या बाजूने त्या सर्व पद्धतींचा (सब का) विकास आणि प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी घेत आहोत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्यापेक्षा नवर्‍याला (किंवा जो आवडेल त्याला. It's up to you) दुकानात घेऊन जा की आणि दाखवा कपडे. त्याला सर्व मापे माहीती असतातच ROFL ROFL .......... तो कपडे निवडून देईल, काम फत्ते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवरे मंडळींना कपडा कसा बसतो यापेक्षा तो कसा चटकन उतरवता येतो यात इंटरेस्ट असल्याने उद्देश असफल (म्हणजे फिट्ट बसण्याचा उद्देश हो) होऊ शकतो.*

*ही अवांतर ज्ञानावर आधारीत केवळ तांत्रिक शंका आहे. भलते प्रश्न विचारू नयेत, अपमान होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'शुक्रवारचा नवरा' अशी एक कथा येणार असल्याची अफवा उठल्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कपडे अर्धवट अंगावर ठेवल्याने तर जास्त रोचक - जाऊ दे तुमच्यासारख्या अननुभवी लोकांना काय काय सांगत बसणार Wink
पटापट शुक्रवारच्या कहाण्या टाका तुम्ही - तेवढं तरी करा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल्या आहेत. मलाही एक सुचली आहे. माज्याशी मैत्रि कराल का? तर माझी आयड्या म्हणजे सत्ते पे सत्ता मधल्या पेंटल चे जसे "कपडे भी कोई धोता है?" हे जीवनविषयक सूत्र असते, तसे कपडे कधी काढायचेच नाहीत हे सूत्र पाळा. म्हणजे दुकानात आहे त्या कपड्यांवरच नवीन घालायचे. नंतर कधीतरी मग एक बिफोर व एक आफ्टर फोटो काढून आपले वजन उतरले आहे असाही समज करून देता/घेता येइल.

किंवा एल्विस प्रिस्ले सारखे किंवा याराना मधल्या बच्चन सारखे अंगाभोवती लाईट्स लावलेला ड्रेस घालून दुकानात जायचे. मात्र दिवे किमान १०० वॅट्स चे हवेत. म्हणजे चेंज रूम मधे गेल्यावर नुसतेच दिवे काहीतरी करत आहेत असे दिसेल. आतली व्यक्ती दिसणारच नाही. सूर्य उगवल्यावर तारे दिसत नाहीत तशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडे आधी विकत घ्यायचे व नंतर तदनुषंगिक बारीक किंवा जाडे व्हायचे - हा उपाय कसा वाटतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे फारच बारीक विधान झालं. हे जाड करावं लागेल. हे एक उदाहरण -

आवडेल तो कपडा विकत घ्यायचा. तो घरी आणून घालायचा. एक बिफोर फोटो काढायचा. (तो फेसबुकवर चढवून फारएण्डला तिथे टॅग करायचं.) मग फोनवर आपल्या व्यायाम, खाण्यापिण्याचं ट्रॅकिंग करणारं अॅप उघडायचं. वजन कमी किंवा जास्त जे काही करायचं असेल त्यानुसार टार्गेट ठरवायचं. रोज त्यातल्या वजन कमी-जास्त करण्यासंबंधी टिप्स वाचायच्या. जेवताना टीव्ही बघू नये असं म्हटलं असलं तरीही जेवताना वजन कमी-जास्त करण्याच्या टिप्स वाचू नयेत असं कोणी म्हणत नाही. त्या टिप्स जेवतानाच वाचायच्या.

अशा रीतीने वजन हवं तेवढं झालं की आफ्टर फोटो काढूनही फेसबुकवर टाकायचा. पुन्हा एका फारएण्डला तिथे टॅग करायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अन एकाच वेळी एखादा स्लिम अन एखादा लूझ फिटिंग वाला आवडला तर सकाळी कोणता घालायचा हे ठरल्यावर काय पंपाने हवा भरून जाड होणार का पंक्चर करून पातळ होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लूझ फिटींगवाला असेल तर आत १० कपडे घालून मग हवा तो घालायचा - तुम्ही पण एवढं शिंपल कळत नाही तुम्हाला.
.
स्लिम फिटींगवाल्या कपड्याकरता स्लिम होण्याखेरीज मार्ग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक कपडे घातलेले असल्यास उतरवताना त्रास होतो तेव्हा त्याला कडाडून विरोध. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पॉइन्ट आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मूळात वेगवेगळ्या प्रकाराचे, आकाराचे, कपड्याचे, डिझाईनचे कपडे एकाच व्यक्तीकडे असणं हे चंगळवादी संस्कृतीचे लक्षण आहे.
लोकांकडे दुष्काळामुळे/ सिरीयातल्या युद्धामुळे किंवा जावयाने लेकीसह हडपल्यामुळे खायला पैसे नाहीत आणि तुम्ही नवनव्या डिझाईनचे कपडे कसे घ्यायचे , ते ही कपडे उतरवायची आणि घालायची तोशिस अंगाला लागू न देता याचा विचार करताय!

कुठे चाललीय आपली भारतीय किंवा परदेशस्थ भारतीय संस्कृती.

१२ मीटर आणि १६० सेमी एकरंगी/ एक तागी खादीच्या कापडात माझ्या दोन साड्या आणि ब्लाऊजे बनतात. (परकराचे माप गेली १२ वर्षे तेच आहेत आणि परकरही.)
मला असल्या चंगळवादी अ‍ॅप्सची आणि तंत्रज्ञानाची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या वर्षी ह्याच सुमारास भारतात होते, तेव्हाची गोष्ट. ठाण्याच्या शेजाऱ्यांच्या घरी आम्ही सगळे जमलो होतो. त्यांची मुलगी, माझी मैत्रीण मला म्हणाली, "किती जुना ड्रेस आहे हा तुझा. अजूनही जुनाट वाटत नाहीये आणि तुला होतोय." मी म्हटलं, "अगं आतून एक शिवण उसवल्ये म्हणून सहा वर्षं जुना ड्रेस होतोय."

त्यावर तिची आई म्हणाली, "ही माझी साडीही सहा वर्षं जुनी आहे, अजूनही होते मला."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसतायत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकू आम्हाला दोघींना आमच्या जन्मापासून ओळखून आहे, अर्थातच.

लहानपणी मी आणि ही मैत्रीण फार भांडलो नव्हतो, कारण ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी. वयं वाढल्यावर तो फरक जाणवेनासा झाला. मी कॉलेजमध्ये होते, मैत्रीण इंजिनियर म्हणून नोकरीला लागली होती तेव्हाची गोष्ट. तेव्हा आम्ही सगळ्या प्रकारची, रंगरूपांची भांडणं अगदी खरवडून, कुरतडून, उकरून काढून करायचो. असाच काहीतरी विषय निघाला आणि दोघींमध्ये गोरी कोण यावर आम्ही दोघींनी भांडायला सुरुवात केली.

ती : तुझा चेहेरा गोरा असेल जास्त, पण माझे हात पहा. (असं म्हणून तिचा हात तिने माझ्या हाताशेजारी ठेवला. खरंच गोरा होता.)
मी : बरोबरे. तू दिवसभर ऑफिसात असतेस. मी दिवसभर बाहेर फिरते म्हणून मी टॅन होते. (ड्रेसची बाही वर करत) इथे पहा, इथे मी गोरी आहे.
ती : (तिनेही तिची बाही वर केली) मी पण गोरी आहे इथे.

घरातले सगळे जेवणं आटोपून बाहेर टीव्ही बघत होते. काकू स्वयंपाकघरात आली आणि आमचा हा संवाद कधी ऐकायला लागली आम्हाला समजलंच नव्हतं.
काकू : (अंगातलं काढल्याचे हातवारे करत) आता सगळेच कपडे उतरवा आणि "मी गोरी का तू गोरी" करत बसा. यापेक्षा टीव्हीवर सांस-बहूची सिरीयल लागल्ये; ती परवडली.

एवढा अपमान अर्थातच दोघींनाही झोंबला आणि आम्ही शरमेने काळ्या झालो; पुन्हा कधीही या विषयावरून भांडलो नाही ... असं मेलोड्रामाटिक वाक्य सुचलं. पण नकोच ते. खरं काय ते सांगून टाकते. तेव्हा आम्ही गप्प बसलो आणि नंतर पुन्हा बरेचदा या विषयावर भांडलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात कपडे का घालावेत हा मोठा प्रश्न आहे. पृथ्वीतलावर मानव सोडून ईतर कोणताही प्राणी कपडे घालत नाही. कपडे घालणे निसर्गाच्या विरुद्ध आहे. किंबहुना कपडे घालण्याची गरज का पडत असावी याचेच कुतुहल आहे. थंडी वाजते हे एक कारण सोडल्यास दुसरे कोणतेच कारण नजरेसमोर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडे घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं? रुची आणि नगरीनिरंजन काय म्हणतील यावर? आधीच एकतर अतोनात कपडे घालायचे आणि मग त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पसारा वाढवून ठेवायचा. माणसाची मला हे हवं, ते हवंची हाव सुटल्याशिवाय हे प्रश्न सुटणारच नाहीत. तो खरा मूलभूत प्रश्न आहे. कपडे कमी वापरावेत, जे असतील तेही तोकडे वापरावेत म्हणजे कार्बन फुटप्रिंट कमी होईल, आणि तंत्रज्ञानाच्या वामनाच्या मोठ्या फुटप्रिंटीखाली दबून जाणारा बळिराजा पाताळात जाण्यापासून वाचेल.

ते काहीही म्हणोत, मला तर बुवा खात्री आहे की तंत्रज्ञान सगळे प्रश्न सोडवू शकतं. त्यामुळे मी माझी कल्पनाशक्ती आणि आशावादी दृष्टिकोन वापरून काही उपाय सुचवणार आहे.

१. जीपीएस टेक्नॉलॉजी - जीपीएस टेक्नॉलॉजी अजूनही पुरेशी अचूक नाही, पण जेव्हा ती एक मिलीमीटर इतकी अचूक होईल तेव्हा हा उपाय वापरता येईल. रस्त्यावर धावताना लोक नाही का 'मी इतके मैल धावलो' असं दाखवणारे आकार फेसबुकवर टाकत? त्यातले कोण कोण ते आकार फोटोशॉप करतं हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. आणि काही आकार फारच अश्लीलही असतात. पण ते एक असो. सांगायचा मुद्दा असा की एक जीपीएस सेन्सर घेऊन तो सर्वांगावर फिरवायचा. त्याच्या लोकेशन्स नोट करायच्या. म्हणजे आपोआपच तुमच्या शरीराची एक त्रिमितीय प्रतिमा तयार होईल. तुम्हाला जो कपडा विकत घ्यायचा आहे, त्याचा जो त्रिमितीय आकार असेल तो मॅच करायचा. कपडा अंगाला न लावताही परफेक्ट फिटिंगचा कपडा घेता येईल. आणि ज्यांना कार्बन फुटप्रिंटची काळजी आहे अशांसाठी - आता असं शॉपिंग दुकानात न जाताही करता येईल. त्यामुळे प्रवास करण्याची गरज राहाणार नाही. त्यातून कितीतरी टनांचा कार्बन् वाचेल. इतकंच काय, झगमगाटी दुकानांची गरज राहाणार नाही - सरळ वेअरहाउसमधून तुम्हाला कपडा मेल करून घेता येईल. अशी दुकानंच राहिली नाहीत की शहरंही राहाणार नाहीत. शहरीकरणाची संपूर्ण गिचमिड, प्रदूषक, कार्बननिर्माती अर्थव्यवस्थाच नाहीशी होऊन जाईल. शिवाय कपडेही कमी शिवले जातील. कारण तत्त्वतः डेलने जे बिझनेस मॉडेल वापरलं, तेच वापरून तुम्हाला हवा तसा कपडा तुम्ही ऑर्डर केल्यावर शिवून घेता येईल.

२. थ्री डी प्रिंटिंग - ज्यांना वरील उपाय पसंत नसेल त्यांच्यासाठीही पर्याय आहे. आता तुम्ही म्हणाल की कोण हे लोक? आता असतात काही नतद्रष्ट लोक ज्यांना प्रत्यक्ष कपड्याला हात लावल्याशिवाय खरेदी करण्याचा आनंद मिळत नाही. तंत्रज्ञानाची सोय असतानाही त्यांना असल्या फुटकळ गोष्टीत रस असतो. म्हणजे बॅंकेच्या बाहेरच एटीएम मशीन असलं तरीही बॅंकेच्या आत जाऊन, लायनीत उभं राहून चेक देऊन पैसे काढणारे. त्यांना व्हर्च्युअल जगावर विश्वास नसतो. मशीनने पैसे देताना काही गडबड केली तर? वीजच गेली तर? असल्या काहीतरी भित्या बाळगणारे. त्यांच्यासाठीही नवीन तंत्रज्ञान उपयोगी येईल. थ्रीडी मापं घेतलेली इमेज थ्रीडी प्रिंटरमध्ये टाकायची - की त्यातून तुमच्या आकाराची मॅनेक्वीन बाहेर येईल. ही मॅनेक्वीन घेऊन जा दुकानात. तिला घाला कपडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांनी धोतरे - कोणत्याहि स्टाइलने - आणि उपरणी वापरायला सुरुवात करावी आणि बायकांनी लुगडी आणि चोळ्या. म्हणजे मापाचा किंवा अंगाला बसण्याचा प्रश्नच उरणार नाही. पेशवाईच्या काळात होत्या अशा तक्रारी आणि चोचले?

(पुरुषांसाठी रामदासांसारख्या लंगोट्याच सुचविणार होतो पण मग जाणवले की तिचा थंडीला काहीच उपयोग नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाच्या इन्जेन्युइटीवर माझा इतका विश्वास आहे की लवकरच स्मार्ट नॅनोफायबरने बनवलेले कपडे बाजारात येतील याची खात्री आहे. असे कपडे मळणार नाहीत, त्यांना इस्त्रीची गरज नाही आणि वेगवेगळ्या प्रमाणात त्यात विजेचा प्रवाह सोडल्यास रंग व आकारही बदलतील. मोबाईलची बॅटरी वापरुन हे बदल करता येतील. मग प्रचंड एफिशियन्सी वाढेल. प्रत्येकी एकच कापड घ्यावे लागेल आणि ते जन्मभर पुरेल. असे टिकाऊ कापड तयार करणार्‍या कंपन्यांचे मालक प्रत्येकाला एक कापड मिळाल्यावर आणि लोकसंख्या स्थिर झाल्यावर आनंदाने आपले दुकान इतिकर्तव्यतेच्या भावनेने बंद करतील आणि नवीन प्रॉडक्ट्स शोधायला लागतील. कॉर्निकोपिया असे त्या कंपनीचे नाव असेल.
दुसरीकडे लॅब-ग्रोन त्वचेमुळे त्वचेसारखेच लवचिक पण आतून फर असलेले किंवा आतून घामशोषक सुती अस्तर लावलेले त्वचा-कपडे बनवतील. मग रोज वरुन वेगवेगळा रंग असलेली त्वचा लोक वापरतील. वर्णभेदाचा नाश होईल. ही त्वचा शरीराला बरोबर फिट्ट बसेल आणि कपडे घालूनही नग्न दिसण्याची सोय उपलब्ध होईल. मग नग्न असताना कोण सुंदर दिसतं याच्या स्पर्धा लागून जिम आणि लायपोसक्शनवाल्यांचे उखळ पांढरे होईल.
शिवाय एफिशियन्सी इतकी अफाट वाढेल की एका कापसाच्या बोंडातून अख्ख्या जगाचे कपडे शिवून होतील. हे कपडे इतके तलम असतील की घातल्यावर शरीराचा आकार धारण करतील.
ज्याप्रमाणे पत्र लिहीणे हा जुनाट प्रकार बंद झाला तसेच कपडे ट्राय करणे हा मागास प्रकार लवकरच बंद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोर. निव्वळ थोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

__/\__. पण हा नक्कीच कल्पनाविलास नाही. स्मार्टशर्ट्स आणि स्मार्टपॅंट्स ऑलरेडी बाजारात आल्या आहेत. बहुरुपी कपडे फारसे अवघड वाटत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपड्याला फिटिंग लागते हे आम्हाला लहानपणापासून माहितीच नव्हते. सगळे कपडे वाढत्या मापाचेच शिवायचे असतात, हे डोक्यांत पक्के होते. आत्ताही तसेच चालू आहे. फरक एवढाच, की लहानपणी उंचीच्या व आता रुंदीच्या वाढत्या मापाने कपडे घेतले जातात. शर्ट इतका ढगळ घ्यायचा की कापड चांगले असेल तर दहा वर्षे टिकतो. पँट कायम एक दोन इंच जास्त कमरेचीच घ्यायची. पट्टा पाहिजे तसा आवळून घ्यायचा. शर्ट कधी 'इन' करायचाच नाही. यांत फायदे अनेक आहेत.
१. कपड्यांवरचा खर्च कमीतकमी होतो.
२. आधीपासूनच सैल कपडे घालत असल्याने नक्की किती जाड झालो आहोत ते शत्रुपक्षाला कळत नाही.
३. 'बावळ्यांत' गणना झाल्यामुळे स्त्री वर्गाचा, हा निरुपद्रवी प्राणी आहे असा समज होतो.
४. फॅशनशी काही देणेघेणे नसल्याने अगदी जुनी बेलबॉटम पँटही वापरता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0