शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ७
व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
----
'अकाण्डताण्डव' ह्या मराठी शब्दाची पुढील मनोरंजक उत्पत्ति योगायोगानेच माझ्यासमोर आली:
अकाण्डताण्डव - Name of the commentary by हरिनाथ on the परिभाषेन्दुशेखर of नागेशभट्ट.
(आधार Dictionary of Sanskrit Grammar निर्मिति काशिनाथशास्त्री अभ्यंकर - तेच ज्यांचा खेदकारक मृत्यु एकेकाळच्या गाजलेल्या जक्कल प्रकरणामध्ये झाला. वासुदेवशास्त्री अभ्यंकर ह्यांचे पुत्र.)
संस्कृत व्याकरणाशी संबंधित अशा ह्या पुस्तकातून हा शब्द सार्वत्रिक वापरात का आला असावा? मोल्सवर्थला तो माहीत नव्हता असे दिसते.
केवळ तर्कच, बाकी काय नुसते अकांड !
अकांड शब्दाची नोंद ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरील दाते कर्वेंच्या महाराष्ट्रीय शब्दकोशात दिसते आहे पण बाकी जुन्या संतसाहित्यात अकांड तांडवचे उल्लेख ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर सध्यातरी आढळत नाहीत.
अकांड-तांडव हिंदी शब्दकोशात दिसते आहे. पण अकांड शब्दास अकांडतांडव वाला अर्थ कसा प्राप्त झाला हे लक्षात येत नाही. आपण मराठीत 'शेंडा-ना बुडूख' असा वाक्प्रचार वापरतो. (पुस्तक डॉट ऑर्ग ) हिंदी शब्दकोशात अकांड म्हणजे (वृक्ष) जिसमें कांड या शाखाएँ न हों। शाखाओं से रहित (वृक्ष)। असाही अर्थ दिलेला आहे, या वरुन मला शक्रध्वजाची -महाभारत- (आणि मेपोल सुद्धा) आठवण झाली ज्यात फांद्या कापलेल्या वृक्षास मध्यभागी रोवून पूजा करुन उत्सव साजरा होत असे आणि महाभारतातच शेवटच्या पर्वात कृष्णाकडून शक्रध्वजपूजेवर टिकाकरुन त्या एवजी गोवर्धन पूजा सुचवलेली दिसते. महाभारत खरोखर घडले की नाही माहित नाही -बगाड-चक्रपुजा केल्या जात, ह्यात सुद्धा झाडाच्या फांद्या तोडून त्या भोवती नृत्य प्रकार आहेत हि बगाड-चक्र पूजा शाक्त आणि शैवांच्या जवळची असावी का याबद्द्ल कोल्हटकर सरच अधिक व्यवस्थीत माहिती देऊ शकतील पण संत एकनाथांच्या काळापासून किंवा त्या आधी पासून या बगाड-चक्रपुजेवर टिका चालू झालेली असावी- त्यानंतर हिंदी शब्द कोशातच दिलेला "बहुत ही छोटी बात को बहुत बढ़ाकर उसके संबंध में व्यर्थ की जाने वाली उछल-कूद और हो-हल्ला।" हे अकांड वृक्षा भोवती होणारा नृत्योत्सव व्यर्थ आहे अशा अर्थाने योजणे चालू झाले असू शकेल का? केवळ एक तर्क
नोकरीतल्या रोलबाबत जिथे
नोकरीतल्या रोलबाबत जिथे "क्लास" दर्शवायचा आहे तिथे दोन शब्द येतातः "ऑफिसर" आणि "एक्झेक्युटिव्ह"
यामधे काही कंपन्यांमधे, विशेषतः सरकारीमधे "ऑफिसर" हा शब्द भलताच मानाचा, रुबाबाचा इत्यादि असतो. जुन्या काळी "मोठे हपीसर आहेत", असं म्हणायचे. खाजगी कंपन्यांत अनेक ठिकाणी ऑफिसर हे एंट्री लेव्हलच्या माणसाचं संबोधन असतं.
तसंच एक्झेक्युटिव्ह या शब्दानेही अनेकदा एंट्री लेव्हल दर्शवली जाते, पण हॉटेलातही "एक्झेक्युटिव्ह" रुम्स असतात त्या कधीकधी सर्वात महाग असतात. हॉटेल्सची नावंही अनेकदा "एक्झेक्युटिव्ह"ने संपणारी असतात.
ऑफिसर आणि एक्झेक्युटिव्ह यांत वरिष्ठ कोण म्हणायचा? आणि मुळात "एक्झेक्युटिव्ह" म्हणजे काय?
असिस्टंट आणि असोसिएट यात फरक काय? डेप्युटी आणि जॉईंट यात फरक काय?
ऑफीसर सोबतच एक्झीकटीव्ह ऑफीसर
ऑफीसर सोबतच एक्झीकटीव्ह ऑफीसर असे पदही पाहण्यात येते. ऑफीसर म्हणजे अधिकारी आणि एक्झीकटीव्ह ऑफीसर म्हणजे कार्यकारी अधिकारी. व्यवस्थापनातली क्लर्कच्या वरची एंट्री लेव्हल ऑफीसरच असावी आणि त्यावर एक्झीकटीव्ह ऑफीसर पण यात कंपनी जेवढी छोटी तेवढे वरच्या पदाची बिरुदावली (प्रत्य्क्ष अधिकारांशिवाय सुद्धा) चटकन एंट्री लेव्हललाच देताना दिसते याचे एक अप्रत्यक्ष कारण कदाचित १) कंपनी बाहेरच्या व्य्क्ती जसे की कस्टमरची अपॉइंटमेंट मिळवणे अथवा कामे लवकर करवून घेण्यासाठी पोस्टला गांभीर्य यावे म्हणून २) छोट्या कंपन्यांना मोठ्या कंपन्यांकडुन मॅन पॉवर खेचून घेतले जाण्याचा त्रास होतो पण छोट्या कंपनीत मोठेपद आधीच मिळालेले असले की जॉब बदली करणार्यांचे पदांचे गणित विस्कळीत होऊन अप्रत्यक्ष लगाम बसत असावा म्हणून एक्झीकटीव्ह हि बिरुदावली काही कंपन्या एंट्रीलेव्हललाच देण्याची स्ट्रॅटेजी ठेवत असाव्यात.
दोन्ही बोथट पण
दोन्ही शब्दांचे मूळ अर्थ बोथट झालेले आहेत.
"एक्झेक्युटिव्ह" हा शब्दार्थात तरी कृतिक्षम असतो ("कार्यक्षम"चा रूढ अर्थ आहे, म्हणून हा नवीन "कृतिक्षम" शब्द योजला आहे) - त्याला कार्य चालवण्याचा अधिकार असतो.
"ऑफिसर" शब्दार्थापुरता म्हणावा, तर "हुद्देवाला" असतो - म्हणजे कुठलाही हुद्दा. तो हुद्दा कृतिक्षम असेल किंवा नसेल. हुद्दा कृतिक्षम असला तर ऑफिसरही आणि एक्झेक्युटिव्हही असतो.
प्रावेशिक स्तरावरही चपरासी किंवा ओझेवाहू कर्मचार्याला "ऑफिसर म्हणत नसावेत, बहुधा. पांढरपेशा तरी असावाच लागतो, अशी माझी आठवण आहे (पण भारतात रोजव्यवहार रोजच ऐकून आता २० वर्षे झाली, त्यामुळे आठवण शिळी असेल.)
---
सरकारात विधिमंडळाचे सर्व सदस्य "ऑफिसधारक" असतात. परंतु मंत्री, सचिव वगैरे "एक्झेक्युटिव्ह" शाखेत असतात, त्यांना कृती करण्याचा अधिकार असतो. (ते ऑफिसधारकही असतात.)
बहुतेक कंपन्यांमध्ये बोर्डाचे सदस्य ऑफिसधारक असतात परंतु एक्झेक्युटिव्ह नसतात. सीईओ, सीओओ, सीएफओ वगैरे ऑफिसरही असतात आणि एक्झेक्युटिव्हसुद्धा.
थँक्स.. असिस्टंट आणि असोसिएट
थँक्स.. असिस्टंट आणि असोसिएट सारखं.
आणखीही एक. काही कंपन्यांत मॅनेजर हाच शब्द वापरुन हायरार्की असते. असिस्टंट मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर इ इ.
आणि काही ठिकाणी मधेच एव्हीपी,व्हीपी, प्रेसिडेंट वगैरे घुसतात. हे फक्त नाव देण्यातले फरक आहेत का मुळात अर्थातही काही फरक असतो?
असिस्टंट आणि असोसिएट
असिस्टंट आणि असोसिएट सारखं.
असिस्टंट म्हणजे 'सहाय्य्क' हे उपच्या समकक्ष असावे यात सहाय्यक पेक्षा उप सिनीअर पोझीशन असण्याची शक्यता असावी पण नक्की माहित नाही.
असोसिएट मध्ये जॉइंट-सहची छटा असली तरी वेगळे असावे, जॉइंट-सह हा एंम्प्लॉयी असावा पण असोसिएट म्हणजे सहयोगी हा एम्प्लॉयी असतो का या बद्दल मला साशंकता आहे सहसा असोसिएट म्हणजे सहयोगी हे पद प्रोफेशनल व्यावसायिकांमध्ये जसे की आर्कीटेक्ट, वकील, चार्टर्ड अकाऊंट, क्वचीत डॉक्टर्स अशा फर्म्स मध्ये पाहण्यात येते बहुधा बरोबरीचे नाते साधण्याच्या दृष्टीने तसे असावे, यात मुख्य प्रवर्तक (प्रोप्रायटरी) आणि बाकी सगळे असोसिएट अथवा पार्टनरशीप या दोन पैकी रचना असते का माहित नाही पण हि व्यवस्था काँट्रॅक्च्युअल असण्याची शक्यता अधिक वाटते.
सहसा जुन्या मॅन्युफॅक्चरिंग
सहसा जुन्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनध्ये असते. उदा.
ज्युनियर ऑफिसर -> ऑफिसर -> सीनियर ऑफिसर -> असिस्टंट म्यानेजर -> डेप्युटी म्यानेजर -> म्यानेजर -> सीनियर म्यानेजर -> डिव्हिजनल म्यानेजर -> असिस्टंट जनरल म्यानेजर -> डेप्युटी जनरल म्यानेजर -> जनरल म्यानेजर -> सीनियर जनरल म्यानेजर -> (असोसिएट) व्हाइस प्रेसिडंट -> सीनियर व्हाइस प्रेसिडंट -> प्रेसिडंट -> म्यानेजिंग डायरेक्टर
मला वाटते कंपनीच्या
मला वाटते कंपनीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात हे शब्द आले आहेत.
कंपनीचे संचालक आणि कार्यकारी अधिकारी यांच्यातला फरक दाखवण्यासाठी एक्झेक्युटिव्ह शब्द वापरतात. वरिष्ठ व्यवस्थापनातले संचालक हे नॉन एक्झेक्युटिव्ह आणि जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे लोक हे एक्झेक्युटिव्ह.
सुरस
काल राजवाड्यांचे लिखाण वाचताना सध्या फारसे ऐकिवात नसलेले दोन शब्द सापडले.
केवळ इंग्रजीच पद्धत सररहा स्वीकारण्यात सौरस्य नाही.
सररहा ऐवजी आज आपण बहुधा सररास वापरला असता. पण सररासचा अर्थ (सर + राशि) 'एकंदरीने' असा होतो तर सररहा = निर्बाधितपणे (असं डिक्शनरी बघितल्यावर समजलं). सौरस्य हे स्वारस्यचं जुनं रूप असेल असं मला वाटत होतं. पण त्यांची उत्पत्ती (कोशांत) सुरस आणि स्वरस अशा दोन वेगळ्या शब्दांपासून दिली आहे.
सररहा
अगदी अलीकडेपर्यंत हा शब्द मला सरसहा असा जाणवत होता. की सररहा आणि सरसहा हे दोन्ही अस्तित्वात आहेत? वेगवेगळ्या अर्थाने? की 'सरसकट' 'सहसा' अश्या अर्थांनी?
सररहा ह्या शब्दाचा फारसी 'सर-ए-राह'शी काही संबंध असावा का? 'निर्बाधितपणे' असा अर्थ असेल तर 'सर-ए-राह'शी तितकीशी जवळीक दिसत नाही.
म्हैस = मठ्ठ
'समग्र रामदास'मध्ये हे सापडलं -
भाग्यासी काय उणे रे। येत्नावांचूनही राहिले।
येत्न तो करावा कैसा। हेचि आधी कळेचिना॥
मुख्य येत्न विचाराचा। त्यावरी बोलणे बरे।
चालणे सत्य नेमाचे। नीतीन्याय चुको नये॥
करंटे मिळाले सर्वे। जो तो बुधीच सांगतो।
सांगावे ते आपणाला। आपणु करिता बरे॥
मोठे ते पाप लोकांचे। प्रभू तो जाणता नव्हे।
वर्ततो सिकविल्या बोले। तो काय म्हैसमंगळु ॥
खबरदार बरा राजा। विवेकी सर्व साक्षेपी।
आज्ञेने सर्वहि चाले। तेणे सौख्य बहु जना॥
ह्याचा अर्थ मूढ किंवा मूर्ख असावा.
uncouth
uncouth या शब्दासाठी प्रतिशब्द शोधताना हे शब्द समोर आले -
अडाणी, अरबूज, गाळणा, रांगडा, वेडझंवा, हिरवट.
अरबूज आणि गाळणा हे शब्द माहीतच नव्हते.
शब्दकोशात वेडझंवा हा शब्द बघून गारगार वाटलं. (A formation filthy in its origin but now so established as to have nearly lost its filthy implication. It is used by the most decent speakers. )
रांगडा या शब्दाचा उगमही माहीत नव्हता. The name of a country between Gujaráth and Mewát; also of a tribe of Hindús.
१००% पेस्तनकाका
वेडझवा/येडझवा सारखाच गुजरातीमध्ये 'घेलचोदिया' असा शब्द आहे
+१
'मी पण घेलिया (कथाकथन*)/घेलचोदियाच (ओरिगिनल पुस्तक) साला' हे पेस्तनकाकांचे उद्गार आठवले. (रेल्वे कंपार्टमेटमधल्या संडासाचे दार घट्ट बसलेले असून आत कोणीही नाही, हा उलगडा झाल्यावरचे.)
*बहुतेक स्वसेन्सॉर-टू-बी-ऑन-द-सेफ-साईड इ.
मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि
मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार या पुस्तकात वेडझवा वगैरे शब्दांबद्दल असेच काहीसे स्पष्टीकरण आहे. या लेखकाच्या (अ द मराठे) मते संभोगप्रसंगी जोडप्याची जी अवस्था असते त्यावरून अपत्याचे व्यक्तिमत्त्व ठरते अशी पौराणिक धारणा होती. (उदा. अंबिकेने डोळे मिटले म्हणून धृतराष्ट्र अंध). वेडझवा वगैरे शब्दांतून 'संभोग व्यक्तिमत्त्व' ही धारणा व्यक्त होते.
???
वेड्या माणसाला झवणं हे शहाण्यासुरत्या माणसाला झवण्यापेक्षा अधिक कौशल्याचं काम आहे.
यावरून एक यहुदी विनोद आठवला.
आमचा यित्झाक एकदा टोपी न घालताच सिनेगॉगमध्ये उगवतो. त्याबद्दल रब्बाय त्याला झापतो, "सिनेगॉगमध्ये टोपी न घालणे हे दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपण्यासमान आहे."
आमचा यित्झाक शांतपणे उत्तरतो: "रब्बाय, मी दोन्ही केलेले आहे. दोहोंत यत्किंचितही तुलना नाही."
असो. अनुभवाचे बोल असल्यागत ठामपणे विधान केलेत, त्यावरून आठवले, इतकेच.
(आणि, 'माणसाला'???)
निरर्थक!
जितक्या वेळा मी वे **वा शब्द कुणी वापरताना ऐकलाय तितक्यावेळा तो 'निरर्थक/निरुपयोगी काम करणारा/बावळट' या अर्थाने ऐकलाय.
म्हणजे 'त्याचा काय उपयोग नाही. उगाच 'वे**वेपणा करू नकोस.'
किंवा 'वे**व्या, इतका वेळ उगाच फुकट घालवलास.'
भांडण झाल्यावर आई बहिणींवरून शिव्या घालतात तसा 'वेड*वा' शब्द वापरून शिव्या घालताना रत्नागिरीत तरी पाहिले नाही.
रत्नागिरीत 'बा * वलास' हा शब्द ही शिवी म्हणू न न वापरता 'गेलास उडत' अशा अर्थाने वापरताना पाहिले आहे.
'आय* *र्या' हा शब्द शिवी म्हणून वापरताना पाहिलाय पण
'आय*व'- उच्चारी 'आयझो'हा शब्द अक्षरशः उद्गारवाचक शब्द म्हणून वापरताना पाहिलाय.
म्हणजे 'आयझो, कसला उंच होता तो माणूस!' असा.
त्यामुळे 'वेड्*वा' हे करण्यास कठिण असलेले काम करणारा माणूस असण्यापेक्षा 'निरर्थक / असाद्य काम करण्याचा प्रयत्न करणारा मूर्ख माणूस' अशा अर्थाने वापरण्यात येणारा शब्द असावा असे वाटते.
( प्लीज नोट- स्वानुभव केवळ शब्द वापरताना ऐकण्याचाच आहे. :) )
विध्यर्थ!
( प्लीज नोट- स्वानुभव केवळ शब्द वापरताना ऐकण्याचाच आहे. (स्माईल) )
"अशा अर्थाने वापरण्यात येणारा शब्द असावा असे वाटते" यातील "असावा" अशी विध्यर्थी रचना (आणि त्यात पुन्हा "असे वाटते" या प्रकारचे आगाऊ डिस्क्लेमरार्थ शेपूट) यांजमुळे प्रत्यक्ष स्वानुभवाच्या आरोपास कोणत्याही प्रकारे वाव नसावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
सबब, उपरोक्त डिस्कलेमर बहुधा अनावश्यक ठरावे.
पाठभेद
याचाच 'झ*ती गाढवे१ अंगावर घेणे' असाही पाठभेद ऐकलेला आहे. किंबहुना, 'झ*ती गाढवे अंगावर घेतल्यास लाथा या बसायच्याच!' अशी म्हणदेखील ऐकलेली आहे.
(या प्रतिसादावर दोन 'माहितीपूर्ण', एक 'मार्मिक' आणि गेला बाजार एक तरी 'भडकाऊ' व्हायलाच पाहिजे, अन्यथा अपमान समजला जाईल!)
..........
१ गाढवाची शरीररचना लक्षात घेता, येथे अनेकवचनच२ सयुक्तिक ठरावे, असे वाटते. एकवचनास अक्सेसिबिलिटीमुळे बाधा यावी, अशी शंका आहे.३ (चूभूद्याघ्या.)
२ मराठीत द्विवचनाची सुविधा नसल्याकारणाने. (अर्थात, अनेकवचनासदेखील आमची तत्त्वत: हरकत अशी काहीच नाही, म्हणा! किंबहुना, (वाक्प्रचाराच्या/म्हणीच्या सोयीकरिता) द मोअर, द मेरियर.)
३ यानिमित्ताने, 'आपला (पुढचा) खूर जगन्नाथ' अशा स्वरूपाची काही म्हण हीहॉबोलीत३अ उपस्थित आहे किंवा कसे, याचा वेध घेणे उद्बोधक ठरावे. (तज्ज्ञांनी खुलासा करावाच.)
३अ खरोष्ठीत?
रांगडा हा शब्द १९व्या शतकातील
रांगडा हा शब्द १९व्या शतकातील मराठी लिखाणात मूळ अर्थाने बरेच वेळा येतो. रांगडी भाषा असाही शब्द येतो. याचा अर्थ साधारण नर्मदेच्या उत्तरेकडचा भाग असा असावा असा माझा अंदाज होता. आता नेमका अर्थ कळला. या काळच्या लिखाणात हिंदुस्तान हा शब्द उत्तर भारत या अर्थाने वापरला जातो. आणि महाराष्ट्राला दक्षिणी (दख्खनी) प्रांत म्हटलेले दिसते.
मराठी लोक ज्याला
मराठी लोक ज्याला "मागे","मागच्या बाजूला"या अर्थाने backside हा शब्द योजतात तसा त्याचा अर्थ इं ( uk) मध्ये नाही.back of the hand/house,on the back वगैरे.अमेरिकन लोकही आपल्यासारखाच अर्थ घेतात वाटतं.backlit illuminated cmos sensor न म्हणता backside illuminated sensor ( BSI ).
वेडझवा याचा अर्थ वेड्याने
वेडझवा याचा अर्थ वेड्याने झवून काढलेला असा आहे,ही ग्रामिण शिवी असुन, यडझवा असा खरा शब्द आहे.
यावरुन एक किस्सा वाचलेला आठवला,दामु केंकरे आणि विजया मेहता वगैरेंचा नाटक ग्रुप होता,तिथे चर्चे दरम्यान विजया मेहता नेहमी वेडझवा हा हा शब्द वापरायच्या,लहानपणा पासून घरातील पुरुषांकडून त्यांनी हा शब्द ऐकला होता,पण त्यांना त्याचा अर्थ माहीत नव्हता.एकदा गप्पा चालू असताना त्यांनी वेडझवा हा शब्द वापरला तेव्हा दामू केंकरेंनी त्यांचा हात करकूच दाबला व त्यांना याचा अर्थ सांगुन पुन्हा हा शब्द वापरु नको ,बायकांना शोभत नाही असे सांगितले.
झवती गाढवाचा संदर्भ असा
झवती गाढवाचा संदर्भ असा आहे:
एखादा माणूस धंधा करत असतो.त्याच्या मते त्यात काही फायदा नाही त्यापेक्षा तो दुसरा कुठला धंधा चांगला वाटून पहिला बंद करून त्या धंध्यात " पडतो".चालतच नाही.
त्याचा उद्योग बघून -- एका दुभत्या म्हशीच्या किंमतीत चारपाच गाढवं { घेऊन माती वाहायच्या कामाला लावता येतील } मिळतात म्हणून घ्यायची आणि ती कशी **** ते बघत बसायचं.
= चार झवती गाढवं उरावर घ्यायची सवयच आहे त्याला इत्यादी.
.
.