गगनजाई - एक स्मरणरंजन

बुच हे नाव जरा विचित्रच, गगनजाई असंही म्हणतात खरं आणि ते ऐकायला छान ही वाटतं. पण ते शाळेतलं नाव आणि घरातलं नाव ह्यात कसा फरक असतो तसं ते 'गगनजाई' शाळेतल्या हजेरीपटावरचं कोरडं नाव वाटतं. बुचाच्या फुलांचा वास आला की मला फार नॉस्टॅलजीक होतं. एकटेपणाच्या सावटाखाली असल्याची भावना उगाच उचंबळून येते पण क्षणात 'सगळे इथेच तर आहेत माझ्या जवळ' असंही वाटतं, सगळं कसं क्षणिक असल्यासारखं. एवढ्याश्या टिचभर फुलाने असं का वाटतं माहित नाही पण कदाचित बुचाच्या फुलाची लहानपणी ज्या पद्धतीने ओळख झाली ते एक कारण असावं ह्यामागे.

लहानपणी आई ठाकूर नावाच्या एका बाईंकडे साड्या,ब्लाऊजपीस, बेड्शीट्स वगैरे विकत घ्यायाला जायची. आई शक्यतो कामावरून आल्यावर घरातले कामं, जेवण्ं उरकले की जायची ह्या ठाकूर बाईंकडे. रात्रीची वेळ असायची आणि तिला सोबत म्हणून कोणीतरी असावं म्हणून मला न्यायची. ह्या ठाकूर बाईंचा मोठा बंगला होता. तो बंगला खरंच मोठा होता का ते माहित नाही पण मी मात्र तेव्हा बर्‍यापैकी लहान असल्यामुळे मला तो मोठा वाटत असावा. लहानपणीच्या बर्याच मोठ्या वाटणार्‍या गोष्टी अता पुन्हा पाहिल्या की लहान वाटतात. मोठं झाल्यावर पुन्हा तो बंगला पाहिला नाही त्यामुळे माझ्यासाठी तो नेहमी मोठा बंगलाच असेल. हां, तर हा बंगला जुन्या पद्धतीचा दगडी होता. ह्या दगडी भिंती सतत ओलसर असल्याचं मला आठवतं आणि ह्या भिंतीवर अगदी घट्ट चिकटलेल्या वेली. घरासमोर सुंदर बाग होती, ती देखील मोठी. नाजूक फुलझाडांशिवाय त्यांच्या 'ठाकूर' अडनावा प्रमाणे भारदस्त झाडंही होती, जसं पिंपळ,उंबर, आंबा, निलगिरी आणि बुचाची.

आई तिला खरेदी करायचे कपडे पहात असायची आणि ठाकूर बाई त्या नविन कपड्याची एक-एक घडी उलगडून गादीवर टाकायच्या. ती उलगडलेली घडी गादीवर टाकताना हवेत त्या नविन कपडयाचा मंद असा वास यायचा, तो वास घ्यायला मजा यायची. काहीकाही वास शब्दात पकडताच येत नाही, जसं नविन पुस्तक, नविन चामड्याचे बुटं तसाच हा नविन कपड्याचा वास. पण ह्या कपडयांच्या वासात मधेच एक असाच मंद पण गोड वास यायचा. मी प्राणायाम केल्यासारखं सारखा तोच वास नाकात कैद करायचा चाळा करत बसायचो. माहित असायचं की हा बुचाच्या फुलांचा वास आहे पण तरीही वासांच्या त्या गोंधळातून बुचाच्या फुलांचा तो वास अचूक हुडकायची ती एक गमंत.

कपडयांच्या वासापेक्षा हा फुलांचा वास नेहमीच जिंकायाचा आणि मग मी बागेत पसार व्हायचो. ह्या बागेत मी आलो की तिथे बुचाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. जेव्हा मी आजुबाजूची गुलाब, झेंडू ची झाडं पहायचो तेव्हा मला बुचाच्या झाडाची गमंतच वाटायची. ही गुलाब्, झेंडू ची फुलं केवढी मोठी आणि टवटवीत पण त्यांची झाडं, झाडं कसली म्हणा रोपंच ती, त्या बुचाच्या झाडापुढे इवलीशीच. आणि बुचाचं झाड हे भारदस्त पण त्याची फुलं इटूकली आणि वासही तसाच त्या झाडाला न शोभणारा, मंद नी गोड, एक-एक गमंतच. जाई-जूई, कदंब ही झाडं/रोपं आणि त्यांची फुलं कशी एकमेकांना शोभणारी वाटतात अगदी त्यांची नावं सुद्धा.

ह्या ठाकूर बाई एकट्याच रहात असाव्या त्या बंगल्यात, त्यांच्या घरात मला कधी दुसरं कोणी दिसलंच नाही. त्याही कोणाचीच वाट बघत नसल्यासारख्या नेहमीच निवांत दिसायच्या. मला बागेत इतकं मोकळेपणी खेळायची सवय नव्हती कधी, सारखं कोणी तरी रागवेल ह्या धास्तितच इतरांच्या बागेत वावर असायचा. पण ठाकूर बाईंच्या बागेत तसं नव्हतं, तिथे कोणीच नव्हतं रागवणारं, माझ्या खोड्या पकडणारं. पण म्हणून फार मजा यायची असंही नाही. कदाचीत तिथे मी ही एकटा असयाचो म्हणून असेल. एकट्याने काय खेळायचं म्हणून मी ती बुचाची फुलं गोळा करून त्याची चित्रं बनवत बसायचो. कधी कार, कधी सुर्य -डोंगर-पक्षी असा देखावा तर कधी माणसं. त्यातल्या त्यात ह्या फुलांपासून माणसांची चित्रं कढायला मला फार अवडायचं. आजीनी मला शिकवलं होतं माणासांची चित्र. एक गोल, त्या खाली एक सरळ रेष मग त्या सरळ रेषेच्या मधोमध एक अडवी दोन्ही बाजूने उतरती रेष ते म्हणजे हात आणि तशीच खाली अडवी उतरती रेष ते पाय की झाला माणूस. आणि त्या गोलाच्या आजु बाजूला दोन उतरत्या रेषा काढल्या की ते बाई-माणूस. अशी बुचाच्या फुलांची उंच सुवासिक माणसं काढली की मला करमायचं त्या ठाकूर बाईंच्या बागेत. ठाकूर बाई पन्नाशीतल्या असाव्यात, त्यांना मावशी/काकू म्हणावं की आजी असा संभ्रम मला कधी झाला नाही कारण त्यांच्याशी संवाद झाल्याचं आठवतच नाही ना त्यांनी कधी माझे लाड केले, जसे माझे त्या वायात इतर मोठी माणसं करायचे. पण त्या कधी नावडल्या असंही नाही कारण त्यांच्या घरातल्या/बागेतल्या माझ्या मुक्त वावरण्याला त्यांनी कधीच टोकलं नाही.

आईची खरेदी झाल्यावर पुन्हा आमच्या घरी जाताना आठवणीने मुठभर फुलं मी खिशात घ्यायचोच. घरी गेल्यावर अजून एखादं चित्र आठवलं तर काढायला म्हणून. पण मला ठाकूर बाई ते आमचं घर असा परतीचा रस्ता कधी आठवतच नाही, कदचीत फार रात्र झाल्याने आणि मी अर्धझोपेत असल्याने मला ते अता आठवत नसावं. पण एक मात्र अगदी स्वच्छ आठवतं. सकाळी झोपेतून उठल्यावर सहज खिशात हात जायचा आणि बुचाची फुलं हतात यायची, जरा विचीत्र वाटायचं, तसंच उगीच एकटं असल्यासारखं पण मग डोळ्यासमोर सकाळच्या लगबगीत असणारे आई-बाबा, आ़जी-आजोबा आणि काका ह्यांना पाहिलं की छानसं बरं वाटायचं. अगदी तसंच बुचाच्या फुलाच्या मंद नी गोड वासासारखं, छान!

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

फार साधं, नेमकं आणि सुरेख आहे. बुचाच्या फ़ुलांसारखंच. अधूनमधून तरी लिहीत जा हो. आग्रह करायला लावू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

व्वा.... नेहमीच्या धाग्यामधून उत्तम दर्जाचा सुखद बदल! काय लिवलंय.. सहज, थेट आणि सुबक

बुचाच्या फुलांचा एक वृक्ष माझ्या एका (बुचसारख्याच व इतक्याच छान) मैत्रिणीच्या सोसायटीत होता. मुंबईत हा फार कॉमन वृक्ष नाही. त्या सोसायटीत फिर(का)यला घरी कोणाला तरी बुचाची फुलं हवीयेत हा उत्तम बहाणा होता Wink

अधिक वारंवारितेने लिहित जा या सुचनेशी अगदीच बाडीस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फर्स्टक्लास लिहिलंयस.

नाकात वास कैद करण्यावरून आठवलं - कॅडबरी कंपनीजवळून जाताना कॅडबरीचा भन्नाट दरवळ यायचा. मी असाच तो नाकात कैद करून घ्यायला धडपडायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप सुंदर. बुचाच्या फुलांचा सुवास आठवला. मलाही आवडतात ही फुलं. त्याला गगनजाई म्हणतात हे आजच कळलं. सुरेख नाव आहे. अर्थात 'हजेरीपटावरच्या नावासारखं'.

आम्ही डोंबिवलीला नवीन रहायला आलो होतो तेव्हा शेजारच्या बंगल्यात छोटं झाड होतं. तेव्हाच त्याचं फुल पहिल्यांदा पाहिलं. आई म्हणाली 'हे बुचाचं फुल'. त्यावर "असं कसं नाव" म्हणत आम्ही दोघी बहिणी कितीतरी हसलेलो. याला कधीकधीच फुलं यायची. त्यामुळे एखादं फुल मिळालं तरी त्याचा सारखा वास घेत बसायचा चाळाच असायचा. दोनचार वर्षातच तो बंगला पाडला. त्यानंतर या फुलांची भेट थेट लग्नानंतर झाली, ती परभणीच्या राजेन्द्र्प्रसाद उद्यानात. तेव्हा हे झाड एवढं मोठं होतं हे बघून अचंबाच वाटलेला.

लिहीत जा हो वारंवार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान लिहिलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुंदर लेख.
'गंधित झाली नाती' ही ओळ उगीचच आठवून गेली. गंधभारल्या आठवणी काय, नाती काय स्मृतिकोशात रुतून बसतात आणि दरवळत राहातात अवचितपणे अधून मधून. .
(गगनजाईला आकाशमोगरा हे आणखी एक नाव आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंधभारल्या आठवणी काय, नाती काय स्मृतिकोशात रुतून बसतात आणि दरवळत राहातात अवचितपणे अधून मधून. .

+१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्वांच्या आठवणी वाचताना छान वाटलं _/\_ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त जम्या... सुगंधी आठवणी आवडल्या.. लिहीत रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी! या गंधाशी किती आठवणी जुळलेल्या असतात! (गगनजाईला आकाशमोगरा असेही म्हणतात ना? कर्नाट्की भाषेत आकाशमग्गी असं म्हणतात बहुतेक. बूच फार कमी वेळेस ऐकलंय मी.)
पाऊस सरत आलेला असतो, कधीतरी चुकून परतीचा पाऊस पडतो, तेव्हा अश्विनात झाडाखाली हलक्या चिखलात सुंगंधी सडे पडतात. असंख्य हळुवार आठवणी त्या सड्याशी आणि सुगंधाशी बांधल्या गेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हो, आकाशमोगरा देखील म्हणतात गगनजाईला. महाराष्ट्रात बहुतेक बुच हेच नाव जास्त वापरात असावं. गगनजाई, आकाशमोगरा ह्या नावांचा उल्लेख मी अंतरजालावरच पहिल्यांदा वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आहा! आजोळच्या बकुळीची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या शाळेत गगनजाईची ऊंचच ऊंच झाडं होती.. तुमच्या या लेखामुळे भुतकळात गेले. सूंदर लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुजूरपागा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. maharashtra mandal gultekdi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. तीही छान शाळा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे का बात!

म्ह० कटारिया का दामले प्रशाला?

कोणती ब्याच हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

गगनजाई सुंदर व समर्पक नाव आहे. बुचाचे झाड फार ऊंच ऊंच आकाशात जाते. शाळेत असताना मी सकाळी सकाळी बुचाची खूप फुलं गोळा करुन वरती गच्चीत जात असे व एक एक फुल खाली टाकुन, ती पकडायला धावणार्‍या मुलींची गडबड पहात असे. त्यांना वाटे झाडावरुन फुल पडत आहे.
ते एक बदामाचं झाड असतं त्यालाही असच सुंदर नाव शांता शेळके यांच्या पुस्तकात सापडले होते - चंदन-चारोळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सुध्धा हे उद्दोग केलेत, फुल खाली टाकले की ते भिंगरी सारखे दिसतात. मी त्या फुलांच्या लांब दांड्या एकमेकांत गुंफुन त्याची वेणी करायचे. आता विसरले कशी करायची ते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्झॅक्टली भिं-ग-री Smile यु सेड इट
आणि फुलांच आस्वाद घेण्याऐवजी ती भेट म्हणून देण्यातच मला जास्त रस वाटे. म्हणजे नकळत भेट म्हणून करण फुल सापडलं की मुली आनंदत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोंबिवलीत जोशी हायस्कूलमागे आहेत जी झाडं ती उंच वाढली आहेत.लेखन आणि आठवणी छान आहेत.
पुण्याजवळ खडकी कँटोनमेंटातून पसरली बुचाची झाडं.तिथे एक अधिकारी होता इंग्रज बुच नावाचा.त्याने ती परदेशातून आणून लावली इथं.त्याच्यावरून पडलं नाव बुचाची झाडं.पुणेकरांनी त्याला केलं गगनजाई!
दुसरं असंच एक झाड म्हणजे काडेपेटीतल्या काड्यांना जे पांढरं लाकूड असतं त्याचं झाड आणलं विमको ( अंबरनाथ ) तल्या इंग्रज अफिसरांनी.आहेत तिथं अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुचाच्या फुलांचा दरवळ मंद असतो, प्राजक्तासारखाच. पण प्राजक्ताचे फूल जसे नाजूक असते तसे बुचाचे फूल नाजुक नसते ही जमेची बाब. प्राजक्ताच्या मोती-माणिकास हाताची उष्णताही सहन होत नाही, लगेच कोमेजतं. याउलट बुचाच्या फुलांच्या वेण्याही करता येतात. लेखामध्ये "एकटेपणाच्या भावनेचा" पुनरुच्चार आहे. यामागे काहीतरी कारण आहे जे लेखक सांगत नाहीत. पण त्या संदर्भामुळे लेखाला गूढरम्यता आलेली आहे. बुचाच्या फुलांची चित्रे ही नाविन्यपूर्ण आणि मोहक कल्पना आहे. संपूर्ण लेख तरल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गगनजाई नाव काही वाईट नाहीये. सुंदर आहे.
तरीही बुचाची फुलं हेच तोंडी येतं खरं.
सध्या सिझन आहे बुचाच्या फुलांचा. ऑफिसबाहेर ओळीने साताठ झाडं आहेत, रोज सकाळी पांढराशुभ्र सडा पडलेला असतो आणि दिवसभर मंद दरवळ...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0