वाघाने फोडली डरकाळी...
ग्लोरी
वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी
माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले
टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान
पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या
खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा
- ग्लोरी
रचना गमतीशीर आहे
:) रचना गमतीशीर आहे