तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?

Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -

१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.

२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं

३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.

४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा

५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.

६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला

७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे

८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.

९) मिलो न तुम तो हम घबराए

--

तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी

--
.
.
.
.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

प्रचंड डोक्यात जाणारं गाणं: तुझे अक्सा बीच घुमा दू आ चलती क्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मै जींदगी में हरदम रोता ही रहां हू" टाईपची गाणी तर फार वाईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडणारी गाणी असंख्य आहेत तशीच नावडणारीही असंख्य आहेत. लक्ष्मी-प्यारेचा तोच तोच केरवा(जगांत दुसरे कुठले तालच नाहीयेत, अशी त्यांची समजूत असावी), राजेश रोशनची काही अपवाद वगळता सगळीच गाणी, अगदी जुन्या गायकांची खर्जातली (हगवण लागलेल्या आवाजातली) गाणी, नौशादच्या सुमधुर चालीतले अत्यंत विसंगत व लाऊड असे, मधले पीसेस, किशोरकुमारची अनेक रेकलेली गाणी, पट्टीच्या शास्त्रीय गायकांबरोबर मन्ना डे वा रफीने केलेल्या हास्यास्पद जुगलबंद्या,
लताबाईंना किंचाळायला लावलेली गाणी, का करु सजनी, या बडे गुलाम अली खाँसाहेब यांनी अजरामर केलेल्या ठुमरीचे येसुदासीय विडंबन, अण्णा तथा दि. ग्रेट सी. रामचंद्र यांनी अखेरच्या दिवसांत म्हटलेली,'हवे तुझे दरिशन मजला' सारखी भिकार गाणी आणि अशी अनेक. हे झाले जुन्याबद्दल.
आणि नवीन संगीतात केवळ ठेक्यालाच महत्व दिलेली, पुरुष गायक असूनही बडिवलेल्या आवाजात गायलेली अनेक गाणी ठार नावडती आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ ठेक्यालाच महत्व दिलेली, पुरुष गायक असूनही बडिवलेल्या आवाजात गायलेली अनेक गाणी ठार नावडती आहेत.

अगागागागागागागागागा ROFL ROFL ROFL येकदम झन्नाट उपमा ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर - तूला हे गाणे नक्की आवडणार नाही. भीषणच आहे, नो डाऊट.

"मै गरीबोंका दिल, हुं वतन की जुबां"

ह्या वाक्याचा नक्की अर्थ काय हे मला कितीही विचार करुन कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मै गरीबोंका दिल, हुं वतन की जुबां"

पडद्यावर प्रेमनाथ आहे. गाणं कळंतच नाही. पण मारून मुटकून अर्थ लावायचाच झाला तर तो राजा होता व फडतूसांचा कैवारी व्हायचा यत्न करीत होता एवढं समजतं. हेमंतदांनी माफक गायलंय.

वर राघांनी "गरीब की सुनो वो तुम्हारी सुनेगा" चा उल्लेख केलेला आहे. त्याच्या बद्दलचा किस्सा आहे - मी सातवीत असताना रेल्वे स्टेशन वर मामाची वाट पाहत उभा होतो. मामा तिकिट काढायला गेला होता. तेवढ्यात एक भिकारी तिथे आला व हे गाणं म्हणायला लागला. मी त्याचं गाणं ऐकून घेतलं .... तो "तुम एक पैसा दो वो दस लाख देगा" असं म्हंटल्याबरोब्बर मी त्याला म्हंटलं की "अहो मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडनंच का घेत नाही ?". बस्स ते तेवढं मामाश्रींनी ऐकलं (तोपर्यंत ते तिकिट काढून घेऊन आले होते) आणी घरी गेल्यावर मातोश्रींच्या कानावर घातले.... "चिरंजीवांचे प्रताप". त्यानंतर मातोश्रींनी माझी यांत्रिक धुलाई केली होती.

आठवीत असताना - आमच्या घरासमोर आलेल्या स्ट्रीट सिंगर कम भिकार्‍याला मी त्याच्याच गाण्याची हुबेहूब नक्कल करून ऐकवली होती. "केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा". तो चिडून तरातरा निघून गेला होता.

"गरीब जानके हम को ना तुम मिटा देना" - हे रफी नं गायलेलं नितांत सुंदर गाणं. म्हंजे रफीचा आवाज व जॉनी वॉकर चे हावभाव एकदम आवडतात. ओपी नय्यर चं संगीत लाजवाब आहे. जांनिसार अख्तर ची शायरी अप्रतिम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवीत असताना - आमच्या घरासमोर आलेल्या स्ट्रीट सिंगर कम भिकार्‍याला मी त्याच्याच गाण्याची हुबेहूब नक्कल करून ऐकवली होती. "केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा". तो चिडून तरातरा निघून गेला होता.

तू लहानपणापासुनच गरीबांना त्रास द्यायचास का गब्बु ? ROFL

तुला गरीब शब्द असलेली गाणी आवडतातच कशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू लहानपणापासुनच गरीबांना त्रास द्यायचास का गब्बु ?

चौथीत असताना एकदा एका भिकार्‍याच्या हातातल्या पातेल्यात मी दगड मारला होता. त्याच्या भीक मागण्याच्या आरोळीची हुबेहूब नक्कल त्याला ऐकवली होती.

---

दॅट रिमाईंड्स मी - ते - तू हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा - हे गाणं मला अजिबात आवडत नाही. डेव्हिड च्या कंबरड्यात लाथ घालावी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दॅट रिमाईंड्स मी - ते - तू हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा - हे गाणं मला अजिबात आवडत नाही.

का बुवा? 'तू हिंदूच बनशील, मुसलमान बनणार नाहीस!' असे बजावून सांगणारे गाणे (ऑफ ऑल द पीपल) तुम्हाला आवडू नये??? सेक्युलर चावला काय?

(शिवाय त्यापुढचे ते 'इन्सान की औलाद है इन्सान बनेगा', बोले तो... 'मुसलमान ही माणसे नसतात' असे (पोलिटिकल करेक्टनेसच्या तमाम प्रचलित संकेताना धाब्यावर बसवून) उघडउघड सूचित करणारे गाणे म्हणजे... ओह्ह्ह, द थिंग्ज़ द्याट पीपल कुड गेट अवे विथ इन द अच्छे ओल्ड दिन्स ऑफ योर...)

असे गाणे तुम्हाला आवडू नये म्हणजे आश्चर्य आहे. खुले खांग्रेजी दिसता!

(अवांतर: त्यात पुन्हा हे असले गाणे ऑफ ऑल द पीपल मुहम्मद रफीकडून म्हणवून घेतले आहे, ही आणखी एक गंमत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

य गाण्याचा असा अन्वय आजपर्यंत कोणी लावला नसेल.
एक नवीन शोध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदमच 'नवी बाजू' उलगडून दाखवली गाण्याची.

आता

'बस यही अपराध मैं हर बार करता हूँ' या गीताबद्दल तुमची बाजू काय आहे याचे कुतूहल पैदा झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तू हिंदूच बनशील, मुसलमान बनणार नाहीस!' असे बजावून सांगणारे गाणे

तसे नाहिये ते. खरंतर ते तु हिंदू बनशील, (किंवा) "न-मुसलमान" बनशील' (काहीही बनलास तरी) माणूसच रहाशील (पुढील तुमचा तर्क सुयोग्य आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सारक्याझम आहे ओ तो नवीबाजूंचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे तोच अधिक ताणायचा मी प्रयत्न केला. पण अति ताणल्याने तो फाटला असे आताच तुझ्या प्रतिसादामुळे लक्षात आले आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लग्नात लावतात ते- बाबुल की दुवाये लेती जा, त्या टाइप चे गाणे.

अच्छा *सिला* दिया तुने मेरे प्यार का..

(टेलर होती का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायदवे बहारों फूल बरसाओ हे इतका छानछान वगैरे आशय असलेलं गाणं असं मयताच्या चालीवर का बसवलं गेलं? ते ऐकताना जनाजे पे फूल बरसाओ म्हटल्यागत वाटतं भेंडी. म्हणजे उन्हाळा असल्यावर छान गार पाणी पिऊ म्हणून भांडे तोंडाला लावल्यावर गरमागरम मचूळ पाणी पिल्यास कसा के एल पी डी होतो तसे काहीसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाणं असं मयताच्या चालीवर का बसवलं गेलं?

'बुगडी माझी सांडली गं' हे गाणं आवडतं का बॅटमन? तेही मयताच्या चालीवरच बसवलं आहे. दूरदर्शनवर राम कदम यांची मुलाखत झाली होती. सांगत्ये ऐका मधे ते असिस्टंट संगीतकार होते. बुगडीची कुठलीच चाल पसंत पडत नव्हती. शेवटी रामभाऊंनी जबाबदारी घेतली. त्यांच्या गांवी दलित, जवळचा माणूस मेल्यावर, 'बाबा माझा म्येला रं' असा आर्त टाहो फोडत. तीच सुरावट वापरुन त्यांनी बुगडी माझी ची चाल बसवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुगडीवालं गाणं आवडतं. ते मयताच्या चालीवर बसवलं ही माहिती नवीन आहे, त्याबद्दल धन्यवाद.

मुद्दा इतकाच, की बहारों... वाले गाणे अतिशय डल आणि मंद आहे. बुगडीवालं गाणं एकदम कॅची असल्याने आवडतं. आशयही मस्त आहे तो भाग वेगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसंच ते 'मेरे मेहबूब तुझे मेरी मोहोब्बत की कसम...'. वैताग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या गाण्यांत, राजेंद्रकुमारचे असे अँगल घेतले आहेत की त्याच्या मोठ्ठ्या नाकपुड्यांमधे कापूस भरला तर कसं दिसेल, असं मला लहानपणी वाटायचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं पाहिलं नाही, पण निव्वळ या कमेंटमुळे पाहणार. धन्स तिर्शिंग्राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंच ते 'मेरे मेहबूब तुझे मेरी मोहोब्बत की कसम...'.

काय ओ तुम्ही भलतंच बघत बसता. आम्ही साधना कधी दिसत्ये याची वाट बघायचो आणि मग तिचा क्लोजप आला की पॉज करून तिच्या चेहर्‍याकडे बघत बसायचो. हाय !!! काय जानलेवा दिसायची ती. कलेजा खल्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर - 'डॉ. कणेकरांचा मुलगा'(कणेकरांच्या याच पुस्तकात आहे ना या गाण्याचा रेफरन्स?) वाचल्यानंतर या गाण्याचं मयत-कनेक्शन जास्त जाणवायला लागलं मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का त्यात काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर लिंका तरी देतो. हे नुस्तेच कोडी घालतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरर्र्र्र्रा म्हणून वाट बघायला नको प्रतिसाद देईस्तोवर.
आता बसा कोडी घेऊन, नाहीतर वाचा पुस्तक, मग कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हे गाणे आधी प्रत्येक लग्नात वाजवायचे जेव्हा नवरा नवरी stage वर जात असतात तेव्हा .. मला वाटायचं कि नवरी मुलगी सासरी जाणार म्हणून हे रडायचं गाणे वाजवतात म्हणून..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं लोकलमध्ये पेटी घेऊन वाजवायला(च) फिट्ट ए एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मेरे दुष्मन तू मेरी दोस्ती को तरसे - म. रफी

अतिशय भिकार गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेमभंगाची रडकी गाणी.
रोते रोते यु ही रात गुजर जाती है,
तडफ तडफ के इस दिल से,
and so on

तसेच
गावटी गाणी जत्रेत वाजणारी
लिंबू मला मारिला,
खंडेरायच्या लग्नाला नवरी नटली,
काळूबाई,येलूबाई,वगैरे वगैरे

बाकी बांबू डालके बारीक कुटना वगैरे गाणी फार आवडतात. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

सर्कमस्टॅन्शियल नावडती गाणी

- लग्नाच्या कॅसेट/सीडीवर ब्याकग्रौंडला वाजतात ती (फुललेरे टँग डँग टँग टँग डँग फुललेरे क्षणमा झे फुललेरे ... झुळुक्क्वार्‍याची आलीरेलेवून कोवळीसोनफुले ... वगैरे)

- ग्याद्रिंग (आज गोकुळातरंग...)

- स्पीकरांच्या भिंतींवर वाजवलेली कुठलीही गाणी (खूप लाऊड स्पीकरवर गाणी नीट वाजत नाहीत असं माझं नम्र मत आहे.)

- मुकेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> मुकेश

तुम्ही शैलेंद्रसिंग ऐकलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"होगा तुमसे प्यारा कौन... हम को तो तुम से है... ए कंचन... (मग अचानक मुद्द्यावर येत) प्या आआआ र" वाला ना?

त्याची बाकीची गाणी आठवत नाहीयेत.

(अवांतरः त्या कंचनवाल्या सिनेमाचं नाव होतं "जमाने को दिखाना है". असलं नाव त्याकाळी सेन्सॉरसंमत कसं झालं? दोज मस्ट बी क्रेड्युलस डेज...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी तो सिनेमा सहा वेळा पाहिलाय. आवाज नै पायजे.

शैलेंद्रसिंगची गाणी म्हणजे ऋषिकपूरची सुरुवातीची गाणी.

---------------------------
ऋषिकपूरला कुणीतरी विचारले की बॉबी हा सिनेमा तुम्हाला लाँच करण्यासाठी काढला होता ना? तेव्हा त्याने "तेव्हाच्या प्रस्थापित हिरोंना द्यायला पैसे नव्हते म्हणून राजकपूर यांनी मला हिरो केले" असे उत्तर दिले होते. त्याचप्रमाणे मुकेश यांना द्यायला पैसे नसल्यामुळे शैलेंद्रसिंगला गायक बनवले असावे. नंतर 'ऋषिकपूरचा आवाज' म्हणून त्याला गाणी मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

" एक बुंद मुझे भी पिला दे शराबी ..देख फिर होता है क्या"

यार..कोणीतरी आमच्या घराशेजारी रिक्षा लावून त्यात हे गाणे लावायचं ..कित्येक दुपारी हे फडतूस गाणे ऐकत गेल्या आहेत .. आम्हाला नाही बघायचं तू प्यायल्यावर काय होणार आहे ते.

हे एक भिकार गाणे ..

दुसरं ":शीशा हो या दिल हो"

तिसरं " भोली भाली लाडकी ..खोल तेरे दिल कि प्यारवाली खिडकी "

हे ममता कुलकर्णी कुठल्या angle नि भोली लडकी वाटते कुणास ठावूक..त्यात सगळी दुनियाभाराची फौज जमा करून हिडीस नाच ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जर स्वताला भाबडी म्हणत असेन तर ममता कुलकर्णी भोली असु शकते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्या ख्या ख्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर कुणीतरी लताबैंची कर्कश्श गाणी दिल्येत.

मोष्टली लक्ष्मीकांत-प्यारेलाल (त्यापूर्वी शंकर-जयकिशन) खूप वरच्या पट्टीत गाणी बसवायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लावण्याची लायकी नाही पण वरील बय्राच गाण्यांशी सहमत.बाकी ते टडटडटक्कटक्क वाजवत गाणं म्हणणारी भिकारी पोरं जोडपी दिसली की तुमsssssपरदेsssसी साथ्थ क्या---- गात हटतच नाहीत आणि खुसखुस थांबवून संतापतात त्यांच्यावर.एखादं चांगलं गाणं गाऊन खुश करून पैसे नक्की मिळतील.
आणि ते लुपमध्ये वाजणारे अतिभाविकांच्या दिवाण,सोफ्याखालून वाजणारे ओम नमम:शिवाय वगैरे---अरे ते थांबवा आणि चा आणा लवकर कडवट.तोही महागडा फुळकवणी पाजतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शारदा नावाच्या गायिकेची गाणी अशीच भीषण असतात, एक आठवते म्हणजे "दुनिया की सैर करलो".
शंकर जयकीशन वर अशी काय वेळ आली होती की ह्या बाईला गाणी देत असत.

----------

संशोधन म्हणुन जालावर ह्या बाई बद्दल बघायला गेले तर धक्कादायक माहीती मिळाली.

हीला फिल्म फेअर अ‍ॅवार्ड मिळाले आहे. १९६८-७१ सलग नॉमिनेश्न मिळाले आहे.

हे तर वाचण्या सारखेच आहे

It so happens that the coveted Filmfare award for best playback singer had only one category (either male or female) until 1966. "Titli Udi" song, however, was tied as best song with Mohd Rafi's song "Baharo Phool Barsao" which had never happened before. Sharda didn't win the award but from then on Filmfare started giving two awards for best playback singer: one for male singer and the other for female singer. Thus Sharda made history.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लताबैंशी झगडा झाला की शंकर हे त्या शारदेला घेऊन गाणी रेकॉर्ड करीत असत. शारदाला घेऊन आणखी कोणी गाणी केली नसावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लताबाईंना न घेण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही पण एकदम शारदा?
त्याकाळात गायिकांचा भीषण दुष्काळ वगैरे पडला होता काय?

कित्येक मिमिक्री करणारे लोक पण बाईच्या आवाजात हीच्या पेक्षा चांगले गातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नक्की कोण?

ते एक 'चले जाना, ज़रा हरो, किसी का दिल मचलता है, ये मंदर देख कर जाना' की कायसेसे गाणे मुकेशबरोबर अत्यंत गेंगाण्या आवाजात गाणारी ती कोण? शारदाच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीच ती. एकदम बरोबर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शारदाची गाणी (एकदोनच ऐकली) मला सुद्धा नावडती.

अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स !!! - काय तेजायला भिक्कार गाणं आहे. त्यापेक्षा पत्र्यावर खिळा ओढला तर सुरेल आवाज येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. बेपनाह प्यार हे आजा - क्रिश्ना कॉटेज
२. टेलिफोन धुन मे हसनेवाली - हिन्दुस्तानी
३. ट्ण टणा ट्ण, ट्ण ट्ण तारा - जुडवा
४. मुझे हक है - विवाह
५. दिल तो पागल है - टायटल सॉन्ग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ & ५????? मला तर आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ३ नंबर पण आवडते २ आणि ५ बरोबर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊप्स मला ३ & ५ म्हणायचे होते. एकूण हिशेब तोच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही माझी लिस्ट आहे तीच तुमची असावी हे कसे चालेल?
बॅटमना: तुला सन्स्क्रुत आवडते आनी माझ्या ते डोक्याबाहेरचे प्रकरण आहे, असे होणारच ना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. मला आश्चर्य वाटले म्हणून प्रतिसाद लिहिला इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२ तर माझं फेवरेट होतं! इतक्यांदा लावलंय लहानपणी टेप वर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट बघतोय रीक्शावाला
चिक्क मोत्याची माळ
विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला
शांताबाय
नवरी नटली सुपारी फुटली
कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली ...
आवाज वाढच डी जे ... आयचा घो... (हे २ शब्द गाण्यातले नाहीत.. गाणं ऐकून असं म्हणावसं वाटतं)
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" फॉर आय = १ टू अगणित ..
वगैरे वगैरे बरीच..

साधारणपणे रस्त्यावरील गणपती मंडळांची (रस्त्यावर गणपती न बसवणारी मंडळं असतात का??? )आवडती असतात ती सगळी ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही अती हीट झालेली गाणी अजिबात आवडत नाहीत.

धडकन आणि मन सिनेमाची गाणी अशक्य डोक्यात जातात.
धडकनची विशेषतः
दिल ने य कहा हे दिलसे
तुम दिल की धडकन मे
ना ना करते प्यार हाय मै कर गई (तुझ्या 'ना ना' ची टांग)

मन
मेरा मन क्यू तुम्हे चाहे
नशा ये प्यार का नशा है
काली नागिन के जैसे ब्लाब्लाब्ला...

रिक्षा वापरणं तर बंदच केलं होत मी त्या़ काळात कारण रीक्षावाल्यांनी उत आणला होता हे गाणे वाजवून. हे सिनेमे आले तेव्हा मी कॉलेजात होतो. कॉलेजची प्रेमी युगलं (चोट खाई हूयी) रडायची वगैरे ती धडकन ची गाणी ऐकून. मला मात्र ती गाणी ऐकली की मी रिक्षावाला झालोय अशीच स्वप्नं पडायची आणि मजबुरी म्हणून रिक्षा चालवतोय ह्यापेक्षा मजबुरी म्हणून मलाही रिक्षेत ही गाणी वाजवावी लागताहेत ह्याचं जास्त वाईट वाटायचं, नशिब स्वप्नच होतं ते.

हा हा... या गाण्यांशी अगदी सहमत. धडकन आणि मन (तसेच त्या काळातील मोहब्बते) या चित्रपटांच्या गाण्यांनी अगदी वात आणला होता.

त्याहीपेक्षा हाईट म्हणजे धडकनची संवादांसहित अशी कॅसेटची एक वेगळी आवृत्ती मिळत असे. नुसरत फतेह अली खान च्या 'धडकन धडकन धडकन धडकन' वगैरे आळवणीच्या मध्येच गाणे थांबवून सुनील शेट्टीच्या आवाजात, 'तुम मेरी हो ये हो नही सकता और तुम किसी और की होगी हे मै होने नही दूँगा' किंवा 'कौन साला मरता है मेमसाब, और मर भी गया तो तुम्हारे सीने मे धडकूंगा धडकन बनकर' वगैरे अजरामर डायलॉगही ऐकावे लागत.

शेवटी रिक्षा-सिक्ससीटरने प्रवास बंद करुन बसचा प्रवास निवडला तर त्यावेळी पीसीएमटीचे रसिक ड्रायवर - कंडक्टर टेपरेकॉर्डर बसवून शुक्रतारा मंदवारा वगैरे गाणी सकाळीसकाळी ऐकवत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर बरीच नावडती गाणी आधीच आली आहेत. आशा भोसलेंची हिरवा-बरवा अल्बचमी गाणी डोक्यात गेली. आतिफ असलम ह्या गायकाची गाणी अजिबात आवडत नाहीत. चांगली आहेत खरंतर पण डोक्यात जातो. यशचोप्रा-जोहर कँपची गाणी (डीडीएलजेपासून धूमपर्यंत) सतत आदळत असल्याने कधीच आवडली नाहीत. हिमेशरेशमियाँची काही गाणी जनरली ऐकू शकतो पण त्याचं एक 'कुछ तो समझो ना' नावाचं गाणं एकदम इरिटेटिंग आहे. रिक्षावाला, पारु वगैरे चांगली आहेत पण शांताबाई गाणे काही झेपले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा आवडला. पण गाण्याचा विचार करते आहे.
___
निगोडी कैसी जवानी है - https://www.youtube.com/watch?v=jiZucsVVCp8
हॉरिबल फॉर ऑब्व्हिअस रिझन्स Sad
____
तेजोमय नादब्रह्म हे - http://www.aathavanitli-gani.com/Song/Tejomay_Nadabramha_He
गाणं आवडतं ना आवडतं तोच गीतकार - प्रवीण दवणे वाचलं अन मग ..... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकताच केबलचा जमाना सुरु झाला होता अन एटीएन वगैरे तत्सम चेनलवर आम्ही डोळ्यात प्राण आणून वाट पहायचो की केंव्हा एकदा हे गाणं लागतं ते. त्यावेळी मला नुकताच जुगार खेळायचा नाद लागला होता अन जिथे तो चालत असे त्या हॉल/खोलीत हे गाणं कॅसेटवर पुन्हा पुन्हा लावलं जात असे. हे गाणं ऐकत जुगार खेळणं म्हणजे निव्वळ नशा होती नशा... वूफ्फ्फ..! आय एम फिलींग नॉस्टेल्जीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

१. तुम तो ठहरे परदेसी, साथ्थ काय निभाओगे
२. ले गयी दिल मेरा मनचली, खलीबली खलीबली खलीबली
३. वरती कोणीतरी पुरूष गायकांनी चिरक्या आवाजात म्हंटलेली गाणी - टोटली.
४. शांताबाई - डोक्यात बिक्यात गेले नाही पण मुळात त्या गाण्यात आवडण्यासारखे काय आहे तेच समजले नाही. डोक्यावरून गेले.
५. कोंबडी पळाली
६. नवीन पोपट, व मुद्दाम तसे आवाज काढून म्हंटलेली असंख्य गाणी
७. केवळ पंकज उदास गातोय म्हणून गजल समजली गेलेली गाणी
८. जिंदगी की ना टूटे लडी. ऐकायला व पाहायला दोन्ही भिकार. काय खाउन लोक गाणी हिट करायचे कळत नाही. (मात्र त्याच पिक्चर मधले लुई शमाशा मस्त आहे)
९. तुम जो मिल गये हो तो ये लगता है के जहाँ मिल गया - त्या हीरॉइन च्या पोजमुळे मला हे भुताचे गाणे आहे असे वाटायचे कित्येक दिवस
१०. कोलावेरी न आवडणार्‍यांमधे मलाही धरा. वाय दिस कोलावेरी कोलावेरी हे ते गाणे रचणार्‍यांनाच उद्देशून विचारायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ पंकज उदास गातोय म्हणून गजल समजली गेलेली गाणी

सलमा आगा बद्दल तुमचे मत जाणून घ्यायचे आहे.

(५), (६) वरून "पोपट पिसाटला" हे आठवलं. न भूतो न भविष्यति असं भंगार गाणं आहे हे.

(१), (८) बद्दल सहमती. (९) बद्दल पण बर्‍यापैकी सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती नावडण्याएवढी तिचे चित्रपट वा गाणी पाहिली नाहीत. एक फक्त 'कसम पैदा करने वाले की' मधे ती काहीतरी "मै अपनी खूबसूरती के बल पे..." वगैरे बोलते तेव्हा फुटल्याने पुढचे वाक्य ऐकले नव्हते. मात्र ती ज्यांच्या डोक्यात जाते त्यांना आणखी त्रास करून घ्यायचा असेल तर तिचा आवाज, रती अग्निहोत्रीला तिच्यासारखा मेक अप करून, व डिस्को लाईट्स लावून एक अफलातून कोरस डान्स असलेले हे गाणे पाहावे
https://www.youtube.com/watch?v=yfE9UXdXCrQ
मेरा नाम सलमा/अल्ला जाने कौन बनेगा इस सल्मा का बल्मा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या हातातला बारकुडा, चिटुकला, लआंब धरलेला फॅलिक माईक फारच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१ आणि ५ लय आवडतात मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्वात नावडते गाणे "आते जाते खूबसूरत आवारा सडकों पे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विठ्ठल नामाची शाळा भरली हे गाणे अतिशय डोक्यात गेलंय.
दूरी सही जाये ना तसेच आतिफ अस्लमची सगळी गाणी प्रचंड डोक्यात जाणारी आहेत
चिक मोत्याची माळ हा बहुदा इथला स्टार नावडता आयटम आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हे एक. ऐकायला श्रवणीय आहे. पण चित्रीकरण एकदम मजेदार. राजेन्द्रकुमार व सायरा बानो सारखे कलाकार असल्यावर उच्च अदाकारी ची ग्यारंटीच. पूर्वीच्या पिक्चर्सच्या जाहिरातीत जसा "ठासून भरलेला मसाला" हे एक क्वालिफिकेशन होते तसा यात ठासून भरलेला अभिनय आहे. जणू काही आपण सर्व प्रकारचा अभिनय करू शकतो हे एकाच गाण्यात सिद्ध करायचे आहे.

सायरा बानो व राजेन्द्रकुमार यांच्या या गाण्यात सेकंदासेकंदाला अभिनयाचे, नृत्याचे धडे मिळतात ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पाहा. पण आधी गाणे पाहा:
https://www.youtube.com/watch?v=LE_RHVhOWeU

हे काही Gems. पहिले आकडे गाण्याच्या क्लिप मधले मिनीट व सेकंद दाखवतात.
०:०१: सायरा एका झाडावरून दुसरीकडे जाते तेव्हा लहानपणी शिरापुरी खेळायचो ते उगाचच आठवले.
०:३९: मिथुनच्या सायकल च्या मागे लपण्याच्या तोडीचा सायरा चा झावळीमागे "लपण्याचा" सीन
०:४०: "येथे समोर दिसत नाही. कोठे गेली?" हीरॉइन्/हीरो तेथेच जवळपास असणार हे उघड असताना चेहर्‍यावर उगाचच काळजी दाखवणारे एक्स्प्रेशन्स असतात तसा चेहरा
०:४९: हीरॉइन समोर शोधत असताना मागून येणे हा अशा गाण्यांत अत्यंत आवश्यक असलेला सीन. सुमारे ३०-४० चौरस फुटांमधे दोघे फिरत असताना हे असे कन्फ्युजन कसे काय होते हे एक आश्चर्यच आहे.
०:५८: "दो दिलोंकी कश्ती" मधे ते दो दिल कोणते हा प्रश्न प्रेक्षकांना पडू नये म्हणून एकदा सायरा कडे व एकदा स्वतःकडे बोट. याला दोघांची माना डोलावून सहमती.
१:०७: हेअर कट् केल्यानंतर एक दोन दिवस कानामागच्या केसांत हात फिरवायचा आपण प्रयत्न करतो पण तेथे केस नसतात तसा एक सीन. "अरे हो, आज केस कापलेत नाही का!"
१:२०-१:३०: गरिबांचा दिलीपकुमार हे नाव सार्थ करणारे हातवारे
१:३८: एक पाय उचलून नटराज पोज मधे नमस्कार. यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
१:५८: स्प्रिन्ग लावलेल्या बाहुलीचा डान्स. राजेन्द्र कुमार करतो. सायरा नव्हे
२:०८: "देखते है तारे" म्हंटल्यावर कम्पल्सिवली आकाशाकडे बघायलाच हवे. तेव्हढ्यात आज दाढी केलीय का हे विसरल्यामुळे एकदा चेक
२:२२-२:३०: सायराबानो च्या डान्स पोजेस सुद्धा स्वतःच करून टाकणे
२:५५: मला डान्स करता येत नाही हे हावभाव करून सांगणे
३:०४: "पंछी" चा उल्लेख आल्यामुळे हाताने पंख हालवतानाचे हावभाव करायलाच हवेत. त्याशिवाय लोकांना कसे कळणार
३:२३: भजन
३:२९: बॉक्सिंग ची प्रॅक्टिस
३:४८: ज्याच्या मधून प्रतिभोत्तर राम गोपाल वर्माने क्लोज अप कसा असावाचे धडे घ्यावेत असा क्लोज अप. भरतनाट्यम-भुवया उडवण्याचाही एक प्रयत्न.

एकाच गाण्यात एवढा अभिनय ठासून भरला आहे असे सहसा नसावे. रिस्पेक्ट! तो शेवटी एक बंदूक घेउन उभा असलेला माणूस दिसतो, तो दिग्दर्शक असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं एकदा चित्रहार मधे लागलं होतं. मातोश्री शेजारी बसल्या होत्या. तीन चतुर्थांश गाणं झाल्यावर स्वतःचीच पुटपुटल्या - "अपेक्षा तरी कोणाकडून करायची म्हणते मी ?".

बाकी गाणं ऐकायला अतिशय गोड आहे. पण बघणे हा थेट अत्याचार असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण गाणं तुम्ही दिलेल्या point नुसार पाहिलं आणि माझा शनिवार सार्थकी लागला, उद्याचा रविवार पण छान जाणार .. जबरी निरीक्षण ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सो बॅड दॅट इट्स गुड : कंटिन्युड् :
"सबसे बडा खिलाडी़" सिनेमातलं ममता कुलकर्णी आणि अक्षयकुमारचं गाणं. शब्द विसरलो. सडीकछाप.
"अंदाज़" नावाचा , '९० च्या दशकातला डेव्हीड धवनने काढलेला सिनेमा. त्यातली सगळी गाणी. दुर्गंधीयुक्त.
८३-९४ च्या आसपासचा "कैदी" नावाचा हिंदी (पण दाक्षिणात्य निर्मात्यांनी बनवलेला) सिनेमा. त्यातलं "बांगो बांगो बांगो/जो भी चाहो/वोही मांगो" हे गाणं.
सिनेमा विसरलो. पण अनुराधा पौडवालचं कर्कश्श "मैंने रब से तुझे मांग लिया" (बहुदा "कर्मा")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"सबसे बडा खिलाडी़" सिनेमा

यातली गाणी सो बॅड इट्स गुडचा मापदंड आहेत.

- भोली भाली लडकी, खोल तेरे दिल की, प्यारवाली खिडकी, ईईईईई (ईई म्हणजे ईत्यादी नव्हे. खरंच गाण्यात ईईई असं म्हणातात. वर कोणीतरी याबद्दल इतर प्रेमळ उद्गार काढलेले आहेतच)

- जहर हय के प्यार हय तेरा चुम्मा, कयसा ये खुमार हय तेरा चुम्मा

- भरो .... टर डर डग टक .... मांग मेरी भरो
हे एक अतिशय संस्कारी गाणं आहे. मकु अकुला सिड्यूस करतानाही मांग भरल्याशिवाय मी सिड्यूस होणार नाही असं सांगते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"- भरो .... टर डर डग टक .... मांग मेरी भरो" : मला हेच सडलेलं गाणं म्हणायचं होतं. माझ्या मते ही आणि असली गाणी अँटाय्-सेक्सी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती - अजिबात आवडत नाहीत. कितीही सुरेल गाणं असलं तरी त्यांचा आवाजच डोक्यात जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराधा पौडवालबद्दल: अगदी अगदी, त्रिवार अगदी. गुलाबजामचा उरलेला पाक (त्याच त्या भयाण गुलाबाच्या कृत्रिम वासासकट) पितो आहोत असं वाटतं.

आणि आता विषय निघालाच आहे, तर ती श्रेया घोसल. काय कर्कटकी आवाज आहे तिचा. पूर्वी दगडी पाटी असायची आठवते का? त्यावर एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे कर्कटक खरवडत नेलं तर जसा आवाज येईल, तसा काहीतरी पोत आहे तिच्या आवाजाचा. वास्तविक (असं वाटू नये, याला पुरेशी सबळ कारणं असली तरीही) काही अनाकलनीय कारणांनी संजय लीला भन्सालीच्या सिनेमांतली गाणी मला बरेचदा ऐकावी वाटतात. मग त्यात ह्या बाईचा आवाज आला की एकदम मुस्काटात बसल्यासारखं वाटायला लागतं. "करशील, परत करशील असली हिंमत? चल नीघ." असं डोक्यात वाजतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'दिल के झ्रोके मे तुझको बिठाकर...' आणि पुढच्या ओळी कानावर यायला लागल्या की "अरे क्काय लावलय" (वर्हाड निघालय लंडनला स्टाईल मध्ये) असं तोंडातून निघतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनुषला या धाग्याची लिंक धाडा रे कोणीतरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या एकेकाळी डोक्यात जाणारं गाणं :

अगर तुम मिल जाओ , जमाना छोड देंगे हम . अत्यंत मूर्खपणाचं उदाहरण; ह्यातच पुढे असाही आहे कि तेरी सुरत न हो जिसमे वो शिशा तोड देंगे हम - काय म्हणजे. बाथरूममध्ये, इकडे तिकडे सगळीकडे काचांचा खच पडलाय असं डोळ्यासमोर यायचं . काहीही .

आणि ते दुरीईईईई सही जाये ना - त्याने फर्स्ट इयर मध्ये वात आणला होता. लोकांना आवडतो अतिफ अस्लम पण मला हे आणि अजून एक दोन गाण्यातलं त्याचं रेकणं सहन होत नाही .

बाकी हल्ली आमच्याकडे प्रत्येक रेडीओ स्टेशनवर अडेल बाई रडत असतात - ते हेल्लोच तर अजीर्ण झालंय . Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

अगर तुम मिल जाओ , जमाना छोड देंगे हम . अत्यंत मूर्खपणाचं उदाहरण;

अगदी, अगदी!

म्हणजे तुम नही मिले तो जमाना है बॅकअप के लिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगर तुम मिल जाओ या गाण्यातील क्रियापदाच्या स्पेलिंगवर मित्रांत तुफान खसखस पिकत असे ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभी ना जाओ... गाण्याबद्दल सेम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाहाहाहाहा अगदी अगदी. शिवाय त्यात पुढची शब्दयोजनाही एकदम सूचक आहे. नशीब अभिजित नामक कुणी मित्र नव्हता तेव्हा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगर तुम मिल जावो मधली गणपतीच्या डोळ्यासारखे डोळे असणारी उदिता गोस्वामी पण डोक्यात जाणारीच आयटेम होती.
.
बॅट्या नशीब मी तुला ओळखत नव्हतो त्यावेळी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी खी खी. Wink

अबे पण उदिता गोस्वामी चांगली होती की बे. गणपतीचे डोळे ळॉळ ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तीच उदिता गोस्वामी आता तीन उदिता गोस्वामींचा ऐवज झाली आहे. आप्पुन ने अप्नी ये ये आख़ों से देखेला हय कुच महिना पैलेइच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी हल्ली आमच्याकडे प्रत्येक रेडीओ स्टेशनवर अडेल बाई रडत असतात - ते हेल्लोच तर अजीर्ण झालंय . Sad

हाहाहा अडेल चं हेलो मी ही ऐकलं आवडलं पण बस्स. फार ऐकवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धी हे ब्रिटनी आणि अडेल मॅश अप ऐकलयस का? एकदम छान आहे.
https://www.youtube.com/watch?v=fKyb3UXLXJg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही ऐकलं. मी फक्त कॉलेजला येता जाता गाडीत रेडीओ ऐकते. हे घरी जाऊन ऐकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

जरा अवघड प्रश्न आहे ... आवडती विचारल असतं तर तुमच्या लेखापेक्षा मोठ्ठी यादी दिली असती .

नावडत्यांची लिस्ट पण बर्‍यापैकी मोठी आहे ..

१) गरीबोंकी सुनो .. वो तुम्हारी सुनेगा
२) बाबुल की दुवाए लेती जा ...
३) जानेवालो जरा मुडके देखो मुझे
४) तुम गगन के चंद्रमा हो .. मै धरा की धूल हू
५) चल चल चल मेरे हाथी .. ओ मेरे साथी
६) तेरी मेहेरबानीया - तेरी कदरदानीया
७) तु मेरा जानु है
८) मै तो रस्तेसे जा रही थी - भेलपुरी खा रही थी
९) सरकाई लियो खटीया जाडा लगे

अजून बरीच आहेत .. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

(१) बद्दल वर जिक्र केलेला आहेच.
(२) अगदीच रटाळ
(३) बर्‍यापैकी सहमत
(४) कुठल्याही आधुनिक स्त्री ला हे गाणं आवडणार नाही. तसेच मै तुलसी तेरे आंगन की. ही दोन्ही गाणी मी बायकोला चिडवण्यासाठी लावतो. पुढचा तासभर दिवाळीप्रमाणे फटाके वाजत राहतात.
(५) ठीकाय
(६) चांगल्यापैकी सहमत
(७) हे स्वरा चे सुद्धा नावडते आहे. आजकाल कुठे दिसत नाही स्वरा.
(८) व (९) ही भिकार आहेत याबद्दल सर्वसहमती असेल असा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा एखाद्या आधुनिक स्त्रीला सबमिसिव्ह फेटिश असेल तर हे गाणे आवडू शकेल की. नै आवडणार म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
तेरे लिये पलकों की झालर बुनूं
कलियों सा गजरे में बांधी फिरूं
धूप लगे जहां तुझे छाया बनूं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने