ध्वनी अनुदिनी - पुष्प - १ मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

नमस्कार,

ऐसी अक्षरेच्या सर्व वाचकांना मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागातर्फे सस्नेह नमस्कार.

मुंबई ग्राहक पंचायतीचा पुणे विभाग - पुणे परिसरांत गेल्या ६ वर्षापासून कार्यरत आहे. पुण्यातील मुंबई ग्राहक पंचायतीचे काम ग्राहक शिक्षण या विभागापासून सुरु झाल्याने ग्राहक शिक्षणातील महत्वाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत पुण्यातील ६ शाळांमधून ग्राहक शिक्षण देण्यात येत आहे. गेले ४ वर्षापासून मुंबई ग्राहक पंचायतीच्या मासिक ग्राहकोपयोगी वाणसामानाचे मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुण्यातील सभासदांना रास्त दरात वितरण सुरु आहे. आज दिनांकापर्यंत पुणे परिसरांत असे ६५ गट (मुंबई ग्राहक पंचायत अशा गटांना संघ संबोधते) कार्यरत आहेत. एका गटात किमान ११ कुटंब सदस्य असावे लागतात. पुण्यातील मुंबई ग्राहक पंचायतीचे काम भोगोलिक रचनेमुळे थोडेसे विखुरलेले आहे, त्यावर उपाय म्हणून पुणे विभागातील कार्यकर्त्यांनी १ वर्षापूर्वी विभागाचा असा वेगळा ब्लॉग सुरु केला. सदर ब्लॉगवरील पोस्ट्स ह्या कालांतराने मिसळपाव, मायबोली या मराठी संकेतस्थळांवरही प्रसिध्द होऊ लागल्या. गेले महिनाभर याच पोस्ट आपण "ऐसी अक्षरे" वर का प्रसिध्द करीत नाही अशी विचारणा होऊ लागल्याने मुबई ग्राहक पंचायतीच्या अनुदिनी गटाने सदर पोस्ट्स इथेही प्रकाशित करता येतील या करीता सुरुवात केली आहे.

ऐसी अक्षरे च्या वाचकांनी सदर लेख वाचून प्रतिक्रिया द्याव्यात. ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ किंवा वितरण या पैकी कशाचीही माहिती आपणास हवी असल्यास आपण आमच्या ई-मेल पत्त्यावर संपर्क करु शकता. आपणास कोणत्याही प्रकारचा सहभाग मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यात द्यावयाचा असेल तरीही आपले स्वागत आहे.

आमच्या ध्वनी अनुदिनीच्या उपक्रमाला नुकतीच सुरुवात झालीयं. त्यातले हे पहिले पुष्प आपणाकरीता सादर.....

गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे.

आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा वाचण्याकरीता पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही, म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रेडीओ भागांचे या अनुदिनी करीता संपादन करुन ते आपण 15 दिवसांनी एक भाग असे प्रसारीत करणार आहोत. हे सर्व भाग आपण ऐकून त्याचा आनंद तर घ्याच, पण आम्हालाही कळवा आपल्याला हे भाग आवडले की नाही ते. चला तर करुया सुरुवात.....

मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासूनच्या कामाचा घेतलेला हा आढावा आपण ऐकूयात....

खालील दुव्यावर टिचकी मारुन (Click) आपण हा भाग ऐकू शकता.

ध्वनी अनुदिनी भाग-1 - श्री अशोक रावत

टिप - सदर लिंक मुंबई ग्राहक पंचायतीच्या गुगल ड्राईव्ह वरील ऑडियो फाईल सुरु करते.

आपण हा भाग येथूनही ऐकू शकता.

धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.

- अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर ध्वनी धागा मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत. माहितीपूर्ण लेख/चर्चा यांचे स्वागत आहे

अवांतरः ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून लहान उद्योगांची चांगली प्रोडक्ट्सही मिळतात - वापरून बघता येतात हा मला मोठा फायदा वाटतो. आमच्या घरी कोरफडीच्या चिकाचा शांपू, भांड्यांचे साबण, फिनाईल, ब्लिच वगैरे गोष्टी इथूनच रास्त दरात येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वागत.ध्वनी अनुदिनीचाही उपक्रम रुळायला वेळ लागेल.प्रतिसादही असेच ओडिओ रेकॅार्डींगने दिले पाहीजेत .त्या लिंक सोबत फाईल किती एमबी साइझ आणि किती मोठी -मिनीटांची आहे तेही कृपया द्यावे.दीड मिनीट,तीन मिनीट अथवा साडेचार मिनीटे एवढीच ऐकणाय्राची क्षमता असते.इतक्या वेळातच एखादा मुद्दा मांडला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0