हे चित्र पहा आणि ते चित्र पहा



काही दिवसांपूर्वी "टाईम" या अमेरिकन नियतकालिकाच्या अंकात (केवळ एशियन आवृत्तीतच ?) भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर "Underachiever" म्हणून प्रमुख लेख आलेला होता. त्याची भारतात आणि परदेशस्थ भारतीय वर्तुळांत तीव्र प्रतिक्रिया आलेली होती. त्याची ऑनलाईन आवृत्ती वाचल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीच्या संदर्भात पंतप्रधानांच्या निर्णयक्षमतेवर भाष्य त्यात केल्याचे आठवते.

नुकत्याच पाहिलेल्या एका बातमीनुसार, "आऊटलूक" या भारतीय नियतकालिकाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर तेच शीर्षक (आणि तेच उपशीर्षक !) देऊन प्रमुख लेख छापल्याचं कळतं.

प्रस्तुत लेखकाने "आऊटलूक"चा हा अंक वाचलेला नाही. मात्र या निमित्ताने आलेले विचार :

"त्यांनी गाय मारल्यामुळे आपण वासरू मारणे" हे या बाबत घडलेले आहे काय ? असे करणे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे रक्षण करण्यासारखे आहे काय ? की "आऊटलूक" या साप्ताहिकाच्या उत्तम दर्जाच्या साप्ताहिकाच्या प्रगल्भतेला तडा जाणारे हे कृत्य आहे ? "आऊटलूक"ने सनसनाटी मुखपृष्ठ आणि शीर्षक देऊन गल्ला जमवला आहे असे सकृद्दर्शनी तुम्हाला वाटते काय ?

बीबीसी ने दिलेली बातमी :
http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-18920112

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

दोन्ही अंक वाचलेले नाहीत. त्यामुळे सकृद्दर्शनी जे काही दिसते आहे त्यावरूनच मत मांडतो आहे.

हा निव्वळ बालिशपणा वाटतो आहे. एकाने खोडी(?) काढली म्हणून दुसर्‍याने खोडी काढायची, अगदी तश्शीच, तेवढीच! काही ओरिजिनॅलिटीच नाही. कॉपीकॅट टाइप! Smile मूळातच टाइमचा अंक आला तेव्हा झालेला गहजबच दांभिकपणाचा वाटला. एखाद्या भारतियाची स्तुति म्हणून जर का टाइमने मुखपृष्ठावर त्याला / तिला स्थान दिले असते तर त्यावर कशा प्रतिक्रिया आल्या असत्या? आवडल्याच असत्या. ते चालते तर मग हे ही बरोबरच. तसेही टाइम मासिक वेळोवेळी जगभरच्या राजनैतिक नेत्यांवर काही ना काही लिहित असते, छापत असते... कित्येकांचे मुखपृष्ठही छापले जाते. मुख्यतः काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या लोकांनी जी बोंब मारली, एका अमेरिकन मासिकाने भारताच्या पंतप्रधानाचा अपमान केला इ.इ. ती केवळ हास्यास्पद वाटली.

आणि आता हे परत वर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे. शिवाय टाईम मासिकाला आवडावे म्हणून आपले धोरण सिंग यांनी ठरवू नये. भारतीय जनतेला (पक्षी-संसदेला) जे मान्य असेल तेच करणे त्यांना बंधनकारक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टाईम आणि आउटलूक एकाच (खालच्या) पातळीचे आहेत हे तरी सिद्ध झाले. टाईम काय किंवा आउटलूक काय 'बाजारू' व्यावसायिक. मला टाईम फारसे आवडत नाही. (निदान भारतात प्रकाशित होणारे तरी). त्यात माहितीपूर्ण लेखांपेक्षा लोकप्रिय शोबाजीला अधिक प्राधान्य मिळते.

बाकी बिकांशी सहमत. अगदीच बालिशपणा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुखपृष्ठाची कॉपी करणं हे एक (नुसतं) 'मार्केटिंग'च धोरण असावं. 'टाईम'आणि 'आऊटलुक' सारखी नियतकालिकं त्यांच्या मुखपृष्ठासाठी नाही तर त्यातल्या मजकुरासाठी वाचली जातात असं वाटत. त्यामुळे मुखपृष्ठाची कॉपी करणं हा प्रकार एक गंमत म्हणून सोडून देईन मी. आतल्या लेखांच्या दर्जात काय तफावत आहे, असल्यास कोणत्या प्रकारची .. हे मुद्दे महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रकाराकडे बघण्याचा 'जशास तसे' असा एक दृष्टीकोन असू शकतो, दुसरा 'आवडलं ते उचललं' असाही.

बीबीसीच्या बातमीवरून हा निव्वळ स्टंट वाटत नाही. ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले त्याच वर्षी त्यांना शांततेचं नोबल मिळालं. इराकमधली परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही, इराकमधे अजूनही अमेरिकन सैन्य आहे आणि इरानचा प्रश्न टांगता आहेच. ओसामा मारला गेला तरीही अल कायदा, दहशतवाद संपला, निदान खिळखिळा झाला असं म्हणण्यासारखी काहीही परिस्थिती नाही. अरब देशांमधे 'क्रांती' झाली, होते आहे, तिथे अजून अशांतता वाढली आहे. सिरीयात यादवी युद्ध (सिव्हील वॉर) सुरू असल्याचं याच आठवड्यात अधिकृतपणे जाहीर झालं. या सगळ्यात अमेरिकेचा सहभाग नाहीच असं म्हणता येणार नाही.

अमेरिकेच्या देशांतर्गत बाबींपैकी बेकारीच्या बाबतीत परिस्थिती अजूनही फार सुधारल्याचं दिसत नाही. जाने ०९ मधे ओबामा सत्तेवर आले तेव्हा बेकारीचा दर ७.८% होता, तो पुढच्या दोन वर्षांत वाढला, ९% वर गेला आणि आता थोडा उतरून गेल्या महिन्यात ८.२% झाला आहे. (संदर्भः http://ycharts.com/indicators/unemployment_rate)
ओबामांच्या काळातला US Consumer Price Index याचा आलेखही चढताच दिसतो. (http://ycharts.com/indicators/consumer_price_index)

मंदीचा तडाखा थोडा कमी 'दिसतो' हे मान्य. सक्तीच्या आरोग्यविम्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून ओबामांना दिलासा मिळालेला असला तरीही अनेक राज्यांमधे त्याचा विरोध जारी आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी दोन्ही लेख वाचलेले नाहीत. पण हा प्रकार 'गाय मारली म्हणून वासरू मारणे'सारखा वाटत नाही. टाईमचा भारतात आशियात किरकोळ खप आहे तर आऊटलूकचा भारताबाहेर खप नाही(?). त्यामुळे 'बदला घेणे' हा उद्देश सफल होऊ शकत नाही हे उघड आहे. टाईम मॅगझिनने निर्माण केलेल्या गोंधळाचा फायदा करून घेऊन भारतात खप वाढेलच पण कदाचित बातम्यांमुळे भारताबाहेरही मार्केट मिळण्याची शक्यता निर्माण होण्याची ही नामी संधी आउटलूकने साधलेली दिसते. अशी संधी साधताना निव्वळ चिखलफेक जर केलेली असेल तर मात्र 'वासरू मारणे' प्रकार असू शकेल. पण सद्य परिस्थितीत ओबामाबद्दल लिहलेली वक्तव्ये (बीबीसी वृत्तावरून) काही खोटी नाहीत. ओबामाबद्दल अशी वक्तव्ये करणारा आउटलूक काही पहिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द, रंग, फॉंट आणि फोटोनुरुप हेडलाइनचं स्थान बघितल्यावर काही ना काही कारणाने कॉपी मारली आहे हे उघड होतं. मग Outlook's editor told the BBC that they had been "planning an Obama cover for a long time" and that it was "not tit-for-tat" journalism. या भाष्यातला फोलपणा दिसून येतो.

मला थोडा वेगळा प्रश्न पडतो. बीबीसी, टाइम आणि आउटलूक ही कमी अधिक प्रमाणात यशस्वी, मान्यताप्राप्त अशी तीन वेगवेगळी प्रकाशनं आहेत. मग बीबीसीने, 'आउटलूकने टाइमची कॉपी मारली' अशी आउटलूकवर टीका करणारा लेख प्रसिद्ध होऊ द्यावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोडसाळपणाचा चष्मा लावून पाहिल्यास प्रत्येक गोष्टीतच खोडसाळपणा शोधता येईल. अमेरिकेच्या आर्थिक, परराष्ट्र धोरणांवर टीका केली म्हणूनही 'प्रतिशोध' घेण्याचा आरोप 'आऊटलुक'वर करता आलाच असता. अशा गोष्टींना किती महत्त्व द्यायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठी संकेतस्थळ असूनही कुणाला अशी शंका आलेली दिसत नाही की 'आउटलुक'चं मुखपृष्ठ हे एक विडंबन आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||