"श्री सूर्य-विजय" किंवा "आणि नंतर पुन्हा "

(शिशिरर्तुच्या पुनरागमें/एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे/न कळे उगाच रडावया.
: शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर
)

फ्रीवेच्या दोन्ही किनाऱ्यांना गच्च लगडलेला
लाल-पिवळा मृत्यू , कडेला पडलेली, कणाकणाने
अनंतात विलीन होणारी हरणे , खारी, ससे ..
अभाग्याच्या प्राक्तनासारखी
नकळत अंगावर येऊन आदळणारी
कच्च अंधारी संध्याकाळ,
यातून मुक्त करण्यासाठी सृष्टी अखेर घालेल
त्यावर पांढरे-स्वच्छ आच्छादन : जे तीन महिने टिकेल.
मग तेही अस्तंगत होत जाईल
त्यात उमटलेल्या पावलांसह..
ताकदवान बुलडोझर पुन्हा स्वच्छ करतील रस्ते
सूर्य पुन्हा जोमाने उगवू लागेल
सृष्टीला हिरवा पाला फुटेल,
जिवंत हरणे, ससे ,खारी त्यात
वेगाने धावू लागतील,
जसे काही घडलेच नाही !
मी सुद्धा बेसबॉल कॅप उलटी फिरवून
त्याच फ्रीवेवर गाडी हाणताना
हसत सुटेन!
आणि नंतर पुन:
दिवस परत लांबत जातील
- कदाचित तेव्हाही पुन:
तुला माझे शब्द आठवतील.
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यातून मुक्त करण्यासाठी सृष्टी अखेर घालेल
त्यावर पांढरे-स्वच्छ आच्छादन :

बहोत खूब. हिमाला, शवावरील वस्त्राची दिलेली उपमा फारच अनवट आहे. मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0