Civilisation

केनेथ क्लार्क (१९०३-१९८३) हा एक प्रसिद्ध ब्रिटिश लेखक, संग्रहालय संचालक, निवेदक आणि सुप्रसिद्ध कला-ईतिहासकार होता. ऒक्सफर्ड महाविद्यालयात ईतिहास विषय घेऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. १९३३ साली, वय अवघे ३० असताना तो नॆशनल गॆलरीचा संचालक म्हणून नेमला गेला. तिथे त्या पदी निवड झालेला तो सर्वात तरूण संचालक होता. १९४६ साली लिखाणाला वेळ देण्यासाठी त्याने हे पद सोडलं आणि १९४६-१९५० ह्या काळात तो ऒक्सफर्डमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होता. त्याला खूप मान-सन्मान मिळाले,पण त्याचं नाव झालं ते १९६९ साली बी.बी.सी.ने प्रसारीत केलेल्या सिव्हिलायझेशन ह्या मालिकेमुळे. १३ भागात सादर केलेली ही मालिका पश्चिम युरोपच्या कला-ईतिहासावर एक नजर आहे असं म्हणता येईल. मालिका लोकप्रिय झाल्यावर त्या मालिकेत केनेथ क्लार्क ह्याने जे निवेदन केलंय त्याचंही पुस्तक प्रकाशित झालं आणि ते सुद्धा गाजलं. त्याच पुस्तकाचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांना हि मालिका बघायची आहे त्यांनी Civilisation ह्या दुव्यावरून सुरूवात करावी. हा पहिला भाग आहे. बाजूलाच बाकी भागांचे दुवे सापडतील.

१९६९ च्या सुमारास बीबीसीला कलांवर एक चित्रपटमालिका हवी होती आणि त्याबाबत क्लार्क सल्ला देऊ शकेल असं त्यांना वाटलं. पण जेव्हां डेव्हीड ऎटनबरो क्लार्कशी चर्चा करत होते तेंव्हा त्यांनी "सिव्हिलायझेशन" हा शब्द वापरला आणि त्या शब्दाने उत्साहीत होऊन क्लार्कने हा आराखडा बनवला. अर्थातच दूरचित्रवाणी मालिका १३ भागांचीच होती, त्यामुळे चीन, भारत, पर्शिया, ईजिप्त इत्यादी अनेक संस्कॄत्या घ्यायचा मोह टाळावा लागला. त्या वगळल्या त्याचं अजून एक कारण म्हणजे त्या भाषा त्याला अवगत नव्हत्या. क्लार्कचं मत होतं की,"कुठल्याही संस्कॄतीची ओळख तिच्या भाषेतूनच योग्य प्रकारे होते. भाषेतले शब्द, वाक्प्रचार, म्हणी, बोलण्याची ढब, लोकांच्या प्रतिक्रीया त्या संस्कॄतीचं रूप उभं करतात".

पुस्तकाच्या प्रस्तावनेपासुनच केनेथ क्लार्कची एकूण माध्यमाची जाण दिसून येते.दूरचित्रवाणीसाठी लिहीणं कसं वेगळं आहे ह्याची मीमांसा करताना तो म्हणतो,"दूरचित्रवाणीसाठी लिहिणे हे मुळातच वेगळे आहे, फक्त शैली आणि सादरीकरणाबाबतच नव्हे तर विषयाकडे बघण्याचा दॄष्टीकोनसुद्धा वेगळा हवा. संध्याकाळी दूरचित्रवाणीसमोर बसणार्यांची मनोरंजनाची अपेक्षा असते. त्यांना कंटाळा आला तर ते दूरचित्रवाणीसंच बंद करतात. त्यांना जे दिसतं त्याने जितकं त्यांचं मनोरंजन होतं तितकच मनोरंजन ते जे ऐकतात त्यानेही होतं. त्यांचं लक्ष काळजीपूर्वक विणलेल्या दॄष्य-साखळीने वेधून घ्यावं लागतं आणि अनेकदा ही दॄष्य-साखळीच विचारांना दिशा देते." दूरचित्रवाणीवर सादर होणार्‍या अभ्यासू कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी मत व्यक्त करताना तो म्हणातो ,"आपण संध्याकाळी चहा पीत गप्प मारत बसतो तेंव्हा असंच बोलतो. आणि टी.व्ही.ने हे असं गप्पा-टप्पांच स्वरूप जपावं असं मला वाटतं". तो पुढे असंही म्हणतो ,"मला असं वाटतं की दॄष्य, संगीत, रंग, हालचाली ह्यांचा एकत्र परीणाम जो अनुभव देतो तो शब्दांना देणं शक्य नाही, आणि म्हणून मला टी.व्ही.माध्यम म्हणून विश्वासार्ह वाटलं आणि दोन वर्षांचं लिखाण बाजूला सारून ह्या माध्यमाच्या शक्यता पडताळून पहायला मी सरसावलो". पुस्तकाला दॄक-श्राव्य परिणाम देण शक्य नाही म्हणूनच
पुस्तकात मालिकेतील काही अप्रतिम गोष्टी निसटल्या आहेत. एखादी गोष्ट केवळ दॄष्य मालिकेने लोकांवर बिंबवता येऊ शकते पण पुस्तकात त्यासाठी अनेक पानं खर्ची घालावी लागतील.एव्ह्ढ स्गळं असूनसुद्धा हे पुस्तक लिहून प्रकाशीत होऊ देण्यामागची भूमिका मांडताना तो म्हणातो,"मला एक तर नकर देणं जड जातं, दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्यात गाही मतं अगदी ठामपणे मांडल्येत, मला स्वत:च मत आहे हा साक्षात्कार मला इथे झाला आणि मी तो मोह आवरू शकलो नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हण्जे ह्या कलेच्या ठेव्याने मागच्या ५० एक वर्षात मला जो निखळ आनंद दिलाय, त्याबाबतची माझी ही कॄतज्ञता आहे".

ह्या मालिकेच्यावेळी क्लार्कने कुठल्या दॄष्टीकोनातून विचार केला होता आणि कोणाला घ्यावं, कोणाला वगळावं हे कसं ठरवलं याबाबत एक मार्मिक भाष्य प्रकाश टाकते. "जर असा प्रश्न विचारला की मानवाचा आवाका वाढवून त्याला ४ पावलं पुढे नेईल असं स्पेनने काय केलं? तर फार काही हाती लागणार नाही. माझा मुख्य विचार प्रत्येक भागात युरोपिअन मानसिकतेतील एक महत्त्वाचा टप्पा दाखवणं हा होता त्यामुळे स्पेन बाहेरच राहिलं".

एकंदर युरोपिअन कलेच्या अनुषंगाने मानवी संस्कॄतीचा आणि एकंदर प्रगतीचा आढावा ह्या मालिकेतून क्लार्क घेतो. त्याचवेळी तो कलेतील झालेले फरक आणि त्यावरून तत्कालिन संस्कॄतीची मानसिकताही उकल करून सांगतो. ईतिहासातील घटना,आणि कलेच्या अनुषंगाने त्याचं विष्लेषणही तो करतो.

पुढे - पहिले प्रकरण - द स्किन ऒफ अवर टीथ

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

तुमच्या लेखाने पुस्तकावरची धूळ झटकायची प्रेरणा मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूणच रोचक प्रकरण दिसतंय.. आता मालिका बघतोच
एकेक भागावर जर तुमचे लेखन येणार असेल तर भाग आधीच बघुन घेतो म्हणजे मालिका बघतेवेळी तुमच्या व प्रतिसादकांच्या मताचे संस्कार झालेले नसतील.

परिचयाबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझी महत्वाकांक्षा प्रत्येक भागावर लिहायचीच आहे. बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....