कॉकटेल लाउंज : Almonda Amarita

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "Almonda Amarita

पार्श्वभूमी:

काल अस्मादिकांचा वाढदिवस होता त्यानिमीत्ताने एक जबरदस्त कॉकटेल टाकायचा विचार होता पण कार्यबाहुल्यामुळे (कसले भारदस्त वाटते ना?) जमले नाही. पण शुक्रवारचा मुहुर्त साधता तेयोय त्यामुळे काही 'गम' नाही.

हे कॉकटेल हे माझे इंप्रोवायझेशन आहे म्हणजे, पुर्णपणे माझी रेसिपी. बायकोने एकदा मुलांसाठी एक आइसक्रीम आणले होते बदामाचे. ते बघताना माझ्या डोळ्यासमोर अमारेतो ही बदामापासून बनलेली लिक्युअर आली, आणि ती माझ्या मिनीबार मध्ये दाखल होतीच. लगेच मग काहीतरी प्रयोग करायचे ठरले. तो यशस्वी झाला म्हणून तुमच्यासमोर सादर करतो आहे. ह्या कॉकटेलला नाव देण्यासाठी बर्‍याच मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली. पण कॉकटेल्सचे फोटों बघून हे नाव सुचवले ते आंजावर पैसा ह्या नावाने फेमस असलेल्या ज्योती कामत हिने. Smile सो, पैसातै धन्यवाद गं!

प्रकार व्हाइट रम आणि अमरेतो लिक्युअर बेस्ड, लेडीज स्पेशल
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
अमारेतो १० मिली
आल्मड क्रशड आइसक्रीम २ स्कूप
काजू (सजावटीसाठी)
ग्लास वाइन ग्लास

कृती:

ह्याची कृती एकदम सोप्पी आहे. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून मस्त ब्लेंड करून घ्या. (कोण खवचटपणे म्हणतयं काजू पण का? ते सजावटीसाठी आहेत.)
खालच्या फोटोप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की व्यवस्थित ब्लेंड झाला आहे हे समजावे.

आता हे मिश्रण वाइनग्लास मधे ओतून घ्या. ग्लासच्या कडेला काजू सजावटीसाठी लावा. हे फारच जिकरीचे आणि कष्टप्रद काम आहे.

आता त्यात स्ट्रॉ टाकून घ्या. आइसक्रीम मुळे हे कॉकटेल खुप थंड असणार आहे. त्यामुळे स्ट्रॉने पिणे हे सोयिस्कर असते, थेट पिण्यापेक्षा.

चला तर, Almonda Amarita तयार आहे Smile

डिस्क्लेमर: ह्या कॉकटेलसारखे कॉकटेल कोणी दुसर्‍या नावाने प्यायले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अहा! तुम्ही आता माहिती देता देता स्वतः कॉकटेले बनवायलाही लागलात तर! सह्ही!
बाकी तो कार्यबाहुला आहे ना त्याला हॅप्पीवाल्या बड्डेच्या दिवशी बाजुला ठेवायचं हो! Blum 3 असो.

(उशीराने का होईना) बड्डेच्या बड्ड्या बड्ड्या शुभेच्छा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शतायुषी हो (म्हंजे चालू वर्षं + १००) आणि ह्या कॄत्या टाकत जा...वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

मस्तच रे ब्रिजेशा.खरा शेफच व्हायचास बघ तू शिर्‍याच्या मित्रासारखा.
(सोकाजीचे कॉकटेल लेख नियमित वाचणारी पण कॉकटेल कधीही न पिणारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0