पुरोगाम्यांचा अस्सल विजय

पुरोगाम्यांचा अस्सल विजय हा कायदेशीर रित्या विषमता निर्माण करणे हा आहे.

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/indias-rising...
महत्त्वाचा भाग :
The study, released by rights group Oxfam ahead of the World Economic Forum (WEF) annual meeting here attended by rich and powerful from across the world, showed that just 57 billionaires in India now have same wealth ($ 216 billion) as that of the bottom 70 per cent population of the country.
===========
ही बातमी सनातन प्रभात मधली नाही.
============
https://www.oxfamindia.org/Demand-The-Finance-Minister-For-An-Inclusive-...
महत्त्वाचा भाग :
The Oxfam report An Economy for the 1%, shows that the wealth of the poorest half of the world’s population has fallen by a trillion dollars since 2010, a drop of 38 percent. This has occurred despite the global population increasing by around 400 million people during that period. Meanwhile, the wealth of the richest 62 has increased by more than half a trillion dollars to $1.76tr. The report also shows how women are disproportionately affected by inequality – of the current ‘62’, 53 are men and just nine are women.
=================
किती लोकांकडे किती पैसे ही आकडेवारी नेहमी प्रसिद्ध होत असते. प्रत्येक वर्शी अजूनच कमी लोकांकडे सम्पती सन्चय होत असताना दिसतो. आता नक्की काय म्हणावे? आधुनिक व्य्वस्थेचे समतेचे वचन हे बोलाचाच भात नि बोलाचीच कढी आहे म्हणावे कि काही लोकांची जैविक उत्क्रांती अधिक झाल्यामुळे त्यांना अधिक सम्पतीचा अधिकार प्राप्त झाला आहे?
=============
वैज्ञानिक प्रगतीने उपलब्ध स्रोतांची सन्ख्या कैक पट करून ठेवली आहे. हे फार छान आहे. पण या लाभांचे वितरण कसे झाले आहे? गरीब लोकाण्ची बुद्धी, लायकी, शारिरिक क्षमता, मानसिक सन्तुलन ,इ इ गोष्टी प्रत्येक वर्शी अकारण ढासळत आहेत का व्यवस्थेतच काही चूक आहे.
============
प्रगती झाली आहे कि नाही याची चर्चा करायला मिलणारे सारे लोक या श्रीमन्तान्चे, त्यान्च्या व्यवस्थान्ची कालजी घेणारे, पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, ..., दहाव्या लेवलचे "अनैतिक लाभार्थी" आहेत. त्यांना मिडल क्लास इ इ म्हणतात. तेच कायदा बनवतात आनि या लूटीला कायदेशीर रूप देतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अजो - ह्या स्टडी ला काही अर्थ नसतो.

जगभर असेच असते. इंग्लंड मधे पण २% लोकांकडे ९५+% जमिन आहे अश्या बातम्या येत असतात.

पण कम्युनिस्ट देशात तर ०.१% लोक ५०% मालमत्ता बाळगतात.

------------

असल्या बातम्या थोड्या थोड्या दिवसांनी तयार करणे आणि पसरवणे हा सर्व पुरोगामी समाजवादी हुच्च्भुभु चोरांचा कावा आहे. त्यांना २% लोकांकडे संप्पत्ती आहे ते बघवत नाहीये. त्यांना सर्व संप्पत्ती फक्त स्वताकडे हवी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण आज ९० ट्रिलियन डोलर जागतिक डोमेस्तिक प्रॉडक्ट मानू.
http://data.worldbank.org/indicator/NE.GDI.TOTL.ZS
इथे असे दिसते कि यात असे दिसते कि २५% सम्पत्ती सरासरी उत्पन्न होते. तसे असलेल्या संपत्तीचे सरासरी १०% वा जास्त डिप्रिसिएशन होते, पण आपण ते जवळजवळ शून्य मानू.
========
६२ लोकांकडे १.७ ट्रिलियन डोलर. १.७/(९०*२५%) = ७.५%. हे एका वर्षाचे. इथे श्रीमन्ताची सम्पत्ती नि अन्य लोकान्चे वार्शिक उत्पन्न असा घोळ केलेला आहे. ३% जागतिक उत्पन्न वाढीचा दर धरला. तितकाच महागाईचा दर धरला. ९० +९०*(१+३%)/(१+३%) असे दहादा करून ९०० ट्रिलियन उत्तर येते. म्हणजे वास्तवात ०.७५% टक्के जगाची "सम्पती" ६२ लोकांकडे आज आहे.
==============
६२ लोक म्हणजे ६२/७.५*१०^९ % मन्जे ०.००००००००००८२६७ % लोक नि ०.७५ % सम्पती.
===============
(असम्बन्धित आणि सम्बन्धित प्रतिसाद जाणायची क्षमता असलेल्या लोकांची कृपाड्रुष्टी झाली तर ) याला अर्थहिन म्हनता येत नाही. भयानक आहे हा प्रकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो,

असा कोणी प्रसिद्ध माणूस माहीत आहे का तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा विषय पुरोगामीमध्ये उगाचच ढकलला आहे. आर्थिक समता/विषमता आणि राज्यपद्धती यामध्ये चालेल.
पण विषय मुळात चावून चोथा झालेला आहे.इथे लिहिण्यापेक्षा कट्ट्याला पटकन सांगता/चर्चा करता येईल. तरीही संस्थळावर लेख आलाच आहे/आणलाच आहे तर यावर मत थोडक्यात देतो. - निरनिराळ्या राज्यपद्धती या गरीबांचे भल करण्याच्या उद्देशाने स्विकारून पाहिल्या जातात पण पाच हजार वर्षांत कोणतीही एक राज्यपद्धती गरीबांचे सतत भले करू शकली नाही. अथवा भले करून घेताघेता कधी श्रीमंत तर कधी गरीबही माजोरडे होतात आणि राज्यपद्धती नासते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा विषय पुरोगामीमध्ये उगाचच ढकलला आहे. आर्थिक समता/विषमता आणि राज्यपद्धती यामध्ये चालेल.

एकदम सहमत.

-------

निरनिराळ्या राज्यपद्धती या गरीबांचे भल करण्याच्या उद्देशाने स्विकारून पाहिल्या जातात पण पाच हजार वर्षांत कोणतीही एक राज्यपद्धती गरीबांचे सतत भले करू शकली नाही. अथवा भले करून घेताघेता कधी श्रीमंत तर कधी गरीबही माजोरडे होतात आणि राज्यपद्धती नासते.

राज्यपद्धती निवडताना नेमकी कोणती अपेक्षा आहे ?

 1. राज्यपद्धतीने गरिबांचे भले करावे अशी अपेक्षा आहे ?
 2. राज्यपद्धतीने श्रीमंतांचे भले करावे अशी अपेक्षा आहे ?
 3. राज्यपद्धतीने गरिब श्रीमंत हा भाव न करता प्रत्येकाचे भले करावे अशी अपेक्षा आहे ?
 4. राज्यपद्धतीने गरिब श्रीमंत हा भाव न करता ज्याला स्वतःचे भले करायचे आहे त्याला करू द्यावे अशी अपेक्षा आहे ?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अचरट आणि गब्बर,
अगदी हाच प्रतिसाद कॉपी पेस्ट करून राजेश घासकडवींच्या "पुरोगामीत्वाचा विजय" या धाग्यात लावायला कसे बरे विसरलात? म्हणजे तिथे दिल्याप्रमाणे (तथाकथित) प्रगतीचे श्रेय पुरोगामित्वाला, आणि दुर्गतीचे खापर प्रतिगामितेच्या माथ्यावर, इथे मात्र याच पुरोगामी प्रगतीतून आलेल्या विषमतेचा आणि पुरोगामित्वाचा सबन्ध नाही??? कमाल आहे.
===============
घासकडवींच्या लेखात आणि लेखमालांत आर्थिक समता/विषमता आणि राज्यपद्धती हे विषय पुरोगामीत्वाच्या अखत्यारित आलेत. कोण्याही माणसाने कोण्याही काळी काहीही चांगले केलेले पुरोगामी मानले गेले आहे. एकिकडे देवावरच्या विश्वासावर टिका आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर पुरोगामी असे देखिल लिहिले आहे. म्हणजे पुरोगामीत्वाच्या बाजूने काय लिहावे याला मर्यादाच नाही, मात्र काहीही वाईट झालेले लिहिले तर त्याचा पुरोगामित्वाशी संबंधच नाही?
====================
निरनिराळ्या राज्यपद्धती या गरीबांचे भल करण्याच्या उद्देशाने स्विकारून पाहिल्या जातात .>>>>> धर्मव्य्वस्थेतील मूळ प्रामाणिकपणाच पुरोगाम्यांना मान्य नाही. तुम्हाला ५००० वर्षापूर्वीच्या व्य्वस्थेचा तत्त्वतः उद्देश लोककल्याण असू शकतो हे मान्य आहे ही आनंदाची गोश्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी हाच प्रतिसाद कॉपी पेस्ट करून राजेश घासकडवींच्या "पुरोगामीत्वाचा विजय" या धाग्यात लावायला कसे बरे विसरलात? म्हणजे तिथे दिल्याप्रमाणे (तथाकथित) प्रगतीचे श्रेय पुरोगामित्वाला, आणि दुर्गतीचे खापर प्रतिगामितेच्या माथ्यावर, इथे मात्र याच पुरोगामी प्रगतीतून आलेल्या विषमतेचा आणि पुरोगामित्वाचा सबन्ध नाही??? कमाल आहे.

(१) राघांचा धागा हा पुरोगामीत्वाच्या व्यापक संकल्पनेबाबतचा आहे.
(२) अजो, तुमचा धागा हा मुख्यत्वे आर्थिक विषमतेबद्दलचा आहे. तुम्ही तो पुरोगामित्वाबद्दलचा केलेला आहे पण तो आर्थिक विषमतेबद्दलचाच आहे.
(३) माझा वरचा प्रतिसाद हा --- आर्थिक विषमता हा व्यवस्थेचा परिणाम आहे का ? व असल्यास कोणत्या व्यवस्थेचा ? व किती प्रमाणावर - या प्रश्नांबाबतचा आहे. व म्हणून तुमच्या या धाग्यावर दिलेला आहे. व तो सुद्धा तुमच्या मूळ टेक्स्ट मधल्या विशिष्ठ, स्पेसिफिक वाक्याला क्वोट करूनच दिलेला आहे.
(४) पुरोगामित्वाबद्दल मला जे काही म्हणायचे आहे ते मी या धाग्यावर मांडलेले होते. माझे त्या धाग्यावरचे सर्व प्रतिसाद वाचा असे सुचवतो. राघांचा धागा हा त्यानंतर आला.
(५) प्रगतीचे मूळ फक्त पुरोगामित्वामधे आहे असं मला बिल्कुल म्हणायचे नाही. दुर्गतीचे मूळ देखील काही प्रमाणावर पुरोगामित्वात आहे. उदा. मी मार्क्सवादाला पुरोगामी च मानतो. पुरोगामी म्हणतील की - "ते स्वातंत्र्य, समता, व बंधुत्व या मूल्यांना मानतात व त्याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य हे समतेपेक्षा महत्वाचे आहे (कारण ते सिक्वेन्स मधे प्रथम आहे म्हणून)" पण मला ते प्रामाणिक वाटत नाही. माझ्या मते स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचे आहेच पण असमानते प्रति सहिष्णुता सुद्धा असावी. Freedom equals freedom to be unequal. मार्क्सवादामुळे सोव्हियत युनियन ची (म्हंजे आजचा रशिया) दुर्गतीच झाली. चीनने स्वतःला लवकर सावरले पण त्यांचीही दुर्गती झालीच. क्युबाची सुद्धा व नॉर्थ कोरियाची आजही होते आहे. व त्याचे खापर मी परंपरावादावर बिल्कुल फोडायला तयार नाही. The philosophers have only interpreted the world, in various ways; the point is to change it. असं मार्क्स ने म्हंटले होते. मार्क्सवाद्यांनी विश्व बदलून टाकण्याच्या अट्टाहासापायी अनेक पिढ्या बरबाद करून टाकल्या व काही मारूनच टाकल्या. व मार्क्सचे "तत्त्वज्ञान" हे परंपरागत सिस्टिम ही चूक आहे व ती बदलायला हवी म्हणून समानतेला स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्व देणारी होती. आता -- कोणत्या प्रकारची समानता ? - हा प्रश्न उपस्थित करून मखलाशी करायचा यत्न केला जाईलच ... पण त्यात फार काही दम नाही (कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हा प्रश्न सुद्धा तसाच.). समानतेचा सोस हे सैतानाचे दुसरे रूप आहे या माझ्या मतावर मी ठाम आहे. पण मार्क्सवादाने झालेली दुर्गती ही परंपरावादाशी अजिबात संबंधित नाही. पुरोगामी लोक आजकाल मार्क्सवादाबद्दल बोलत नाहीत पण मागच्या दरवाज्याने समानता आणायचा सोस दांडगा असतो त्यांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासकडवींच्या लेखात आणि लेखमालांत आर्थिक समता/विषमता आणि राज्यपद्धती हे विषय पुरोगामीत्वाच्या अखत्यारित आलेत. कोण्याही माणसाने कोण्याही काळी काहीही चांगले केलेले पुरोगामी मानले गेले आहे. एकिकडे देवावरच्या विश्वासावर टिका आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर पुरोगामी असे देखिल लिहिले आहे. म्हणजे पुरोगामीत्वाच्या बाजूने काय लिहावे याला मर्यादाच नाही, मात्र काहीही वाईट झालेले लिहिले तर त्याचा पुरोगामित्वाशी संबंधच नाही?

अजो, याच्याशी काहीसा सहमत आहे.

खालील प्रतिसाद व त्यावरची उत्तरे पहा.

http://www.aisiakshare.com/node/5687#comment-144995

------

जाताजाता :

अजो हे अवश्य वाचा - ARE WE REALLY SO MODERN?

खाली बोल्ड व अधोरेखित मधे जे लिहिलेले आहे ते वाचा.

One of Gottlieb’s central insights is that, as he wrote in his previous volume, “The Dream of Reason,” which covered thought from the Greeks to the Renaissance, “the history of philosophy is more the history of a sharply inquisitive cast of mind than the history of a sharply defined discipline.” You might say that philosophy is what we call thought in its first, molten state, before it has had a chance to solidify into a scientific discipline, like psychology or cosmology. When scientists ask how people think or how the universe was created, they are addressing the same questions posed by philosophy hundreds or even thousands of years earlier. This is why, Gottlieb observes, people complain that philosophy never seems to be making progress: “Any corner of it that comes generally to be regarded as useful soon ceases to be called philosophy.”

Therefore, philosophy shouldn’t be considered a kind of centuries-long chess match, with thinkers taking turns in an abstract intellectual game. For instance, in treating the philosophy of the seventeenth and eighteenth centuries, it is conventional to cast it as a struggle between “rationalists” and “empiricists.” In this account, everyone from Descartes to Hume is engaged in one long battle over whether truth is to be found “in here,” through strictly logical reasoning on the model of mathematics, or “out there,” through observation of the world. This debate, in turn, was finally resolved by Immanuel Kant, in the late eighteenth century, when he figured out a way to show that both sides were correct, since all perception is necessarily filtered through the categories imposed by our minds.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्या काळी तर विषमतेला धार्मिक अधिष्ठान होते. अर्थात हे मंगळावरच्या उदगीरबद्दल नाही, पृथ्वीबद्दल बोलतोय. आमच्या पृथ्वीवर तरी असंच होतं. मंगळावर कदाचित नसेल तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पानीपतच्या लढाईची चार पाने वाचली म्हणजे आपण सोलर सिस्टिम चे तज्ञ होतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मंगळावरच्या उदगीरमध्ये राहिल्याने मात्र अख्ख्या सोलर सिस्टिमचेच नाही तर आकाशगंगेचे तज्ञ होता येत असेल. ते बाकी विसरलोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन आणि अरुणजोशी या दोघांनाही विनंती. कृपया, व्यक्तिगत पातळीवरून प्रतिसाद देणं टाळावं. आपसांत भांडायला खरडवह्या, व्यक्तिगत निरोप, खरडफळा अशी ऐसीवरच सोय आहे. याशिवाय इमेल, व्हॉट्सॅप, फेसबुक अशी इतरही व्यासपीठं आहेत. दोन व्यक्तींच्या खाजगी व्यवहारांतल्या डॉमिनन्सचं प्रदर्शन करण्यासाठी ऐसीचं व्यासपीठ वापरू नये.

तिकडे जवान युद्धभूमीवर मरत आहेत; किंवा एकीकडे ऐसीच्या विदागाराचा आकार फुगून ऐसी बंद पडतंय आणि तुमचं इथे काय सुरू आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपली अपेक्षा रास्त नि सुयोग्य आहे. मी त्याला बरेच जागी इग्नोर केले आहे, पण अशी लॉबी बनताना दिसली तर मी रिअ‍ॅक्ट करतो.
============
बॅट्या, आपण पर्स्नली चान्गले मित्र आहोत तर इथे का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी फक्त मुद्यांच्या आधारे 'हिरीरीने' (हा तुमचाच शब्द बायदवे) मते मांडतो. इथे मित्र-शत्रू इ. चा संबंध कुठे आला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे "आपसांत भांडायला" अशी वाक्यरचना अदितीने केली आहे म्हणून मी तसे (चांगले मित्र इ इ ) लिहिले. आपसांत भांडण असणारे लोक मित्र नसतात नं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वैज्ञानिक प्रगतीने उपलब्ध स्रोतांची सन्ख्या कैक पट करून ठेवली आहे. हे फार छान आहे. पण या लाभांचे वितरण कसे झाले आहे? गरीब लोकाण्ची बुद्धी, लायकी, शारिरिक क्षमता, मानसिक सन्तुलन ,इ इ गोष्टी प्रत्येक वर्शी अकारण ढासळत आहेत का व्यवस्थेतच काही चूक आहे.

तुम्ही एक परग्रहावरून आलेली व्यक्ती आहात असे गृहित धरा आणि तुम्ही पृथ्वी वरील विविध देशांतील व्यवस्थांचा आढावा घेत आहात (किंवा मूल्यमापन करीत आहात) असा विचार करा. विश्वात अनेक देश आहेत आणि त्यातल्या प्रत्येक देशात वेगवेगळी राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था मौजूद आहे. रशियात ऑलिगार्की+प्रजातंत्र आहे. अमेरिकेत कॉर्पोरेट कॅपिटलिझम आहे. चीन मधे साम्यवाद्+भांडवलवाद अशी एक विरोधाभासी व्यवस्था आहे. व्हेनेझुएला, उत्तर कोरिया या देशांमधे प्रखर समाजवाद आहे. सिंगापूर, हाँगकॉन्ग, स्विट्झरलँड, ऑस्ट्रेलिया इथे भांडवलवादी व्यवस्था आहे. अफगणिस्तान, सोमालिया, सुदान इथे अराजक आहे, भारत, ब्राझिल, बांग्लादेश इथे जवळपास संमिश्र (काहीसा भांडवलवाद व काही समाजवाद) व्यवस्था आहे. सौदी अरेबिया सारख्या काही देशांमधे राजेशाही आहे. फ्रान्स, ब्रिटन, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जपान अशा अनेक देशांमधे बळकट लोकशाही आहे. स्वीडन, फिनलंड, नॉर्वे सारख्या स्कँडिनेव्हियन/नॉर्डिक देशांमधे भांडवलवाद्+लोकशाही+दणकट कल्याणकारी राज्य व्यवस्था आहे. पाकिस्तानात quasi-अजोवादी व्यवस्था आहे.

वर उल्लेखलेल्या देशांपैकी प्रत्येक देशात ती ती व्यवस्था (वा व्यवस्थांचे मिश्रण) किती कालासाठी होती/आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यवस्थांची ही प्रचंड विविधता हे मानवाने केलेले प्रयोग आहेत असं म्हणता येईल का ? व प्रयोग असल्यास व दीर्घकालासाठी (उदा. ३०+ वर्षे) केलेले असल्यास त्यातून काय निष्पन्न झाले ?

( आता प्लीज लोकसंख्या व नैसर्गिक साधनसंपत्ती हे दोन घिसेपिटे, फालतू मुद्दे मधे आणू नका. तसेच - हे असे "प्रयोग" करणारे तुम्ही कोण ? प्रयोग करून पोट भरतं का ? वगैरे बेअक्कल सवाल करू नका. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यवस्थांची ही प्रचंड विविधता हे मानवाने केलेले प्रयोग आहेत असं म्हणता येईल का ? व प्रयोग असल्यास व दीर्घकालासाठी (उदा. ३०+ वर्षे) केलेले असल्यास त्यातून काय निष्पन्न झाले ?

मानवी प्रयोग? अर्थातच. "हे सारे आधुनिक प्रयोग" सर्व प्रतिगामी मूल्यांना तिलांजली देऊन आणि पुरोगामी मूल्ये आपलीशी करून झालेले आहेत. असे न होता प्रतिगामी मूल्ये कायम ठेऊन प्रयोग केले असते तर काही निष्पन्न झाले असते.
===========
प्रतिगामी मूल्ये वैज्ञानिक विचाराच्या विरोधात आहेत, भौतिक सुखाच्या आणि मानवी प्रगतीच्या विरोधात आहेत हा मूळ कांगावा खोटारडा आहे. उदा. पुरोगाम्यांनी इस्लामचे रोज पाय धूवून पाणी पिले पाहिजे. "शास्त्रीय (सत्यस्थापना) पद्धती" ही इस्लाम धर्माची जगाला देण आहे आणि ज्यावर आज विज्ञानच नव्हे तर (तथाकथित) वैज्ञानिक दृष्टिकोन देखिल निर्भर आहे. आजचे विज्ञान हे अनंत काळच्या धार्मिक, ईश्वरीय आणि तत्त्वज्ञानाच्या चिकित्सेची देण आहे.
धर्मांनी जसे विज्ञानाचे पोषण केले नि आजच्या अवस्थेला त्याला आणले तसे आज विज्ञानाचा वापर धर्माची अधि़कृत उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी झाला पाहिजे. तो आज रँडम होत आहे. म्हणून धर्माभिप्रेत समाज न उभा राहता एक विचित्र समाज बनत आहे. हा विचित्रपणा दुर्लक्षू म्हणावे तर ठिक पण यात जो अन्याय, जोखडे, विषमता, बण्धने, भेदाभेद, कष्ट आणि अपमान आहेत ते दुर्लक्षिता येणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"शास्त्रीय (सत्यस्थापना) पद्धती" ही इस्लाम धर्माची जगाला देण आहे

इस्लामिक धर्मशास्त्राप्रमाणे अमुक एका विधानाची सत्यता ठरवायच्या कैक कसोट्या पाहिल्या तर त्यांना कुठल्याच अंगाने शास्त्रीय म्हणवत नाही. तेव्हा नक्की काय म्हणायचे आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोलवा.

एका मुसलमान शास्त्रज्ञाने काही तत्त्वे सांगितली जी आजच्या शास्त्रीय विचारपद्धतीचा आधार आहेत.

याचा अर्थ त्या तत्त्वांचा इस्लामशी काही संबंध आहे असा लावणे म्हणजे हद्द झाली, हे असलं तर झकिर नाईक करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजचे विज्ञान हे अनंत काळच्या धार्मिक, ईश्वरीय आणि तत्त्वज्ञानाच्या चिकित्सेची देण आहे.: वाचून हसू आवरेना . विश्व अनंत आहे या म्हणण्यासाठी चर्चकडून जिवंत जाळल्या गेलेल्या जिऑर्डानो ब्रूनो किंवा चर्चची टॉर्चरची धमकी ऐकून आपले सूर्यकेंद्रित ग्रहमालीकेचे निरीक्षण बदलणारा गॅलिलिओ यांना विचारून बघणे. ख्रिश्चनिटी मुळे विज्ञानाची प्रगती किमान एक हजार वर्षे रोखली गेली . काही थोर विद्वान होऊन गेले असले तरी इस्लामची विज्ञान -तंत्रज्ञानांतली बाकी प्रगती शून्य आहे. हिंदू धर्मानेच विज्ञानाला उघड विरोध केलेला दिसत नाही. पण महास्फोटवाद , उत्क्रांती इत्यादी विषयांवर हिंदू धर्म-मार्तंडाचे भाष्य ऐकणे मनोरंजक ठरावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मान्य आहे.
============
समजा तसे जरी आहे तरी "भारतात परिस्थिती या पेक्षा वाईट होती..." हे सोयीस्करपणे सांगीतलेले चालते. https://en.wikipedia.org/wiki/Death_by_burning
भारतात विज्ञानाला फार विरोध नव्हता तरी इथे का प्रगती कमी झाली म्हणे? खापर इथल्या धर्माच्या माथ्यावर कसे?
========
गॅलिलिओ कधी मेला? आणि हेलिओसेंट्रिक मॉडेल कोनत्या वर्षी सिद्ध झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतात विज्ञान प्रगती झाली नाही याचे खापर हिंदू धर्मावर फारसे फोडता येत नाही हे खरेच. दोनतीन गोष्टी मांडता येतात:
१. भौतिक विज्ञान हे केवळ बौद्धिक पातळीवर पुढे नेता येत नाही, त्यात प्रत्यक्ष प्रयोग करावे लागतात. आपल्या चातुर्वर्ण्याने बौद्धिक काम ब्राह्मण आणि हाताने काम करायला शूद्र अशी विभागणी केल्यामुळे हे होणे कठीण बनले. बौद्धिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेले काम भारतीय ज्योतिर्विशारदांनी उदा. आर्यभट्ट , केलेलं आहेच.
२. भौतिक विज्ञानाच्या प्रगतीमागची एक महत्वाची प्रेरणा लष्करी-साम्राज्यवादी होती. ही प्रेरणा तशी भारतात कमीच.
३. विज्ञानाला संपत्ती-पुरवठा करू शकणारा राजे-राजवाड्यांचा वर्ग याबाबत उदासीन, आणि मुख्यतः चैनी-विलासी, बऱ्यापैकी मठ्ठ होता.
४. विज्ञानात क्रांती करायला विद्रोही मनोवृत्तीचे लोक लागतात. समाज-धारणा, सामाजिक उतरंडीचे रक्षण हा मुख्य "कार्यक्रम" असणाऱ्या देशात हे घडायची शक्यता कमी.
५. आजचे सांगायचे झाले तर विज्ञानाची प्रगती ही "कटिंग एज" वर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये चालणाऱ्या सततच्या चर्चांमधून होते. अशा शास्त्रज्ञांच्या गटांना 'स्कूल " म्हटले जाते. प्रत्येक विषयात अशी स्कूल्स तयार होण्याइतके पुढारलेले अनेक शास्त्रद्न्य आज भारतात नाहीत. पण माहिती-क्रांतीमुळे याचे महत्व आता कमी व्हावे. पण पैसा कमी आहे हे खरेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

माझ्या प्रतिसादास श्री गब्बर आणि श्री अरुणजोशी यांनी जो अंशत: आक्षेप घेतलाय तो मान्य आहे. माझी बाजू मांडायची तर मला एक मोठी लाल दुरेगी वहीभरून टंकावे लागेल तरी शक्यतो उद्या थोडक्यात लिहितो॥

बाकी श्री राघा यांच्या धाग्यावर असा प्रतिसाद का दिला नाही?---
- त्या धाग्याचा रोख /सुर थोडा वेगळा वाटला॥

एक प्रश्न: आताच्या परिस्थितीत मोठा प्रतिसाद इमेल मधून ( व्यनि) केल्याने ऐसिच्या डेटाबेसवर कमी दाब पडेल का? ऐसी फक्त मजकूर तिकडे पाठवणार ( योग्य इमेलला फॅारवड)?मलाही तसच वाटतय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

There is difference between aggregates and distribution. While (your chosen) aggregates have improved, the distribution is very bad.
================
May God bless those who show world poverty in 2015 at 1/4th of the levels in 1990.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक चित्र हजार शब्द.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आलेखात नमूद केलेले एक लेखक जोहान नॉर्बर्ग हे In Defense of Global Capitalism या पुस्तकाचे लेखक आहेत.

--

त्या ऑक्सफॅम च्या लोकांना अंगणात उलटं टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे साल्यांना. मार्क झुकरबर्ग च्या संपतीवर पण यांचा डोळा. वास्तविक फेसबुक हे कोणत्याही भेदभावविहीनतेचे महान द्योतक आहे. ज्या भेदभावाच्या विरोधात पुरोगमी लोक सारखा शंख असतात तोच. गरीब वा श्रीमंत असा कोणताही भाव न करता प्रत्येकास व्यक्त होण्यासाठी उभे असलेले हुकुमी माध्यम म्हंजे फेसबुक. फेसबुकवर जाण्याची कोणासही जबरदस्ती नसते व जाणार्‍या कोणासही कोणत्याही भेदभावास तोंड द्यावे लागत नाही. सेवा॑ पण नि:शुल्क असतात. पण अशा शोषणविहीन व भेदभावविहीन प्लॅटफॉर्म चा जनक सुद्धा या चक्रम लोकांच्या असूयेचा बळी ठरत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्विटरवर देखील लय खार खाऊन असतात लोक. ट्विटर बंद करा वगौरे आरोळ्या येत असतात. वरवरचे कारण शिवराळ भाषा हे असते पण त्यामागचे खरे कारण माध्यमांचे लोकशाहीकरण, आणि पर्यायाने राखीव कुरणात इतरांचा प्रवेश हीच चिडचिड असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बेघरांना घरे द्या म्हणे. सॅन फ्रान्सिस्को शहर मुन्शिपाल्टी ने ट्विटर ला काही सवलती दिलेल्या आहेत. त्या सवलती देण्यापेक्षा सॅन फ्रान्सिस्को शहरातील बेघरांची व्यवस्था करा म्हणे. बेघरांचे अस्तित्व हा सॅन फ्रान्सिस्को शहरासाठी "मोरल क्रायसिस" आहे म्हणे. "मोरल क्रायसिस" म्हंजे काय ते त्यांचं त्यांनाच माहीती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Not a word on aggregates and distribution? बर्‍याच लोकांना आपल्या चित्रातन महान साक्षात्कार झालेले दिसतात म्हणून ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इथे गब्बर, अनुप, अचरट, इ नी राजेशचा लेख आणि हा लेख कसे वेगळे आहेत ते सांगीतले आहे. म्हणजे माझा लेख हा केवळ आर्थिक विषमता या विषयाबद्दल सिमित असून राजेशचा लेख 'समग्र सामाजिक मानके' बद्दलचा आहे असे म्हटले. हे लगेच पटते देखिल.
======================
मी बर्‍याचदा अगदी हेच्च "वेगळेपण" मांडायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी म्हणतो 'अरे त्या अमेरिकन लोकांचा फक्त कॅपिटा जी डी पी आपल्यापेक्षा सरस आहे. बाकी आपणच एक श्रेष्ठ समाज आहोत.' आणि तिथे देखिल ऐसीकरांकडून सपेशल मार खातो. "अजो, अमेरिका इज नॉट अबाउट इन्कम रियली स्पिकिंग. तिथला जो समाज आहे, व्यवस्था आहेत त्या फार छान आहेत." जगात जे सारे छान समाज आहेत आणि पर कॅपिटा इन्कम यांचे कोरिलेशन पाहता का जरा?
===================
तुम्ही जी मानवी प्रगतीची मानके म्हणून देता ती सधन राष्ट्रांत खूप उत्तम आहेत. आणि राष्ट्र सधन असो वा निर्धन ही मानके श्रीमंत लोकान्तच छान आहेत. अनुप, शिक्षण, दारिद्रय, मोर्टॅलिटी, इ इ श्रीमंत लोकांचेच बरे असते.सबब मी या सगळ्या गोष्टींचा मूलाधार, डिनॉमिनेशन - म्हणजे पैसा नक्की कसा विखुरला आहे ते सांगत आहे. अनुषंगाने इतर सर्व सौख्य त्याच हिशेबाने समाजाच्या विविध वर्गांत विभागले गेले आहे. त्याच्यासाठी मला राजेशचा लेख पुन्हा छापण्याची गरज नाही.
उदा. शिक्षण - जितका जास्त पैसा तितके जास्त शिक्षण, तितके महागडे शिक्षण, तितके भारी ब्रँडच्या कॉलेजातून. शिवाय जितका पैसा जास्त तितके कमी बुद्धी असली तरी अ‍ॅड्मिशन्स. जितके जास्त पैसा तितके प्रतिष्ठित शिक्षण आणि मग तितक्याच मस्त विकासाच्या आणि पुढे अजून पैसे कमवण्याच्या संधी. मग हे दुष्टचक्र पिढी प्रमाणे पुढे सरकणार.
आता मागच्या आणि आजच्या काळात फरक आहे कि हे दुष्टचक्र किती स्क्यू होऊ शकते? त्याचा रेशो मी अनु राव याना काढून दाखवला आहे. शिवाय तो अर्धवटच आहे. तळागाळातल्या लोकांकडे (बॉटम १०%) किती संपती आहे हे महत्त्वाचे नाही का? तो किती भयानक असेल? शेवटचा एक टक्का? आणि लक्षात घ्या अतिरेकी स्क्यूनेस आता आहे म्हणून आता काळजी करायची. मागे असे नव्हते कारण व्यवस्था, अविकसित विज्ञान असे करूच देत नव्हते. ती माणसे नाहीत का?
=====
हेच आरोग्याचे.
=====
हेच्च माणसाला जे जे काय आवश्यक आहे त्याचे. सबब या दोन लेखांत फरक नाही, पोझिशन सोडून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवउदारमतवाद हे चुकीचे भाषांतर आहे, आणि त्याचा रोख उगाचच लिबरल्सकडे जात आहे. खरे भाषांतर जागतिक भांडवलशाही असे असायला हवे. भांडवलाशिवाय विकास शक्य नाही , त्यामुळे कोणत्याही प्रकारे भांडवल आपल्याकडे ओढून घ्या या विचाराला सर्वच आले आहेत, किंबहुना कम्युनिस्ट तर फारच पूर्वी (चीन- देन्ग १९७८?). जपान-चीन यान्च्या अमेरिकेला निर्यातीमुळे पॅसिफिक समुद्रावरील वाढलेला प्रचंड व्यापार न दिसण्याइतके भारतीय राज्यकर्ते मूर्ख कधीच नव्हते. पण भारताला एतद्देशीय मक्तेदारी उद्योग परकीय स्पर्धेपासून जपायचे असल्यामुळे भारताने उशीर केला इतकेच. आजही एकीकडे "हिंदू सन्मानाची" भाषा व दुसरीकडे अमेरिकेच्या दारात लोटांगण अशी मोदींची नीती आहे . असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आजही एकीकडे "हिंदू सन्मानाची" भाषा व दुसरीकडे अमेरिकेच्या दारात लोटांगण अशी मोदींची नीती आहे .

हे वाक्य म्हंजे हास्यास्पदतेचा उच्च नमूना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे (नेहमीप्रमाणेच) आधारहीन विधान ! कृपया या तीव्र भावनांमागचा कार्य-कारण-भाव सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तुमचे (नेहमीप्रमाणेच) आधारहीन विधान ! कृपया या तीव्र भावनांमागचा कार्य-कारण-भाव सांगाल का?

(१) पहिली गोष्ट तुमचे मोदी+अमेरिकेचे विधान हे चांगल्यापैकी आऊट ऑफ प्लेस होते. पुरेसा संबंध नसताना उगीचच मोदींना मधे आणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायचा क्षीण यत्न होता तो. की "बघा मी कसा मोदींना धोपटतो !! म्हंजे मी प्रतिगाम्यांचा विरोधक आहे की नाही ??" टाईप्स.

(२) मोदींनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या व जी जी काही डील्स केली त्यांचा तपशील पाहिलात तर तुम्हाला समजेल की मोदी हे अमेरिकेच्या दारात लोटांगण घालत नसून - जिथून जे मिळवता येईल ते मिळवण्याचा यत्न करत आहेत. उदा फ्रान्स कडून राफेल, रशिया कडून एस-४००, जपान कडून अणु ऊर्जाविषयक करार, High-speed rail, US-2 amphibious aircraft. (हॅ ? त्यात काय ? जपान्/फ्रान्स ही अमेरिकेची मित्र राष्ट्रेच आहेत, गब्बर)

(३) येत्या २६ जाने ला Crown Prince Mohammed bin Zayed Al Nahyan हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. (हिंदुत्ववाद्यांनामोदींना मुस्लिमांचा द्वेष करण्यावाचून दुसरा उद्योगच नसतो असं मानणार्‍यांसाठी.). बाय द वे मोदी हे (राजेशाही प्रति सुद्धा) सहिष्णु आहेत याचे हे उदाहरण नसणारच तुमच्या मते कारण तुमच्या मते मोदी जे काही करतात ते द्वेषमूलकच असते.

(४) प्रधानमंत्री झाल्यापासून मोदी २ वे़ळा रशिया व २ वेळा चीन ला जाऊन आलेले आहेत. २ वेळा अफगाणिस्तान ला सुद्धा गेले होते. अमेरिकेत ४ वेळा गेलेले असले तरी त्यातल्या दोन वेळा संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक शिखर संम्मेलनासाठी गेले होते. तुमच्या मते चीन व रशिया हे अमेरिकेची पिट्टू राष्ट्रे असल्यास आमचा दंडवत घ्यावा. या वर्षी इस्रायल ला सुद्धा चाललेले आहेत. आता तुम्ही म्हणालच की इस्रायल हे अमेरिकेचे पिट्टु आहे. किंवा "गब्बर, नुसत्या भेटी देऊन काय होतंय ?".

(५) https://en.wikipedia.org/wiki/New_Development_Bank

(६) अमेरिकेशी केलेले करार CISMOA, LSA and BECA et al यातले काही करार (उदा. CISMOA) मागेच चर्चिले गेलेले होते. म्हंजे मोदी पंप्र व्हायच्या आधी.

(७) अमेरिकेकडून शस्त्रे विकत घेण्याच्या कामात काँग्रेस सुद्धा आघाडीवर होती आहे. P-8 Poseidon, Globemaster. हॉवित्झर तोफा ह्या चीन पासून सावधानी म्हणून घेतलेल्या आहेत.

(८) इराण मधे छाबार बंदरात सुमारे ५०० मिलियन ची गुंतवणूक करण्याचा निर्णय मोदींच्या कारकीर्दीत घेतला गेला. ( मोदी हे मुस्लिम "द्वेष्टे" आहेत त्याचे आणखी उदाहरण). इराण हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहे की काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी मोदींचा विरोधक आहे हे मी अभिमानाने सांगतो हे खरेच आहे. गरिबांच्या कत्तली घडवून राज्यावर आलेल्या मनुष्याबद्दल काय बोलणार? पण मोदींच्या अमेरिका-धोरणाबाबत साधा प्रश्न विचारतो; त्यांची ही धोरणे संघाला तरी पसंत आहेत का? संरक्षण-दृष्ट्या , सांस्कृतिक-दृष्ट्या ? रशिया आणि चीन ला जाऊन आले याचा अमेरिका (आणि एकूणच परदेशी भांडवल) याबाबतच्या धोरणांशी काय संबंध? प्रश्न घरचे कायदेकानू परकीय भांडवलाला फायद्याचे होतील अशा प्रकारे बदलण्याचा आहे ((land acquisition, repatriation of profits, hire-and -fire labor laws) . हा मोदींचा प्रयत्न नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

गरिबांच्या कत्तली घडवून राज्यावर आलेल्या मनुष्याबद्दल काय बोलणार?

हॅहॅहॅ.

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असे मत व्यक्त केले नव्हते ओ.

गंमत ही आहे की "काय बोलणार?" असं म्हणून पुढे एक अख्खा प्यारा लिहिता तुम्ही.

--

पण मोदींच्या अमेरिका-धोरणाबाबत साधा प्रश्न विचारतो; त्यांची ही धोरणे संघाला तरी पसंत आहेत का? संरक्षण-दृष्ट्या , सांस्कृतिक-दृष्ट्या ?

पुन्हा एकदा हास्यास्पद प्रश्न विचारताय.

"विचार कसा करावा" याचे एक ट्रेनिंग घ्या असे सुचवतो.

मोदी हे रा स्व संघाला उत्तरदायी आहेत ? कशावरून ? २०१४ चे यश मुख्यत्वे मोदींचे होते. व्यक्तीगत ब्रँड इमेज + मार्केटिंग. संघकार्यकर्त्यांनी मदत केली असेलही पण ती तर मोदींच्या जागी दुसरा कोणी असता तर सुद्धा केली असती. खरंतर मोदींची बार्गेनिंग पॉवर जास्त होती २०१४ च्या इलेक्शनात. इलेक्शन झाल्या झाल्या (म्हणे) संघाच्या शाखांची संख्या सहा महिन्यात काही हजारांनी वाढली म्हणे.

तेव्हा संघ हा मोदींना जाब विचारण्याच्या पॉवर मधे नाही. निदान आज तरी.

तेव्हा संघाला मान्य असो वा नसो ही धोरणे संघाला स्वीकारावी लागतील.

--

रशिया आणि चीन ला जाऊन आले याचा अमेरिका (आणि एकूणच परदेशी भांडवल) याबाबतच्या धोरणांशी काय संबंध?

वाटलंच मला.

मोदी रशियात पुतिन बरोबर गोट्या खेळायला गेले होते ओ.

S-400, four guided missile stealth frigates for the Navy and 200 Kamov-226T light utility helicopters for Army and the Air Force वगैरे चं काय घेऊन बसलात.

--

प्रश्न घरचे कायदेकानू परकीय भांडवलाला फायद्याचे होतील अशा प्रकारे बदलण्याचा आहे ((land acquisition, repatriation of profits, hire-and -fire labor laws) . हा मोदींचा प्रयत्न नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?

हे कायदे फक्त परदेशी भांडवलवाद्यांनाच वापरता येतील आणि एतद्देशीय भांडवलवाद्यांना वापरता येणार नाहीत असे काही आहे का ?

आणि परकीय म्हंजे फक्त अमेरिकेचेच की काय ? दुसर्‍या देशांतील भांडवलदार लोकांना ह्या तरतूदी वापरण्यापासून मज्जाव आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार करण्याचे शिक्षण घेण्याबाबत : मोदी संघावर अवलंबून आहेत किंवा संघाने त्यांना जाब विचारावा असे मी कुठेही लिहिलेले सापडत असल्यास दाखवा. हे अर्थातच तुमच्या मनाचे खेळ आहेत. मी संघाचे याबाबतचे मत काय आहे याबाबत विचारत होतो.

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असे मत व्यक्त केले नव्हते ओ.
सर्वोच्च न्यायालय हे त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्याच्या चौकटीतच निर्णय देऊ शकते. हा पुरावा पोलीस सहज साबोटाज करू शकतात (म्हणजे करतातच!). त्यामुळे ही असली "क्लीन चिट ' फारच कमी दर्जाची मानावी लागते.

S-400, four guided missile stealth frigates for the Navy and 200 Kamov-226T light utility helicopters for Army and the Air Force
ज्या देशात ८० टक्के जनता, माणशी दिवसाला दोन डॉलर्सच्या आत राहते, त्या देशात शिक्षण, आरोग्य, अन्न, पाणी या प्राथमिकता सोडून ( आणी खोटा युद्धज्वर माजवून!) असल्या खेळण्यांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करणे हेच आधी क्रिमिनल मानावे लागेल. त्यातून यातला बराच पैसा कुणाकुणाच्या खिशात जातो हे अज्ञातच आहे. पण डिफेन्स प्रोक्युअरमेन्ट हे एक अत्यंत भ्रष्ट डिपार्टमेंट आहे हे सर्व देश जाणतो.
हे कायदे फक्त परदेशी भांडवलवाद्यांनाच वापरता येतील आणि एतद्देशीय भांडवलवाद्यांना वापरता येणार नाहीत असे काही आहे का ?
असे अजिबातच नाही, पण जोपर्यंत जागतिकीकरण नव्हते तोपर्यंत "hire and fire" टाईपचे कायदे विधेयक मांडायची सुद्धा कोणाची हिम्मत नव्हती. (आज अजूनही हे घडलेले नाहीच, आणि भूसंपादनात सणसणीत आपटी खाल्ल्यावर मोदी ताक फुंकून पीत आहेत हे उघड आहे.) पण हा अजेन्डा आहे हे सर्वज्ञात आहे.
आणि परकीय म्हंजे फक्त अमेरिकेचेच की काय ? दुसर्‍या देशांतील भांडवलदार लोकांना ह्या तरतूदी वापरण्यापासून मज्जाव आहे का ? "आणि एकूणच परदेशी भांडवल" हे माझे वर म्हणून झालेच होते. उत्तर देण्याआधी पोस्ट नीट वाचल्यास सर्वांनाच सोयीचे जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

विचार करण्याचे शिक्षण घेण्याबाबत : मोदी संघावर अवलंबून आहेत किंवा संघाने त्यांना जाब विचारावा असे मी कुठेही लिहिलेले सापडत असल्यास दाखवा. हे अर्थातच तुमच्या मनाचे खेळ आहेत. मी संघाचे याबाबतचे मत काय आहे याबाबत विचारत होतो.

हॅहॅहॅ

ही धोरणं संघाला मान्य आहेत का ? - हे का विचारले होतेत तुम्ही ?

संघाला मान्य असण्यानसण्याचा फरक पडतो/पडावा ?

मी तुम्हाला हे दाखवून दिले की संघाला मान्य आहेत्/नाहीत हा मुद्दा ड्रायव्हिंग नाहीच.

पुढे - संघाला मान्य असती तर ती योग्य / अयोग्य ठरली असती तुमच्या मते ????

---

सर्वोच्च न्यायालय हे त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्याच्या चौकटीतच निर्णय देऊ शकते. हा पुरावा पोलीस सहज साबोटाज करू शकतात (म्हणजे करतातच!). त्यामुळे ही असली "क्लीन चिट ' फारच कमी दर्जाची मानावी लागते.

हे तर फारच हॅहॅहॅ.

अहो मग मला हे सांगा की कोणाचे म्हणणे प्रमाण मानावे ? व त्या व्यक्तीचे/संस्थेचे का प्रमाण मानावे ?
त्या व्यक्तीकडे/संस्थेकडे असं काय आहे की ज्याच्या आधारावर तिचे म्हणणे प्रमाण मानावे ?

---

ज्या देशात ८० टक्के जनता, माणशी दिवसाला दोन डॉलर्सच्या आत राहते, त्या देशात शिक्षण, आरोग्य, अन्न, पाणी या प्राथमिकता सोडून ( आणी खोटा युद्धज्वर माजवून!) असल्या खेळण्यांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करणे हेच आधी क्रिमिनल मानावे लागेल. त्यातून यातला बराच पैसा कुणाकुणाच्या खिशात जातो हे अज्ञातच आहे. पण डिफेन्स प्रोक्युअरमेन्ट हे एक अत्यंत भ्रष्ट डिपार्टमेंट आहे हे सर्व देश जाणतो.

हे तर अगदीच केविलवाणे आर्ग्युमेंट आहे.

या देशात ८० टक्के जनता, माणशी दिवसाला दोन डॉलर्सच्या आत राहते - हा मोदींचा दोष कसा ? पूर्वीच्या सरकारने जी काही घाण करून ठेवली आहे त्याबद्दल पण मोदीच जबाबदार ?

---

पण जोपर्यंत जागतिकीकरण नव्हते तोपर्यंत "hire and fire" टाईपचे कायदे विधेयक मांडायची सुद्धा कोणाची हिम्मत नव्हती. (आज अजूनही हे घडलेले नाहीच, आणि भूसंपादनात सणसणीत आपटी खाल्ल्यावर मोदी ताक फुंकून पीत आहेत हे उघड आहे.) पण हा अजेन्डा आहे हे सर्वज्ञात आहे.

माझा प्रश्न समजलाय तरी का तुम्हाला ?

माझा प्रश्न हा आहे की सगळं अमेरिकेच्या दारी लोटांगण घालण्यासारखं चालू आहे -- हे कसंकाय ? जी धोरणं अमेरिकन भांडवलवादी वापरू शकतात ती भारतीय लोक पण वापरू शकतात. त्यामुळे ही अमेरिकाधार्जीणी, लोटांगणवादी धोरणं नाहीत. तुम्ही उगीचच सापसाप म्हणून भुई धोपटताय.

---

इन जनरल सांगतो - तुमच्याकडे मोदीविरोधी काहीही युक्तीवाद नाही. नुसत्या आदर्शवादी दुगाण्या आहेत व त्या ममोसिं, सोगा, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल या सगळ्यांना लागू पडतात.

तुम्ही आदर्शवादी युक्तीवाद करताय हे मान्य करतो पण तुम्ही अत्यंत सुमार दर्जाचे व भोंगळ युक्तीवाद करताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक शंका.

मोदीना सुप्रीम कोर्टाने नक्की कधी व कशी क्लीन चिट दिली, ते समजेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मोदीना सुप्रीम कोर्टाने नक्की कधी व कशी क्लीन चिट दिली, ते समजेल का?.

तुमचा सापळा लावण्याचा यत्न प्रशंसनीय आहे.

माझे वाक्य पुन्हा मांडतो = सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असे मत व्यक्त केले नव्हते ओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युक्तिवाद व शब्दच्छल उत्तम आहे पण इथे तुम्ही लिहिलेले पूर्ण लिहितो त्याचा context बघा

" गरिबांच्या कत्तली घडवून राज्यावर आलेल्या मनुष्याबद्दल काय बोलणार?

हॅहॅहॅ.

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असे मत व्यक्त केले नव्हते ओ. "

सर्वोच्च न्यायालय असली काही आणि अश्या कशावर अशा भाषेत मतं देतं ?
मिलिंद रावांच्या वाक्यावर/ मतावर सर्वोच्च न्यायालय कशाला मत देईल ?

सर्वोच्च न्यायालयाने परवाच्या कोहली च्या सेन्चुरी बद्दल हि मत व्यक्त केलं नव्हतं ... म्हणजे ती सेंच्युरी झालीच नसणार .... या स्वरूपाचं लॉजिक आहे हे ...

अवांतर : " हॅहॅहॅ " या टर्मिनॉलॉजी च्या विरोधात मात्र मी न्यायालयात जाणारे ..

गब्बर सिंग : हळू घ्या .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंतर अमेरिकेशी थेट व सखोल "स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप" करणे हे भारताच्या कितपत हिताचे आहे ह्याबद्दल मोदी साशंक आहेत व असे वाटणे योग्यच आहे.

--

आतातर जपान ची ही छाबार बंदर विकासात मदत होणार असं दिसतंय. Japan and India are finally moving to fructify their partnership for development of the Chabahar port in Iran with Tokyo committing investment to help improve Afghanistan's access to the port.

---

पुढे - या दोन बातम्या पहा -

(१) China sticks to its stand on Azhar, NSG issues

(२) US, Indian navies sharing information on Chinese subs, says Pacific Command chief

या दोन बातम्या वाचून "thirteen days" मधला हा प्रसंग आठवला. मॅक्नामारा यांचे शेवटचे वाक्य सर्वात महत्त्वाचे.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गरिबांच्या कत्तली घडवून राज्यावर आलेल्या मनुष्याबद्दल काय बोलणार?

केंव्हा, कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तुम्ही दिलेल्या लिन्केत मला पुढील मजकूर दिसला:

In 2012, Modi was cleared of complicity in the violence by a Special Investigation Team (SIT) appointed by the Supreme Court of India. The SIT also rejected claims that the state government had not done enough to prevent the riots.[12] The Muslim community was reported to have reacted with anger and disbelief, although Teesta Setalvad of the Citizen for Peace and Justice stated that the legal process was not yet complete as there existed a right to appeal.[13] In July 2013 allegations were made that the SIT had suppressed evidence.[14] That December, an Indian court upheld the earlier SIT report and rejected a petition seeking Modi's prosecution.[15] In April 2014, the Supreme Court expressed satisfaction over the SIT's investigations in nine cases related to the violence, and rejected as "baseless" a plea contesting the SIT report.[16]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गरिबांच्या कत्तली घडवून राज्यावर आलेल्या मनुष्याबद्दल काय बोलणार?

मोदींनी कोणत्या गरीबांच्या किती दंगली घडवून आणल्या ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) या धाग्याचा मूळ विषय "पुरोगाम्यांचा अस्सल विजय" असला तरी या उपधाग्याचा मूळ विषय "मोदींनी अमेरिकेच्या द्वारी लोटांगण घातले किंवा कसे ?" हा आहे.

(२) माझं म्हणणं हे आहे की "मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या हितासाठी चे निर्णय घेतलेले आहेत व त्याचा अर्थ हा की ज्या देशाकडून जे जे काही भारताच्या हितास पोषक आहे ते ते मिळवण्याचा यत्न केलेला आहे". फक्त अमेरिकेच्या द्वारी लोटांगण घातलेले नाही.

(३) मी उपधागा पुन्हा एकदा वाचला. मिलिंदभाऊ, तुम्ही "मोदींनी अमेरिकेच्या द्वारी लोटांगण घातले" या तुमच्या विधानाच्या पुष्टीसाठी अजुनतरी पुरेसा युक्तीवाद केलेला नाही.

(४) मोदींवर हडेलहप्पीपणाचे, आत्मकेंद्रीपणाचे आरोप झालेले आहेत. अगदी एक महिन्यापूर्वी रागांनी (नेमका हाच नव्हे पण) अशा स्वरूपाचा एक आरोप केला होता. (मोदी संघाचे पाईक असल्यामुळे त्यांच्यामागे एकचालकानुवर्ती शैलीची देखील पार्श्वभूमी आहे.) हे जर खरं असेल तर मोदी अत्यंत इगोइस्टिक आहेत असा त्यामागचा भावार्थ निघतो. मोदींना अमेरिकेने व्हीसा नाकारला होता असे ऐकलेले आहे. आता ज्या अमेरिकेने मोदींना व्हिसा च्या वेळी झिडकारले त्या अमेरिकेच्या द्वारी मोदींसारखा इगोइस्टिक माणूस लोटांगण घालतोय हा आरोप पुरोगामीच करत असतील तर पुरोगामी मंडळी निर्वाणपदास पोहोचलेली आहेत असा काढावा का ? (मिलिंदभाऊ, तुम्ही पुरोगामी आहात हे माझे गृहितक आहे.)

जाताजाता (अवांतर) : इस्लामवर आरोपपत्रच दाखल होऊ द्यायचे नाही आणि तरीही इस्लाम ला निर्दोषत्वचे प्रमाणपत्र देत रहायचे हा जसा पुरोगाम्यांचा आवडता उद्योग असतो तसा - सर्वोच्च न्यायायलाने मोदींच्या विरोधी कोणताही निर्णय दिलेला नसला तरी मोदी हे या ना त्या मार्गाने दोषी आहेतच हे भासवत राहण्याचा पुरोगाम्यांचा आवडता उद्योग झालेला आहे.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या द्वारी लोटांगण घातले किंवा कसे ? हा उपधागा वेगळा काढता येऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पढके मजा आ गया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इस्लामवर आरोपपत्रच दाखल होऊ द्यायचे नाही आणि तरीही इस्लाम ला निर्दोषत्वचे प्रमाणपत्र देत रहायचे हा जसा पुरोगाम्यांचा आवडता उद्योग असतो तसा - सर्वोच्च न्यायायलाने मोदींच्या विरोधी कोणताही निर्णय दिलेला नसला तरी मोदी हे या ना त्या मार्गाने दोषी आहेतच हे भासवत राहण्याचा पुरोगाम्यांचा आवडता उद्योग झालेला आहे.

अर्थमंजूरी!
इस्लाम आणि त्याच्या कट्टरपंथीय समर्थकांचे आक्रसाळी चाळे सहेतुक दुर्लक्षिले जातात ह्याबद्दल नो दुमत.

पण दोन्हीकडे पुरोगामी शब्द का टाकावा? (माझं गृहितक आहे की तुम्ही खर्‍याखुर्‍या, काम करणार्‍या पुरोगाम्यांबद्दल बोलत नसून बोलबच्चन स्युडोसेक्युलरांबद्दल बोलत आहात)

मग स्युडोसेक्युलर हा चपखल बसत नाही का ह्या जागी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंतप्रधानाला रिसिव्ह करायला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा उप-सचिव कसा काय जातो?
महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे पुरेसे लक्ष न पुरविता महाराष्ट्र भाजप मुंबईत परदेशी गुंतवणूकदारांसाठी फाईव्ह स्टार मेळावे कसे भरविते ? (गुजराथ, केंद्रातही हाच प्रश्न )
आणि (ज्याचा लोटांगणाशी संबंध नाही) अशा प्रकारे जे लाखो कोटींच्या केलेल्या समझोत्यांच्या ज्या बातम्या सतत येत आहेत, त्यातील किती पैसा भारतात प्रत्यक्ष गुंतविला जातो ?
चीनविरुद्ध आणि इस्लामी टेरर विरुद्ध लढण्यासाठी भारताचा अमेरिकेला उपयोग होणार आहे हे सत्य आहे. त्याप्रमाणात (आणि अणुबॉम्ब मुळेही ) भारताचा मान वाढेल हेही सत्य मी मान्य करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे पुरेसे लक्ष न पुरविता महाराष्ट्र भाजप मुंबईत परदेशी गुंतवणूकदारांसाठी फाईव्ह स्टार मेळावे कसे भरविते ? (गुजराथ, केंद्रातही हाच प्रश्न )

पण हे अमेरिकेच्या दारी लोटांगण कसे ?

मेळाव्यांना फक्त अमेरिकनच गुंतवणूकदार येतात का ? सिंगापूरी, हाँगकाँगचे, ब्रिटिश, फ्रेंच गुंतवणूकदारांना यायला मज्जाव आहे का ? असे धोरण आहे का की फक्त अमेरिकन गुंतवणूकदारांनाच बोलवायचे ? व बाकीच्यांना बोलवायचे नाही ??

---

पंतप्रधानाला रिसिव्ह करायला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा उप-सचिव कसा काय जातो?

हा प्रोटोकॉल भंग आहे किंवा कसे यावर विवाद होऊ शकतो. पण हे लोटांगण कसे ? ही अमेरिकन परराष्ट्रखात्याची चूक असेलही पण मोदींनी लोटांगण घातले असा अर्थ कसाकाय काढलात यातून ?

मोदींना अमेरिकन संसदेत भाषण करण्याबोलवले गेले ह्यातून काय अर्थ काढावा ? ( असे बोलवणे मिळालेले मोदी हे सहावे प्रधानमंत्री आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काश्मीरमध्ये दर चार नागरिकांमागे एक सशस्त्र सैनिक भारताने (काँग्रेसने) उभा केला आहे. तसेच ("विरुद्ध बाजूचे") सत्तावीस वर्षात सुमारे ७७,००० मृत्यू झाले आहेत, ज्यातील (वर्षाला १००० या हिशोबाने) २७,००० हे बाहेरील घुसखोरांचे आहेत. म्हणजेच बाकीचे स्थानिक काश्मिरींचे आहेत.
(काँग्रेस काळापासूनच!)भारतभर मुस्लिम तरुणांना पोलीस दडपशाहीचा अनुभव येत असून हजारो मुस्लिम तरुण न्यायालयीन प्रक्रियेशिवायच अनेक वर्षे तुरुंगात डांबले जात आहेत. नकली चकमकित किती मारले जात आहेत ते वेगळेच. यासगळ्यात मुस्लिमांचे अतिरेकी चाळे मुद्दाम दुर्लक्षित करण्याचा संबंध कुठे आला? तसेच मुस्लिम पोटगी , त्रिवार तलाक या विरुद्धची लढाई गेली कित्येक दशके पुरोगामीच चालवीत आहेत (उदा. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई ). आत्ताआत्ता हिंदुत्ववाद्यांना असे काही घडते आहे याचा अचानक साक्षात्कार होऊ लागला आहे (तोही निवडणुकीपुरताच!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मोदींनी अमेरिकेच्या दारी लोटांगण घातले ह्याचा पुरावा देताय ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://indianexpress.com/article/business/budget/union-budget-2017-demon...
भारतीय समतेच्या वा विषमतेच्या सांख्यिकीचा अजून एक मस्त पुरावा.
=====================================
जाता जाता - डिमॉनेटायझेशन व्यर्थ म्हणणारांनी मनन करावे. (किमान या क्षणापर्यंत गप्प राहायला पाहिजे होते इतके कळले असते तरी पावले असते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.