देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.
काही शे सामंतांचे/knights लोकांचे विखुरलेले प्रदेश अशीच ह्यांची रूपे होती. त्यातल्या त्यात एकसंध होता रशिया(आणि ऑस्ट्रियाही), पण तोही मागच्या पन्नासेक शतकात पीटर द ग्रेटच्या काळातच उभा राहू लागलेला. स्वीडन, तुर्कस्थान ह्यांचे काही भाग मारुन समुद्रापर्यंत प्रथमच त्याने सलग अशी रशियन सत्ता प्रस्थापित केली.
स्वित्झर्लंड, डेन्मार्क, पोलंड हे ही असे बर्‍यापैकी विखुरलेलेच होते. त्यांचे आकार पाहिले तर आपल्या मैसूर(टिपू सुल्तान), हैद्राबाद(निजाम) आणि पुणे-सातारा(पेशवे-छत्रपती) ह्यांच्या राज्यांपेक्षा काही फार मोठे नव्हते.
म्हणे भारत विखुरलेलाच होता, "एकसंध" नव्हता.
अहो, प्रशिया हा जर्मनीचा आज एक प्रांत आहे. त्या एका प्रांतातील काही भागावर एका घराण्याची सत्ता होती. एकोणीसाव्या शतकात इतरांवर हल्ले करत , ते जिंकत त्याने आजचा जर्मनी म्हणतात त्या धर्तीवरचा सलग देश उभा केला.
तीच कथा इटालीची. गॅरिबाल्डी, मॅझिनी ह्यांच्या सशस्त्र क्रांतीमुळे इटाली नावाचे काहीएक एकसंध अस्तित्वात आले.
संपूर्ण जग तेव्हा nation , country(राष्ट्र, देश) ह्या शब्दांतील फरक शोधत होतं.
nation हे एखाद्या जातीचं, जमातीचं, मोठं रूप(extension) मानलं जात होतं.race आणि nation (वंश/कबिला/टोळी आणि राष्ट्र)ह्या कल्पना एकमेकांना स्पर्श करत होत्या. त्यांच्या सीमा धूसर होत्या.
जवळच्या नात्यातील लोक एकत्र आले की कुटुंब बनते. समानता असणारी काही कुटुंबे एकत्र आली की एक वंश, एक राष्ट्र , एक टोळी बलागते.त्यामुळेच कधीकधी भारतातली हरेक जात एक अशीच स्वतंत्र राष्ट्र वाटू लागते.
नकाशावरच्या भूभागाला "देश " म्हणतात. देश = जमीन = भूमी बस्स. इतकच.
कुटुंब हे चार भिंतीमध्ये/फ्लॅटमध्ये "वसते " तसेच राष्ट्र हे देशात "वसते". राष्ट्र हा चालक असून देश हे चाल्य(गाडी/वाहन) आहे.
दोन देश exclusively वेगळ्या भागातच असतात. पण एकाच देशात्/एकाच भूभाग काही वेगवेगळे समाज, वेगवेगळी राष्ट्रे नांदू शकतात. हंगेरी ह्या देशात बराच काळ रोमन आणि हूण ही दोन राष्ट्रे मध्ययुगाच्या प्रारंभी वसत होती; तसेच.
घरातून कुटुंब जागा सोडून जाते. तसेच एखाद्या राष्ट्राला एखाद्या देशातून घालवून देता येते.
एखादे राष्ट्र एखाद्या देशाचा ताबा घेउन त्याला आत्मसात करते. ग्रीको-रोमन राष्ट्राला तुर्क राष्ट्राने बायझेंटाइन्/तुर्कस्थान "देशातून" काढले तसेच. किंवा "स्पेन्/अल अंदालूस" देशातून अरब राष्ट्र बाहेर फेकले गेले तेराव्या शतकापर्यंत तसेच काहीसे.

देश शब्दाची आजची "व्यवस्था"/system ह्याजवळ जाणारी व्याख्या अजून बनायची होती. आज melting pot भासणारी अमेरिका अजून नीट बनलीही नव्हता. जी बनली होती, ती फक्त काही फुटीर सैन्याच्या लोकांची इवल्याशा प्रांतातली सत्ता ह्यापुरतीच मर्यादित होती.(आज जी अमेरिका दिसते त्यात पन्नास राज्ये, तेव्हा ह्यापैकी फक्त पंधरा एक राज्ये अमेरिकेत होती. अमेरिकेच्या पश्चिमेला जमीन होती, समुद्र नाही. ती जिंकून त्यांनी सीमा वाढवत वाढवत समुद्राला नेउन भिडवली.)
आज काही प्रमाणात एक संस्कृती एक देश असेही पहायला मिळते, पण "व्यवस्था", "करार" वाल्यांची संख्या सध्या जास्त दिसते.
असो. तर अठरावे शतक. तेव्हा खुद्द इंग्लंड -स्कॉटलंड ह्यांच्यात कमी का असेना पण धुसफुशी सुरुच होत्या. आयर्लंडने तर ब्रिटिश सत्ता झुगारुन देत लढा उभा केलेला.
अगदि त्याच वेळेला त्याच धर्तीवर पश्चिम्-उत्तर (वायव्य शब्द मुद्दाम टाळतोय) भारतात एक अशीच सत्ता उदयास येउ लागली.शीखांचे राणा रणजितसिंग ह्याच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली एक नवीन सत्ता उदयास आली, प्रस्थापित झाली. ती ह्या राज्यांपेक्षा लहान वगैरे मुळीच नव्हती.
आम्ही फुटलेलो होतो, विखुरलेलो होतो वगैरे म्हणतो , ते काही प्रमाणात खरेच आहे. पण फक्त आपणच तसे होतो असे नाही. सर्वत्रच राष्ट्र-राज्ये ही कल्पना अजून अस्तित्वात यायची होती.
उगीचच आम्ही फारच मागे पडलो बुवा असे म्हणत ऊठसूट स्वतःला थोबाडित मारुन घ्यायची गरज नाही.
ह्याबद्दल जे आणि जसे सुचत जाइल ते प्रतिसादातूंन टंकत राहणार आहे.
तुम्हा लोकांची मतं जाणून् घ्यायला आवडेल.
.
.
P S
My thoughts, one step further.
A part which i have not written in my original article.

देशावर "राज्य" करतात त्या सत्ता/regime. किंवा सरकारं/government.
सगळीच माणसं शहाणी अथवा व्यवहारी झाली तर ह्यांची दुकानं कशी चालतील?
मग ह्या सत्ता/सरकारं थेट स्वत:च देश/राष्ट्र असल्याचा दावा करतात.
उदात्ततेचं लेबल चिटकवून घेतात. प्रत्यक्षात ही भोसडीची झाटाइतकीही उदात्त नसतात.
पण त्या उदात्ततेचा अंश तुम्हाला मिळवायचा भास योजण्यासाठी ही साक्षात तुम्हाला मरायला तयार करतात!
किंवा तुम्ही मरुन त्यांचा फायदा नसेल तर तुमचं जीवन त्यांच्यासाठी वापरुन घेतात.
जुमला असतो हो तो शुद्ध जुमला.
.
सरकारं येतील जातील. राज्यं विभाजित होतील. राष्ट्रं टिकतील. कारण ती तोडता येत नाहित.तुटत नाहित.
अमूर्त असली तरी ती फार अधिक चिवट असतात सरकारांहून. पण सरकारं काही राष्ट्राला रिप्लेस करण्याचा स्वत:चा हेका सोडत नाहित.
.
धाकामुळे सरकारशी निष्ठावान असणं हा शहाणपणा/व्यवहारीपणा झाला.
त्या जुमल्याला शिरेसली घेउन निष्ठावान राहणं हे स्वत:लाच बनवून घेणं झालं.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

विस्कळित विचार आवडले.

माझी पण विस्कळित भर.

राष्ट्र = देश ही स्थिती आलेली नव्हती याच्याशी सहमत. त्यामुळे एतद्देशीयांना एकमेकाच्या विरोधात परक्यांचे साहाय्य घ्यायला अडचण वाटली नसावी. पॉवर पॉलिटिक्समधील आपल्यासारखेच एक खेळाडू असे एतद्देशीय ब्रिटिशांना किंवा फ्रेंचांना समजत असावेत.

खरे मागासलेपण हे वसाहत बनल्यावरची धोरणे ब्रिटनच्या आर्थिक हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आखली गेल्यामुळे आले.

महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्लासीची लढाई १७५७ मध्ये झाली आणि इंग्लंडमधील औद्यिगिक क्रांती त्यानंतर झाली. औद्योगिक क्रांती वसाहतीमधल्या संपत्तीतून फायनान्स झाली होती.

वसाहत झाली नसती तर भारतात रेनेसां किंवा औद्योगिक क्रांती आली असती की नाही हे सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी उलट समजत होतो. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहती , वसाहतींवरील पकड वाढत गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

http://en.wikipedia.org/wiki/Industrial_revolution

येथे औद्योगिक क्रांतीबाबत माहिती मिळेल.

औद्योगिक क्रांती यूके मध्ये सुरू होऊन इतरत्र पसरली. त्या क्रांतीसाठी लागणारे रिसोर्सेस, आणि भांडवल भारतासारख्या वसाहतींतून आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विस्कळित विचार आवडले...
पुढे कधी वाद घालताना हे मुद्दे चांगलेच उपयोगी पडतील...
... सध्या अशाच काही मुद्द्यांवरून विकीवाचन चालू आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा आणि नितिन दोघांचे विस्कळीत विचार आवडले. युरोपात आज जे वेगवेगळे देश दिसतात त्यांच्यात भाषा हा समान धागा आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांमधे हाच प्रकार आहे. तेव्हा युरोपीय "देशां"च्या सीमा स्थिर नव्हत्या, आज राज्य आहेत त्या सीमाही तेव्हा बदलत्या होत्या. सीमावर्ती भागांमधे बरेच लोक दोन्ही, तिन्ही भाषा बोलतात, समजतात. सामान्यांना राज्य कोणाचं यापेक्षा राज्यकर्ता बरा आहे का याची जास्त काळजी असावी.

काही वेगळं, सांगण्यायोग्य वाटल्यास जरूर लिहेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख रोचक आहे. मुद्दे लक्षात ठेवण्याजोगे आहेत.

या लेखावरून एकदम 'आर्य चाणक्य' आठवला. (चंद्रप्रकाश द्विवेदींचा 'रास्ट्र' हा उच्चारही आठवला.)

चंद्रगुप्त, अशोक, (समुद्र वगैरे) गुप्त, मुघल साम्राज्यांमुळे आणि पुण्यभू संकल्पनेमुळे इंग्रजांपूर्वी भारत हा एक देश नसला तरी एक राष्ट्र होते असा उलट युक्तीवाद करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ विषयाबद्दल जे आणि जसे सुचत जाइल तसे टंकायचे ठरवले आहे. हा पुढील भागः-

हे सगळं आत्ताच डोक्यात का आलं?
"थुत् तुम्हा भारतीयांच्या .एकसंध म्हणूनही कधी रहायची अक्कल नव्हती. तुम्ही खरोखरीचे कमअस्सल "असं कुणी तरी संभाषणादरम्यान काल म्हणालं.
त्यानंतर जी (शाब्दिक) हाणामारी झाली, त्यातला माझा प्रतिक्रियेचा एकूण ढाचा इथे माडलाय.
"आम्ही ब्रिटिश्", "आम्ही अमेरिकन" , "आम्ही चायनीज/मँडरिन" अशी स्वत्वाची जाणीव identity इतर ठिकाणी पूर्वीपासूनच होती, तेव्हाही तुम्ही स्वतः कोण आहात ह्याची अक्कल नव्हती असे तो म्हणाला. "तुमच्याकडे जाणीव फक्त् एवढीच की आम्ही अमुक एका जमीनदाराचे , warlord चे चाकर." तो संपला की तुमची ओळखही संपली. तुम्हा भारतीयांची सलग अशी काहीही आयडेंटीटी नव्हती. वगैरे छापाचं एक भारतीयच बोलताना पाहून आम्ही पेटलो.

भारत एकसंध होण्यात भाषेची तितकी अडचण वाटत नाही. आपलेपणा जाणवणं हे महत्वाचं. दिल्लीच्या माणसाला चेन्नै किंव बेंगलोरला जाताना "यहीं पर तो जाना है" किम्वा "उसमे क्या बडी बात है" असे वाटू लागेल तर हे नक्कीच शक्य आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. नागपूर, पुणे, मुंबै, कोल्हापूर , औरंगाबाद म्हटले तर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण महाराष्ट्राचे सामाजिक अभिसरण उत्तम सुरु आहे. इकडच्या कित्येक लोकांचे नातेवाइक आता तिकडे आहेत.
पाकिस्तानच्या बाबत् उलट् होते आहे. काही हजार वर्षे त्यांचे सामाजिक लागेबांधे दक्षिण आशियाशी होते. पण आता (उच्चभ्रूंच्या आणि धार्मिक लोकांच्या) घरोघरी दुबै, इजिप्त असे कुठेही नातेवाइक भरपूर सापडतील. त्यांच्या टीव्हीवर वगैरे तिथल्या घटानांची अधिक दखल घेतलेली आढळेल . लग्नसंबंधाने हे घडते आहे. तिथे सरकार समर्थित प्रोपागेंडा असा आहे की आपण पाकिस्तानी पूर्वीपासूनच अरब नि पर्शियन जगाशी जोडलेलो होतो. आज पाकिस्तान म्हणतात तिथे पूर्वी प्राचीन काळी धड स्थित असे काहीही नव्हते. नागर समाज वगैरे नव्हता. काही फुटाकळ लोकांच्या विरळ वस्त्या होत्या.
तो जाहिल, रानटी लोकांचा काळ. "जाहिलियत " त्यास म्हणता यावे. कासिम नामक भला माणूस इथे आला. ह्या बहुतांशाने रिकाम्या प्रदेशात त्याने वस्ती केली. शहरे वसवली. न्यायाचे राज्य, काय्दा सुव्यवस्था प्रस्थापित केली. स्थिर शासन दिले. त्याच्या भल्या आचरणातून इथल्या काही अल्पसंख्य रानटी लोकांनाही सत्याची जाणीव झाली. व ते स्वतःहून कासिमला जॉइन झाले. कसलीही जोरजबरदस्ती झाली नाही. सर्वांना समान वागवणारा असा हा आमचा राष्ट्र पुरुष पाच सात वर्षांच्या सत्तेनंतर जिथून आला होता तिथे परतला.(बहुदा बगदाद) पाकिस्तानचा "राष्ट्र" बनण्याचा प्रयत्न हा असा आहे.
भारत वेगळ्या मार्गावरून जातो आहे. आम्ही एकसंध नाहीत. पण आमच्यात एक धागा अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे. मध्यमवर्गानं ही स्थापित होण्यास नकळातपणे फार मोठा फातभार लावलाय. भारत ही "संकल्पना" जाणवून घ्यायची असेल तर तुम्ही सलग पाच-सात वेळेस मूळ "मिले सूर मेरा तुम्हारा" हा सुंदर मैफिल पाहिली पाहिजे. साध्या साडीतली कुलीन गुजराती स्त्री "बणे सूर जो तारो मारो बणे आपणो सूर निराळो" असं काहीसं म्हणते ; पूर्वेकडच्या राज्यात कुणीतरी " सृष्टी होउ कोइ कोतान्/कोइ कोशू" अशी सुरेल कुणी हाक देतं, मराठीत फिल्मस्टार तनुजा "तुमच्या माझ्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा" म्हणत समेवर येते.
अहाहा. सुरेख. सुंदर. त्या गीतातल्या सगळ्याच भाषा समजतात असे नाही, पण खूपच प्रसन्न वाटते. "मला तुमची भाषा येत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो" ह्या अर्थाचे काहीसे हे भारतीय संघराज्य एकत्रित आहे. ह्यात भाषाभिमानी अतिप्राचीन वाङ्मयासोबत तमिळ आहेत, बाबो मोशाय त्याच्या मिठायांसोबत आहे, नेकिचा नोकरदार नि कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी मराठीही आहे. परंपराप्रिय राजपूत्/राज्स्थान हे आहेत नि आमचेच निसर्गाच्या सहवासात राहणारे उडिया लोकंही आहेत.
दिल्लीकडच्यांना अकबराबद्दल प्रेम्/आदर आहे ना, असूं देत, त्याचं (मेवाडी)राजपूतांना आदरस्थानी असणार्‍या राणा प्रतापाशी युद्धही झालं होतं ना? असूंदेत. तरीही आम्ही दोन्हीचा सांस्कृतीक वारसा सांगू. कुणीकडून काय मिळालं हे मांडू.

"मिले सूर मेरा तुम्हारा " च्याच धर्तीवर, त्या दर्जाची नसली, काहीशी populist वाटली तरी "तारक मेहता का उल्टा चश्मा" मध्ये ही भारताच्या वैविध्याची नि एकतेचीही कहाणी मस्त मांडलिये. म्हणजे, तो कथेचा मूळ गाभा नसेलही, पण प्रत्येकाला त्यात आपलच, किंवा आपल्या जवळच्यांचं representation सापडतं. एका हिंदी सिरियलमध्ये " पापड कसले बनवतेस तू माधवी" म्हणणारा मराठी श्रीयुत भिडे नि कच्छवाले(गुजराती) जैन व्यावसायिक जेठालाल एकमेकांची सुमडी सुमडीत खेचू पाहतात. पण खरच अवघड वेळ आली तर भिडेला जेठालाल ला सोडून जेवणही जात नाही. अर्थात जेठालाल सुटला की ह्यांचे पुन्हा ट ऑम अ‍ॅन्ड जेरी सारखे उद्योग सुरुच. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणारा अब्दुल त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य आहे. सरदारजी त्यांच्या पारशी बायकोसाबत धमाल आणताहेत. ते मद्राशाला(हौ. सगळे साउथ इंडिअन हे मद्राशीच असतात.) छोले भटुरे आठवणीनं आणून देतात , मद्राशी सगळ्या उत्तर भारताच्या उत्सवात सहभागी होताना दिसतो. "आपण वेगळे आहोत पण आपण शत्रू नाहीत" अशी काहीशी ही भावना आहे.
सध्याची भारत ही संकल्पना यशस्वी झाली तर ती जणू एका मोठ्या प्रच्चंड मोठ्या कोलाज च्या रुपातील असेल. मोठा कॅनव्हास, अनेकानेक रंग तरी त्यांची एकमेकांना सोबत. एकजिनसीपणा नाही, पण एकत्रित बांधणी पक्की आहे.
एकाच पुस्तकात प्रत्येक पान वेगवेगळ्या रंगाचं असावं तरीही त्याची बायंडिंग घट्ट असावी, तसच काहीसं.
कालच एक सिनियर सहकारी, सरदारजी "नामदेव की बाणी कहां से मिली " असं मला मी वाचायच्या प्रयत्नात असताना म्हणाले. म्हटलं नामदेवाचा जन्म आमच्या इथलाच की नर्सी-नामदेव, मराठवाड्यातला. ज्ञानेश्वरांसोबत काही कळ राहून आमचा नामदेव इथे कसा आला? त्याने इथल्या लोकांशी नाळ कशी जोडली हे शोधतोय. मला वाटतं तो एकमेव non-sikh संत कवी आहे, ज्यास गुरुबाणी ह्या शिखांच्या ग्रंथात स्थान आहे. असा pan india प्रवास त्याला का करावासा वाटाला ते शोधायचय. शंकराचार्यांनी केला तसा तो अजून कुणी केला का? अनेकानेक पवित्र क्षेत्रे उत्तरेत आणि दक्षिणेत असल्याने ये-जा होत राहून हे अभिसरण आधीही थोड्याप्रमाणावर का असेना होत होतं का? बरेच प्रश्न होते. "वोह छोड, अभी जल्दी रिपोर्ट बनाके भेज" इतकच म्हणून ते निघून गेले; तो भाग वेगळा Sad
"एक भारत" म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर रेल्वेने प्रवास करावा. आधी जम्मू ते मदुरै आणि नंतर सुरत ते गुवाहाटी असं जाउन पहा. रेल्वेतच बसले राहिलात तरी खूप काही बघणं होइल. अल्पशा मोबदल्यात आख्खे भारत दर्शन होउन जाइल्.रेल्वेत भेटणारी माणसे, त्यांची आयुष्ये त्यांनी "भारत " कल्पनेबद्द्ल काहीही भाष्य न करताच तुम्हाला खूप काही सांगून जातील. कॅनव्हास मोठा करायला एकदा स्लीपर कोच, नि एकदा तरी ए सी असे जा. खूप काही जाणवेल.

सामान्यांसाठी भारताची अजून एक व्याख्या म्हणजे जिथवर बॉलीवूड्प्रेम दिसेल, तो तो भाग भारताचा. दक्षिणेत हिंदि बोलत नाही म्हणतात, पण तिकडेही बॉलीवूड गाणी हिट्ट आहेतच. अजून एक व्यवच्चेदक लक्षण म्हणजे पैसे खायला, कामात कुचराई करायला अचाट मार्ग शोधून काढणारी बुद्धी, नोकरशाही दिसली(आणि त्याबदल्यात शोषितांची तक्रार न दिसता "चलता है" अशी भूमिका दिसली ), तर ते भारतीय रक्तच समजा. ते आपले व्यवच्छेदक लक्षण आहे!

मग भारताचे पुढे मागे ७-८ देश झाल्यास काही नवल नाही किंवा तसे वेगळे होण्याची कुण्याची इच्छा झाल्यास त्यास विरोध करायला नको. असेही कुणी म्हणताना दिसते. पण हे होणे सोपे नाही. हे स्थित्यंतर पुन्हा फाळणीच्या काळासारखा प्रपात घडावायची शक्यता अधिक. काही सीमा नेहमीच अशा असतात की त्यावर दोन्ही बाजूंकडून् दावे होउ शकतात.
ह्यामुळे होते काय, की आजचे "शेजारी" उद्या "परके" किंवा घुसखोर ठरतात. शिवाय लहान आकार असण्यास समस्या हीच की भारतीय राज्ये लहान बनली की मेली. अर्थ, संरक्षण,परराष्ट्र् नीती ह्यात ती दुबळी आहेत. विज्ञान - तंत्रज्ञानात, रोजगार उभारणी ह्यातही ह्यांची एकेकेट्यांची बोंब आहे. एकूणच आधुनिक बलशाली देश म्हणवून घेण्याइअतपत् ह्यांचे अस्तित्व नाही.
मध्यपूर्वेत पन्नासेक देश आहेत. कुणाही पाश्चात्याने यावे नि टपली मारुन् जावे,रशिया चीनने मोहरा बनवावे ही त्यांची अवस्था. ह्यांना आपसात भांडायला बाहेरची फंडिंग, तंत्रज्ञान मिळाली तर कोण आनंद होतो. इराकी सत्ता कुर्द, शिया वगैरेंचे हत्याकांडा घडवते.(सुन्नींचेही घडावले ठाउक आहे.) उग्गीच बुशला लहर आली म्हणून तो बगदाद बेचिराख करायला उठतो.वाटॅल तेव्हा लिबियावर हल्ले होतात. कल्पना करा, ज्या नाटोच्या विमानांनी लिबियावर हल्ले केले, त्यांची तसेच हल्ले दिल्लीवर करायची हिंमत आहे का?
नाही. कारण दिल्ली म्हणजे १८५७ च्या काळातली दिल्ली राहिलेली नाही. लाल किल्ला नि त्याच्या आसपासची वस्ती असे त्याचे रूप नाही. आज दिल्लीला बोट लावाल तर आख्खे भारतीय संघराज्याचे लष्कर उभे राहील. गुरखा, शीख, राजपुताना, मराठा, महार ह्या सगळ्याच गाजलेल्या पलटाणी त्यात आहेत. दिल्ली, युपी, बंगाल, केरळ एकेकटे काहीही नाहीत. पण त्यांनी एकत्रित एक फौज उभारली आहे. त्यांच्या सहकार्य निधीतून त्यांनी काही थोडिफार का असेना आधुनिक विमाने घेतलीत, अणुबॉम्ब बनवलाय. त्यामुळेच आज दिल्लीवर हल्ला होउ शकत नाही.
पण भारताचे असे तुकडे झाले तर आपलीही मध्यपूर्वच होइल; ही धास्ती आहे. किंवा, मराठा सत्तेच्या शेवटच्या काळात तसे झालेलेच होते.
तुम्ही म्हणाल तसेच होइल असे काही नाही, आपला युरोपही होउ शकतो. युरोपातही अनेकानेक् भारतापेक्षा लहान लहान पण प्रबल सत्ता/देश आहेत. यु के, फ्रान्स , जर्मनी हे सगळे प्रत्येकी आठ आठ कोटींहून अधिक नाहीत. हो. हे खरे आहे. की ते प्रबळ आहेत. पण तुम्ही आम्ही तसे आहोत का?
ओरिसा फ्रान्सशी स्पर्धा करु शकेल? ब्रिटन जर कावेरी पाणीवाटापातल्या वादात लवाद्/ मांजर म्हणून घुसले तर तामिळ आणि कर्नाटक राष्ट्रे एकेकटी त्याला काय झाट रोखू शकणार आहेत?
इटाली जो भारतासमोर भुक्कड् भासतो, तो बंगाल - दार्जिलिंग/गोरखालँड वादात एकट्या बंगालचे कंबरडे कधीही मोडू शकतो. त्याच्या बंगालपेक्षा कैकपट आर्थिक, राजनितीक ताकद व् तंत्रज्ञान आहे.
आपल्याला भारतरूपी allied forces चे एकछत्री राज्यच बरे नाही का?
एखाद्यावेळेस गुण्यागोविंदाने तुम्ही वेगळे होउही शकाल. पण त्यानंतर एकटे राहण्याइतपत तुम्ही सबळ आहात का? इशान्य राज्ये स्वतंत्र झाली तर चीन नुसत ती घशात घालेल असे नाही तर तिबेट आणि सिक्यांग* प्रांतात त्यांनी जसा वंशविच्छेद केलाय, शतकानुशतकांचा लोकसंख्येचा तोल एका पिढीत पालटावलाय तसे कधीही करु शकेल. तर व्यावहारिक् मुद्दे म्हटाले तर हेच आहेत, बाकी काही नाही.

*सिक्यांग मध्ये मूळ चीनी वंशाचे लोक अल्पसंख्य होते.पन्नासवर्षापूर्वीपर्यंत. चीनने नियोजनबद्ध पद्धतीने लष्कराच्या काही लाख लोकांना तिथे कायमचे स्थायिक केले. स्त्रिया उचलून नेल्या. जबरदस्ती करण्यात आली. ह्या प्रकारातून निर्माण झालेली प्रजा आता "चीनी राष्टृ" ही कल्पना गळी उतरवून् घेण्याच्या तयारीत आहे. भारताने असेच काही काश्मीर मध्ये केले, तर तो भारताचा भाग होइल् असे काही कट्टरवाद्यांचे म्हणणे आहे. पण अर्थातच भारत असे काही पोलादी पकडीने करेल हे शक्यच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विस्कळीत विचार तंतोतंत पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकाशानंद!

१८व्या १९व्या शतकात उर्वरित जग असंख्य राजेरजवाडे असलेल्या भारताचा विचार एकसंधपणे (हिंदुस्थान, इंड्या वगैरे वगैरे) असा करीत असत का?

"हिंद मध्ये असे होते. हिंद मध्ये सुबत्ता आहे. हिंदमधील कापड,हस्तीदंत चांगले आहे." असा हिंद नावाचा उल्लेख मनुची वगैरे सारखे औरंगजेबाच्या काळात भारतात दिल्ली,लाहोरपासून ते गोव्यापर्यंत प्रदीर्घ राहिलेले लोक करताना दिसतात. मनुची हा इटालियन डॉक्टर/वैद्य/हकिम होता. नेपोलिअनने हिंदमधील ब्रिटिशांच्या भरभराटीस आलेल्या व्यापारास अटाकाव करायला, नाकाबंदी करायला काय करावे? त्याने सरळ आख्खे इजिप्त फक्त लष्करी बळावर घशात घालायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या आसपासची जल वाहतूक सहजच खंडित करता येइल. आपल्या साम्राज्यातील किंवा साम्राजाच्या प्रभावाखालील देशांना (खरे तर राज्यांना ) इंग्लंडशी भूमार्गातून व्यापारास प्रतिबंध केला. त्यातही हिंद असा उल्लेख आहे म्हणे. इथल्या स्थानिक सत्तांशी हातमिळवणी करुन(टिपू वगैरेने केला तोच प्रयत्न) ब्रिटिशांना शह द्यायचा त्याचा प्लॅन होता.
असो. तर त्या उल्लेखातही इथल्या राजे रजवाड्यांचा एकत्रित,सरसकट उल्लेख आढळतो.
मला आजच्या भारताला बर्‍याचदा India mainland म्हणावेसे वाटते.
नेपाळ, श्रीलंका हे Indian periphery वर येतात. भारताने ह्यांच्यात सामील होउन जावे असे मला वाटते. किंवा भूतानसारखी( भूतानला quasi indenpendent म्हणता येइल) ह्यांच्याशी मैत्री ठेवावी.

युरोपात राष्ट्रे भाषिक, (काहीशी)वांशिक आधारावर बनली. हिटलरने भाषिक आधारावरच ऑस्ट्रिया - जर्मनीचे एकीकरण केले. "आपणही जर्मन आहोत" ही भावना ऑस्ट्रियन जनतेत असावी का? कारण हिटलरला तिथे प्रतिबंध असा फारसा झालाच नाही. लोण्याच्या गोळ्यातून सुरी फिरावी तसे त्याचे सैन्य घुसले म्हणतात.

फाळणीदरम्यानचा भारतः- जमाते इस्लामीची अधिकृत भूमिका काहीशी अशी होती :- "संस्कृती हा एका देशाचा पाया हवा, धर्म हा नाही." पण खरेतर त्यांना कट्टर हिंदुत्ववाद्यांसारखाच अखंड हिंदुस्थान हा प्रांत हवा होता. एकाला भगवा हवा होता, एकाला हिरवा हवा होता. संपूर्ण देशावर आज ना उद्या आमचाच झेंडा फडाकावा अशी काहीशी ती भूमिका होती.(कोण चूक कोण बरोबर हे सोडून द्या.)
नुसता तुकडा मागण्याऐवजी अखंड मुस्लिम/शरिया भारत घडवा अशी भूमिका घेणार्‍या देवबंदी लोकांना त्यांनी केलेल्या पाकिस्तान विरोधामुळे देशप्रेमी वगैरे समजणारेही बक्कळ आहेत. पाकीस्तानात फजलूर रेहमान ह्यांचे प्राबल्य वाढते आहेमसे दिसताच इथल्या भारत-पाक मैत्री प्रेमींना आणी शांतीवाद्यांना लागलिच ते देवबंदी चळवळीचे समर्थक आहेत वगैरे म्हणून धन्य धन्य वाटू लागले होते.

--मनोबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा! लय म्हंजे लयच भारी!
म्हणूनच टिपु सुलतानला (किंवा अगदी झाशीच्या राणीला) भारतासाठी प्राणपणाने लढले किंवा देशभक्त (भारतभक्त या अर्थाने) म्हणू लागले की हसूच येते Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो ही आणि नाही ही...
इथे सावरकरांसारखी भूमिका सुचते.
"जोवर इतर लोक स्वतःची ओळख मी मुस्लिम, मी ख्रिश्चन अशी देत राह्णार तोवर मीही स्वतःची ओळख हिंदू म्हणूनच देइन" अशी काहीशी ती भूमिका होती.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन सत्तेविरुद्ध जबरदस्त उठाव करणार्‍या "बुडिका" नावाच्या राज स्त्रीला इंग्लंडमध्ये वेगळेच वलय आहे.खुद्द राणी विक्टोरिया(की एलिझाबेथ??) तिला आपला आदर्श मानी. स्कॉटिश लोकांनी विल्यम वॉलेसला(तोच तो. ज्याच्यावर गाजलेला braveheart हा सिनुमा निघाला.आपल्या लोककथेचा नायक आणि स्वातंत्र्याकांक्षेचे प्रतीक बनवले आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण त्यागले म्हणून गौरवले जाणारे १०५ हुतात्मे काही खरोखर एखाद्या मोर्चात गेले, आणि त्यांना "संयुक्त महाराष्त्राची मागणी" केली म्हणून मारले असे नव्हते. कित्येक जण आपल्या घर्रातून नुसते बाहेर पडत असताना कर्फ्युमध्ये मारले गेले. तरीही मराठी अस्मितेत त्यांना "सं महाराष्त्राचे हुतात्मे" असेच स्थान आहे.
.
.
त्यामुळें टिपू आणि राणीच्या बद्द्लच्या विधानातील आशयाशी बौद्धिकपातळीवर नक्कीच सहमत आहे. पण इतरेजन आपापली स्थाने दाखवत असतील तर इथल्यांनीही(वस्तुस्थिती माहीत असूनही) तशीच टिमकी वाजवावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझं मत इतकंच होतं की तेव्हा भारतच नव्हता.. आपापल्या लहान-मोठ्या राज्यांसाठी लढणार्‍या, मुख्यतः आपली जहागिरी वाचवु पहाणार्‍यांना केवळ ते लढले म्हणून एकदम एक देशभक्त म्हणणं जरा जास्त वाटतं. ते पराक्रमी होते,किंवा प्रसंगी शुर-मुत्सद्दी लढवय्ये होते वगैरे ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांत किंवा देशभक्तात नाही म्हटलं तरी त्यांची (आणि केवळ त्यांचीच असे नाही त्यात तत्सम अनेक आले) नावे खटकतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही अरूण शौरींची पुस्तकं वाचायला हवीत. तुमच्या विचारातला विस्कळितपणा कमी होईल बहुतेक. एकूण भारताची एकात्मता या विषयावर नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे. मी एक त्यांचं या संदभातलं पुस्तक थोडं वाचलं आहे..नाव आठवलं की सांगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच वाचेन. पण आंग्ल भाषेत (technical/तांत्रिक, व्यावसायिक, आर्थिक, माहिती सोडून)काहीही वाचायचं म्हटलं की जीवावार येतं.
बहुतांश सावरकरांचे ह्यासंदर्भातले लिखाण आणि काहीसे नेहरु(glimpses of world history पूर्ण, discovery of India पूर्ण) वाचून झालेत.
विसाव्या शतकात "स्वतंत्र एकसंध भारत " ही एक नवीनच ओळख बनत होती. ती दोघांनी आपापल्या चष्म्यानं छान टिपली. आणि वरवर ते कितीही कट्टर विरोधक, वैचारिक हाडवैरी दिसत असले तरी सांस्कृतिक समानता, भूतकाळातील राज्कीय ऐक्य, भौगोलिक सलगता(चायनीज सीमा सोडून) ह्यावर त्यांचे विचार खूपच सारखे वाटले.
सुप्रीम कोर्टातील दिग्गज वकील, लोकशाहीप्रेमी नानी पालखीवाला ह्यांचं लोकशाहीवरील एक पुस्तकही सुंदर वाटलं होतं. त्यातही हा आडहवा छान घेतला होता.(नाव विसरलो. बहुतेक क्रॉसवर्ड मध्ये जाउन फुकटात वाचायची ही शिक्षा असावी.)
अरुण शौरींचेही आता बघावे लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरूण शौरींची पुस्तकं वाचायला जड जातात..पण वाचायला हवीत असं वाटतं. त्यामुळे जमेल त्या गतीनी मी वाचायचा प्रयत्न करत असते. त्यांचं 'गव्हर्नांस' हे पुस्तक वाचून डोळे उघडल्या सारखं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Secular Agenda हे शौरींचं पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बापरे !!!! अरूण शौरी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते, मास्तर, विक्षिप्त बै, विसूनाना , ऋषिकेश , ऋता ;
सर्वांचे मौलिक भर घालण्यासाठी आभार. वाचनमात्रांचेही आभार.

@विसूनाना:- चाणक्य माझी आवडती सिरिअल होती. पण मौर्यसत्त्तेबद्दल त्याहीपेक्षा चांगले भाग अगदि थोडक्यात पण प्रभावीपणे "भारत एक खोज" मध्ये पहायला मिळाले.
@ थत्ते :- इंग्रज निघून गेलेत. अजूनही भारतात धड रेनेसां झालेला नाही. विचाराची चक्रे अजून फिरायची आहेत. विचारवंत म्हणवणआर्‍यांना सत्तेच्या विरोधात प्रमाणिकपणे(कुठल्याही स्पॉन्सरशिवाय) लिहायचं आहे. लोकांच्या टाळक्यात आजही काही वाईट, कुबट, जुनाट विचारांचे दाट जाळे आहे जे विकासाच्या रेट्यानी नि बद्धिक उन्नतीच्या प्रेशर पम्पनी धुवून काढायचय. कित्येक भाग अजूनही दोनेक शतके मानसिकदृष्ट्या मागेच आहेत.
@अदिती :- सामान्यांना राज्य कोणाचं यापेक्षा राज्यकर्ता बरा आहे का याची जास्त काळजी असावी.
भारतात तसं असेलही. नेपाळ आणि अफगाणिस्तानवाले बेचिराख होतील पण फारकाळ थेट सत्ता चालवून घेणार नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्याकांक्षा अतितीव्र आहेत. भारतीय बहुसंख्येच्या बोथट आहेत.(तशा त्या असल्या आणि परकीय राज्यकर्ता, चांगला प्रशासक मिळाला तर चांगलेच आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उर्दु भाषेतलं उदाहरण त्यातल्या त्यात परिचित असल्यामुळं घ्यायचं म्हटलं तर काय दिसतं?
"ऐ वतन ऐ वतन तेरी राहों में हम जां तक लुटा जाएंगे" असं कुणी म्हणतं. "गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" हे त्याचं मराठी रूप. भूमी- जमीन- वतन ह्यांच्याशीही बांधिलकी मानलेलीच दिसते.
इथे जमीन- वतन हे शब्द निष्प्राण, निर्जीव नाहीत, आपले, आपल्या लोकांचे तिथे पूर्वापार वास्तव्य आहे ही भावन त्या जमिनीच्या तुकड्याला मोल प्राप्त करुन देते. एरव्ही "जमीनीचा तुकडा" ह्या अर्थाने हेच शब्द जमीन्-दार, वतन-दार असे दिसतात.
.
सध्या बोली उर्दु मध्ये मुल्क हा शब्द सर्रास आढळतो. मराठीत आपण "देश" म्हणतो; बोलीभाषेतही "देश" वापरतो अगदि त्याच अर्थाचा आणि वापराचा हा शब्द. ह्यात मला तितकासा जिवंतपणा जानवत नाही. कलरलेस, ओडरलेस, निरुपद्रवी असा हा शब्द.
.
"राष्ट्र " ह्या कल्पनेशी "बृहद कुटुंब" किंवा "टोळी" किंवा "वंश" ह्याच्या जवळ जाणारा उर्दु शब्द म्हणजे "कौम"
"कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा
यह जिंदगी है तू कौम पे लुटाये जा" असं आझाद हिंद सेनेचं विजय गीत होतं. भारत ही एक "कौम" मानण्यात आली होती. एक बृहत कुटुंबच. पण अर्थातच ह्या शब्दाचं मूळ तितकं उदात्त नाही. आज आफ्रिकन एकाच आफ्रिकन "देशा"त अनेक "कौम " पहायला मिलतात. एक "कौम" दुसर्‍या "कौम" ला हाकलायला पाहते ; उर्दु च्यानेल पाहिल्यावर "कौम" ह्या शब्दाचा हा अर्थही जाणवेल.
वतन, मुल्क, कौम हे मराठीत अनुक्रमे वतन/भूमी/जमीन,देश, राष्ट्र बनून येताना दिसतात.
.
एक रिकामी जागा आहे, तो "देश" असू शकतो का? टेक्निकली , हो. पण ते राश्ट्र असू शकत नाही असे मी वर लेखात म्हटले आहे. देश- राष्ट्र ही तुलना सर्वात अचूक करता येइल ती संस्था/संघटना -- संस्थेचे कार्यालय ह्या जोडिशी.
एखाद्या संस्थेला एखाद्या कार्यालयातून, बिल्डिंगमधून घालवून देता येते. पण म्हणून त्यांची संघटना संपत नाही, तिचे फक्त कार्यालय जाते, तसेच काहीसे. संघटना असणे, संघटनेचे सभासद असणे हे एका नात्याने, धाग्याने बांधले जाणयसारखे आहे . "राष्ट्र‍ " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे.
त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा
बराचसा निर्जीव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>"राष्ट्र‍ " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे. त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा बराचसा निर्जीव.

सहमत आहे. म्हणून जनगणमन हे देशातल्या लोकांचा (पंजाब, सिंध गुजरात मराठा, द्राविड ....)उल्लेख असलेले गीत राष्ट्रगीत म्हणून अधिक सार्थ आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारत अमेरिका दोन्हीही ढोबळ मानानं संघराज्य म्हटली जातात. दोन्हीत लोकशाही आहे, वैविध्य आहे, प्रचंड मोठा भूभाग,लोकसंख्या आणि प्रचंड मोठा भूगोल ह्यांना लाभलाय; हे खरं. ही साम्ये आहेत; पण त्यांच्या रुपात मूलभूत फरक आहे. संकल्पनेतच फरक आहे.
America is destructible unit of indestructible states.
India is indestructible unit of destructible states.
तिथली राज्ये (कागदोपत्री तरी) स्वेच्छेने एकत्र आहेत.(अपवाद अमेरिकन यादवी/गृह युद्ध).
भारताच्या सीमांना कुठलेच भारतीय राज्य च्यालेंज करु शकत नाही. भारतीय त्यातून फुटून निघण्याची मागणी करणं हेच मुळात घटनाबाह्य, असंवैधानिक ठरवण्यात आलय.(कश्मीर स्वतंत्र करा म्हणणार्‍यांना अरुंधती रॉय वगैरेंना हे कलम लावलं जाउ शकतं.) दुसर्‍या एखाद्या शेजारी सत्तेस आम्हास जोडून घ्यायची इच्छा असेल तर मात्र भारत सर्कार त्यावर विचार करु शकते. ठिक वाटल्यास जोडून घेउही शकते.(सिक्कीम १९७३ पर्यंत भूतान सारखाच स्वतंत्र देश होता तसेच काहीसे.)
एकूणच इतिहासातून आपल्या घटनाकारांनी हा बोध घेतलेला दिसतो.(प्रबळ केंद्र सरकार असण्यासाठी नेहरु/काँग्रेस ह्यांनी हटून बसणे हे फाळणी होण्याच्या कारणांपैकी एक आहे असे म्हणतात. मुस्लिम राज्ये करा, त्या राज्यांना विशेषाधिकार इथपर्य्म्त जिन्ना ऐकायला तयार होते, फाळणी टाळायला म्हणे.)
भारतीय राज्ये तोडून त्यातून नवी राज्ये तयार करण्याचे सर्वाधिकार केंद्राकडे आहेत.
अमेरिकेचे उलट. तिथे राज्ये फोडली जाणे अपेक्षित नाही. शिवाय हवे तर राज्यांना स्वतंत्र होण्याचा (कागदोपत्री तरी) अधिकार आहे म्हणतात.
ऋषिकेश च्या "एक ऐतिहासिक घटना" नावाच्या एका माहितीपूर्ण मालिकेत ह्याचा उल्लेख पाहिल्याचं आठवतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.
काही शे सामंतांचे/knights लोकांचे विखुरलेले प्रदेश अशीच ह्यांची रूपे होती.<<

हे तितकंसं खरं नाही. त्याला अनेक कारणं आहेत. प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे :

मॅग्ना कार्टाच्या (१२१५) पश्चात हळूहळू राजसत्तेवर कायद्याचे निर्बंध आणून आणि तिला उत्तरदायी ठरवून संसदीय लोकशाहीचा पाया उभारला गेला. कायदे सर्वसामान्यांपेक्षा हुजूर वर्गाला सोयीचे होते, पण 'कायद्याचं राज्य' या संकल्पनेला एक अधिष्ठान प्राप्त होणं हा (आधुनिक अर्थानं) राष्ट्रउभारणीतला एक महत्त्वाचा टप्पा होता.

१७१३ मधला हा नकाशा पाहा :

स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन ह्या तेव्हाच्या महासत्ता होत्या - युरोपपुरत्या नव्हे तर अख्खी दक्षिण आणि उत्तर अमेरिका व्यापून टाकणार्‍या ह्या सत्ता होत्या. १७५७ साली प्लासीची लढाई झाली हे खरं, पण राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढून १७७६ साली अमेरिका स्वतंत्र झाली आणि १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती होऊन राजसत्ता उलथली गेली हेदेखील लक्षात घ्यायला हवं. नागरिकांना मानवी हक्क, अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे आधुनिक संकल्पना या काळात रुजल्या. त्यांचा पाया व्होल्तेअर वगैरेंनी याआधीच घातला गेला होता हे दुर्लक्षून चालणार नाही. प्रत्यक्ष सत्तेखाली असणारा भूभाग किती होता यापेक्षा या संकल्पना युरोपियन (आणि अमेरिकन) जनमानसात रुजण्याचा हा काळ होता हे महत्त्वाचं आहे.

हा झाला सत्ताकेंद्री विचार. पण यापलीकडे राष्ट्रउभारणीचा एक वेगळा पाया असतो आणि तो सांस्कृतिक असतो. एक उदाहरण : सतराव्या शतकापर्यंतच्या युरोपात ब्रिटिश बेटं ही तुच्छतेनं पाहायची गोष्ट होती. कारण त्यांची संस्कृती ही लॅटिन ते फ्रेंच अशा युरोपियन अंमलाखालची पण कनिष्ठ समजली जाणारी, स्वतःचा चेहेरा नसलेली संस्कृती होती. शेक्सपीअरनं सतराव्या शतकात हे चित्र बदलून टाकलं. ब्रिटिश राष्ट्र म्हणून आपली स्वतंत्र ओळख (आणि अस्मिता) निर्माण करण्यात शेक्सपीअरचा वाटा होता. फ्रान्समध्ये आधी राबले (सोळावं शतक) आणि नंतर मोलिएर, कोर्नेय, रासिन (सर्व : सतरावं शतक) वगैरेंनी हे केलं. स्पेनमध्ये सर्व्हांतेस (सतरावं शतक) तर जर्मनीत गथ आणि शिलर यांनी अठराव्या शतकात हे केलं. थोडक्यात, भाषा ही अस्मिता, संस्कृतीश्रेष्ठता आणि पर्यायानं राष्ट्रउभारणीचा पाया म्हणून अठराव्या शतकातल्या युरोपात घट्ट पाय रोवून उभी असलेली एक संकल्पना होती. हा फरक लक्षात घ्यायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढून १७७६ साली अमेरिका स्वतंत्र झाली आणि १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती होऊन राजसत्ता उलथली गेली हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

मुद्दा पटातो आहे; पण पूर्ण नाही. अमेरिका स्वतंत्र झाली; पण कुठल्या मुद्द्यावर "प्रतिनिधीत्व नाही तर कर नाही" अशी काहीतरी निर्वाणीची मागणी होती म्हणतात. म्हणजे प्रतिनिधित्व मिळालं तर "इंग्लंडची नव्या खंडातली वसाहत" हे स्टेटस त्यांना मान्य होतं. आज जी "अमेरिका" दिसते ती बर्‍याच प्रय्त्नांचा आणि अपघातांचा परिणाम आहे. जगप्रसिद्ध "अमेरिकन ड्रीम" जे जणू काही अमेरिकन राष्ट्रियत्वाची ओळख आहे, ते त्यावेळेस नव्हतच ना अस्तित्वात.
भांडण होतं ते समुद्रापलीकडून सत्ता चालवणार्‍या सत्ताधीशांशी स्थानिक अमेरिकनांचं. म्हणजे भौगोलिक वेगळेपणा अधोरेखित होत होता.
"देश" अस्तित्वात आला. "राष्ट्र " यायला वेळ लागला.
.

त्यांचा पाया व्होल्तेअर वगैरेंनी याआधीच घातला गेला होता हे दुर्लक्षून चालणार नाही.
हे पटलं. थत्तेंनी रेनेसां म्हटलय, त्याचच हे एक्स्टेंशन.

पण यापलीकडे राष्ट्रउभारणीचा एक वेगळा पाया असतो आणि तो सांस्कृतिक असतो.
मला वाटतं हे आपल्याकडेही घडात होतच. इतकं ठळ्क नसेल पण काही सायलेंट प्रय्त्न होतेच की.

शेक्सपिअर , राबले (सोळावं शतक) आणि नंतर मोलिएर, कोर्नेय, रासिन (सर्व : सतरावं शतक) वगैरेंनी हे केलं.
आपल्याकडे धार्मिक लिखाणच अधिक झालं, ते सोडून इतर काही फारसं झाल नाही,विशेअष्तः वैचारिक आणि तेही मागच्या बाराशे वर्षात, हे खरेच.
.
शंका:- चीनला ह्या अडचणी कशा आल्या नाहीत? युरोपच्या भरभ्राटीचा काळ ही चीनसाठीही मध्यरत्रच होती.

अवांतरः-
अशी राष्ट्रिय अस्मिता म्हणून काही बनवायची असेल तर सरकारचा प्रोपागेंडा असावा का? कालिदासाचे "अभिज्ञान शाकुंतलम्" (दुष्यंत्-श्कुंतला ह्यांची प्रेमकथा) , मालविकाग्निअमित्रम् अशा कथांची स्पॉन्सरशिप घेउन काही नवीन व्यावसायिक दर्जाचे चित्रपट वगैरे बनवावेत का? काही अभिजन वर्ग वगळता ह्याचा आमच्यासारख्या सामान्यास बराचसा विसर पडलेला आहे. ह्यात रंजक मूल्यही बरेच आहे, त्यामुळे दर्शकांकडून तिकिट लावून पैसेही मिळायची शक्यता आहे, टॅक्स देणार्‍यांवर त्यामुळे फारसा ताण येणार नाही.

@ऋषिकेश :-
ते पराक्रमी होते,किंवा प्रसंगी शुर-मुत्सद्दी लढवय्ये होते वगैरे ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांत किंवा देशभक्तात नाही म्हटलं तरी त्यांची (आणि केवळ त्यांचीच असे नाही त्यात तत्सम अनेक आले) नावे खटकतात
मुद्दा समजला. मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विश्वाच्या सकल (सर्वंकष) उत्पादनात भारताचा शेअर कसा वाढत व नंतर घटत गेला त्याचे चित्र - http://2.bp.blogspot.com/-AXJLcZ0Kvvk/T-HGFBor-KI/AAAAAAAATJ0/jQN47egIjY...

व हे चित्र बनवणारे प्राध्यापक २०१० साली निवर्तले. त्यांच्या वेबसाईट वर (http://www.ggdc.net/maddison/oriindex.htm ) खालील संदर्भ मिळाले -

१) Class Structure and Economic Growth: India & Pakistan since the Moghuls (1971), Chapter 2: The Moghul Economy and Society
२) Class Structure and Economic Growth: India & Pakistan since the Moghuls (1971), Chapter 3: The Economic and Social Impact of Colonial Rule in India

दोन्हीच्या पीडीएफ तिथे उपलब्ध आहेत.

माझा प्रश्न हा आहे की - या लोकांनी भारत (ईंडिया) म्हणून विचार व संशोधन करताना कोणता भूभाग गृहित धरला व कोणता वगळला ?

(अर्थात दुसरा प्रश्न असा ही असू शकतो की विश्वाच्या सर्वंकष उत्पन्नाचा एवढा डेटा त्यांना कसा मिळाला व - व्हॉट इज द व्हेरॅसिटी ऑफ धिस डेटा ?)

.

वो जिनके होते है खुर्शीद आस्तीनोंमे ...
उन्हे कही से बुलाओ ... बडा अंधेरा है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात दुसरा प्रश्न असा ही असू शकतो की विश्वाच्या सर्वंकष उत्पन्नाचा एवढा डेटा त्यांना कसा मिळाला व - व्हॉट इज द व्हेरॅसिटी ऑफ धिस डेटा ?

आधीचं माहीत नाही, पण १५०० साली अकबराचं साम्राज्य होतं. त्याच्या खजिन्यात किती पैसे आले याचे चोख हिशोब असावेत. यावरून जीडीपीचा अंदाज बांधणं कठीण नसावं.

हाच आलेख मी बार चार्ट स्वरूपात पाहिलेला होता. त्यावरून स्पष्ट दिसत होतं की सुमारे पंधराव्या शतकापर्यंत भारताचं जगातलं जीडीपीचं प्रमाण हे खूप वरचं राहिलेलं होतं. त्यानंतर उतरती कळा लागली. याचं कारण भारताचा विकास होत नव्हता असं नसून विकासदर हा जगापेक्षा बराच मागे पडला असावा. ब्रिटिश आल्यानंतर अठरा व एकोणिसाव्या शतकात हे प्रमाण फारच वेगाने घसरलं. आता हे चित्र पलटल्याचं दिसत आहे. या मॅक्रो चित्रावरून गेल्या पन्नास साठ वर्षांत जागतिक पातळीवर विषमता कमी झालेली दिसते. (भारत व चीन - सर्वात दरिद्री देश तुलनेने अधिक कमवायला लागलेले आहेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकबर काय किंवा औरंगजेब काय, यांच्या काळातल्या सारारूपी महसुलाचे आकडे आहेत. त्यामुळे टॅक्सरूपी उत्पन्न आयतेच उपलब्ध आहे.

सेम डेटा इज़ अ‍ॅव्हेलेबल फॉर पेशवाज़. शिवशाहीबद्दल दुर्दैवाने असा डेटा उपलब्ध नाही (अजूनतरी माहिती नाही)-सभासद बखरीतील टिपिकल 'क्रोड होनांचे राज्य' ही फ्रेज़ वगळता. बंगालचे नबाब, निजाम, इ. बद्दलही काही प्रमाणात हा डेटा उपलब्ध असेलसे वाटते.

त्यामुळे कुठला भूभाग इ. आहे हा तर एक वेगळाच मुद्दा (कुठला का असेना, पण गिव्हन एनी भूभाग ज्या प्रकारचा डेटा आहे त्यावरून), पण मेन प्रश्न असा की वरील माहितीआधारे फार तर आजच्या बाजारभावात ट्याक्सचे इन्कम काढता येईल. निव्वळ तेवढ्यावरून तुमचा तो जीडीपी कसा काढणार? दोहोंचा काही एक रेशो अझ्यूमवल्याशिवाय ते अशक्य वाटते. शिवाय तत्कालीन कॅल्क्युलेशनमध्ये आफ्रिका अन आम्रविका यांचे काय केले ते कसे काढले काय की. की काही रौंड फिगरीने रौंडवले? नॉट दॅट देअर इज़ मच ऑफ अ पर्याय, बट ष्टिल..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_tax_revenue_as_percent...

अन आय गेस, गेल्या तीनेकशे वर्षांपासून अगदी सध्याच्या पद्धतीने जीडीपी काढण्यासाठीचा डेटा युरोपसाठी उपलब्ध असावा. त्यावरून जो कै येईल त्याला आशियाशी तुलून पाहिले असेल इ.इ. गेसेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>शिवशाहीबद्दल दुर्दैवाने असा डेटा उपलब्ध नाही (अजूनतरी माहिती नाही)

चौदा लाख (की तीन कोटी) मोडीतील कागदपत्रे ........ Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ळॉळ Blum 3

थत्तेचाचा, साधारणपणे शिवकाल हा १६००-१७०० असा मानला जातो. या काळातली कागदपत्रे १७००-१८०० या काळातल्या कागदपत्रांच्या तुलनेत लैच कमी आहेत कारण औरंगजेब दक्षिणेत आल्ता तेव्हा रायगड आणि राजगड दोन्ही त्यांच्या ताब्यात अधूनमधून गेल्ते. तस्मात दफ्तरखानाही खाक झाला असावा. आजमितीस या ना त्या वेळेस प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनी पाठवलेली फक्त २५० च्या आसपास पत्रे उपलब्ध आहेत. ते सोडून अन्य मोडी कागदपत्र पण १७०० च्या अगोदरचे असे तुलनेने कमी आहेत इतके नक्कीच, यद्यपि नक्की आकडा मला ठाऊक नाही. जाणकारांना विचारले पाहिजे, बट माय गेस इज़, १ लाखापेक्षा कमीच (रादर बरेच) कागद असावेत १७०० पर्यंतच्या काळाचे. तरी विचारून पाहतो नक्की आकडा किती आहे ते. शिवचरित्र साहित्य खंड नामक १५ खंडी मालिका आहे त्यांत १० हजारापेक्षा कमीच पत्रे आहेत आय थिंक-त्यातही परत मोडी किती, फारसी किती, ते मी चेकवले नाही. पाहतो अन सांगतो.

तुलनेने त्या काळचे मुघल रेकॉर्ड्स इतके प्रचंड उपलब्ध आहेत की सांगता सोय नाही. राजस्थानातील बिकानेर गावात भारतातले सर्वांत मोठे आर्काईव्ह आहे. त्यात रजपूत+मुघल अशी लिटरली कोट्यवधी पत्रे आहेत. ८ लाख रुमाल आहेत अन १ रुमाल मीन्स १००० पत्रे ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज़. अन प्रत्येक रुमालातली १००० च्या १००० पत्रे शिल्लक नसली, किमान प्रत्येकात १०० पत्रे आहेत असे मानले तरी लोवर लिमिट आहे ८ कोटी. त्यामुळे मुघलांबद्दल प्रचंड माहिती मिळणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नुकताच कोठेतरी भारतासंबंधीच्या (देशभक्तपुरस्कृत) अफवांपैकी किती खर्‍या किती खोट्या याविषयी लेख वाचला. त्यानुसार भारताचा पर कॅपिटा जीडीपी कदाचित इतर देशांइतकाच (किंचित जास्त) असावा पण भारताच्या लोकसंख्येमुळे एकूण जीडीपी जास्त असावा. [अर्थात मोस्टली लेबर ओरिएंटेड औद्योगिक क्रांतीपूर्व जगात हे साहजिकच आहे].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

पीपल प्रपोर्शनल टू रिसोर्स आणि
पीपल प्रपोर्शनल टू वेल्थ असे असणे शक्यआआहे तेव्हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

देश, राष्ट्र ह्याबाबतीत माझी त्या-त्या वेळी जी काही समजूत होती, ती ह्या धाग्यावर लिहून काढलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0