केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन

स्त्रोतः ई-सकाळ.कॉम व लोकसत्ता.कॉम

यकृतावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी विलासराव देशमुखांचे चेन्नईतील रुग्णालयात निधन
महाराष्ट्राच्या या धडाडीच्या नेत्याला आदरपूर्वक श्रद्धांजली.

विलासरावांबद्दलची विकीवरील माहिती

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक व्यक्तीच्या निधनामुळे होणार्‍या देशमुख कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे!

काल त्यांना किडनी देणारा गेला असल्याची बातमी वाचली होती. मात्र एखाद्या मोठ्या नेत्याला अवयवरोपणासाठी इतके कष्ट पडत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल याचाही विचार या निमित्ताने झाला व त्यात सुधारणा झाली तरी ती त्यांना एक चांगली श्रद्धांजली ठरेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरेरे.

काल त्यांना किडनी देणारा गेला असल्याची बातमी वाचली होती. मात्र एखाद्या मोठ्या नेत्याला अवयवरोपणासाठी इतके कष्ट पडत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल याचाही विचार या निमित्ताने झाला व त्यात सुधारणा झाली तरी ती त्यांना एक चांगली श्रद्धांजली ठरेल

या घटनेचं निमित्त ठरूनतरी अवयवरोपणाबद्दल अधिक जागृती निर्माण व्हावी, संस्थात्मक पातळीवर याबद्दल अधिक काम व्हावं अशी इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या घटनेचं निमित्त ठरूनतरी अवयवरोपणाबद्दल अधिक जागृती निर्माण व्हावी, संस्थात्मक पातळीवर याबद्दल अधिक काम व्हावं अशी इच्छा.

हे वाचायला मिळाल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

एक व्यक्तीच्या निधनामुळे होणार्‍या देशमुख कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे!

ऋषिकेशराव, एवढे मोजून कशासाठी लिहायचे! राजकीय पुढार्‍यांविषयी आपले काही मत असेल ते असेल, पण ते नेते असतात, आणि त्यांच्या मृत्युनंतर आपले मोठे सामाजिक नुकसान होत असते. फक्त एका कुटुंबापुरते ते मर्यादित नसते. नेत्यांमध्ये समाजाची फार मोठी इन्व्हेस्टमेंट असते. हा नेता अवघ्या ६७व्या वर्षी गेलाय, हे आपले सर्वांचेच मोठे नुकसान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दु:ख, नुकसान, नेतृत्व, ..... अशा बाबींत मतभिन्नता असणारच. त्यात योग्य-अयोग्य असं काही नसतं. त्यामुळे तुमच्या मताचा आदर आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर लगेच त्या व्यक्तीचं 'सामाजिक' मूल्यमापन करु नये (मुख्यत्वे टीका करु नये) हा संकेत पाळणं आणि त्याचवेळी व्यक्तिगत दु:खाबाबत संवेदनशील असणं हे संतुलन व्यक्त होत असल्यामुळे मला ऋषिकेश यांचा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री.आ.रा. सरांच्या मताशी सहमती व्यक्त करीत असतानाच...आतिवास यांच्या त्या संदर्भातील मताविषयी म्हणू इच्छितो की, ज्या दिवशी देशाला/राज्याला सुपरिचित असणारी व्यक्ती स्वर्गवासी होते, त्याच दिवशी तिच्या कारकिर्दीचे "डिसेक्शन" करायला अपॅरॅटस घेऊन बसू नये हा एक सर्वमान्य संकेत असतो तो पाळावा, जो अशिक्षित पाळतात, तर मग सुशिक्षितांकडून तशी अपेक्षा व्यक्त केल्यास त्यात चुकीचे काही नाही.

कुणीही नेता वा अभिनेता अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असत नाही (हे देखील सर्वमान्य आहे); पण आपल्या शास्त्रात म्हटल्याप्रमाणे 'मरणान्ती वैराणी....' या वचनाला जागून किमान शब्दात 'श्रद्धांजली' वाहणे कधीही योग्य. विलासरावांच्या कारकिर्दीविषयी दुमत असू शकते...नव्हे आहेच...जे लोकशाही प्रणाली मान्य करणार्‍या या देशात योग्यही ठरते. पण त्यासाठी, कारकिर्दीवर विजेरी टाकायचीच असेल तर मग गो फॉर अ सेपरेट थ्रेड.

परवा राजेश खन्ना गेल्याचे सार्‍या देशाला वाईट वाटले....{विशेष म्हणजे पहिलाच अभिनेता असेल की जो स्वर्गवासी झाला म्हणून जितके स्त्रियांना दु:ख झाले, अगदी तसेच त्याच्यावर प्रेम करणार्‍या पुरुषांच्याही डोळ्यात त्या वार्तेने पाणी आले होते}, पण म्हणून तो काही "टिनोपाल' सारखा स्वच्छ विनाडाग नव्हता. त्याच्यावरदेखील आयकर खात्याच्या केसीस होत्याच. पण ही बाब त्याला श्रद्धांजली वाहाणार्‍यांच्या नजरेसमोर येत नाही. तसे आणणेही उचीत नाही.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोक काका एकदम मार्मिक प्रतिसाद
सहमत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< आतिवास यांच्या त्या संदर्भातील मताविषयी म्हणू इच्छितो की, ज्या दिवशी देशाला/राज्याला सुपरिचित असणारी व्यक्ती स्वर्गवासी होते, त्याच दिवशी तिच्या कारकिर्दीचे "डिसेक्शन" करायला अपॅरॅटस घेऊन बसू नये हा एक सर्वमान्य संकेत असतो तो पाळावा....>>

मला वाटतं, मीही हेच म्हणते आहे.
काही वेगळं मत पोचतंय का तुमच्यापर्यंत माझ्या वाक्यातून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेत्यांमध्ये समाजाची फार मोठी इन्व्हेस्टमेंट असते.

या वाक्याचा अर्थ कळला नाही. सोनियाबाईंपासून आमच्या गल्लीतल्या कुठल्याही नेत्यासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट केली असे वाटत नाही. हे सगळे नेते बळजबरीने आमच्या डोक्यावर बसले आहेत. आज जर कुणाविषयी आदर व भक्तिभाव उरला असेल तर तो फक्त आपल्या तिरंग्यासाठीच आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळे नेते बळजबरीने आमच्या डोक्यावर बसले आहेत

या वाक्याचा अर्थ कळला नाही.

बाकी नेत्यांमधील सामाजिक इन्व्हेस्टमेंटविषयी वेगळे लिहायचा विचार आहे. सवडीने लिहीन. हा धागा त्यासाठी अप्रशस्त वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोजून यासाठी लिहिले आहे की दिवंगत व्यक्तीच्यी काही कृत्यांबद्दल/कार्यकालातील निर्णयांबद्दल मत प्रतिकुल असल्यास ते मत श्रद्धांजलीच्या धाग्यावर देणे मला औचित्यपूर्ण वाटत नाही.

असो. बहुदा माझ्या प्रतिसादावर (त्यातही पहिल्या वाक्यावर) असलेला आक्षेप मला अजूनही समजलेला नाही! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द राज्याच्या सर्वोच्च राजकीय पदापर्यंत नेणारा हा नेता कर्तबगार नक्कीच होता.
वाईट वाटले.
माझी श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावपूर्ण श्रद्धांजली.

आरा आणि पाटीलसाहेब यांच्या मताशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

विलासरावांच्या कारकीर्दीबद्दलचा एक उत्कृष्ट लेख : http://moklik.blogspot.in/2012/08/blog-post_4537.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद.

राजकारण्यांबद्दल वाईट गोष्टी शोधणं कठीण नाही, पण एखादा मनुष्य एवढे घोटाळे करण्याइतपत मोठा का झाला हे मात्र सापडत नाही.
विलासरावांची विनोदबुद्धीही चांगली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखादा मनुष्य एवढे घोटाळे करण्याइतपत मोठा का झाला हे मात्र सापडत नाही.

रोचक प्रश्न पडला आहे.
मुक्तसुनीत यांनी वर एक दुवा दिला आहे. त्यात विलासरावांविषयी जी नकारात्मक भाष्ये आहेत, त्यातही बरेच रीड बीटविन द लाईन्स करता येते आणि तिथे बरीच माहिती दडलेली आहेत.
हा अधिक चर्चेचा विषय आहेच. आरा काय लिहितात ते पाहूया. त्यांनी स्वतंत्र धागा केला तर तिथं जरूर लिहिता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विलासराव देशमुख यांच्या मृत्यु झाल्याचे समजल्यावर फारसे दु:ख झाले नाही. कुटूंबिय व इतर जवळच्या लोकांच्या दु:खाविषयी सहानुभूती वाटते.विलासराव गेल्याची बातमी प्रत्येक मराठी वृत्तपत्रात-वाहिन्यांवर उपलब्ध आहे. ती येथे नव्याने पाहिल्यावर गंमत वाटली.

त्यांच्या मृत्युनंतर आपले मोठे सामाजिक नुकसान होत असते.

त्यांच्या मृत्युने काय सामाजिक नुकसान झाले आहे हे कळू शकले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती येथे नव्याने पाहिल्यावर गंमत वाटली.

गंमत वाटण्यासारखी कोणती गोष्ट यात आहे बरे. पेपरात बातम्या आल्या म्हणून काय कुणी आपली श्रद्धांजली व्यक्तच करायची नाही की काय. ही प्रतिक्रिया वाचून खेद वाटला एवढेच बोलतो.
कार्यरत असलेल्या एका मंत्र्याच्या, अर्थात सर्वोच्च राजकीय कार्यकारी अधिकार्‍याच्या (पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह) मृत्युने समाजाचे काय नुकसान होते ही काही गोपनीय बाब नाही.

(माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आणि राजकीय नेत्यांचा अतिशय वाईट अनुभव ते अतिशय चांगला अनुभव अशा सगळ्या रेंजमधून मी गेलेलो आहे.) स्व. विलासरावांविषयी मला वैयक्तिक काही अनुभव नाही. त्यांच्यावरील आरोप इत्यांदिवर बोलायची ही जागाही नाही, आणि ती वेळही नाही. पण ते मृत्युसमयी केंद्रीय मंत्रीपदावर होते या अर्थाने आपल्या देशाचे नेते होते. त्या नात्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात संस्कारही झालेले आहेत. शिवाय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला श्रद्धांजली नसेल व्यक्त करायची तर मौन श्रेयस्कर; पण ते गेल्याने काय नुकसान झाले इत्यादि टिप्पण्यांनी कळत नकळत औचित्यभंग होतो असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमत वाटली कारण चौकाचौकात लोक मोठाले बॅनर लावून श्रद्धांजली व्यक्त करतात तसाच हा प्रकार वाटला. श्रद्धांजली अर्पण करणार्‍यांना दुखावण्याचा हेतू नव्हता.

केंद्रात मंत्री असल्याने एखाद्याचा आदर बाळगावा हे माझ्या आदरणीय असण्याच्या निकषांत नाही. गद्दाफी किंवा आसाद किंवा लादेन किंवा नारायणदत्त तिवारी किंवा सुरेश कलमाडी किंवा आणखी कोणी मेल्यानंतरही ते कोणाचेतरी नेते असल्यामुळे त्यांच्या कृष्णकृत्यांविषयी बोलू नये असे काही आहे का?

स्व. देशमुख यांची एक उच्च पदावर पोचलेली व्यक्ति एवढीच ओळख माझ्यासाठी आहे. त्यांच्या कृत्यांची चर्चा न करता एकूणातच त्यांच्या मृत्युने झालेल्या तथाकथित-उपरोल्लिखित सामाजिक नुकसानाची चौकशी करण्यात मला काही गैर वाटले नाही. तुम्हाला हा औचित्यभंग वाटला असल्यास माझा नाइलाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या हेतुंविषयीचा खुलासा मान्य आहे.

किंवा आणखी कोणी मेल्यानंतरही ते कोणाचेतरी नेते असल्यामुळे त्यांच्या कृष्णकृत्यांविषयी बोलू नये असे काही आहे का?

इथे तीन मुद्दे आहेत.
१. मंत्री हा "कोणाचातरी" नेता नसतो. आपल्या सगळ्यांचाच असतो. आपण त्याला मत दिलेले नसले तरी. किंवा त्याच्या विरोधकाला मत दिलेले असले तरी.
२. कृष्णकृत्यांविषयी बोलणे वेगळे, आणि कृष्णकृत्यांच्या आरोपांविषयी बोलणे वेगळे.
३. वरील मुद्द्यामध्ये "कृष्णकृत्य" सिद्ध झालेले आहे हे गृहीत धरले, तरी जेंव्हा एक लोकनियुक्त शासन (अर्थात लोकांतर्फे) दुखवटा जाहीर करते, तेंव्हा, त्या दुखवट्याच्या काळात तरी त्या तथाकथित कृष्णकृत्यांविषयी बोलणे हा औचित्यभंग आहे. यातील कायदेशीर बाब मला ठाऊक नाही; पण माझी समज अशीच आहे.

तुमच्या नाइलाजाबद्दल माझे काही म्हणणे नाही. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही लिहिले, मला काय वाटते ते मी लिहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकीय व्यक्तींच्या मृत्यूनंतर अल्पकाळात केलेले मूल्यमापन आणि औचित्य हा रोचक मुद्दा आहे. विलासराव असोत नाही तर कुणीही असोत, त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या "आदर्श" प्रकरणातल्या , या प्रकरणानंतर अशोक चव्हाण यांच्याबरोबर चालवलेल्या टोलवाटोलवा संबंधीच्या , २६/११ च्या बाँबहल्ल्यांनंतर ज्या कारणांमुळे आणि ज्या रीतीने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्या सगळ्या गोष्टी अगदी अलिकडच्या आहेत आणि त्या पुसता येणे शक्य नाही. मी वर उधृत केलेल्या सुनील तांबे यांच्या लेखामधून ज्याप्रमाणे त्यांचं राजकीय कर्तृत्व, त्यांच्यातील श्रेयस-प्रेयस यांचा लेखाजोखा मांडला गेला त्याच प्रमाणे त्यांच्या न पुसता येणार्‍या चुकीच्या गोष्टींची चर्चा अपरिहार्य आहे.

<<<<एका मंत्र्याच्या, अर्थात सर्वोच्च राजकीय कार्यकारी अधिकार्‍याच्या (पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह) मृत्युने समाजाचे काय नुकसान होते ही काही गोपनीय बाब नाही. >>>
ए. राजा, कलमाडी यांच्याबद्दलही हेच म्हणता येईल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मोठा विषय आहे. सवडीने बोलतो. औचित्याचा मुद्दा फार महत्वाचा आहे. एखादा माणूस एखाद्या पदासाठी योग्य की अयोग्य ही गोष्ट वेगळी; आणि तो त्या पदावर आहे ही वस्तुस्थिती मान्य करुन त्या पदासोबत असलेले गांभीर्य बाळगणे ही बाब वेगळी. त्या पदावर असताना मृत्यु झाल्यामुळे शासकीय इतमाम, दुखवटा, राष्ट्रध्वज अर्धा उतरवणे इत्यादि सोपस्कार/ मान पाळले जातात. त्याला औचित्य म्हणतात. आणि ते शासनासोबतच सर्व लोकांनी पाळावे ही किमान सभ्य अपेक्षा आहे, कारण त्यातून आपण (आपल्याच, आपणच निर्माण केलेल्या) व्यवस्थेविषयी आदर व्यक्त करत असतो - (केवळ) एखाद्या व्यक्तीविषयी नव्हे.

ए राजा असोत की कलमाडी असोत की आणखी कुणी असो; ज्या पदावर ते असतील त्या पदानुसार त्यांचा प्रोटोकॉल हा पाळावाच लागतो. ते पदावर नसतील तर वेगळी गोष्ट आहे. उद्या कलमाडी राष्ट्रपती झाले तर त्यांना हिज एक्सलेन्सी दि प्रेसिडेण्ट ऑफ इंडिया म्हणावेच लागते, आणि तिन्ही सेनाप्रमुख त्यांना सॅल्यूट्चा मान देणारच. तो त्या पदाचा मान आहे.

आणि व्यक्तीविषयी म्हणाल तर ती ज्या दिवशी गेली त्याच दिवशी तिच्या चारित्र्याची चिरफाड करणे, किंवा त्या रोखाने टिप्पणी करणे हा निश्चितच सभ्य संकेत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील लेखन 'ई-सकाळ'मध्ये आत्ताच वाचले.

"महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या विलासरावांचे गावागावातील कार्यकर्ते त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी आता खपू लागले आहेत.कुटुंबियांनी परवानगी दिल्यास विलासरावांच्या अस्थी जिल्हयाजिल्हयात नेण्याचा विचार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या अगोदरच जाहीर केला आहे. सर्वप्रथम कोल्हापूर कॉंग्रेस कमिटीने अमित यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा ठराव केला. आता त्यांच्या पाठोपाठ ही मागणी करणाऱ्या कॉंग्रेस कमिटयांची संख्या वाढली आहे.विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांना नुकतेच विधानपरिषदेत दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.मुलगा आणि बंधू या दोघांनाही विलासरावांनी सातत्याने आग्रहपूर्वक प्रतिनिधित्व मिळवून दिले.साखर कारखाना तसेच अन्य संस्थांवर मात्र अमित यांचा पगडा आहे.विलासरावांचा वारसा चालवण्यासाठी या पैकी कुणाला मंत्रिमंडळात संधी दिली जाईल या बाबत सध्या उत्सुकता आहे.राज्यसभेवरील रिक्‍त जागेसाठी वैशालीताई देशमुख यांना विनंती करावी असाही काही कार्यकर्त्याचा आग्रह आहे तर उल्हासदादा पवार यांना संधी दयावी असा काहीजणांचा प्रयत्न आहे."

मुलगा आणि बंधु ह्यांना'आग्रहपूर्वक' प्रतिनिधित्व मिळवून देण्यापलीकडे कै. विलासरावांचा कोणता वारसा आहे, जो चालवायची आवश्यकता आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0