हल्लीच काय खरेदी केलंत ?

अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.

एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.

कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.

तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.

यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं.

नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे.

..............

गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली.

B

शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो.

आ

field_vote: 
0
No votes yet

तुळशीबागेत गेलेलो असताना खेळण्यातली आगबोट दिसली.
त्यात वात लावायची, तेल टाकायचं; झुक झुक करत मस्त फिरायला लागते पाण्यावर.
लै मज्जा आली.
हे ते जहाज --
http://www.amazon.in/Kuhu-Creations-Explorer-candle-flame/dp/B01HWA6ALS?...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुटपुटलाँच म्हणायचो त्याला लहानपणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही फटफट बोट म्हणायचो. च्यायला पण १४० रुपयाला झाली राव. मला गड्ड्यावर २० रुपयाला घेतलेली आठवते. ह्या खेळण्यावर मी इतके प्रयोग केलेत की बस्स. ह्या बोटीची एक अ‍ॅडव्हान्स आवृत्ती आलेली. प्लास्टीकची असायची. त्यावर फुगा बसवला की नॉझलमधून हवा पास व्हायची व बोट पळायची. आवाज यायचा नाही.

ह्या बोटीपेक्षा माझा आवडता लाल पत्र्याचा ट्रॅक्टर (जो जुन्या मॅसे फर्गुसन किंवा एचएम्टी सारखा असायचा) .आणि जेसीबी. माझ्य आजोबांनी एका मॉडेल ट्रेनचे डब्बे दिलेले. त्याची ट्रॉली करुन त्याने अर्थमुव्हिंग करत बसायचो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुळशीबागेत गेलेलो असताना खेळण्यातली आगबोट दिसली.
त्यात वात लावायची, तेल टाकायचं; झुक झुक करत मस्त फिरायला लागते पाण्यावर.
लै मज्जा आली.
हे ते जहाज --
http://www.amazon.in/Kuhu-Creations-Explorer-candle-flame/dp/B01HWA6ALS?...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि साहेब , मिट्टी अत्तराचा फीडबॅक द्याल काय ? पावसातल्या विशेषतः पहिल्या पावसाच्या वेळी येणार मृदगंध हा जिओस्मीन नावाच्या पदार्थामुळे येतो. मातीतील काही विशिष्ट अक्टिनोमायसीट्स( एक प्रकारचे बॅक्टरीया ) तयार करतात . कॉलेजात असताना माझ्या काही सहाध्यायांनी त्या अक्टिनोमायसीट्स पासून त्याची लॅब मध्ये निर्मिती केली होती . हे कमर्शिअल प्रोडक्ट केमिकली तयार केलंय का मायक्रोबायॉलॉजिकली हे जाणण्यात इंटरेस्ट आहे ...

आणि " रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. " हे अजून मिळतं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कनौजमधे हे कसं तयार करतात यावर हा लेख पहा:

http://www.hindustantimes.com/more-lifestyle/mitti-attar-take-home-that-...

माती खापरांच्या रुपात भाजून मग भट्टीत उकळून हायड्रोडिस्टिलेशन केलं जातं.

ज्य बेस ऑईलमधे हा अर्क उतरवला जातो त्या मूळ ऑईलच्या किंमतीनुसार १०० ते १००० रुपयांपर्यंत रेंज मिळते. (१० मिली) मी हायर एन्डचं मागवलं. अगदी खास मातीचा मोहक वास आहे. पण अगदी सौम्य अत्तर आहे. फाया ठेवल्यास नाकाला मस्त फील येतो पण खोलीभर किंवा दिवसभर घमघमाट टिकत नाही.

.....

रेकॉर्डप्लेअर मिळतात ५-६ हजारांपासून पुढे किंमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा , वा , धन्यवाद , हे सोपं दिसतंय ( आम्ही लॅब मध्ये करायचो तो पोरखेळ च होता तर .... Smile , काहीच गरज नव्हती त्याची )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेकॉर्ड प्लेअरविषयी : कितीला पडला? वेगवेगळ्या आरपीएमच्या रेकॉर्ड्स वाजतात का? पीसीला कनेक्ट करून एलपी कन्व्हर्ट करता येतात का? एक्स्टर्नल स्पीकर्स लावता येतात का? आर्म किती हलका / जड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साधारण आठ हजाराला पडला. ५-६ हजारापासून पुढे ऑप्शन्स आहेत.

सर्व आरपीएमच्या रेकॉर्ड चालतात.

पीसीला जोडून एम्पीथ्री बनवता येतात.

एक्स्टर्नल स्पीकर्स लावता येतात.

आर्म हलका आहे. पण मॅग्नेट टाईपचा स्टायलस आहे.

घरी बसून पूर्ण पोर्टेबल प्लेअरवर समाधानकारक स्पष्ट आवाजात जुन्या रेकॉर्ड ऐकण्यासाठी उत्तम आहे.

अगदी साऊंड टेक्निशियन्स / इंजिनियर लोकांसाठी हा बनलेला नाही.

कमी किंमत हे बलस्थान आहे. एकदम हाय एंड , थिएटर इफेक्टवाले, ७.१ चॅनल, इक्वलायझर इत्यादि अपेक्षा असतील तर किंमत लाखावर जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माफ करा पण या जमान्यात एलपीप्लेअर वगैरे जंक वाटत नाही का? आहे त्याच थाळ्या किती दिवस वाजवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. नवीन थाळ्याही येतात अमेझॉनवर.

शिवाय जुनं ते जंक असं कोणाला वाटत नसेल तर त्यांजसाठी हे उपकरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...३३-१/३ची थाळी ४५ किंवा ७८ला पळविणे (किंवा व्हाइसे व्हर्सा), थाळीला चरे पाडून त्यात ठराविक ठिकाणी पिन अडकविणे, असल्या गमतीजमती करता येतात काय तुमच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'त???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थाळ्या एकदाच वाजवायच्या. पण त्या थाळ्यांत अडकलेली अमूल्य गाणी काढून घ्यायची, हा ही उद्देश असू शकतो. त्याशिवाय,
७८ आर्.पी.एम. च्या रेकॉर्डस मधून गाणे जे ऐकू येते, ते आत्ताच्या डिजिटल्च्या तोंडात मारेल, अशा क्वालिटीचे असते, असा रिमार्क मी अलिकडेच एका दर्दी रसिकाकडून ऐकला. त्या अर्थी तो खरा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हि ऐकलंय असंच.
आता गवि ऐकवतील आपल्याला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थाळ्या एकदाच वाजवायच्या. पण त्या थाळ्यांत अडकलेली अमूल्य गाणी काढून घ्यायची, हा ही उद्देश असू शकतो. त्याशिवाय,
७८ आर्.पी.एम. च्या रेकॉर्डस मधून गाणे जे ऐकू येते, ते आत्ताच्या डिजिटल्च्या तोंडात मारेल, अशा क्वालिटीचे असते, असा रिमार्क मी अलिकडेच एका दर्दी रसिकाकडून ऐकला. त्या अर्थी तो खरा असावा.

थाळ्या म्हणजे मला गाणीच अभिप्रेत होती. तीच ती जुनी गाणी कितीदा घासत बसायची. नवी गाणीही छान आहेत ब्वॉ. डिजिटलच्या तोंडात मारेल अशी क्वालिटी ८०००च्या एलपीप्लेअरमध्ये नसेल असा अंदाज आहे. शिवाय नव्या थाळ्या ज्या येतात त्या अनेकदा डिजिटलमधून थाळीवर आणल्या जातात. डिजिटलमध्ये ऑलरे़डी झालेला लॉस थाळीवर भरुन निघणार नाही. (आडात नाही तर पोहऱ्यात कुठून आणणार?). या व्यतिरिक्त थाळीच्या आवाजाचा तो विशिष्ट गेंगाणा टोन आणि पिन ओऱखडल्यासारखा किंचित बॅकग्राऊंड आवाजही डोक्यात जातो.

घरात ताजमहालची प्रतिकृती ठेवल्यासारखा एक नॉव्हेल्टी आयटम म्हणून ठीक आहे. पण प्रत्यक्ष काय उपयोग आहे याचा अंदाज घ्यायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थाळीच्या आवाजाचा तो विशिष्ट गेंगाणा टोन आणि पिन ओऱखडल्यासारखा किंचित बॅकग्राऊंड आवाजही डोक्यात जातो.

अगदीच चावीच्या कर्णावाल्या ग्रामोफोनबद्दल वाटतंय हे.

लहानपणी घरी असलेले आधी फिलिप्स आणि मग तोशिबा हे प्लेयर्स कधीही चरचर किंवा गेंगाणा आवाज करायचे नाहीत.

सध्याचा नवीन रे.प्ले. तर अजिबातच नॉईज होऊ देत नाही. डिजिटलपेक्षा उत्तम आणि स्पष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिजिटल मधे लॉस होण्याचे दिवस गेले गवि आता. तुम्ही २० वर्षापूर्वीचे बोलताय.

मुळात जे आधी तबकडीवर अ‍ॅनॅलॉग होते ते नंतर डिजिटल केले तर ०.००१% तरी लॉस होणारच. त्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा दोष नाही.

पण आता नविन रेकॉर्डींग डिगिटल आणि तबकडीवर केले अ‍ॅनॅमॉग मधे तर काही फरक जाणवणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> रेकॉर्डस मधून गाणे जे ऐकू येते, ते आत्ताच्या डिजिटल्च्या तोंडात मारेल, अशा क्वालिटीचे असते,<<
..........पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताबाबत म्हणजे वाद्यसंगीताबाबत (सिम्फनी, कन्चेर्तो, चेम्बर म्यूझिक, इ.) हा माझाही अनुभव आहे. त्यामुळे ते संगीत ऐकण्यासाठी माझे प्राधान्य तबकडीलाच आहे. मात्र गायनाविषयी - भारतीय वा पाश्चिमात्य - माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेकॉर्ड प्लेयर बघून फारच स्मरणरंजन झालं. आमच्याकडे होता रेकॉर्ड प्लेयर. अजूनही असेल. भाऊ वापरत नसेल तर घेऊन येईन इथे. अँटीक म्हणून मिरवता येईल. अतिशहाणा, कालच सकाळी एनबीसीवर रेकॉर्ड बनवतात त्या कारखान्याची धावती भेट घडवून आणली. रेकॉर्डला मर्यादित वर्तुळात पण वाढता खप आहे असं त्या कारखान्याची मालक सांगत होती. जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलं की हमखास रेकॉर्ड्स दिसतात. त्यांची कव्हरं, अल्बम आर्ट, मोठ्या आकारात म्हणून रेकॉर्डवर आणखी उत्तम दिसतं.

मी चार-पाच आठवड्यांपूर्वी ग्लॅडिओलाचे कांदे खरेदी केले. १७ डॉलरला ५२, म्हणजे रुपयाला तीन. ठीक आहे. ५२ म्हणजे जरा जास्त वाटले कारण तेवढे खड्डे खणायचं काम मलाच करावं लागणार. दर आठवड्याला १०-१० पेरायचं असं ठरवलं. दोन आठवड्यांपूर्वी लक्षात आलं की ५२ कांदे फुकट मिळाले, एकून १२० आहेत. काल दुपारभर मेहनत करून त्यांतले शेवटचे ६० कांदे पेरले. आणि ३-४ आठवड्यांपूर्वी पेरलेल्यातले ५ आता जमिनीबाहेर डोकं काढायला लागले आहेत. इथल्या डिप्रेसिंग उन्हाळ्यात रंगीत फुलं दिसतील अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अँटीक म्हणून मिरवता येईल.

कोणाला???

ठीक आहे. ५२ म्हणजे जरा जास्त वाटले कारण तेवढे खड्डे खणायचं काम मलाच करावं लागणार. ... काल दुपारभर मेहनत करून त्यांतले शेवटचे ६० कांदे पेरले. आणि ३-४ आठवड्यांपूर्वी पेरलेल्यातले ५ आता जमिनीबाहेर डोकं काढायला लागले आहेत.

अपार्टमेंटात खड्डे खणलेले, पेरलेले चालते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरखरेदी जुनी झाली म्हणून इथे लिहिलं नाही.

पण अपार्टमेंटाच्या जमिनीत जिथे तण माजलेलं होतं तिथे रानफुलांच्या बिया पेरून मगच अपार्टमेंट सोडलं होतं. आता जाऊन बघितलं पाहिजे; आमच्याकडे रानफुलांचा हंगाम आता सुरू झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्लु बॉनेट हे टेक्सासचं स्टेट फ्लॉवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या मुंबई ड्यूटीफ्रीमधे काय ऑफर्स चालू आहेत? कोणी हल्लीच आलंगेलं आहे का?

थायलंडमधे हत्तीच्या पिल्लाने झाड आणि फूल असं चित्र समोरच पेंट केलेला टीशर्ट ४०० बाथांना घेतला.

पटायात डुरियन फळाचं आईस्क्रीम घेतलं. सडक्या कांद्याचा वास पण गराळ गोड चांगली चव असं अतिविचित्र कॉम्बिनेशन होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुरियन फळाचं आईस्क्रीम घेतलं.

अरे कर्मा! फील बॅड फॉर यू!!
पुलंनी पूर्वरंगात दूरीयान बद्द्ल लिहिलं होतं म्हणून इथे दूरीयान बाजारात दिसल्यावर मुद्दाम घेतला होता.
अशक्य पस्तावलो!!!
महाभिकार वास! नंतरचा आठवडाभर तो घराला लागलेला वास घालवण्यासाठी रोज अगरबत्या जाळत होतो!!
सोडे आणि सुके बांगडे परवडले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. ते खाल्ल्यावर पुढे आठवडाभर कोणीच मजसमोर उभे राहायला मागेनात. जनावर मेल्यासारखा वास वगैरे वर्णन चाललं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थायलंडमधे हत्तीच्या पिल्लाने झाड आणि फूल असं चित्र समोरच पेंट केलेला टीशर्ट ४०० बाथांना घेतला.

हत्तीच्या पिल्लाला कशाला हवाय शर्ट? मुंगीपासून आपली लाज वाचवण्यासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हत्तीच्या पिल्लाने त्या शर्टावरचं डिझाईन पेंट केलंय, शर्ट नाय घातलेला. शर्ट माणसासाठीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं