होळीची लावणी

काल खफवर धुळवड झाली. पण तुम्ही मिस करू नये म्हणून हा धागा काढते आहे. चला तर होऊन जाऊ द्या शिमगा.
बघता काय व्हा सामील. कल्पनाशक्तीचं वारू आणि काव्याचं तारू द्या भरकटू. होळी काय एकाच वर्षी परत परत येत नसते Wink तेव्हा जोर लावा न हो ऊन जाऊ द्या तर काय Wink
.
आबांनी सुरुवात केली,
.

तुम्हाघरच्या गुळाला सजना
आमच्या तुपात भिजवा
अन् राया चला, पिर्तीचा सांजा शिजवा

.
.
अभ्याने रंग भरले. ओयहोय!! भांडाभांडी काय, अन वाफकोंडी काय Wink बहार आणली.
.

गुळासंगं भाजण भांडली
भांडं झाकून वाफ कोंडली
हबका माराया हात जरा.....भिजवा
अन् राया चला, पिर्तीचा सांजा शिजवा

.
.
ही माझी
.
.

गुळापुरानाचं सांदणं खमंग भाजले ,
जोराजोरानं कणीक गोळे तिंबले
आता खरंच बाई मी घामाघूम झाले
.... आता तुमीच पुढाकार घ्या ना गडे .....
तेल -तुपाचं बोट पोळीवरनं फिरवा,
राया मला पिरतीची पुरणपोळी भरवा

आम्हा तिघाना मार्कं द्या आणि तुम्हीही भर घाला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सजनी
सोड ना गूळाचा सांजा गडे
चोख ना पिरतीचा उस गडे
आनंदी आनंद गडे
जिंकले तिकडे चो हीकडे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंग दी सारी गुलाबी चुनरीया रे,
मोहे मारे नजरीया सांवरीया रे
.
जावो जी जावो करो ना बताइयां

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“मातले रान मातले प्राण खळाळे पायात नीर
पहाते जेथे अनंग तेथे उभा हा रोखून तीर
अशा या वेळी झाल्ये मी खुळी ऐकून वेणूचे सूर
जवळ बाई मोहन नाही तरी मी लाजुन चूर”
________________________________________________

” आज पहाटे स्वप्नी आला घनःश्याम श्रीहरी
अधरांवर मम अधर ठेवले धरून मजला उरी
बावरल्ये मी झाले जागी तेव्हापासून अशी
निळ्या भ्रमाने चित्त भारुनी झाल्ये वेडीपिशी
मंचक दिसला निळा जाहला निळी जाहली शेज
निळ्या सकाळी निथळत होते निळ्या नभाचे तेज
निळ्या जळाने भरले दिसले निळे होऊनी घडे
निळावल्या प्राजक्ताखाली निळ्या फुलांचे सडे
निळी पाखरे निळी वासरे निळा वायुचा छंद
निळ्या आसमंतातुन सुटले निळे निळे सौगंध
व्याकुळले मी गमले मजला मीच जाहले निळी
निळेनिळे का दिसते सगळे मला जळी अन स्थळी
धावत आल्ये घरी आरशा पुढे राहिल्ये उभी
निळ्या दर्पणी मुळी दिसेना माझी मजला छबी
______________

This one is too good -

” मकरंद धुंद लव उन्मिलीत सारंगे
त्या परी नयन जड प्रणयमदाच्या संगे
विमनस्क उसासत स्मरसुंदर स्मरणाने
ताणले चाप जणु लावून बाण अनंगे //
त्या मदनशरांनी विद्ध जाहली राधा
तापली तनुलता होऊन मोहन बाधा
कुच अधिकच उन्नत तंग कंचुकी-बंध
हा विरहव्यथेचा प्रकार नाही साधा //
आठवले कालच पूर्णचंद्र उदयाला
हिंदोळत होता तरुशाखेवर झूला
त्या हिंदोळ्यावर कृष्ण आणखी राधा
त्यासवे गळ्यातील शुभ्र फुलांच्या माळा //
वेढले हरीने राधेला करपाशी
ओढिले आणखी निकट तिला हृदयाशी
देखिली मेखला कटिवरुनी ढळताना
मी उभीच होत्ये तेथून दूर जराशी // ”
.
.
याचा अर्थ असा की हा प्रणय सुरू असताना राधेची सखी तिथंच जवळपास उभी होती. साहजिकच तिच्या मनात ते पाहून लज्जा उत्पन्न झाली.
.
.
” लाजून जाहले अगदी चूर मनात
तो चंद्रबिंबही लपले कृष्णघनांत
मी पुढे आणखी तिथे थांबल्ये नाही
परतल्ये घरा शोधीत तमातून वाट // ”
सखीच्या मनात रात्रभर विचारांचे तरंगच येत राहिले.
” कुणि कसे जपावे स्वतःस वयसाकाळी
राधा तर कृष्णास्तव धरणीवर आली
तो अंगसंग नच मीलन जणु प्राणांचे
ती समर्पणातच अशी अलौकिक झाली //
मी विचार करत्ये अता कालच्या रात्री
किती अमृत स्रवले असेल तिचिया गात्री
यापुढे सतत ती विरहिणीच राहील
वाहेल जोवरी जल यमुनेच्या पात्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे;
नव रत्ने तू तुज भूषविले,
मन्मम खुलले आतिल का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उक्लील का ?
.
हृदयी माझ्या गुलाब फुलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
काटा माझ्या पायी रुतला,
शूल तुझ्या उरि कोमल का ?
माझ्या शिरी ढग नीळा डवरला,
तव नयनि पाउस खळखळला;
शरदच्चंद्र या हृदयी उगवला,
प्रभा मुखी तव शीतल का ?
मद्याचा मी प्यालो प्याला,
प्रिये, तयाचा मद तुज आला;
जखडिले कुणि दोन जीवांला
मंत्र बंधनी केवळ? का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उकलील का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://lh3.googleusercontent.com/UD-Xl8aahT4xuQWpGxhu6P5yTDds7JUyH_zJFBaadn2YASAuRGVRl0dqs24IJeihXpH2Cu446lW3N4HKjXh3qSuf_wNFKggXLgI8B0X7wiZt_Qm8nibZCO8X7exelMnuBs0EANJY26tXl4qCpUAUdzJs5kh8-0Q3h61IHTCL-JQG8uDqFGNPGHslFrf4BRaZ4U8CDUa-0TyE2-tK5eZe_tprzEMxztJMXcD6kTEjz0jf5dA9o_hHM41DlsRJmkCO50lfzljhdaDTXFv7efP9OIZaCweIB3XXwd54D4ZVzPCzNssoeK3YIJCCckbx-g0wueQxRJRGVOK-kLS3Z7K4TOA_rcwnRK1PirvDfnk9-qdRQqa-DYm24K4GoGD_JU7XWX45aTXUMRsId_NtQD7UHcqYx8dwNuV25-a4dNsI8Psz1jHE6-ZQDxIxKYxNUBMHFxo7rac2nWgM1sTmlz8Hkqj2Whhn3qBDpX8Wj6t03umoD5skQgSfUMsrLvBwya7V-Ra2-eO2I1tJAPXBHROstSgimmWJJelz-k0ySkdSppP6WbiE0cUBZVTCTae6YrF3v2iqbPi2D4fAt2nnL9j-pvf2h8o2NszQMdOf3gllUsJxnZATyD0T4Q=w416-h662-no
.
.
https://lh3.googleusercontent.com/UZZVA8C1131IH0HvUuojDXPIZtKhLp5pe0tOg0OCZNrS3E-57X-4AYzWrs-9UeaWP8gdk-xITC_ZwClfX4Bgg5w6coEzlw0-NCzEj1zXx5_SSIuWMpKwC54pjaqJ8QpabQXXAqHnC5GnXD17wAtk9-4D87zwcVoUC02GZ6nnxxGb0zrH3B_OlJv6Ai-rGT2S76Q-zhqCbtipmLh8SRVf24z_JF0peY0mSC3TruKa60N7StpwAHX6rPsIHg8YgXMWVU-aFpgjH9SUhoPeN8V7hJebov8vYSKLKAiqje8EbDf82TBUxC-mTiTBvyQId2MR5V2wYAgN-kTVHo-wi7hxER_1kKk4473Melb7yAGpyJ9SCCGDK7PeGnM0CNP9u1gN7wyt42cyq1Y-rbxkbY-ZjNw2Lj5e-vYgFXbVbm063TbFBHgQeRXhGu96hBcEfF_2MsdUlXuuhAts3-wgo-zAVSnZa6fs_k5izPbaUjgfJBOlLRTTXmD4PgXOOg6eSzABJKXjBB3XGzoh6YfNYvjK1c-K2Fipy5i4V6W9so1CLr0a7j7_o-NMGoEf0RrAGsNTi4u3g11GQQedNYrDBHdn9QaFoVwPwJ2EaiyNZik7LvZHk3DwEMdD0w=w895-h662-no

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळाच्या सांज्याची कृती द्यावी लागेल लवकर.

"आबांच्या नळाला प्रतिभेची धार" !!मिपावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

haahaahaa!!! mast Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कौन रंग फागुन रंगे, रंगता कौन वसंत?
प्रेम रंग फागुन रंगे, प्रीत कुसुंभ वसंत।

चूड़ी भरी कलाइयाँ, खनके बाजू-बंद,
फागुन लिखे कपोल पर, रस से भीगे छंद।

फीके सारे पड़ गए, पिचकारी के रंग,
अंग-अंग फागुन रचा, साँसें हुई मृदंग।

धूप हँसी बदली हँसी, हँसी पलाशी शाम,
पहन मूँगिया कंठियाँ, टेसू हँसा ललाम।

कभी इत्र रूमाल दे, कभी फूल दे हाथ,
फागुन बरज़ोरी करे, करे चिरौरी साथ।

नखरीली सरसों हँसी, सुन अलसी की बात,
बूढ़ा पीपल खाँसता, आधी-आधी रात।

बरसाने की गूज़री, नंद-गाँव के ग्वाल,
दोनों के मन बो गया, फागुन कई सवाल।

इधर कशमकश प्रेम की, उधर प्रीत मगरूर,
जो भीगे वह जानता, फागुन के दस्तूर।

पृथ्वी, मौसम, वनस्पति, भौरे, तितली, धूप,
सब पर जादू कर गई, ये फागुन की धूल।
____________

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Please start VYANI facility ...... ppl are going crazy ROFL Good Night!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0