इंडो-युरोपियन भाषांचं मूळ तुर्कस्तानात

भारतीय आणि अनेक युरोपियन भाषांना इंडो-युरोपियन भाषासमूह म्हटलं जातं. त्या सर्व भाषांची मूळ भाषा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आताच्या तुर्कस्तानात निर्माण होऊन इतरत्र पसरली असावी असा दावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनात केला गेला आहे. भाषेची उत्क्रांती ही सजीवांच्या उत्क्रांतीसारखी आहे असं मानून त्यातली प्रतिमानं (मॉडेल्स) शब्दांना लावून २००३ सालच्या संशोधनात हे विधान आधी केलं गेलं होतं. 'आई', 'शिकार', वाहनांशी संबंधित शब्द अशा काही शब्दांची ८७ भाषांमधली रूपं तुलनेसाठी यात वापरली गेली होती. रोगप्रसार कसा होतो याविषयीची प्रतिमानं आणि १०३ भाषांमधल्या शब्दांचे संदर्भ वापरून आता त्या शास्त्रज्ञांनी आपलं नवं संशोधन नुकतंच 'सायन्स' मासिकात सादर केलं आहे. त्यात त्यांना पुन्हा तोच निष्कर्ष काढता आला आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ दाव्याला अधिक बळकटी आली आहे असं ते म्हणतात. याविषयी शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. काहींच्या मते ह्या भाषांचं मूळ सध्या युक्रेनमध्ये असलेल्या भागात आहे.

ताज्या संशोधनाविषयी अधिक माहिती - http://www.nature.com/news/a-turkish-origin-for-indo-european-languages-...
मूळ संशोधनाविषयी (२००३) - http://www.nature.com/news/2003/031124/full/news031124-6.html

'सायन्स'मधला संपूर्ण शोधनिबंध (फक्त सभासदांसाठी) - http://www.sciencemag.org/content/337/6097/957.full

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक! यावरील चर्चा वाचण्यास उत्सुक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान रे माहितगारा. दुपारचे जेवण झाल्यावर हे संशोधन वाचून दाखवणार म्हणालेत.तसे आपल्या भारतिय भाषांत अनेक शब्द बाहेरून आलेत हो. बझार्,तनखा,हिंमत हे सगळे अभारतिय शब्द असे शिरिषने कुठेसे वाचले होते.
(चर्चा वाचण्यास उत्सुक असलेली) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सव्वादोनशे वर्षांपूर्वी विल्यम जोन्सला संस्कृत आणि ग्रीक-लॅटिनसारख्या युरोपीय भाषा ह्यांच्यामधील लक्षणीय साम्याची जाणीव झाली तेव्हापासून एक प्रोटो-इंडो-युरोपीय भाषा अशा सर्व भाषांचा मूलस्रोत आहे अशी विचारधारा सुरू झाली आणि गेल्या दोनशे वर्षांत अनेक विद्वानांनी संशोधनाने ह्या विचारधारेला बल दिले. ह्या प्रोटो-इंडो-युरोपीय भाषेचे मूलस्थान दक्षिण रशियातील गवती मैदानांचा प्रदेश - steppes - हेहि बहुमान्य झालेले आहे. त्यातहि विशेषेकरून स्लाव गटातील भाषा वैदिक संस्कृतला अधिक जवळच्या आहेत अशीहि विचारधारा सुरू झाली. ह्याच विषयी मी लिहिलेला एक लेख येथे पहावयास मिळेल.

वरील धाग्यात उल्लेखलेले संशोधन असाच तर्क पण तो ’तुर्कस्तान’चा उल्लेख करून मांडते. त्यासाठी वापरलेले तंत्रहि नवीन दिसते. त्यात शास्त्रीय दृष्ट्या योग्यायोग्य काय आहे त्याविषयी भाष्य करणे तज्ञांचे काम आहे पण सामान्य वाचक म्हणून मला त्यात अस्वीकारार्ह काही दिसत नाही. मानव शिकार-कंदमुळे-वन्य फळे खाऊन जगण्याच्या भटक्या स्थितीपासून शेती-पशुपालन करून आणि स्थिर वस्ती करून एका जागी राहण्याच्या स्थिर जीवनापर्यंत पोहोचला ही घटनाहि सध्याच्या तुर्कस्तानाच्या प्रदेशातच झाली अशी समजूत आहे. इंडो-युरोपीय भाषासमूहहि तेथूनच सर्वत्र पसरला असे म्हणणे अयुक्तिक वाटत नाही.

भारतातील एक गटाला मात्र असे काहीहि पटणार नाही. ’राष्ट्रीय’ विचार करणार्‍या ह्या गटाला आर्य संस्कृति आणि त्यांची भाषा भारताबाहेरून येथे आले हेच मुळात मान्य नाही. त्यांच्या मते असले सर्व विचार हे ब्रिटिश काळातील विचारसरणीचे दर्शक आहेत, जिच्यामध्ये भारतात जे जे काही प्रशंसनीय आहे ते ते भारताबाहेरूनच आलेले असणार हे गृहीतकृत्यासारखे होते. ह्या विचारसरणीला ’राष्ट्रीय’ पक्षाचा कडवा विरोध आहे. त्यांना भारतीय भाषांचे मूळ हे दक्षिण रशियात नव्हते तर तुर्कस्तानामध्ये होते असे म्हणणे तितकेच न पटणारे असेल.

मला स्वत:ला ’तुर्कस्तानी’ मुळावर एक दुसराच आक्षेप घ्यावासा वाटतो. आजचा तुर्कस्तान हा केवळ ५५० वर्ष जुना आहे. तेथील आजची संस्कृति १४५३त जेव्हा कॉन्स्टॅंटिनोपलचा पाडाव करून तुर्की विजेत्यानी बिझांटियम नष्ट तेव्हापासून सुरू झाली आहे. ते स्वत: मध्य आशियातून त्या भागात त्याच्या केवळ ३०० वर्षे आधी आलेले होते. ज्या हजारो वर्षे प्राचीन काळाबाबत आपण येथे बोलत आहोत त्या काळात तेथे ना तुर्की लोक होते ना तुर्कस्तान. तरीहि ’A Turkish origin for Indo-European languages’, ’Language tree rooted in Turkey’ अशा प्रकारचे मथळे ’नेचर’ सारख्या वजनदार मासिकात आले तर सर्वसामान्य वाचकापर्यंत एक चुकीचा संदेश पोहोचते आणि अनावश्यक वाद निर्माण होतात. तुर्की व्यक्तींची आणि तुर्कस्तानातील प्रसिद्ध जागांची चित्रे बरोबर जोडून हा चुकीचा संदेश आणखी दृढ होतो. (अशा वादांची चुणूक येथे आणि येथे पहा.) ’राष्ट्रीय’ लोकांच्या बाबतीत असे म्हणता येईल की तुर्कस्तानचे नाव अजाणतेपणे ह्या बाबीशी जोडणे हे ’बैलाला तांबडे फडके’ दाखविल्यासारखे ठरेल.

(समान मूल असलेल्या भाषा बोलणारे समाज त्यांच्या समान मुळापासून आणि एकमेकांपासून केव्हा विलग झाले असावेत ह्याचा विचार करण्याचा दुसरा एक मार्ग माझ्या वाचनात आला होता. त्याला Glottochronology असे म्हणतात. अधिक माहिती येथे आहे. प्राथमिक अवस्थेतील समाजामध्ये निश्चितपणे असणार असे शब्द ठरवून मूळ भाषेच्या शाखांमध्ये ते कसेकसे बदलत गेले ह्याची सांगड बदलास लागणार्‍या काळाशी जोडणे आणि त्यामार्गे मानवसमुदायांच्या प्रवासाचा अंदाज बांधणे असे काहीसे ते शास्त्र आहे. हे थोडेसे radioactive decay सारखे आहे. इंडो-युरोपीय भाषेच्या संदर्भातहि असा अभ्यास करण्यात आला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे 'तुर्कस्तानी मूळ' याचा अर्थ आज आपण ज्याला तुर्कस्तान समजतो तो भाग असा लावायचा हे सामान्यांपर्यंत पोहोचणार्‍या लिखाणाततरी मुद्दाम लिहावं. 'करायला गेलो एक' हे विशेषतः अस्मितांचे संदर्भ येतात तेव्हा फारच जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या प्रतिसादात आदिती आणि मन ह्या दोघांनाहि माझ्या विचारानुसार उत्तर देतो.

मी 'तुर्कस्तानी मूळ' असा शब्दप्रयोग वापरतांना 'तुर्कस्तान' ह्याला अवतरणात दाखविले होते कारण 'तुर्कस्तान' ह्या संज्ञेचे राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक अशा निरनिराळ्या संदर्भात निरनिराळे अर्थ लागू शकतात हे मी जाणतो. पण 'तुर्कस्तान' म्हणजे काय ह्यावर काही लिहिणे हे माझा हेतूच नव्हता, त्यामुळे त्यावर वेळ न दवडता मी तो शब्द अवतरणात टाकून ते सुचविले आहे.

मला इतके मात्र स्पष्ट दिसते की सर्वसामान्य वाचक, ज्याला तुर्कस्तानच्या पूर्व इतिहासाची फारशी जाणीव असणे अपेक्षित नाही, त्याला तुर्कस्तान म्हटले की आजचाच तुर्कस्तान, ज्याचा उल्लेख खिलाफत चळवळीच्या संदर्भात वारंवार येतो, तोच डोळ्यापुढे उभा राहणार. अशा वाचकापुढे हे संशोधन आले की त्याची प्रतिक्रिया काय असेल त्याची आपण सहज कल्पना करू शकतो. त्या शब्दाच्या वापरामुळेच ती प्रतिक्रिया संशोधनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण नकारात्मकच करणार आणि संशोधनाकडे तो अभ्यासू अलिप्ततेने पाहू शकणार नाही. असे प्रत्यक्षात घडत आहे हे दिसतेच आहे. माझ्या लेखनात जे 'नेचर' आणि 'सायंटिफिक अमेरिकन' ह्या नियतकालिकांतील दुवे दिलेले आहेत त्यात हेच दिसून येत आहे. वानगीदाखल त्यांतील एकेक मत उद्धृत करतो:

(नेचर) If they could just write," in current day Turkey", then this article would make sense. Otherwise, what does Turkey or its current Turkish inhabitants have anything to do with the Indo-European languages? They are Mongols from Asia who came there about 800 years ago.

(सायंटिफिक अमेरिकन) Turks have NOTHING to do with Anatolia, this is ancient Armenia for thousands of years. The turks came fron northern China in 15th century and destroyed the amazing Armenian and Greek civilization. It's sad to see an artickle of "scientific" american that is not scientific AT ALL.

ईसकाळ्मध्ये ही बातमी वाचून एक प्रतिक्रिया आली आहे ती अशी (शब्दशः)- 'बर्याच theories आहेत .मूर्खपणाच्या. आणि नशीब tyanni हडप्पा तेथे शोधले नाही.असिं देखील अश्या थेओरिएस बनवून युरोपेअन लोकांवर लादल्या पापाहीजेत.'

सारांश असा की भोंगळपणे तुर्कस्तान हा शब्द ह्या संशोधनाशी जोडण्यात मोठा धोका हा आहे की त्यामुळेच संशोधनाचा गाभा दूर राहून अनावश्यक वाद सुरू होतात. म्हणून बातमी देणार्‍यांनी - ज्यांना ह्या गोष्टींची जाणीव असावी अशी अपेक्षा आहे - आपला शब्दप्रयोग उचित करायला हवा होता. उ.सं.डु.ह्याला कारणीभूत आहेत असे मला वाटते आणि तेच मांडायचा मी प्रयत्न केला आहे.

मन ह्यांचा माझ्या 'तुर्कस्तान' ह्या शब्दाच्या वापरासहि आक्षेप आहे. त्यांच्या मते मी 'टर्की' असे म्हणायला हवे होते, कारण 'उर्वरित आख्खे जग त्यास टर्कीच म्हणते'.

हे विधान बरोबर आहे का? इंग्रजी बोलणारे लोक त्याला 'टर्की' म्हणतात पण ते लोक म्हणजे 'आख्खे जग' नाही. रशियन लोक त्याला Турция (तूर्त्सिया) म्हणतात, फ्रेंच आणखी काही म्हणत असतील, तागालोग वा नाहुआत्ल भाषांत बोलणार्‍यांची आणखी काही संज्ञा असेल. खुद्द तुर्कस्तानाचे तुर्की भाषेतील अधिकृत नाव Türkiye Cumhuriyeti असे आहे. (Cumhuriyeti जम्हूरियत - माझ्या उर्दूच्या अल्प ज्ञानानुसार.) आपण भारतीय मराठीत आणि अन्य भारतीय भाषात परंपरेने त्याला 'तुर्कस्तान' म्हणतो ह्यात चूक काय? उलटपक्षी तोच शब्द त्या देशाच्या अधिकृत नावाशी अधिक मिळता आहे. इंग्रज येथे येण्यापूर्वी काही शतकांपासून भारतीयांना 'तुर्की' लोक ओळखीचे आहेत. राजतरंगिणी, क्षितीशवंशावलीचरित अशा ग्रंथांमध्ये 'तुरक', 'तुरुष्क' असे शब्द आहेत. (पहा मोनियर-विल्यम्स. भास्कराचार्यांनी एका वजनमापाच्या कोष्टकात 'तुरुष्कसंज्ञः' असा प्रयोग केल्याचे आठवते.) मला तर मराठीत वापरण्यासाठी 'टर्की' हा शब्द खड्यासारखा वाटतो. इंग्रज वा अमेरिकन त्या देशाला 'टर्की' म्हणतात म्हणून मला त्यांचे अंधानुकरण - मी मराठीत लिहीत असतांना - करण्याची आवश्यकता नाही.

सहज म्हणून मी आपली वृत्तपत्रे ह्या देशाला कसे ओळखतात हे पाहिले. ईसकाळच्या शोधपेटीमध्ये 'तुर्कस्तान' घातले तेव्हा १२९ संदर्भ मिळाले आणि 'टर्की' घातले तेव्हा २७. हे पुरेसे बोलके आहे.

(मन ह्यांच्या पर्यटक तुर्की मैत्रिणीला असा सल्ला द्यावासा वाटतो की 'बाई गं, आपलं सामान्यज्ञान जरा वाढव आणि be quick on the uptake! 'तुर्कस्तान म्हणजेच टर्की' हे तुझ्या का बरं लक्षात येऊ नये? 'तुर्क' ही अक्षरं तर तुझ्या देशाच्या अधिकृत नावात आहेत!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वत:ला ’तुर्कस्तानी’ मुळावर एक दुसराच आक्षेप घ्यावासा वाटतो. आजचा तुर्कस्तान हा केवळ ५५० वर्ष जुना आहे. तेथील आजची संस्कृति १४५३त जेव्हा कॉन्स्टॅंटिनोपलचा पाडाव करून तुर्की विजेत्यानी बिझांटियम नष्ट तेव्हापासून सुरू झाली आहे.
साडेपाचशे वर्षांपूर्वी ऑटोमन तुर्कांनी आजचा टर्की जिंकला.(हो. तो टर्कीच आहे. खुद्द त्या देशातली एक पर्यटक(की सहकारी) दिल्लीला भेटलेली माझ्या मैत्रिणिला. त्या पर्यटक तरुणीस टर्कीला "तुर्कस्थान" म्हणतात, हे चटक्न ध्यानात आले नाही. तिथले लोक त्याला टर्कीच म्हणतात. अरब जगत व त्यांच्या प्रभावाने भारत त्यास तुर्कस्थान म्हणतो. उर्वरित आख्खे जग त्यास टर्कीच म्हणते. असो.)
.
साडेपाचशे वर्षांपूर्वी असलेले लोक मग एकाएकी संपले का? काही लाख - कोटी लोक असे एकदम गायब झाले, आणि त्यातील हरेकाची जागा एकेका तुर्काने घेतली का? तुर्क येण्यापूर्वी तुर्कस्थानला काहीच इतिहास नव्हता का?
किंबहुना आजचा तुर्कस्थान साडेपाचशे वर्षे जुना असेल तर आजचा स्पेन साताठशे-वर्षेच जुना आहे!(त्यापूर्वी तिथे पाचेकशे वर्षे अल्-अंदालुस म्हणवली गेलेली इस्लामिक(बहुतेक अरेबिक) राजवट होती.) आजच्या तिबेट नावाच्या राज्याचा इतिहास पन्नास वर्षेच जुना आहे.कित्येक कट्टर पाकिस्तानवादी पाकिस्तानी विचारवंत सद्य उपखंडाचा इतिहास मुघलकालापासून सुरु होतो असे म्हणतात. आअजच्या भारतीय कला , स्थापत्यशास्त्र, संगीत्,लोककला ह्यावर मुघल छाप असूही शकते. पण आजचा भारत १५२७ नंतर अस्तित्वात आला, असे कसे म्हणता येइल?
पाकिस्तानी पाठ्यपुस्त्कात आजचा पाकिस्तान कासीमच्या हल्ल्यानंतर अस्तित्वाआत आला असे शिकवतात्.
.
जसा नेपाळ -लंका हे भारतीय संस्कृतीशी जोडले गेल आहेत तसाच तुर्कस्थान हा ग्रीक exterior म्हणावा इतपत युरोपच्या मुख्यभूमीशी जोडला गेला होता सांस्कृतिकदृष्ट्या.युरोपिअन संस्कृती आणि मुस्लिम धर्म ह्यांचे ते मिश्रण आहे.
शाक्य -कौशल - कोसंबी ह्यांची शेजारी शेजारी असल्याने जशी सतत युद्धे होत, सतत देवाण्घेवाणही होइ, तसेच ग्रीक नगरराज्यांशी (आणि नंतरच्या काळात रोमन रिपब्लिकशी) तुर्कांचा व्यवहार होता. ते त्यांचाच एक जणू भाग होते. इस्राइल्-जॉर्डन्-सिरिया-पॅलेस्टाइन्- इजिप्तच्या उत्तर व पूर्वेकडील भाग ह्या सर्वांचे एक असे नाते आहे, मागील हजार वर्षे आहे, तसेच तुर्कस्थानचे ग्रीएकांशी आणि युरोपिअनांशी आहे.

हा प्रतिसाद सगळ्यांनाच तितका समजेल असे नाही, पण ह्याला लागणारी बैठक खास तुमची पक्की आहे. म्हणूनच तुम्हाला आधीपासूनच माहित असलेल्या मुद्द्याची जाणीव करुन देत आहे.

साडेपाचशे वर्षापूर्वी राजसत्ता तिथे बदल्लीही असेल, धर्म बदलतही गेलाच असेल, पण संस्कृती अशी एकाएकी निघून गेलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा प्रतिसाद सगळ्यांनाच तितका समजेल असे नाही, पण ह्याला लागणारी बैठक खास तुमची पक्की आहे...

खरे आहे. आमची समज अंमळ कमीच आहे, आणि आमच्यासारखे समज कमी असलेले इथे अंमळ जास्तच आहेत. त्यामुळे 'गाढवापुढे वाचली गीता' किंवा 'काष्टिंग पर्ल्स बिफोर स्वाइन'सारखा प्रकार होईल खरा.

त्यापेक्षा, जिथे मान्यवर मंडळींची समज 'प्रगल्भ' वगैरे आहे, जिथे एकेकाची बैठक एकदम पक्की - दगडाची, नाहीतर लोखंडी वगैरे - आहे (आमच्यासारखी मऊमऊ नव्हे), अशा एखाद्या ठिकाणी जाऊन हा प्रतिसाद का नाही लिहीत? तिथे त्याचे चीज होईल, याची खात्री आहे. नाही म्हणजे, इथे काय आहे, नाहक 'येथे समस्त बहिरें बसतात लोक, कां भाषणें मधुर तू करिसी अनेक, हें मूर्ख, यांस किमपीहि नसें विवेक, वर्णावरून तुजला गणतील काक' अशातली गत व्हायची. (अवांतर: मोरोपंतांनीच लिहिली ना हो ती अन्योक्ती? होशी वाटते, पण म्हटले बैठक पक्की - काँक्रीटची वगैरे - असणार्‍या तज्ज्ञांना विचारून खात्री करून घेतलेली बरी.)

किंवा मग, इथल्या लोकांपुढे लिहायचेच असेल, तर मग आपले प्रतिसाद लोकांना समजतात की नाही याची चिंता लोकांनाच करू द्यावी की जरा; लोकांनाच ठरवू द्यावे आपल्याला काय समजते नि काय समजत नाही ते, काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा मग, इथल्या लोकांपुढे लिहायचेच असेल, तर मग आपले प्रतिसाद लोकांना समजतात की नाही याची चिंता लोकांनाच करू द्यावी की जरा; लोकांनाच ठरवू द्यावे आपल्याला काय समजते नि काय समजत नाही ते, काय म्हणता?

उपप्रतिसाद आले असल्याने 'न'वी बाजूंना न आवडलेले वाक्य तसेच राहील.
वाचकांनी ते सोडून उर्वरित वाचावे इतकेच म्हणू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

" पण ह्याला लागणारी बैठक खास तुमची पक्की आहे."

:exmark: :exmark: :exmark: माझी बैठक इतरांपेक्षा काही विशेष पक्की आहे असे मला स्वतःला बिलकुल वाटत नाही...आणि हा कृतक विनयहि नाही. :exmark: :exmark: :exmark:

बाकी मन ह्यांच्या प्रतिसादाला उत्तर लवकरच देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0