(प्रार्थना) हे शिवे,
सामो
चित्राचा श्रेयाव्हेर - जाल.
.
.
.
हे ईशानी, हे शिवे,
स्कंदमाते, गणेशजननी, जगदंबे,,
जर तू स्वत: होउन
मायापटल दूर केले नाहीस, तर,
.
.
बाळगणेशाने,चिमुकल्या हातांनी,
पंचमहाभूतांच्या चिखलाचे गोळे बनवुन्
स्वशुंडेने ती तारकादळे
थापटुन रम्य आकार देतेवेळी.
स्मितहास्याची पखरण करत, अतीव कौतुकाने,
शिवास उद्देशुन,
तू जे प्रेमोद्गार काढतेस,
त्या आदिम, primordial ॐकारमय उच्चारातूनच्
विश्वात् नवचैतन्य स्फुरण पावते
.
.
हे या मतामतांच्या गलबल्यात्
आम्हा पामरांस कसे कळावे?
तेव्हा तूच आमचे अद्न्यान दूर करुन,
आमच्यावरती तुझ्या कृपाघनाचा वर्षाव करणे.,
हे उचितच नव्हे काय्?
मामी छान हो..
मामी छान हो..
कसला गोंडस गोडूला दिसतोय गणू..