तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

हिमशिखरांतून खळखळ गाते
मनमंदीर तर झगमग झुलते

कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.
----

काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१

काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन.
या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो".. त्याचं हे गाणं लोकांना कमी माहित असलेलं ( विस्मृतीतच गेलेलं म्हणा ना..)

http://www.youtube.com/watch?v=JWHqAFXCqH0

गीतगायनासाठी साक्षात हिंदकेसरी शब्बीरकुमार आणि लता ; म्हणजे पुढे बोलायची गरजच नाही. शब्बीरच्या कठीण गायकीपुढे लता अगदी तोडीस तोड गायली आहे; दादच द्यायला हवी.

लक्ष्मी प्यारेंनी या गाण्यासाठी पुलबहार रागाचा वापर केला आहे. जनमेजयाने लिहिलेल्या "बोलीगीतसार" या ग्रंथात या रागाचा प्रथम उल्लेख सापडतो.
(पुलावरली गाणी , डुंबनदीचे प्राक्तन , हिरवळीवरील हिंमत या नावाने फ़क्त पुलबहार रागातल्या गाण्यांचे काही म्यूझिक विडिओ नुकतेच प्रकाशित झाले. त्यांची ओळख पुन्हा केव्हातरी.)या रागा च्या नावाची गंमत आहे. पूल बहार किंवा पुल् आउट या अर्थाने ही काही गाणी वापरली गेली आहेत. पण याबद्दल तज्ञांमध्ये वाद आहेत, त्यावर पुन्हा केव्हातरी.

विशेष उल्लेख या गाण्याच्या कोरिओग्राफीचा... नृत्यदिग्दर्शनात काय असणार आहे असून असून . उगीच कौतुक करायचं झालं; असं वाटेल काहींना. पण या गाण्यातला प्रत्येक पदन्यास अफ़लातून. विशेषत: नृत्य शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करावा अशा काही अदा आहेत यात. .राज बब्बर म्हणजे अत्यंत अंडररेटेड अभिनेता. ऎंशीच्या दशकात त्याने जो थोर अभिनय केला तो आता पहायला मिळणं कठीण.आपला राज बब्रू डोळे वटारून उत्तम अभिनय करताना तुम्हाला नेहमी आवडतोच पण यात प्रेमाच्या काही मोहक अदा दाखवल्या आहेत पठ्ठ्याने. की वा रे माझा बब्रू; अशी दादच द्यावी. काय तो सुंदर पोषाख आणि केशरचना , काय त्याचं ते पुलावर त्याच्या स्त्रीची वाट पाहणं, पुलाच्या तारांवर आडवे झोपून प्रेम, नदीकिनारीचे मोहक पदन्यास, आपल्या स्त्रीला पायाने कवेत घ्यायची मोहक कसरत,तिच्या मोकळ्या केसांत त्याने स्वत:ला गुंतवणे, ये हृदयीचे ते हृदयीची ऎक्शन वगैरे वगैरे.... आणि शेवटचं त्याचं ते डोंगरउतारावरून धावत येणं... खल्लास.. शब्द संपले.

जरूर पहा...
पुलबहार रागाच्या प्रेमातच पडाल.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कंबलबहार नंतर पूलबहारबद्दल ऐकून कर्णसंपुटे तृप्त जाहली. श्रुती धन्य झाल्या. डोळे निवले. भडकमकरमास्तराना आमचा पायलागू Wink
अवांतर : जिज्ञासूंनी यूट्युब गाण्याखालील विद्वज्जनांचे अभिप्रायही वाचावेत अशी सूचना नंब्रपणे करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मास्तरांनी अश्याप्रकारे एक फर्मास 'पुल' खेचला आहे आणि लेखन-खेळीला 'बहार' आली आहे! Smile
वा! पूलबहार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही लोक याला फूल बहार असेही म्हणतात. स्पेलिंग विषयी साशंक आहे. काव्य जालिंदरसार च्या कालखंडाविषयी काही लोक उगीचच प्रवाद निर्माण करतात. पण त्याच्या प्राचीनतेविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आत्ताच व्यनि मध्ये खूप होतकरू नृत्यकला विद्यार्थ्यांचे निरोप मिळाले..

राजचे काही फोटो दाखवा... फोटो दाखवा.. वगैरे वगैरे...
थोडी झलक म्हणून हे फोटो चढवत आहे .. पण प्रत्यक्ष विडीओची सर या फोटोंना नाही...

ये हृदयीचे ते हृदयी...

डोंगर उतारावरची धाव

पूलबहार

दिल खेचक नृत्यकल्लोळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकमकर मास्तरांच्या मताचं स्वागत आहे, पण या वेळेस जालिंदरजींच्या लिखाणाचा अर्थ लावण्यात मास्तर चुकले आहेत हे मी सखेद नमूद करू इच्छिते.

कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.

इथला पूल हा मराठी नसून इंग्लिशमधला स्विमींग पूल आहे. जालिंदरबाबा स्वतः मल्लखांबपटू होते. आणि हा श्लोक जालिंदरजींनी फ्लोर एक्झर्साईज हा जो जिम्नॅस्टीक्सचा प्रकार असतो त्या संदर्भात लिहीला आहे.
रागाचे नाव पूलबहारच आहे याबाबत मलाही शंका नाही. या रागाचा थाट फ्लोरालाप असा आहे. या रागाचे आरोह-अवरोह "सा रे सा रे गा रे पा नी मा रे" असे आहेत. या रागात ध हा वर्ज्य स्वर असतो. ध हा स्वर फ्लोरालाप थाटात वर्ज्य असतो; मात्र काही चुकार लोक या स्वराचा या रागात किंवा थाटात वापर करतात. जालिंदरजींनी अशा चुकांसाठी तेराव्या सर्गातच शिक्षा लिहून ठेवली आहे. ('काव्यजालिंदरसार'ची माझ्याकडची प्रत कोणा दंतवैद्याने उधारीवर नेली ती परत आणलेली नाही.) हा राग संध्याकाळच्या दुसर्‍या प्रहरात आणि बंदीस्त जागीच गावा अशी मूळ कल्पना आहे. पण पुढे फ्यूजन संगीतामधे याचा अधिक विस्तार होऊन निसर्गाच्या कुशीतही हा राग गाता येतो हे सिद्ध केले.

या रागाचे लक्षणगीतही 'काव्यजालिंदरसार'मधे आहे. ते आता मी आठवणीतून लिहून देते, तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा:
मा रे वादी संवादी सुंदर
उड्या मारती तालावर बंदर
चेहेर्‍यावरती लावती रोगण
बहुत सुहावनी राजकारण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लक्षणगीत छान आहे...

काव्य जालिंदरसार मध्ये अजून एक उल्लेख आहे की निकोलाय मनुचीने या रागाबद्दल लिहून ठेवले आहे. पण तो त्याचे नाव ब्रिजबहार असे लिहितो. बाकी रागवर्णन तेच आहे... तर या शब्दाचा अर्थ लावताना त्याने पूलबहारचे ब्रिजबहार असे केले की मथुरा/ वृंदावन भागातल्या शैलीवरून झालेला ब्रजबहार / ब्रिजबहार हा एक वेगळा स्वतंत्र राग आहे , याबद्दल जाणकारांत मतभेद आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदकेसरी शब्बीरकुमार

हे वाचून फुटलो. शब्बीरकुमार जांघिया घालून खांद्यांवर दोन दोन गदा मिरवत विजयी हास्य करतो आहे असं मोहक चित्र डोळ्यासमोर आलं. त्यात त्याच्यासमोर लता मंगेशकर गोरीमोरी होऊन उभी आहे, आणि आपण याच्या गायकीच्या तोडीला उतरणार का? असा विचार करत नखं कुरतडते आहे हेही आलं.

आणि राज बब्बरचा डॅन्स काय वर्णावा? 'अहह' हा एकच शब्द तोंडून निघतो. स्मिता पाटील त्याच्यावर का भाळली हे ताबडतोब लक्षात येतं. तिचेही नाच सुंदर असायचेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0