माझी 'वाईट्ट' व्यसनं : भाग १

१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. 'माया मेमसाब' ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या....

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं...
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये.....
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये....

सिनेमा कधी एकदा सुरु होतोय या एक्साईटमेंटमध्ये टायटल्सकडे दुर्लक्षच झालेले होते. ते नेहमीच होते म्हणा. त्यामुळे बाहेर आल्यावर पोस्टरवर गीतकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही काही माहिती नव्हती. खिश्यात पुरेसे पैसेही नव्हते. काय करायचे? मग आमच्या बरोबर चित्रपट बघुन बाहेर पडलेल्या लोकांना अडवून विचारणे सुरु झाले. "तुम्ही सुरुवातीला दाखवतात ती कलाकारांची नावे बघीतलीत?"

लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. पण एका काकांनी विचारले, "का रे बाबा? काय हवेय?"
थोडंसं बिचकतच त्यांना कारण सांगितलं. त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं....

" गुलजार! "

गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं....., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.

'पुखराज' या आपली मुलगी 'बोस्की' उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली 'पनाह' ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.

उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट - गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !

(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)

गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा 'पुखराज' मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.

कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..

मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..

तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..

(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)

तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने....

आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे 'संत कबीर'! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलुच)

मग एक दिवस कुणीतरी सांगितलं 'अबे 'इजाजत' बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची. 'कतरा कतरा' ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?

तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..

सुधाला नवर्‍याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात ...

"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...."

इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला ...
त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे 'रेखा' ! असो...., त्याबद्दल परत कधीतरी !

मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?

रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे

"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो" हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक अनाथ मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.

सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है

आणि हाच 'गुलजार' एका कवितेत लिहून जातो...

गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !

'प्रचंड उकडतय' या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं.

किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,
''आपको तैरना आता है?''
गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...''

'डुबणं, बुडून जाणं' एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात झोकून स्वतःला पुर्णपणे देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.

रात का नशा अभी, आंखसें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा....वही, वो...वोही...
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं....

शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या 'शाहरुख आणि करीना' ऐवजी 'घर'ची 'विनोद मेहरा आणि रेखा' किंवा 'तराना' मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा...

"सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं..."

या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला..... पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.

गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.

नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा...

बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?

आयुष्‍याच्‍या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्‍ये कार मेकॅनिक म्‍हणून काम करणारा 'संपूरणसिंग काला' हा तरुण चित्रसृष्‍टीत 'गुलझार साहब' या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्‍हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्‍यांनी विपुल लेखन करून आपल्‍या वाचकांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या 'गुलजार' व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की 'गुलजार' हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.

एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था

आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय...

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...

गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.

माफ किजीए गुलझारसाब, आपका बहोत सारा सामान हमारे पास पडा है लेकीन किसीभी किंमत पें हम उसे लौटा नही सकते क्योंकी अब वो हमारी जिंदगीका एक अटुट हिस्सा बन चुका है !

विशाल

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्त सफर घडवून आणलीस!
आता पुढलं व्यसन कधी त्याची वाट बघतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश !
लिहायला घेतलय, लवकरच पोस्टेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म...
गालिब, कबीर, इर्शाद कामिल... येऊ द्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जुबाँ पर जायका आता था जो
सफ़हे पलटने का,
अब ऊँगली के क्लिक करने से
बस् एक झपकी गुजरती हैं;
बहोत कुछ तह-ब-तह
खुलता चला जाता हैं परदे पर ..
किताबोंसे जो ज़ाती राबता था,
कट गया हैं ..
कभी सीनें पे रख के
लेट जाते थे ...

- गुलज़ार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!
अमुकपंत पेटलेले आहेत Smile (ह घ्यालच)
आज (इथे आणि अश्वत्थावरही) कस्ले भारी भारी नजराणे पेश करताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार सुरेख झाला आहे. खूप आवडला. पुढची व्यसनेही लौकर येऊ द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

धन्यवाद मंडळी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इरसाल
कुछ दाग (पक्षी व्यसने) अच्छे होते है

लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

उत्तम कविता निवडल्या आहेत, तुमच्यासारखीच एक अजून गुलझार वेडी माहिती आहे/होती - (आता तिने तिचा जुना ब्लॉग बंद केलेला दिसतोय) पण इथे काही आहेत अजूनही.
"वह गली थी"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इमली का पेड़

कोसबाध के नुक्कड़ पर एक मुश्तंडा पेड़ खडा हैं इमली का ...
उसका गुस्सा नहीं उतरता |

अदरक जैसी मोटी मोरी गिरहें पड़ी हैं जोड़ों पर
सारा दिन खुजलाता हैं - एक्ज़ीमा हैं |
जिस मोड़ पे हैं, उस मोड़ पे जब बस रुकती हैं,
जल्दी जल्दी बीडी बुझाके उसके बदन पर
लोग बसों में चढ़ जातें हैं |
पान की पींक भी थूँक दिया करते हैं लोग उसपर..
चक्कू से काटें हैं लोगों ने उसकी शाखों के डंठन
खड़े खड़े यूँही उसपे ढेले फेंका करते हैं -
इसीलिए तो उसका गुस्सा नहीं उतरता.....!

भूरे-लाल मकौडों को ज़िंदा ही निगल जाता हैं अक्सर
और बाँह झटक के निचे फ़ेंक दिया करता हैं
अड्डी-टप्पा खेलती गोल गुलेहरी को |
चीटियाँ पाल राखी हैं उसने..
एक लगाए कोई या जूता झाड़े उसपर तो चीटियाँ छोड़ दिया करता हैं |
उसका गुस्सा नहीं उतरता.....!

कोसबाध के नुक्कड़ पर एक मुश्तंडा पेड़ खडा हैं इमली का ...

- गुलज़ार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता वगैरे पासुन दूरच असणार्या आणि सिनेमातली गाणी फक्त संगीत, ठेका साठी ऐकणार्या माझ्यासारख्यांना
देखील कधी कधी काही शब्द/ओळी अचानक आवडुन जातात.
दो पल की राह नहीँ, एक पल रुके, एक पल चले...
किँवा
इस मोड से जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहेँ
किँवा
बिडी जलायले जिगर से पिया, जिगर मा बडी आग है Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मंडळी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0