रमलखुणांची भाषा

जरी तुटले आतून काही,
तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे,
तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या,
सावल्या गडद होताना
हुरहुरत्या संध्याप्रहरी,
पावलांत घुटमळताना

पारावर तेवत असता,
फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया,
शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी,
पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे,
श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले,
पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी,
मग रमलखुणांची भाषा.....

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान्

जरी तुटले आतून काही,
तरी नकोस ओळख देऊ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कातरवेळ लैच बेक्कार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

पण रमलखुणा म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(figurative) : a peep into future.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी चंद्रकांता मालिका पाहिली नाहीत वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहायली ना. त्यातल्या पंडितराज जगन्नाथामुळे रमल काय ते माहीत होतं. 'रमलखुणा'चा अर्थ 'त्या खेळाचं आउटपुट, पक्षी: संकेत' असा वाटत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुंदर आहे कविता.. आवडली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. जीएसंदर्भ नेमके आलेत. ("पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे...")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता जमली आहे.
अश्या कविता पाडायची रेसिपी तशी फारशी अवघड नाही. ग्रेसभूल आणि जी.ए.भूल पडलेले रसिकजन वाहवा म्हणतील अशा कविता कुणी पाडू लागले की मला हटकून डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी आठवते.
दोन ओळी संध्या*** (छाया, माया, काया, ओंजळ)
दोन ओळी आदिमाय
दोन ओळी प्राक्तन नशीब ललाट रमल
स्वादानुसार आठवण उसासा आवंढा
(ग्रेस चाहत्यांसाठी) थोड्याश्या भावल्या, कावळे
इत्यादी इत्यादी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी

फ्लेश ऑफ अ सर्व्हंट, विलिंगली गिव्हन ...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी आठवते.

हा हा हा. काय उपमा!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा कॉमन सेन्स आहे. ग्रेस, जीए काय कॉपिराइट घेउन बसलेत काय. नसेल जिलबी आवडत तं खाऊ नै.
कविता छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

ऐसीवरील पाकक्रियापारंगतांनी (माहितीपूर्णरीत्या) व त्यांच्या अनुमोदकांनी (मार्मिकरीत्या) माझ्या काव्य-कोंबडीतील मालमसाल्याचे जे अचूक (मोज)माप काढले आहे त्यानुसार ही कविता येथून काढून पाक-कृती या सदरात टाकावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात किंवा भारताबाहेर राहून पाक-कृती???? जावा पाकिस्तानात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं ऐसी पण काय खराब नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, सहीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...जावाबद्दल बोलताहेत.

(चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मिळणार नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जावा पाकिस्तानात.

असे आहे होय!

आणि मग भारत काय, मायक्रोसॉफ्ट शॉप आहे काय?

(चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मिळणार नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"काव्य-कोंबडीतील मालमसाल्याचे " kewal thor!
कविता एखाद्या खारीप्रमाणे टुणटुणीत, जिवंत आणि उर्जावान असली पाहिजे इथपर्यंत पोचलो होतो! तुम्ही तिला मारून तिचा रस्सा केलात . (पण दूSSSष्ट रसिक आणि टीकाकारही तेच करतात ! रस्सा चवदार आहे हे मात्र खरे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची बरीचशी प्रतिमासृष्टी कुसुमाग्रजांच्या प्रतिमांसारखीच आहे, आता त्यात जी.ए., ग्रेस वगैरेंची भर पडत चाललीय. म्हणजे हे आत्ताचं नाहीये तुम्हीच एकदा 'भवताल निनादत होते' हि तुमची कविता वाचून बघा. ‘नि:शब्द खोल मी उरलो’, ‘जखमी भवताल’, ‘गडद डोह’ ,’पैंजणाचे गूढ नाद इत्यादी -- जी एंच्या कथेतून या प्रतिमा उपसून बळेच एक कविता लिहिल्यासारखी लिहली आहे. वरती निल लोमस यांनी दिलेला प्रतिसाद खरंतर सूचक आहे तुमच्यासाठी. स्वतंत्र कवी म्हणून कविता लिहीत असाल तर तुमची स्वतःची एक प्रतिमासृष्टी, शब्दकळा, शैली दिसू द्या अन्यथा तुमच्या कवितांना कुसुमाग्रजांच्या कवितांची भ्रष्ट नक्कल याखेरीज वेगळं काही अस्तित्व उरणार नाही.
तुमची पहिलीच ‘ब्रह्माण्डाचे ऑम्लेट’ हि कविता वेगळी होती आणि ती कविता चांदण-चुऱ्याचे लवण, अणु-गर्भाचे सोलीव कांदे, आदि-स्फोटाचा अग्नी, गुरुत्व कालथे अश्या चमत्कारिक उपमांनी ठासलेली होती. प्रसरणशील विश्वाची कल्पना तुम्ही ब्रह्माण्डाचे ऑम्लेट कल्पून कवितेतून मांडलेली. चिवित्र होती Wink हे ब्रह्माण्डाचे ऑम्लेट तुम्ही आकाशगंगेच्या तव्यावर परतत होतात ही सूक्ष्मशी खगोलीय अडचण लक्षात आलेली पण एकंदर ' जे ना देखे रवि' असे म्हणून कविता आवडून घेतली होती. हि कविता लिहिण्यामागे कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीच्या प्रेमगीता’ची प्रेरणा असेल असा माझा चुकू शकेलसा अंदाज होता/ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

Don't use such an expression as “dim lands of peace.” It dulls the image.: Ezra Pound

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कवी नाहीच, त्यामुळे सांगूनच, सरळ जी.एंचे शब्द वापरुन ही कविता पाडली होती, एकेकाळी!

http://www.misalpav.com/node/1598

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Kudos!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0