"मूक-बधिरांचे गाणे" ((भाषांतरित))

रस्त्यावरून चाललेली किंवा
स्टेशनवर उभी बाई बघून
आसपासच्या पुरुषांना जो ठसका
लागतो

तो त्या बाईला सांगत असतो की तू
एक मादी आहेस हे आमच्या
हाडामासांपर्यंत पोचले आहे

(का ते एखाद्या दुहेरी जिभेच्या पक्ष्याचे
कुरुपसर गाणे असते म्हणायचे? कुरुपच,
पण गाणेही?

किंवा अनेक मूक-बधीर एखाद्या जळत्या
इमारतीत कोंडले गेलेत आणि हळूहळू धूर
भरत चाललाय ?)

श्वापदी आवाज काढता येतील
इतपतच त्या पुरुषांचा मगदूर दिसतो ,
हा आपल्याला केलेला मानाचा मुजरा आहे
असे त्या बाईने मानायचे का? म्हणजे
जर तिच्यात "काहीच" जर "नसते" तर त्यांनी
चीत्कारही केले नसते वगैरे?

का फक्त तिच्या मादित्वाला प्रतिसाद नाही ,
तर कोणत्याशा मद्दड आदिम वेदनेचा तो
उद्गार मानायचा ?

तो हलकट मुजरा तिला
फेकूनच द्यायचा असतो, पण
ते जमतेच असे नाही:

स्टेशनात गाडी येते तशी तिच्या श्वासाची,
तिच्या नाडीची गती बदलते,
वाढत जाते,

स्टेशन वरची सिनेमांची फाटकी पोस्टर्सही
बजावून हेच सांगत असतात
मनात कोठेतरी जाणवत जाते की

आयुष्यामागून
भिकारचोट आयुष्य
लडखडत चालतच असते ,

काव्यात्मतेशिवाय
सौंदर्याशिवाय
प्रेमाशिवाय.
xxx

भाषांतर: मिलिंद पदकी
ब्रिज वॉटर , न्यू जर्सी
यू एस ए

मूळ इंग्रजी :

The Mutes
: Denise Levertov

Those groans men use
passing a woman on the street
or on the steps of the subway

to tell her she is a female
and their flesh knows it,

are they a sort of tune,
an ugly enough song, sung
by a bird with a slit tongue

but meant for music?

Or are they the muffled roaring
of deafmutes trapped in a building that is
slowly filling with smoke?

Perhaps both.

Such men most often
look as if groan were all they could do,

yet a woman, in spite of herself,
knows it's a tribute:

if she were lacking all grace
they'd pass her in silence:
so it's not only to say
she's a warm hole. It's a word
in grief-language, nothing to do with
primitive, not an ur-language;
language stricken, sickened, cast down
in decrepitude.

She wants to throw the tribute away,
disgusted, and can't,
it goes on buzzing in her ear,
it changes the pace of her walk,
the torn posters in echoing corridors
spell it out, it
quakes and gnashes as the train comes in.
Her pulse sullenly
had picked up speed,

but the cars slow down and
jar to a stop while her understanding
keeps on translating: “life after life after
life goes by

without poetry,
without seemliness,
without love.”
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भाषांतर जमलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वा! मूळ कविता काय आहे. खासच.
अनुवाद जमला नाही असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0