"वाट बघ आता"

अरे मठ्ठमति / जाण तू या सत्या
अशी आत्महत्या / होत नाही!
मारिले शरीर / मारून ती उडी
दुसरी जी कुडी / धरशिला
कशासाठी घेसी/ मरणाचा ध्यास
अखेरचा श्वास / त्यात नसे
धरले शरीर / नसे आता सुटका
वसे त्यात फुटका / आत्माराम
जन्म-मृत्यू चक्र / अव्याहत फिरे
आणि थरथरे / आत्मा त्यात
नाहीच संपत / येथेही ती कथा
पुढची दुःख-गाथा / ऐकशीला
"अहं ब्रम्हास्मि" ची / बढाई ती खाशी
शेम्बडात माशी / अडकली
आत्मा हेचि ब्रम्ह/ ब्रह्म हाचि आत्मा
जोडीचा या खात्मा / होत नसे!
वाट बघ आता/ ब्रम्ह विरण्याची
आशा सुटकेची / त्याच्यातचि !

मिलिंद पदकी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्व गोष्टींपासुन शेवटी सुटका करुन घेता येते ( किमान असे मानले जाते )
तुमच्या कवितेतुन जो भारतीय तत्वद्न्यानाचा संदर्भ येतो त्यानुसार मी नित्य शुध्द्द बुद्ध मुक्त ब्र्हम आहे अशी अहं ब्रह्मास्मि ची जाणीव वा संबोधि होणे
हा उपनिषदवाल्यांसाठी फायनल क्लायमॅक्स अखिल जगाच्या भानगडीपासुन सुटका
पुढे तळ्यात म्हशीप्रमाणे डुंबुन/ ब्रह्मलीन राहणे ही जीवनाची फायनल इतिश्री वा सुटका

आता तुम्ही नविन जोडी एकाच शब्दाची लावुन म्हणता

आत्मा हेचि ब्रम्ह/ ब्रह्म हाचि आत्मा
जोडीचा या खात्मा / होत नसे!
वाट बघ आता/ ब्रम्ह विरण्याची
आशा सुटकेची / त्याच्यातचि !

तर च्यामारी
सुटके पासुन सुटका कशी होणार हो ?

हा वदतोव्याघात का काय म्हणता तो नाही का ?
कविता आवडली खास करुन
"अहं ब्रम्हास्मि" ची / बढाई ती खाशी
शेम्बडात माशी / अडकली
ग्रेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0