Skip to main content

फुल टु बेन

आमच्या मंडळचा काम होता म्हनून एका बेनला फोन लावला. स्टार्ट ला बराबर बोल्ली ती. पन तिला गुजराती बराबर येतच न्हवती ते जाणलं मी! पन तेनी लई धम्माल क्येली पछी! डायबिटेस हाय का बोललो, तर सीधा जवाब द्यायला तैयारच न्हाई. नाव सांगितला सन्निता जॉशी का काय ते. आमचा होमवर्क पन कंप्लीटच होता. तिचा हसबंडचा नाव घेउन विचारला तर तेचा पन काय सांगायला नाकबूल. लई चॅप्टर! मलाच घुमवायला लागली. मंग आपन भी खुन्नसमे.
तिला सामनेसे विचारला. घरी येऊ का ? तर मला सिक्युरीटीची भय घालायला लागली. फ्रेंडसर्कल मधी कोणपण सीक असणार ना ? तेंचा पण अ‍ॅड्रेस द्यायला ना पाडली. मंग तिचा उमर, वेट आणि लंबाई विचारली तरीबी तेच नाटक करायला लागली. तिचा वेट नक्की भारी असनार आन उमर तर समद्याच चोरी करन्यात हुश्शार. होती तर घाटीच पन लई हुश्शारी दाखवत होती. मी पण फिरकी घेतली. तिला दिल्लीवाली हाय का असा विचारलं. तर हस्तिनापूर म्हनते.
साला, आमी बी बीआर चोप्राचा महाभारत बघितला हाय. आमाला काय उल्लु समजते ? कशामंदी इंटरेस्ट हाय असा विचारला तर तारे बगायला आवडते म्हणे. अमाला पन 'तारे जमींपर' लई आवडला होता. आमची बायडी तर पिक्चर खल्लास होईपर्यंत रडत होती.
तारे गिनती केले का विचारला तर मलाच विचारते. थोडी मेड पन असावी. सोता अ‍ॅस्ट्रोनोमी ची डिग्री असून तेला बेड म्हणत होती. मंग बीकोम का नाय
केलं ? तिची बिमारी जास्त वेळ लपली नाय. खाँसी आलीच तिला. टीबी असनार! मी विचारला तर गला फाडके चिल्लाचिल्ली करायला लागली. जवा ती गला व्हॅकुम क्लीनर वापरुन साफ करायची वार्ता करायला लागली तेंवा डाऊट पक्का झाला. ती मेंटल केस असनार. जास्त लफरा नको म्हनून सीधा नूरसाहेबलाच दिल्ला फोन सूम मंदी !
इतका दिवस ब्लोग लिवला पन इतका डेंजर प्लोट आजच भेटला!

मन Sat, 22/09/2012 - 12:22

चोक्कस.
सर्व विक्षिप्तांनी वाचावा असा लेख :)

अशोक पाटील Sat, 22/09/2012 - 12:40

In reply to by मन

मनराव....मी विक्षिप्त नाही असा माझा समज आहे, तरीही तिरशिंगरावांचीही त्या प्रकरणातील डॉ.सईद मेहमूदी धर्तीची 'दुसरी बाजू' ऐकली वाचली समजूनही घेतली. सन्हिताबेनना झालेला फोन-त्रास दुसरीकडून आलेल्या खुलाशावरून काही प्रमाणात कमी होईल अशी भाबडी का असेना, पण आहे आशा !

अ‍ॅण्ड येस्स...रीअली चोक्कस !

राजेश घासकडवी Sat, 22/09/2012 - 12:47

हें तिरसिंग, (साला तारो फुल्ल नेम पढिनेच मारो दम निकली गयो. एटले हू तारे तिरसिंगच बोलूछ.)

तारो लेखन तो सावू सरस थयू छे. पण ऐय्या सामाटे पायडू? मारी 'एवी अक्षर' नामनी गुजराथी साईट छे, त्या लिख नें.

पेल्ली बायडी तो फुल्ल मेड छे ए वात मात्र चोक्कस

विसुनाना Mon, 24/09/2012 - 11:00

In reply to by राजेश घासकडवी

राजेसभाई, तुमचे गुजरातीवरचे प्रभुत्व पाहता 'सन्हिता जॉशी'बेनला तो फ्रेंडली फोन तुम्हीच आवाज बदलून केला असावा अशी (सुष्ट!) शंका आली. ;)
बेनला ही शंका येऊ नये म्हणून नंतर लगेच मूळ आवाजात खर्‍या नावाने फोन केलात. काय म्हणता? :)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/09/2012 - 11:32

In reply to by विसुनाना

हा सगळा डाव राजेशचाच दिसतो. विसुनाना बक्षी यांना या शोधाबद्दल तपासकामासंदर्भातला मॅगसेसे पुरस्कार देण्यात यावा अशी सूचना आहे.

रमाबाई कुरसुंदीकर Tue, 25/09/2012 - 17:56

खो खो खो!
छान रे तिरशिंगोब्या.

सर्किट Sun, 30/09/2012 - 00:03

ब्येश्ट स्ट्रेस बश्टर येव्हर....