"संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे!"

"नेणिवेची अक्षरे " हा
संग्रह त्याचा वाचतो आहे,
संदीप खरे कवी साला
मनामध्ये डाचतो आहे!

आंतर्जालावरती आला
कवितांचा महापूर
शुद्धलेखन नसे शुद्ध
काव्यात्मता राहिली दूर !

नवाच कवी (माझ्यासाठी)
मिळवून आता वाचतो आहे
अर्थ त्याच्या कवितांचा
मनामध्ये साचतो आहे!

अर्थगर्भ कवितेमध्ये
लालित्याचा लोळ महा
शलाका ही गगनामध्ये
चमकते ती कशी पहा:

"कसा चंद्र ! कसं वय !
कशी तुझी चांदण सय !
कसा निघेल इथून पाय!
वेड लागेल नाहीतर काय!"

त्याच्या काही पानांवर तर
नाचतात बा सी मर्ढेकर :
"गरीब , बुटका , कद्रू,
कर्कश, कटकटवाणा
अवघड, हट्टी , हेकट
आणि माणूसघाणा "

स्वतःच्या या वर्णनाची
नसे राहिली फॅशन आज
प्रत्येक कवीमध्ये असे
महानतेचा मोठा माज!

तरुण कवी कसा काय
रान सारे करी फस्त
इतर कवींसाठी राही
थोडीच जागा, नाही स्वस्त!

"नाही लिहू शकलो असे"
विषाद याचा वाटतो आहे
पुस्तक त्याचे डोक्यावर
तरी घेऊन नाचतो आहे !

: मिलिंद पदकी
Bridgewater, NJ, USA

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कालिदासाचे शाकुंतल घेउनी
नाचला तो म्याक्हम्युल्लर
संदिपची कविता वाचुनी मी
करू का विपश्यना सत्वर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा! मस्त! विपश्यना एरवीही कराच!!
खरेंचे गुणगान केल्याबद्दल माझ्यावर भरपूर टीका होत आहे! पण "लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान "सवंग"! )" हे समीकरण कितपत बरोबर आहे? आणि प्रत्येक कवीने प्रत्येक कवितेत "भीषण युगधर्माचे चित्रण" केलेच पाहिजे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण "लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान "सवंग"! )" हे समीकरण कितपत बरोबर आहे?

फिलॉसॉफी ऑफ पोएट्री मधून - (संदर्भ्)

So whereas instrumental prose, such as that of philosophy, aims at a single unambiguous meaning, poetry may allow multiple meanings, and demand various interpretations. This richness of utterance is one of the reasons we value poetry; but again it is not the only reason, nor is it the case that all poetic utterances are hard to fathom. Indeed, it is remarkable how many of the most often-quoted lines of poetry are not only not in the least obscure but also free of metaphor. One thinks of Thomas Gray observing Eton schoolboys at play: “Where ignorance is bliss / ‘Tis folly to be wise.” Even Keats, whose language is typically richly suggestive and sensuous, offers the bald generality that “A thing of beauty is a joy forever.” These sentiments may or may not be persuasive in themselves – they may not even be true – but they are made memorable by being embedded in a formal arrangement of words marked by the use of rhythm and rhyme.

ॲम्बिग्युईटी ही स्पेसिफिसिटी च्या विरुद्ध दिशेने जाते असं मला वाटतं. स्पेसिफिसीटी साठी क्रायटेरिया चे अस्तित्व आणि आधार आवश्यक असतो.

I feel (not necessarily think) - लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान "सवंग"! ) हे समीकरण बऱ्याच प्रमाणावर बरोबर आहे. क्रायटेरिया (मग तो कोणताही असो) शिथील करत करत गेलं की बहुतांना प्रिय असण्याची शक्यता वाढत वाढत जाते. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बहुतांना प्रिय असणं हे क्रायटेरिया नसण्याच्या जवळपास जातं. किंवा त्या दिशेने जातं. आणि क्रायटेरिया नसणं हे बरोबर असण्याच्या विरुद्ध दिशेने जातं. ( अर्थात हे सगळ्या बाबतीत ॲप्लिकेबल नाही. पण अनेक बाबतीत ॲप्लिकेबल असावं असं वाटतं. )

वर जे काही लिहिलंय ते "मला असं वाटतं" या सदरात आहे. पण मिलिंदभाय तुमच्याकडे विरुद्ध बाजूचा किंवा वेगळा युक्तिवाद/व्यू असेल तर तो ऐकायला उत्सुक आहे.

( मला सकाळी सकाळी प्रचंड चढलिये असं दिसतंय )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहेब "लोकप्रिय" होणं इतकं सोपं असतं तर हजारो "धडपडणारे " लेखक/कवी "धडपडत" कशासाठी असते? लोकप्रियतेची एक वेगळी नस पकडण्यासाठी कौशल्य लागतेच. एके काळी (आई-वडिलांच्या वारशामुळे ) माझ्याही मनात "लोकप्रिय" कलाकृतींबद्दल एक बारीक तुच्छता होतीच. पण दोन्ही बाजूंनी जनरलायझेशन बरोबर वाटत नाही. लोकप्रिय आणि "टीकाकारांना रुचलेली / अभिजात" अशा दोन्ही बाजूंनी यशस्वी कलाकृती अनेक असतातच की: उदा. मिचेलेंजेलो , किंवा पिकासो, किंवा मराठीतले ग्रेस किंवा भीमसेन किंवा उर्दूतले गालिब किंवा फैझ . आणि लोंकांचीही अभिरुची हळूहळू समृद्ध होताना दिसतेच की! सुमार कलाकृतीचे बिंग लवकरच उघडे अशासाठी पडते, की तिने धड मनोरंजनही होत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदीप खरे मला आवडतो. मला पुढारी पेपरची बहार पुरवणी सुद्धा आवडते.
मराठीला तुकाराम आवश्यक आहेत, खानोलकर लागतात, कोलटकर आवश्यक आहेत तसेच संदीप खरे सुद्धा आवश्यक आहेत.

मला मराठी वाचायची गोडी बहार पुरवणीने, पुढारीच्या विश्वसंचारने (प्रिंट टीलसी) लावली. तसेच कैकांना कवितेकडे खऱ्यांनी ओढलं असेल. बहार पुरवणीतल्या अनमोल कोठाडियांच्या चित्रपट परीक्षणांनी जागतिक सिनेमांचं एक स्वतंत्र सुंदर अस्तित्त्व आहे याची पहिल्यांदा जाणीव करून दिली. नाहीतर आजही आम्ही बॉलिवूडी दळणांना भाव देत बसलो असतो.

खऱ्यांवर बाकीबाब खानोलकर सगळ्यांचे प्रभाव स्पष्ट जाणवतात.
तुम्ही खऱ्यांच्या स्थलांतराच्या कविता वाचून पाहा. कदाचित खरे कवी म्हणून अगदीच टाकाऊ नाही एवढं तरी पटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

डिट्टो..
पुढारी माझादेखिल आवडता पेपर आहे.
संदीप खरेचे 'नेणीवेची अक्षरे' खरोखरच सुंदर आहे. मौनाची भाषांतरेतील कविता तितक्याशा भावल्या नव्हत्या.
बाकी, मिलिंदजींना फुकटचा सल्ला, लोकप्रिय ते ते बकवास म्हणणाऱ्या दुढ्ढाचार्यांना फाट्यावर मारा. आवडतंय ते आवडतंय. बास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

शाळेत - इंग्रजीत जाऊन भराभर करिअरला लागणारे तेवढेच आवश्यक सामान माळ्यावरून डोक्यावर पाडून घेण्याची घाई नसती तर ' अग्गोबाई ढग्गोबाई' म्हणत पागोळ्यांखाली कित्येक तास घालवले असते भावी एंजिनिअर डॅाक्टरांनी.

बाकी बुटका,कद्रु ही गव्हाची नावेसुद्धा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल काव्य सोडून नुसते हिरो मटेरियल असलेले पुष्कळ लोक पण पुढे येतात, त्यांच्यपेक्षा खरे पुष्कळ्च 'खरा' वाटतो. आणि चांगल्या काव्याची ओळख तुम्ही तुमच्या कवितेतून बरोबर सांगितली, की "हे असं आपल्याला लिहिता यायला हवं होतं" "हे आपल्याच मनातलं, पण आपल्यापेक्षा छान व्यक्त केलेलं" असं वाटतं.

त्यामुळे मला तर तुमची कविता सुद्धा मनामध्ये डाचतेच आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0