व्यसन

.

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मराठी आंतरजालावर लेख लिहिणं हेही एक भयंकर व्यसन आहे म्हणे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! नेमक्या प्रश्नावर चांगली माहिती!
हा प्रश्न काही वर्षातच अतिशय विक्राळ रूप धारण करेल (केलेही असेल कोणी सांगावे) असे काही माहितगारांच्या तोंडून गेले काही वर्ष ऐकतो आहे.

लहान वयात आम्हीही भरपूर व्हिडियो गेमिंग केले त्याचीही आठवण झाली. तेव्हा कम्युटर नव्हते फारसे. रुपयाचे नाणे टाकून मारीयो वगैरे वेगवेगळे व्हिडियो गेम्स खेळायचे डबे असायचे. मात्र या गेम्स साठी आठवड्याला (छोटिशी- बहुदा ५ रुपये- का असेना) ठराविक रक्कम मिळत असल्याने खाऊचे / इतर पैसे वापरावेसे वाटले नाहीत. उलट 'कठिण लेव्हल' आहे असे बघितले तर दोन आठवडे थांबुन पैसे जमवून मग १० ट्राय करत असु Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अभ्यासपूर्ण निरिक्षण झाले आहे हे नक्की. पण का कोण जाणे, मंदार...मला हा विदा केवळ मुंबई आणि पुणे या दोन महानगरातीलच 'बालकां'ना लागू होईल की काय असे वाटते. त्याला कारण म्हणजे माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी कोल्हापूरशिवाय सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून [तसेच अगदी तालुका पातळीवरील गावातूनही] खूप फिरलो असून रीपोर्टिंगच्या निमित्ताने काही वेळा खाजगी नेट कॅफेमध्ये जाण्याचेही प्रसंग मला आले आहेत. तिथे माझे कार्यालयीन कामे संपल्यानंतर काहीशा उत्सुकतेने मी अशा कॅफेमध्ये येत राहाणारी, होणारी, ग्राहकांची हालचाल पाहिली आहे....निरिक्षण म्हणा हवे तर.... येणारा मुलामुलींचा गट, अपवाद वगळता, इंजिनिअरिंग्/मेडिकल्/तसेच पीजी पूर्ण होऊन 'गेट, सेट, नेट, यूपीएससी, एमपीएससी' आदी स्पर्धात्मक परीक्षा/एन्ट्रन्स एक्झामिनेशन्स आदींच्या माहितीपत्रकांसाठी, नोकरीच्या अर्जासाठी, जागांची उपलब्धतता आदी प्रकारची माहिती एकत्र करण्याच्या उद्देश्यानेच आलेली मी पाहिली आहेत. [तासाचा चार्ज भरला असल्याने जर हवे ते काम लवकर झाले आणि वेळ उरला असेल तर काही मुले, आणि मुलीही, याहू चॅटिंगकडे वळत होती. पण तिथेही इंग्रजीवर जितकी हवी तितकी 'कमांड' नसल्याने ती सफरही दहापंधरा मिनिटांचीच असायची.] दहावी-बारावीची मुले/मुली तर अपवादानेच मला आढळली....[अशा वर्गात शिक्षण घेत असलेली मुले मी साधारणतः ओळखू शकतो....तशी तीन मुले मला सोलापूर कॅफे केन्द्रावर सापडलीदेखील, पण ती 'गेमिंग' साठी न येता ई-मेलिंगसाठी आल्याचे दिसल्ये. उलटपक्षी मला कौतुक वाटले की दहावीची एक मुलगी अत्यंत सराईतपणे की-बोर्डवर आपली बोटे चालवित होती.]

नेट कॅफेच्या मालकांच्याही मी [माझे अधिकारपत्र दाखवून, चौकशीचा उद्देश्य सांगून] दोनतीन वेळा या संदर्भात मुलाखती घेतल्या आहेत. त्यांचे म्हणणे असे पडले की, आठ-दहा वर्षापूर्वी केवळ गेम्स आणि एंटरटेनमेन्ट साईट्ससाठी येणारा एक विशिष्ट वर्ग जरूर होता, पण तो मिक्स वयोगटातीलच असल्याने केवळ मुलेच गेम्स खेळत असतात असे म्हणता येणार नाही. हल्ली मात्र विविध कारणांसाठी येणार्‍यांची संख्या खूप आहे, गेमिंग हा त्यातील केवळ एक प्रकार. कॅफे संचालकांचे अनुभव हे सत्य मानले तर निदान अशा छोट्याछोट्या शहरातील मुलामुलीमध्ये कॉम्प्युटरबाबत असलेले प्रेम आस्था यांचे 'व्यसना'त रुपांतर झाले असेल असे माझा अनुभव सांगत नाही.

राहता राहिला प्रश्न...'सतत नेटवर बसून राहाण्याचा...' तर मला वाटते हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग असेल. त्यासाठी तुम्ही म्हणता तसे 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे सूत्र योग्यच ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख दोन वेळा बारकाईने वाचला. त्यातील मुद्दे अगदी बिनचूक अन वास्तवाला धरून आहेत असे मत झाले.
खरोखर करमणूक अन व्यसन यातील सूक्ष्म लक्ष्मणरेषा मुलेच काय, मोठ्यांच्याही लक्षात येत नाही.
अशोकजी पाटील यांनी मांडलेला मुद्दाही खरा आहे. माझ्या मते मोठ्या शहरांमधून असणारा मोकळ्या हवेचा अन नैसर्गिक वतावरणाच्या अभावामुळे मेट्रो सिटीमधील मुले अन मोठेही आंतरजालाच्या अतिरिक्त वापराकडे झुकत असावेत. सार्वजनिक सामाजिक Activities चा अभाव हेही एक कारण असू शकेल.
काही असो. आंजा हे व्यसन होऊ नये म्हणून सावधानता राखली पाहिजे याच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0