सामान्य माणसाची असामान्य कथा!

एका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट.

जान्हवी सामंत

काही सामान्य माणसं आपल्या असामान्य कर्तृत्वाने लोकांच्या नजरेत ‘हिरो’ बनतात. ‘सूरमा’ ही अशाच एका ‘हिरो’ची कथा. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. कुठल्याही बायोपिकेमध्ये नुसताच ड्रामा आणि संघर्ष असून चालत नाही तर त्याशिवाय काहीतरी विलक्षण असणे गरजेचे असते. संदीप सिंह यांचे आयुष्य अशा ब-याचशा विलक्षण क्षणांनी भरलेले आहे. हॉकी हे करिअर म्हणून स्वीकारण्यापासून तर हे करिअर अगदी अत्त्युच्च शिखरावर असताना एका जीवघेण्या अपघातात पायातील गेलेली शक्ती परत मिळवण्यापर्यंत संदीप सिंह यांचा प्रवास सोपा नव्हता आणि त्याच्या या प्रवासाला दिग्दर्शक साद अलीने पूरेपूर न्याय दिलाय.
संदीप सिंहची (दिलजीत दोसांज) कथा थोडीशी ‘सुल्तान’च्या सुरुवातीसारखी आहे. लहानपणी संदीप सिंह अगदी साधारण मुलासारखा असतो. कुठलेही ध्येय नाही, डोळ्यात कुठलेही स्वप्न नाही. त्याचा हॉकीवेडा आणि कर्तृत्ववान भाऊ विक्रम याच्या तुलनेत संदीप म्हणजे नुसताच उनाड आणि कामचुकार असल्याचे त्याच्या कुटुंबाला वाटत असते. संदीपला कुठल्याच कामात रस नसतो. पण प्रितो (तापसी पन्नू) नावाच्या एका हॉकी खेळाडूच्या प्रेमात पडतो आणि तिला जिंकायच्या नादात तो हॉकीच्या मैदानावर पोहोचतो. ९ वर्षांचा असताना संदीपने हॉकीची प्रॅक्टिस सोडून दिली असते. त्यामुळे तो पुन्हा मैदानावर पोहोचतो, तेव्हा कोच त्याचे जगणे हराम करतो. इतरांपेक्षा अधिक प्रॅक्टिस, अधिक शिक्षा त्याच्या वाट्याला येते. पण प्रितोच्या प्रेमापोटी तो तेही पत्करतो. कारण भारतीय हॉकी संघात स्थान मिळाले तरच प्रितो आपली होईल, ही खात्री त्याला असते. संदीप प्रचंड मेहनत घेतो. पण तरिही ऐनवेळी कोच त्याला डावलतो. संदीपच्या भावाचीही भारतीय संघात निवड होत नाही. याबद्दल दोन्ही भाऊ बोलत असतानाच संदीप हॉकीस्टिकचे असे काही डावपेच खेळतो की, विक्रम आपल्या भावाला बघून दंग होतो. हॉकीमधील अतिशय कठीण अशी ‘ड्रगफ्लिक’ ही हॉकीस्टिक चालवण्याची पद्धत, जी वर्षानुवर्षे प्रॅक्ट्रिस करूनही खेळाडूंना जमत नाही, ते संदीपला इतक्या सहजपणे करताना पाहून विक्रम अचंबित होतो. तो लगेच संदीपला पटियालाच्या एका कोचकडे (विजय राज) नेतो. इथूनच संदीपच्या करिअरला एक नवीन दिशा मिळते आणि लवकरच तो भारतीय टीममध्ये सिलेक्ट होतो.
भारतीय हॉकी संघात निवड झाल्यानंतर संदीपचे आयुष्यचं बदलून जाते. आपल्या ‘ड्रॅगफ्लिक मुव्ह’ मुळे लोकप्रीय झालेल्या संदीपला संपूर्ण जग ‘फ्लिकर सिंह’ म्हणून ओळखू लागते़. अपार लोकप्रीयता, खेळाडू म्हणून नवीन नोकरी, पैसा, प्रसिद्धी असे सगळे त्याला मिळते. पण एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी निघालेल्या संदीपला रेल्वेत एक अपघात होतो. एका पोलिस कॉन्स्टेबलच्या बंदूकीतून चुकून फायर झालेली गोळी थेट संदीपच्या पायात रूतून बसते. या अपघातामुळे संदीपचे पाय कमरेखालून लुळे पडतात. संदीप चालू शकेल की नाही, याबद्दलही डॉक्टर साशंक असतात. हे वास्तव मान्य करणे स्वत: संदीपलाही अवघड जाते. पण पायावर उभे होऊन एक दिवस पुन्हा हॉकी खेळू, असा तो निश्चय करतो.
चित्रपटाचा पहिला भाग खुपच हलका-फुलका आणि मनोरंजक आहे. शाद अलीने अतिशय तरलपणे एका छोट्या शहराचे चित्र उभे केले आहे. साधे मध्यमवर्गीय कुटुंब, त्यांच्यातले हलके-फुलके प्रेमळ क्षण यातून संदीपचे आयुष्य आणि त्याच्या यशात कुटुंबाचा किती वाटा आहे, ते कळून येते. पण मध्यंतरानंतरचा दुसरा भाग मात्र काहीसा बोजड वाटतो. संदीपला आलेले नैराश्य, अपघातात झालेले त्याचे भावनिक आणि शारीरिक नुकसान खूपचं दयनीय वाटते. मुलाच्या यशात त्याचा अभिमान बाळगणारे कुटुंब अपघातानंतर त्यांच्या नैराश्येच्या काळातही त्याला साथ देते, हे क्षण भावूक करतात. यामुळे चित्रपट बराच लांबतो. संदीप निश्चय करून परत मैदानात उतरतेपर्यंत चित्रपट थोडा कंटाळवाणा वाटतो. इथपर्यंत त्याची प्रितोसोबतची प्रेमकथा थोडी बेचव वाटू लागते. एका थरारक क्लायमॅक्समुळेही चित्रपटाची गाडी नीटपणे रूळावर येत नाही़ अंगद बेदी, सतीश कौशिक, विजय राज या सगळ्यांनीच आपआपल्या भूमिकेत जीव ओतलाय. तापसीला चित्रपटात फार वाव नाही. पण तरिही वाट्याला आलेली भूमिका तिने उत्तम साकारली आहे. दिलजीत हा या चित्रपटाचा खरा हिरो आहे. त्याने नक्कीच कौतुकास्पद काम केले आहे. मध्यांतरानंतर चित्रपट काहीसा कंटाळा आणत असला तरिही एका सामान्य माणसाचा असामान्य प्रवास दाखवण्याचा प्रयत्न मनाला भावतो. त्यामुळे क्रीडाप्रेमींना विशेषत: हॉकी प्रेमींना हा चित्रपट खूप मनोरंजक वाटेल, यात शंकाचं नाहीच.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्रपट नक्कीच बघणार. परिक्षण चांगले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुम्ही जान्हवी सामंत आहात का? नसल्यास त्यांची परवानगी घेतली आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जान्हवी सामंत कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0