करुणानिधींनी बदलला ड्रेसकोड

तमिळनाडून मधील द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी गेले सात वर्षे असलेला त्यांचा ड्रेसकोड बदलला आहे. पुर्वी ते अंगावर पिवळी शाल घेत असत. आता ते काळ्या शर्टावर पांढरी शाल परिधान करीत आहेत.मुख्यमंत्री जयललिता यांच्या सरकारचा निषेध करण्यासाठी ते काळा शर्ट घालत असल्याचे सांगत असले तरी ज्योतिषाच्या सल्ल्या वरुन त्यांनी हा बदल केले असल्याचे मानले जाते. पिवळा रंग ही त्यावेळी त्यांनी ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच स्वीकारला होता.
दै सकाळची ही बातमी आज वाचनात आली. राजकारणी, अभिनेते, उद्योगपती लोक ज्योतिषांच्या सांगण्यावरुन असे बदल करत असतात. यात नवीन असे काही नाही. खरंतर ज्योतिष हे ते 'सपोर्टिंग' म्हणुन वापरत असतात. रंग बदलल्याने राजकीय परिस्थितीचा रंग बदलेल ही समजूत करुणानिधींची ही नसेल. पण अस्थिर व अनिश्चिततेच्या पार्श्वभुमीवर मनाला दिलासा देणार्‍या गोष्टी या लोकांना हव्या असतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणार्‍यांनाही मानसिक आधार हवाच असतो. तो कुठला घ्यायचा हे ते त्यांच्या सोयीने ठरवत असतात. मानवी मन शंभर टक्के विवेकी विचारी असूच शकत नाही. जो पर्यंत त्यात इरॅशनल कटेंट आहे तो पर्यंत (अंध)श्रद्धा ह्या रहाणारच. न जाणो भविष्यात कदाचित बायोकेमिकल रोबो तयार होतील जे अंधश्रद्ध नसतील.
जोपर्यंत जगात अनिश्चितता आहे तो पर्यंत ज्योतिषाला मरण नाही ह भाकीत तर आम्ही केव्हाच वर्तवलेले आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रकाशजी...

तमिळनाडूच्या राजकीय इतिहासातील हे एक नित्याचे सोंग आहे. "काळा शर्ट"..."काळी साडी" हे विरोध अभिव्यक्तीचे एक मूक हत्यार आहे असे तिथे मानले जाते. आज आपण करुणानिधीच्या या कृत्याबद्दल लिहितो/बोलतो आहोत, पण खुद्द जयललिता आणि त्यांच्या एआयअण्णाडीएमकेच्या आमदारांनी देखील हे 'ड्रेस कोड' चे नखरे करून दाखविले आहेत. अर्थात त्यावेळी त्यांचाही पक्ष विरोधी बाकावर बसत होता. असेम्ब्लीमध्ये त्या पक्षाच्या सार्‍या आमदारांनी काळे शर्ट घालून [महिला आमदारांनी काळी साडी नेसून] संपूर्ण सेशन त्या धर्तीच्या विरोधाने घालविले होते.

करुणानिधींची ही चालदेखील एक राजकीय वासाचीच आहे, त्याला कारण म्हणजे दोन दिवसापूर्वीच त्यांच्या नातवाच्या.....दुराई दयानिधी....बंगल्यावर तमिळनाडू पोलिसांनी छापा टाकून ग्रॅनाईट स्कॅम, जमिनी बळकावणे आणि गैरकानूनी खाणखुदाई प्रकरणासंबंधीची कागदपत्रे जप्त केली आहेत. नातू तर फरारीच झाला आहे, पण पोलिस मागावर आहेत. तो राग आजोबाच्या मनी ठसठसत असणार, मग मुख्य प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुभागले जावे म्हणून हे बदलत्या ड्रेस कोडचे नाटक....त्यामध्ये ज्योतिषशास्त्र वा श्रद्धा वा अंधश्रद्धा काहीही नाही....आहे तो फक्त संधीसाधूपणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा करूणानिधी पूर्वीपासून अगदी ६०च्या दशकापासून मला बिलंदर वाटतो.तसे आपले टोप्या,लेंगे घालणारे नेतेही बिलंदरच असतात म्हणा.
(स्वातंत्र्यापासून असली नाटके पाहत आलेली) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करुणानिधी हे नास्तिक असल्याचे ऐकले होते?..मग हि ज्योतिषाची कय भानगड आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

या विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. रमाबाईंना कदाचित माहिती असेल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

नास्तिक असण्यानसण्याचा ज्योतिषावर विश्वास असण्यानसण्याशी संबंध काय?

हे म्हणजे, "अमकेतमके तर शाकाहारी असल्याबद्दल ऐकले होते... मग त्यांच्या दारू पिण्याची ही काय भानगड आहे?", असे विचारण्यासारखे झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक असण्यानसण्याचा ज्योतिषावर विश्वास असण्यानसण्याशी संबंध काय?

नास्तिक असल्यावर ज्योतिषावर विश्वास असण्याची शक्यता ही अस्तिक असल्यावर ज्योतिषावर विश्वास असण्याच्या शक्यतेपेक्षा कितितरी कमी आहे. असा तो संबंध लॉ ऑफ प्रोबॅबलिटी शी आहे.
नास्तिक मनुष्य ज्योतिषावर विश्वास ठेउच शकत नाही; तस असेल तर तो नास्तिक नव्हेच अस ठामपणे म्हणता येत नाही हे मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

"...अमकेतमके तर शाकाहारी असल्याबद्दल ऐकले होते... मग त्यांच्या दारू पिण्याची ही काय भानगड आहे....?"

~ दाखला आवडला. "....अमकातमका नट काय सुरेल गातो हो ! विशेष म्हणजे नाट्यक्षेत्रात असूनही तो निर्व्यसनी राहिला आहे....!" अशी मताची पिचकारीदेखील वरील उदाहरणासारखीच आहे.

२. करुणानिधी आणि त्यांच्या साथीदारांनी आपण नास्तिक असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर 'रामा' संदर्भात [रामसेतू...एक थोतांड] त्यानी काढलेल्या अपमानस्पद विधानामुळे तर अगदी दिल्लीही चांगलीच गरम झाली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक असणे म्हंजे कुठल्याहि प्रकारच्या अतिमानवी शक्तीचे अस्तित्व नाकारणे अशी साधारण व्याख्या आहे.मग ज्योतिष हे अतिमानवी शक्तींमध्ये जमा होत नाही का?आणि अशा संकल्पनांवर विश्वास ठेवनार्या व्यक्तीस नास्तिक कसे म्ह्णता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

ज्योतिष अतिमानवी कसं काय? माणसानेच नाही का हे ठोकताळे किंवा सूडोसायन्स निर्माण केलेलं? गुरूत्त्वाकर्षण अतिमानवी म्हणता येईल. पण देव न मानणार्‍या लोकांमधे ज्योतिष न मानणार्‍यांचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता पटते.

दुसरं म्हणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी करूणानिधींनी असं केलं नसेल कशावरून? स्टंटबाजी करायला काय? (एकेकाळी संमतीवयाच्या कायद्यालाही राजकीय नेत्यांकडून लोकसंग्रहासाठी(?) विरोध झाला होता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शर्ट पँट घालून (शहरांमध्ये) राजकारण राजकारण खेळणार्‍या केजरीवालांनीही (गावाकडल्या) गांधी टोपीचा नवीन ड्रेसकोड स्वीकारला आहे असे समजते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला सतत एक प्रश्न पडत आला आहे-गांधीजी कधी तशी टोपी घातलेले दिसले नाहित मग तिला तसे नाव का पडले असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

मला सतत एक प्रश्न पडत आला आहे-गांधीजी कधी तशी टोपी घातलेले दिसले नाहित मग तिला तसे नाव का पडले असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

मला सतत एक प्रश्न पडत आला आहे-गांधीजी कधी तशी टोपी घातलेले दिसले नाहित मग तिला तसे नाव का पडले असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

तुमच्या प्रश्नाचे उत्तर गुगल देईल पण मी तरी याचे नाव "नेहरू टोपी" असेच ऐकले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शंकासमाधान झाले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी