फोटो शेअरिंग

फोटो शेअरिंग

साइटवर फोटो शेअरिंगसाठी
१)postimage dot com
२)tinypic dot com
३) facebook dot com
४)photobucket dot com
५) flickr dot com
६) instagram
७)twitter
८) cloudfront dot net
९)google dot com ( photos)

या साइट्स वापरता येतात. काळाप्रमाणे यांचे फिचर्स आणि फ्री असणे/नसणे बदलत आहे. शिवाय साइट्स बंदही पडतात.
शेवटच्या photos dot google dot com या साइटवरून फोटो शेअरिंग करण्याबद्दल काही ट्रायल एररमधून त्याचा उपयोग करण्यासाठी काय करावे लागते, फोटो लिंकस का चालत नाहीत याबद्दल थोडक्यात -

माहिती
अ) प्रत्येक जीमेल अकाउंटला १५ जिबी स्टोरेज गुगल फ्री देते ती गुगलच्या "ड्राइव" या साइटवर असते. या अकाउंटशी संबंधुत युट्युब विडिओज, फाइल्स, ओडिओ, फोटो, डॅाक्युमेंटस धरून १५ जिबी.
गुगल फोटोजवर अपलोड केलेले फोटो "हाइ क्वालटी" म्हणजे दोनशे KB पेक्षा कमीचे कम्प्रेस केलेले असतात ते या १५ जिबीमध्ये मोजले जात नाहीत. सुरुवातीला हाच डिफाल्ट असतो.
ब)
दुसरा पर्याय " हाइ रेझलुशनचे" जितक्या एमबीचे असतील त्या साइजचे अपलोड करण्याचा पर्याय निवडल्यास ते स्टोरेज लिमिटमध्ये मोजले जातात. यासाठी "गुगल ड्राइव" उघडून त्यामध्ये "गुगल फोटोज" हा फोल्डर add करावा लागतो. ( ड्राइवच्या सेटिंग्जमध्ये आहे.)
( सेटिंग्जमधून बदल करण्यासाठी डेस्कटॅाप पेज उघडावे लागते.) हा बदल केला नसेल तर शेअर्ड फोटो लिंकस चालत नाहीत.

---------
तर साधा (अ) डिफाल्ट पर्यायासाठी खालील क्रम करा.
१) तुम्हाला फोटो अपलोड करून वारंवार शेअर करायचे असतील तर तुमचे फोनमधे सेटप केलेले जीमेल अकाउंट वापरू नका कारण ते अपलोड करून शेअर केलेले फोटो विसरून डिलीट केले जातात. वेगळेच जीमेल अकाउंट क्रोम/ फायरफॅाक्समधून लॅागिन करून उघडा.
या अकाउंटशी संलग्न फोटोज, ड्राइव इत्यादि वेगळ्या असतात.
२) दहा बारा फोटो अपलोड करायचे असतील तर प्रथम दोन फोटो अपलोड करा.
३) ते दोन फोटो अपलोड होऊन दिसतील तेव्हा सिलेक्ट करून creat album करा.
४) अल्बमचे नाव देणे - समजा गोव्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये दोनवेळा गेलो असू तर
गोवा २०१८११०२
गोवा २०१८११२६अशी नावे दिल्याने युनिक आणि तारीखही कळते.
५)आता अल्बम उघडल्यावर ते दोन फोटो दिसतील.
६) अल्बमच्यावर टुलबारमधून सेटिंग्जमध्ये जाऊन शेअर विद पब्लिक करा. अल्बमची शेअरिंग लिंक तयार होइल. आता क्लोज करून पुन्हा अल्बम लिस्ट उघडल्यावर या अल्बमचे नाव शेअर्ड अल्बम असे दिसले पाहिजे.
७) हा अल्बम उघडून वरचे प्लस बटण वापरून आणखी फोटो अपलोड केल्यावर ते याच शेअर्ड अल्बममध्ये जातील. त्यातल्या एका फोटोवर क्लिक करा आणि शेअरिंग लिंक कॅापी करून घ्या.( p)
८) ctrlq dot org/ google/photos ही एक नवीन साइट (अॅपसारखी आहे) उघडून तिथे ही (p) link पेस्ट करा. खालचे "get sharing link" बटण क्लिक केल्यावर पेज आपोआप स्क्रोल डाउन होउन direct आणि embed लिंकस मिळतात॥ direct लिंक(D) इथे वापरा.
बटण क्लिक केल्यावर " try another link" हा मेसेज आल्यास तुमचे १-७ स्टेपमध्ये गडबड झाली आहे. तसं पाहिलं तर ही साइट एक टेस्टच आहे.

हे प्रकरण फार लांबलचक वाटलं तरी फारच झटकन होते.

आणि हां
फोटोचे इमेज कोड टेम्प्लेट - ओफलाइन लेख लिहिताना उपयोगी पडेल ते पाहा -

आडव्या फोटोंसाठी
<img src="copypastherelink" width="640"/>
--------

उभ्या फोटोंसाठी
<img src="copypastherelink" width="480"/>

कॅापी केलेली direct link (D) copypastherelink च्या जागी बदलून तयार कोड लेखात योग्य जागी टाकायचा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे त्या कट्ट्याचे फोटो कुणीतरी बघा रे दिसतात का.. आचरटबाबा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्ट्याचे दोन फोटो ग्रुपवर आलेत त्यातला एक दिलाय उत्स्फुर्त कट्टे धाग्यात, पण धागा फार लांबलाय तो. पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0