मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १००

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद ९०+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

अस्वलानं गुप्तेंच्या कथांच्या स्रोतांबद्दल ऐसीवर लिहिलं (दुवा); त्या धाग्याची वाच्यता फेसबुकवर झाली. त्यातून लोकसत्तामध्ये प्रतिक पुरी यांनी लेख लिहिला, आता त्याला गुप्त्यांनी उत्तर दिलं आहे. (हे दोन्ही दुवे अस्वलाच्या धाग्यात आहेत.) पुरींनी केलेली टीका आणि त्यावर गुप्त्यांचं उत्तर दोन्ही लेख आता विनोदीच वाटत आहेत.

कालच्याच लोकसत्तामध्ये मुकुंद संगोराम यांनी पुलंवर काढलेल्या चित्रपटावर टीकेची झोड उठवली आहे. (दुवा) सिनेमा न पाहता, पुलंचे फारसं वाङ्‌मय न वाचता आणि सिनेमा या माध्यमाबद्दल फार जाणिवा नसूनही मला तो लेख आक्रस्ताळी आणि म्हणून विनोदी वाटला. (कारण हवं असल्यास, उदाहरणार्थ, दारू प्यायल्याचं दाखवल्यामुळे चारित्र्यहनन, वगैरे.) देवावर केलेली टीका सहन न होऊन किंवा धर्माच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी पेटून उठतात तशी. Wink मात्र ते असो.

फेसबुकवर या लेखाबद्दल मत वाचलं ते म्हणजे, फेसबुकवरचं स्टेटस उचलून लोकसत्तेत छापलं आहे. म्हणजे कोणीही उठावं, काहीही टीका करावी, अशा अर्थानं. गुप्ते आपल्यावर झालेल्या 'लेखनचौर्या'ला उत्तर देताना म्हणतात -

फेसबुक वा एखादे संस्थळ हे काही निवाडय़ाचे, न्यायदानाचे अधिकृत ठिकाण नव्हे, की जिथे कुणीही हवे तेव्हा लेखकाला ‘समन’ करू शकेल आणि तिथे जाऊन लेखकाने हजर न होणे हा दखलपात्र गुन्हा ठरू शकेल. अशी अनेक समाजमाध्यमे आहेत- जिथे साहित्य, चित्रपट, संगीतादी कलांबद्दल बोलले/ लिहिले जाते. त्यात अनेक संगीतकारांवर, लेखकांवर, कलाकारांवर उलटसुलट प्रतिक्रिया, आरोप होत असतात. त्या प्रत्येक ठिकाणी लेखक वा कलाकार उपस्थित राहून भाग घेईल, ही अपेक्षा अवाजवी आहे. परंतु तोच मुद्दा पुन:पुन्हा उपस्थित केला जात असेल आणि संपादन प्रक्रियेतून जाणाऱ्या प्रथितयश मुद्रित माध्यमांतून तो उचलला गेला असेल, तर व्यवधानांतून वेळ काढून त्यावर खुलासा देणे मी आवश्यक समजतो.

गंमत याची वाटली की लोकसत्ता हे जुनं, प्रस्थापित आणि काही प्रमाणात आदरप्राप्त वृत्तपत्र आहे. गुप्तेही असं समजतात. मात्र लोकसत्तामधला पुरी आणि आता संगोराम यांचे टीका करणारे लेख मला विनोदी वाटले. याउलट अस्वलाचा लेख आणि प्रतिसाद.

लोकसत्ता फेसबुक बनू बघत आहे का? किंबहुना छापील माध्यमं टिकून राहायची तर त्यांना थोड्या-बहुत प्रमाणात फेसबुकवर चालणाऱ्या, किमान तत्कालीन महत्त्वाच्या वादांची दखल घ्यावी लागेल का? एके काळी संपादकांना जे वाद महत्त्वाचे वाटत असतील त्यासंदर्भातलं लेखन ते छापत असतील. आता इतर माध्यमांमध्ये गुप्ते-वाङ्‌मयचौर्य प्रकाराची चर्चा चावून चोथा झाल्यावर लोकसत्तानं त्याची दखल घेतली. प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडीत निघायला लागली आहे, अशा पद्धतीनं या प्रकरणांकडे बघता येईल का?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पना उचलणे किंवा कुणाला उचल्यासारखी वाटली तर लेखक लगेच मान्य करतो का? संस्थळांवर चक्क कॅापी पेस्टही झाल्याची उदाहरणं आहेत. तरीही हो म्हणत नाहीत. सं०वरच्या लेखामुळे शाबासक्यांशिवाय काही मिळत नसताना किती ती खटपट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सं०वरच्या लेखामुळे शाबासक्यांशिवाय काही मिळत नसताना किती ती खटपट!

खरच!! खटपट/प्रयत्न करावेत पण चोरी कशाला ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी आंतरजालावर बागडणाऱ्या अनुभवी लोकांना रामतीर्थकर बाई चांगल्याच परिचयाच्या असतील. त्या जुन्या काळात राहतात, बुरसट आहेत वगैरे मुद्द्यांवरून मराठी आंजावर भांडणं होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र 'ब्राह्मण निराळे आणि ब्राह्मण्य निराळं', हे ज्यांना मान्य नाही किंवा समजत नाही, त्यांनी रामतीर्थकर बाई आणि स्वतःची तुलना एकदा करून बघाच, अशी नम्र विनंती.

ब्राह्मण्यवाद संपला तर समाजातील आपले वर्चस्व संपेल. - रामतीर्थकर.
बातमीची पीडीएफ
रामतीर्थकर ब्राह्मण्यवाद

समाजातल्या इतर संवेदनशील, हुशार, किंवा दखलपात्र घटकांनी सांगून जे काम झालं नसतं, ते कदाचित रामतीर्थकर बाई करून दाखवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>ब्राह्मण्यवाद संपला तर समाजातील आपले वर्चस्व संपेल. - रामतीर्थकर.

आपले म्हणजे कोणाचे वर्चस्व संपेल याची अपर्णाआईंना भीती वाटते?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ताई ‘महान’ अाहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>हायपॉथिकेट आणि पॉन यांच्यात किंचित फरक आहेसे वाटते.

हायपोथिकेट व मॉर्टगेज मध्ये काय फरक आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>हायपोथिकेट व मॉर्टगेज ~~ >>

त्या दिवशीच प्रश्न वाचला पण जुजबी माहिती म्हणजे वाहनासाठी हायपोथिकेट व घरासाठी मॉर्टगेज हे सर्वांनाच ठाऊक आहे. सखोल हे एलएलएम कमर्षल विषयात कायदे आहेत. ते शोधावे लागेल.
वाहन अपघातात ड्राइवर, वाहनमालक याचबरोबर लोन देणारी बँक ( हाइपोथिकेटेड ओनर) यांच्यावर पडलेल्या जबाबदारीचे प्रश्न असतील. शिवाय वाहन आणि घर हे प्रत्यक्ष बँकेच्या ताब्यात नसते. कर्जाची परतफेड/ वसुली हासुद्धा मुद्दा येतोच.
चांगला प्रश्न. शोधतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्थावर मालमत्ता मॉर्टगेज होते आणि जंगम मालमत्ता हायपोथिकेट होते असं काही असेल का? कार, धन्द्यातील स्टॉक, मशिनरी ही जंगम मालमत्ता (मूव्हेबल प्रॉपर्टी) असते.

हे मिळालं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्थावर मालमत्ता मॉर्टगेज होते आणि जंगम वगैरे माहीत असतेच बऱ्याच जणांना म्हणून ते सोडून दिले.
वस्तुच्या मालकीने जे हक्क व जबाबदाऱ्या उत्पन्न होतात त्यावरचे कायदे वाचण्यात मला इं० आहे. पुर्वी झाबवाला यांची कायद्याची पुस्तक मालिका होती पण ती पुस्तके हल्ली दिसत नाहीत.
क्रिमिनॅालजीचे दोन ठोकळे धाधा रुपयांत मिळाल्याने घेतले आहेत पण हा विषय वेगळा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकार जे लॉटरी चालविते ती कशी चालविते? म्हणजे त्या लॉटरीच्या आमदानीतील काही भाग सरकार ठेवते का? त्यातून लॉटरी यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना पैसे दिले जातात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडा नाही, बराच मोठा भाग सरकार ठेवतं. त्यातून लॉटरी चालवण्याचा खर्च (पगार + विक्रेत्यांचं कमिशन हे मुख्य खर्च, बक्षीस हा मुख्य खर्च नसतो) भागवलं जातं.

भारतात तरी छोट्या राज्यांसाठी लॉटरीतून मिळणारा महसूल महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या लॉटऱ्या जास्त सिरियसली चालवल्या जातात. माझ्या लहानपणी तरी नागालँड, मणिपूर, त्रिपुरा वगैरे लॉटऱ्या फेमस होत्या. (या राज्यांना - विशेषतः नागालँड - आणखी एका विचित्र प्रकारे महसूल मिळतो, पण त्याबद्दल नंतर कधीतरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद आबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉन एलिया हा अत्यंत वेगळी अनोखी अनवट औघड शायरी लिहीणारा, शायर अत्यंत प्रतिभाशाली अनोखा कलंदर व्यक्तीत्वाचा शायर , स्मोकींग करत मुशायऱ्यात शायरी म्हणणारा बहुधा एखादाच, अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा
या शायरचा डॉ. कुमार विश्वास यांनी ज्या प्रगल्भतेने परीचय करुन दिलेला आहे तो अत्यंत श्रवणीय आहे. कुमार विश्वांसाचे राजकारण बाजुला ठेउन व त्यांच्या नेहमीच्या इमेज ला बाजुन ठेऊन हा व्हिडियो जरुर पहावा
उर्दु शायरीचे एक अनोखे विलक्षण दालन उघडेल इतकी गॅरंटी
खुदरंग जॉन एलिया बाय डॉ. कुमार विश्वास्
https://www.youtube.com/watch?v=QFxeWupSmzo

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यादों का हिसाब रख रहा हूँ
सीने में अज़ाब रख रहा हूँ

तुम कुछ कहे जाओ क्या कहूँ मैं
बस दिल में जवाब रख रहा हूँ

दामन में किए हैं जमा गिर्दाब
जेबों में हबाब रख रहा हूँ

आएगा वो नख़वती सो मैं भी
कमरे को ख़राब रख रहा हूँ

तुम पर मैं सहीफ़ा-हा-ए-कोहना
इक ताज़ा किताब रख रहा हूँ

दिल ने किया है क़स्द-ए-सफ़र घर समेट लो
जाना है इस दयार से मंज़र समेट लो

आज़ादगी में शर्त भी है एहतियात की
परवाज़ का है इज़्न मगर पर समेट लो

हमला है चार सू दर-ओ-दीवार-ए-शहर का
सब जंगलों को शहर के अंदर समेट लो

बिखरा हुआ हूँ सरसर-ए-शाम-ए-फ़िराक़ से
अब आ भी जाओ और मुझे आ कर समेट लो

रखता नहीं है कोई न-गुफ़्ता का याँ हिसाब
जो कुछ है दिल में उस को लबों पर समेट लो

बाहर गुज़ार दी कभी अंदर भी आएँगे
हम से ये पूछना कभी हम घर भी आएँगे

ख़ुद आहनी नहीं हो तो पोशिश हो आहनी
यूँ शीशा ही रहोगे तो पत्थर भी आएँगे

ये दश्त-ए-बे-तरफ़ है गुमानों का मौज-खेज़
इस में सराब क्या के समंदर भी आएँगे

आशुफ़्तगी की फ़स्ल का आग़ाज़ है अभी
आशुफ़्तगाँ पलट के अभी घर भी आएँगे

देखें तो चल के यार तिलिस्मात-ए-सम्त-ए-दिल
मरना भी पड़ गया तो चलो मर भी आएँगे

ये शख़्स आज कुछ नहीं पर कल ये देखियो
उस की तरफ़ क़दम ही नहीं सर भी आएँगे

दिल का दयार-ए-ख़्वाब में दूर तलक गुज़र रहा
पाँव नहीं थे दरमियाँ आज बड़ा सफ़र रहा

हो न सका हमें कभी अपना ख़याल तक नसीब
नक़्श किसी ख़याल का लौह-ए-ख़याल पर रहा

नक़्श-गरों से चाहिए नक़्श ओ निगार का हिसाब
रंग की बात मत करो रंग बहुत बिखर रहा

जाने गुमाँ की वो गली ऎसी जगह है कौन सी
देख रहे हो तुम के मैं फिर वहीं जा के मर रहा

दिल मेरे दिल मुझे भी तुम अपने ख़्वास में रखो
याराँ तुम्हारे बाब में मैं ही न मोतबर रहा

शहर-ए-फ़िराक़-ए-यार से आई है इक ख़बर मुझे
कूचा-ए-याद-ए-यार से कोई नहीं उभर रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनातला छोटा प्रश्न - इंग्रजीत जसं रॉक/डेथ मेटल वगैरे संगीत आहे तसं भारतात काही आहे का?
मोठा प्रश्न - तरूणांची गाणी म्हटलं म्हणजे कसा जोश असतो, एक भान हरपून टाकणारं वगैरे संगीत. तसलं पाश्चात्य संगीतात आहे, भारतीय संगीतात असलं काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरूणांची गाणी म्हटलं म्हणजे कसा जोश असतो, एक भान हरपून टाकणारं वगैरे संगीत.

राष्ट्रीय स्टीरियोटैपविरोधी आघाडीकडून याचा निषेध. जब तरूण था मय, तेव्हाही जोश दाखवण्यासाठी गाणंच ऐकावं असं नाही. शिवाय भान हरपून टाकायला वृद्धश्रमण वगैरे असताना गाणीगिणी कशाला ऐकायचीत?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अवं तसं नव्हं आबा,
जोश दाखवायला गाणी नाहीत, पण गाणी ऐकून जोश आला पाहिजे.
उदा. जिममधे ऐकायला उत्तम इंग्रजी गाणी आहेत, काही हिंदीही आहेत.
तशी मराठी कुठली?
--
भान हरपण्याबद्दल सहमत, तो शब्द माझा अंमळ हुकला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरूणांची गाणी म्हटलं म्हणजे कसा जोश असतो, एक भान हरपून टाकणारं वगैरे संगीत. तसलं पाश्चात्य संगीतात आहे, भारतीय संगीतात असलं काही आहे का?

हे चालंल का?

आमच्यात ह्याला कंटेपररी डॅन्स म्हणतात.

हेसुद्धा बघा -

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतीय लोकसंगीतात भोजपुरी गाण्यात असावं -
अरीरीरीरीssssss सैंया हमार चटणी पिसवैया कोणता प्रकार म्हणता येईल?
--
तबला पेटीसह कंटाळवाणे गाणे प्रकार इराण,पर्शियातला आहे.

ढोलकाच्या तालावरचा आदिवासी नाच गाणे इकडचा तरुणांचा प्रत्येक राज्यात आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तबला पेटीसह कंटाळवाणे गाणे प्रकार इराण,पर्शियातला आहे.
असहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिकडून लाहोर पंजाब मग इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की माहित नाही . पण तरीही लिहितो .
सांगीतिक दृष्ट्या रॉक ला समांतर काही असेल असे वाटत नाही ( आणि त्याची गरजही नाही*)
पण तरूणांची गाणी, जोश, भान हरपून टाकणारं वगैरे संगीत , हे भारतातच काय पण जगभर कुठेही नक्की सापडावं .
भारतात प्रांतीय लोकसंगीत, उपशास्त्रीय संगीत , भक्ती/सुफी संगीत, यात जोश आणि भान हरपून टाकणारं संगीत नक्की सापडायला हरकत नाही .
कदाचित रॉक मधील बंड , जोश, भान हरपून टाकणारं वगैरे इथे वर लिहिलेल्या पारंपरिक संगीतातातुन व्यक्त होत असाव असा संशय. ( त्याचे कारण ही वेगळेच असावे )
या विषयातील जाणकार नसल्याने मी जास्त लिहीत नाही .

* रॉक हे शेवटी पाश्चात्य /युरोप/यूएसए यातील तत्कालीन आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे अपत्य ( किंवा अपत्यांचे अपत्य ) असावे असे माझे आकलन .
तशी परिस्थिती इथे नसल्याने ( पूर्वापार ) ,सांगीतिक दृष्ट्या त्याला समांतर काही असायलाच पाहिजे असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्याला माझ्या मित्राच्या घराच्या वरच्या मजल्यावर एका घरात* आनंदमार्गी लोकांचे भजन चाले. तासनतास ते लोक "बाबा नाम केवलं; बाबा नाम केवलं" असा जप करीत. तेव्हा त्यांचे भान हरपलेलेच असे.

* आता ती चाळ पाडून तिथे बिल्डिंग झाली आहे. माझ्या मित्राचे घर अजून त्या बिल्डिंगमध्ये आहे. पण ते भजनवाले कुठे गेले ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भान हरपणारं हा शब्द हुकला होता.
पण उरलेला प्रतिसाद मार्मिक. मला हेच विचारायचं होतं की बंडखोर, जोशिलं आणि एक प्रकारे आक्रमक संगीत मराठीत आहे का?
ह्याचा अर्थ ते चांगलं असं नाही- पण त्या "टायपातलं".
त्या मानाने मराठी गाणी बरीच मिळमिळित वाटतात
कुणाला अशी बंडखोर, जोशिली , आक्रमक मराठी गाणी आठवताहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समग्र अवधूत गुप्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंडखोर, जोशिलं आणि एक प्रकारे आक्रमक संगीत मराठीत आहे का?

एकेकाळी चांगला ढोल ताशा ऐकताना भान हरपत असे. ढोल-ताशे मला तरी जोशिलें वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+1
तमाशातली ढोलकी, हलगी, संबळ, लेझीम, पोवाडा हे प्रकार जोशींले असतात.
लेझीम हलकीफुलकी पण खेळता येते (सोलापुरातील मंगळवेढा स्टाईल), पण अधिक गतिमान घाम फुटेल अशीही खेळता येते

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लोकल मधले 'दत्त दर्शनाला जायाचं जायाचं' चालेल का? ऐकणाऱ्यांचे माहीत नाही पण गाणाऱ्यांचे तरी भान हरपलेले वाटते.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐकणाऱ्यांचे माहीत नाही

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिल्डिंग हलवून टाकायची क्षमता नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नागरिकांनी शरीराचं डस्टबिन केलं- जगन्नाथ दीक्षित

हे वाचलं. दीक्षितांच्या जीवनपद्धतीबद्दल हल्ली बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत.

व्यायाम करताना वजनं उचलण्याचे उल्लेख खड्यासारखं टाळणं आणि मधुमेहाची 'साथ' आल्यासारखी परिस्थिती असताना तो टाळण्याबद्दल अवाक्षरही न काढणं, या दोन्ही गोष्टी अत्यंत शोचनीय आहेत. भाषणात एका बाजूला वैज्ञानिक पद्धतीबद्दल चुकूनही चाड न बाळगणं (उदाहरण - "राम-कृष्ण सकाळी नाश्ता करत नसत.") आणि दुसऱ्या बाजूनं झालेला मधुमेहाचा विकार आटोक्यात आणणं एवढाच संकुचित विचार हे पाहता, भारतीय लोकांना बाबागिरीच आवडते, का भारतीय 'तज्ज्ञां'ना बाबागिरीपलीकडे जाताच येत नाही, अशा शंका येतात.

गाडगेबाबांची मंदिरं उभारली की सगळं सुफळ संपूर्ण होईल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटतं बाबागिरीचे २ प्रकार असावेत.
अडाणी बाबा- हे खरोखरची बाबागिरी करतात. वैज्ञानिक पद्धतीबद्दल चुकूनही चाड न बाळगणं, अंतरात्म्याला वाटेल ते सांगणं वगैरे. त्यांच्यामते खरोखरंच ते बरोबर असतात.

मार्केटिंग बाबा- ह्या लोकांना चांगलं माहिती असतं की "बाबागिरी खपते". भारतात बाबागिरीला डिमांड आहे तेव्हा तसं ते स्वत:ला पॅकेज करतात.
दाढी वाढवतात, भगवी किंवा तत्सम वस्त्रं घालतात, समोर टायरॅनोसॉरस आला तरी त्यांच्या चेहेऱ्यावर एक "मधुर स्मित" असतं, ते नेहेमी शांत दिसतात. वगैरे.

दिक्षितांबद्द्ल माहिती नाही, पण ल्यूक का कोणीतरी माणूस म्हणे असाच काहीतरी डाएट सांगतो - परत केटो वगैरे डाएट आहेतच.
राम कृष्ण नाश्ता करत नव्हते हे बेष्ट आहे. तसं काय कुठल्या ग्रंथात लिहिलंय की युथिष्ठीर शी करायला संडासात गेला म्हणून? म्हणजे युधिष्ठीर हगतच नव्हता असं अनुमान काढायला आपण मोकळे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"डॉ. दीक्षित पैसे घेत नाहीत", हेही काही लोकांकडून ऐकलं आहे. पैसे घेत नाहीत म्हणजे त्यांचं सगळं योग्यच असणार, असा काहीसा आव असतो. लोकांना पैसे वगळता इतर काही (प्रतिष्ठा, प्रसिद्धी वगैरे) नकोच असतात, हे काही नवीन गृहितक!

डाएटमधलं कीटो आणि केव्हमन वगैरे गोष्टी सोडूनच देऊ. त्यात किती वैज्ञानिक तथ्य आहे हा निराळा विषय. त्याची मांडणी करण्यासाठीही बाबागिरी!

युधिष्ठीर हगत नव्हता किंवा राम-कृष्ण नाश्ता करत नव्हते, हे इतिहास-संशोधन म्हणून ठीकच आहे. पण त्यांनी काही केलं किंवा केलं नाही म्हणून आपणही करायचं/नाही याला काय अर्थ आहे! मिलिंद सोमण साखर खात नाही म्हणून आपणही साखर खाणं सोडून देणं, ठीक आहे. बॉडी बघितल्ये का त्याची!! Man in love

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेसिकली ते जे सांगतायत ते खरं असेल.... (अतिरिक्त इन्शुलिन हे मधुमेहाचे कारण आहे) तर त्यांचे संशोधन हे नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे आहे. कारण आजवरच्या तज्ञाना मधुमेह म्हणजे काय हेच कळले नव्हते असे यातून सूचित होते. (जसे काळ म्हणजे नक्की काय हे आईन्सटाईनपूर्वी कुणाला कळले नव्हते तद्वत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे नवं आहे वाटत नाही. इन्शुलिन रेसिस्टंस नामक प्रकार ऐक्ला होता आधीही. खुप गोड खात राहिलं किंवा अतिखाण्याने ब्लड शुगर कायम चढी राहिली तर शरीर अधिकाधिल इन्शुलिन तयार करत रहातं आणि त्यातुन इन्शुलिन् रेसिस्टंस देव्हलप होतो, त्यातुन पुढे डायबेटिस होतो हे द्न्यान आधीही होतं की लोकांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आधीपासूनच माहीत होतं, हे थोडं 'वेदों में विज्ञान'सारखं होतं. डॉ. दीक्षितांनी खरोखर आकडे गोळा केले ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या योग्यच आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास न टाकता, प्रत्यक्षात प्रयोग करून विदा गोळा केल्यावर मग राम-कृष्णाचे दाखले का देता? त्यातून पुढे उत्क्रांतीजन्य विधान पुरावा म्हणून मांडलं असतं तर निराळी गोष्ट आहे.

स्वतः वैज्ञानिक पद्धत वापरून काही मांडणी करणाऱ्या माणसानं लोकांशी बोलताना बाबागिरी वापरण्याचा त्रास अधिक होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि कुठलेही अौषध सांगत नाहीत हे महत्वाचे आहे. त्याचा अर्थ काहीही ‘खपवण्याचा’ व्यापारी हेतू नाही, हे स्पष्ट आहे. त्यांचा प्लॅन सहज वापरून बघावा म्हणून सहा महीन्यांपूर्वी सुरू केला आणि चालू ठेवलाय. त्यांच्या तपासण्या वगैरे केल्या नाहीत, कारण मधुमेह वा लठ्ठपणा नव्हता. एकूण आरोग्य बरे वाटते अाहे, निदान तोटा तरी काही जाणवला नाही. अशा परिस्थितीत केवळ त्यांची स्टाईल बाबाप्रमाणे आहे, म्हणून त्यांचे निष्कर्ष किंवा आरोग्यावरील सुपरीणाम अमान्य करण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपरोल्लेखित बातमीत बाबागिरी आहे, हा आणि एवढाच मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जोपर्यंत तुंम्ही त्यांचं सोल्यूशन मोडीत काढत नाही आहात, तोपर्यंत ठीक. अर्थात त्यांच्या उपायांविषयी काही बोलायचं असेल, तर ऐकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत हे पुरेसं स्पष्ट झालेलं नसल्यास - मी विज्ञानाच्या काही शाखांचा अभ्यास केला आहे; आणि त्यात जे शिकते त्यांतल्या लोकोपयोगी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं मला अगत्याचं वाटतं.

विज्ञानात आणि विज्ञानाबद्दल लिहितानाही वैज्ञानिक पद्धत अत्यंत महत्त्वाची असते. त्याशिवाय सगळंच 'वेदों में विज्ञान' बनतं; अगदी प्रयोगशाळात सिद्ध झालेल्या गोष्टीही वैज्ञानिक पद्धत न वापरल्यास 'वेदों में विज्ञान'च्या लायकीच्या बनतात. ही मूलभूत वैज्ञानिक शिस्त आहे. ती शिस्त ओलांडून, बेताल काहीही कारणबाजी करणारे लोक बाबागिरी करत असतात.

सदर बातमीत जो काही मजकूर आहे, तो बाबागिरीपेक्षा काही निराळा नाही. 'मला चांगला अनुभव आला' ही गोष्ट व्यक्तिगत पातळीवर वा सांगोवांगी म्हणून छानछानच आहे; पण ही विदा नव्हे. विदेसाठी जी वैज्ञानिक पद्धत स्वीकारावी लागते ती यात नाही. त्यातून दर महिन्याला वैज्ञानिक, विज्ञानाची पाठ्यपुस्तकं लिहिणारे आणि वैज्ञानिक पद्धतीबद्दल चाड बाळगणारे लोक निषेधाची पत्रकं काढताना दिसत आहेत; बोलभांडगिरी करणाऱ्या राजकारणी आणि त्यांच्या पित्तूंविरोधात. अशा वेळेस डॉ. दीक्षित असतील किंवा आणखी कोणी, त्यांच्या अवैज्ञानिक बोलण्यावर किंवा बाबागिरीवर टीका करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं.

ही बाबागिरी करून ते पैसे कमावत नसतील, प्रसिद्धी जरूर कमावत आहेत. चार वर्षांपूर्वी कोणी डॉ. दीक्षितांचं नाव ऐकलं होतं? ही प्रसिद्धी वापरून ते बाबागिरी पसरवत/प्रसवत आहेत; पुन्हा बाबागिरीमुळे आणखी प्रसिद्धी!

त्यांचे उपाय जर 'रामकृष्णानं नाश्ता केला नाही म्हणून आपणही करू नये', असले हास्यास्पद असतील तर त्यांची चिकित्सा आणि यथावकाश टिंगलटवाळी होणंच समाजाच्या आरोग्यासाठी योग्य असतं. गांधीजींनीही साधनशुचितेचं महत्त्व सांगितलं होतं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुंम्ही त्या माणसावर सरळ सरळ बाबागिरीचा अारोप करताय. त्यांचं व्याख्यान ऐकलं का? जिचकार यांचं व्याख्यानही ऐका. त्यात त्यांनी वापरलेली पध्दत, केलेले प्रयोग, अालेले निष्कर्ष असा सगळा विदा दिला अाहे, असे मला तरी वाटले. मलाही त्यातल्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत, अाणि मला वैद्यकीय ज्ञानही नाही, पण सामान्यज्ञानावर निर्णय घेणे मला गैर वाटत नाही. राम कृष्णाचे उदाहरण मलाही पटले नाही, पण म्हणून मी त्यांच्या सगळ्या गोष्टींना मोडून काढावं, असं तर नाही ना? विज्ञानाचीच पध्दत अाहे ना, की अाधी संपूर्ण माहीती घेतल्याशिवाय मत बनवू नये अशी?
टीप: मी त्यांचं सगळं सांगितल्याप्रमाणे मुळीच पाळत नाही, पण जे पटलं ते जरूर पाळतो. उद्या त्यांच्यापेक्षा अाधिक सोपं अाधिक नेमकं काही कुणी शोधलं तर नक्की करून बघणार.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपरोल्लेखित बातमीत बाबागिरी आहे, हा आणि एवढाच मुद्दा आहे.

आणि वरच्या आणखी एका प्रतिसादातही लिहिलेलं आहे -
स्वतः वैज्ञानिक पद्धत वापरून काही मांडणी करणाऱ्या माणसानं लोकांशी बोलताना बाबागिरी वापरण्याचा त्रास अधिक होतो.

---

ती बातमी ज्यांना सोडून द्यायच्ये, त्यांच्याकडे तो मुद्दा लावून धरण्याचा काहीही आग्रह धरलेला नाही. पण इतर काही लोकांना वैज्ञानिक पद्धतींबद्दल चाड वगैरे असते. त्यांना आपल्या ननैतिक पातळीवर खेचणं कठीण असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रियंवदा नटराजन - Yale astrophysicist

त्या म्हणतात - मला एक कळत नाही भारतामध्ये सायनन्स बद्दल, इतकं rampant denialism का?
मी स्वत: शास्त्रद्न्य असल्याने, हे irrationalism अतिशय त्रासदायक वाटते. आणि यावर तोडगा म्हणजे - Demystifying the process of science . सायन्सवरती सतत दाखविला जाणारा अविश्वास जर दूर करायचा असेल तर जनजागृती, लोकांना अधिकाधिक 'सायन्साभिमुख' करणे हेच मार्ग आहेत. scientific inquiry and how the scientific process works - याची ओळख करुन देणे , सायन्स चे महत्व/जीवनातिल स्थान सातत्याने मनावर बिंबविणे हे गरजेचे आहे. आणि त्याकरता लोकांनी, ओपन माईंडेड असणे फार गरजेचे आहे.
______________________
तुझा पॉइंट मला योग्य वाटतो. रामकृष्ण यांचे उदाहरण कोण्या डॉक्टरांनी/आहारतद्न्याने देणे योग्य नाही. योग्य नाही एक तर त्याचे कारण पुरावा नाही व पुराव आसला तरी रामकृष्ण हे आहारशास्त्रामधील आदर्श धरण्यासारखं रामहकृष्णांचं ना कार्य आहे/ ना त्यांचि तब्येत तशी आहे.
______________
दुसरं म्हणजे, कोणी मारे डॉक्टर आहेत, तेही प्रसिद्ध आहेत म्हणुन त्यांच्यावर 'बाबागिरी' चा आरोप होताच कामा नये , हे अतिच आहे,. जसा त्या डॉक्टरांना वाट्टेल ते उदाहरण देऊन वडाची साल पिंपळाला लावायचा हक्क आहे तसा तुलाही जे योग्य वाटतं ते पॉइन्ट आऊट करण्याचा हक्क आहेच की. त्यात त्यांच्या फॅन्स नी इतकं हतबुद्ध होण्याचं काही कारण नाही.
____________
तुझा फटकळपणा या केसमध्ये योग्यच आहे.
___________________
पण डॉक्टरांचा एक विशिष्ठ हेतू असू शकतो आणि तो म्हणजे - 'संतमहंत यांच्या माध्यमातून' लोकांना भावनिक आवाहन. कारण बहुसंख्य लोकांचा बाबा/गुरु/महाराज यांवर विश्वास असतो (ते योग्य की अयोग्य तो वेगळा विषय होइल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मला चांगला अनुभव आला' ही गोष्ट व्यक्तिगत पातळीवर वा सांगोवांगी म्हणून छानछानच आहे; पण ही विदा नव्हे.

व्यक्तिगत पातळीवर आलेले अनुभव का बरं दुर्लक्षित करायचे. किंबहुना - हे असले अनुभव का येतात याची कारणं शोधणं हे विज्ञानाचं काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगोवांगीकडे दुर्लक्षच करा, वगैरे सल्ला मी देतच नाहीये. किंबहुना आरोग्यासाठी अमुकढमुक करा किंवा करू नका, अशा छापाचे जाहीर सल्ले मी देतच नाहीये. माझ्या अभ्यासाचा विषय तो नाही.

'मला चांगला अनुभव आला म्हणून मी ते करणार' असं व्यक्तिगत पातळीवर कोणीही काहीही म्हणावं, करावं; त्याबद्दल आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना या विषयावर संशोधनात रस असेल त्यांनी संशोधन करावं. या बातमीनुसार, डॉ. दीक्षित बाबागिरी करून प्रसिद्धी मिळवत आहेत, एवढाच माफक मुद्दा आहे. आक्षेप प्रसिद्धीवरही नाही, बाबागिरीवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उदाहरण - "राम-कृष्ण सकाळी नाश्ता करत नसत.")

'सुदाम्याचे पोहे' आठवले!
कथेतले आणि श्री. कृ. कोल्हटकरांचेही Smile

अवांतर - आयुर्वेद (मुळातून, त्यावर बेतलेलं काही नको) कुठे वाचायला मिळेल? आयुर्वेदात अमुक सांगितलं आहे, असा दावा अनेकदा वाचायला मिळतो - पण मूळ स्रोत/श्लोक/अध्याय सहसा कुणी देत नाहीत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा, आयुर्वेद नामक एकच एक ग्रंथ नाही, जसा ऋग्वेद किंवा यजुर्वेद आहे तसा.

आयुर्वेद हे अनेक ग्रंथांनी सिद्ध झालेल्या होलिस्टिक पद्धतीचे नाव आहे, त्यातले मुख्य ग्रंथ चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, इ. आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रामुख्याने आयुर्वेदात सांगितलंय म्हणजे या तीन ग्रंथात आहे असा त्याचा अर्थ घ्यावा.
बृहतत्रयी म्हणतात.

मला इथले वैद्यांना दिलेले लेक्चर्स फार आवडतात. बहुतांश भाग जार्गन वाटू शकतो, पण मी नित्यनेमाने हे लेक्चर्स खूपदा ऐकत असतो. वैद्य धोपेश्वरकरांचे स्वभावोपरम, वेदनेवरचे किंवा वैद्य गिरीश सरड्यांचे बुद्धीवरची दोन व्याख्याने विशेष आवडतात. विशेषत: आयुर्वेद म्हंटलं की नुसत्या ऐकीव बेसिक प्रिन्सीपल्सवरती टीएलडीआर मारून आयुर्वेदाला निकालात काढणाऱ्यांनी ही लेक्चर्स ऐकावीत.
तुम कुछ जानतेही नही हो असं म्हणण्याचा मोह आवरत नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

यूट्यूब लिंकसाठी अनेक धन्यवाद! अवश्य ऐकण्यात येईल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@बॅट्या आणि नील - अनेक आभार. सवडीने पाहतो लेक्चर्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आयुर्वेद हे अनेक ग्रंथांनी सिद्ध झालेल्या होलिस्टिक पद्धतीचे नाव आहे, >>
होलिस्टिक? म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांगीण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन, प्रश्न मला समजला नाही पण एक उदाहरण तीन फोटोंसह aise rasik facebook group वर दिले आहे पाहा.
ग्रंथ बरेच आहेत पण संस्कृतातला संदिग्धपणा असल्याने कुणी सोपे करून सांगत नाही. एकाच गोष्टीला बरीच विशेषनामं असणे हेसुद्धा कारण. जशी शंकर, विष्णूला हजारो नामं आहेत तसं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@आचरटबाबा: ग्रुपवर फोटो पाहिले, धन्यवाद. पुस्तक शोधतो ते यथावकाश.

(आयुर्वेदात ज्यांचा समावेश होतो, त्या निरनिराळ्या संहिता/ग्रंथ एकाच जागी उपलब्ध आहेत का, असा प्रश्न होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वैज्ञानिक पद्धतीबद्दल चुकूनही चाड न बाळगणं, "

यावर प्राणायाम धाग्यात विरोध केला आहे.
--
एक किस्सा.
एकदा "या डॅाक्टरकडे जा,खूप गर्दी असते त्याच्याकडे" ऐकून त्याच्याकडे गेलो.
डॅाक्टराने माझा आजार ऐकून "कोणते औषध देऊ?"
"कोणते म्हणजे?"
"अलोपथिक,आयुर्वेदिक का होमिओपथी?"
"जे तुम्ही शिकला ते द्या." (( नाही लागू पडले तर दुसरीकडे जाईन.))
-
नऊ औषधे लिहून दिली तिन्हींची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायोपीक च इनजनरल पीकं अचानक का फोफावु लागलय ? मला कुठल्याही विशीष्ट बायोपीक विषयी काहीही म्हणायच नाही पण इनजनरल
या विषयावर सन्माननीय सदस्यांनी चर्चा केलीय का ?
नसल्यास काय मत आहेत बायोपीक च्या फोफावणाऱ्या पीकावीषयी ?
हा मराठ्यांना नेहमीचा यशस्वी खपणारा नॉस्टॅल्जीया आहे का ?
म्हणजे पुर्वीचे जे आई बाप भावगीत म्हणतांना ( मराठी भावगीत हा एक भयावह प्रकार होता त्या खालोखाल समुहगीत एक तरी काटक्या शरीरयष्टीचा ,हमखास चष्मा घालणारा, छाती फुगवत हातवारे करत गर्जा जयजयकार च्या टीममध्ये सापडायचा ) हळहळायचे कुरवाळुन घ्यायचे त्यांचीच ही पोरं बायोपीक ला जाऊन हळहळून हुरळुन जातात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समुहगीत एक तरी काटक्या शरीरयष्टीचा ,हमखास चष्मा घालणारा, छाती फुगवत हातवारे करत गर्जा जयजयकार च्या टीममध्ये सापडायचा

प्लिस. "पोलीसातिल माणुस तुम्ही जाणुन घ्याहो जराऽ" (शुद्धलेखन मुळाबरहुकूम) यासारखं समूहगीत झालं नाही आजतागायत. ग्रॅमी मिळायला पाहिजे होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे कुठलं गाणं आहे राव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायोपिक्सचे नेहेमीचे ठरलेले प्याटर्न्स बघून वैताग येतो हे खरं आहे

निदान मराठीत तरी बायोपिक्सचा साचा म्हणजे -
एक जुनी लोकप्रिय व्यक्ती घ्या.
सध्याची आघाडीचे नट त्या व्यक्तीच्या मेकअपमधे बसवा.
जुन्या काळातले इतर लोक्स दाखवण्यासाठी आजकालचे लहानमोठे तारे घ्या.
ह्या सगळ्यांची मंगळागौर दाखवा.
जुने प्रेक्षक जुन्या व्यक्तीला बघून खूष.
नवे प्रेक्षक त्यांच्या स्टारने काय ॲक्टिंग केलीये म्हायती? म्हणून खूष.
आनंदी आनंद गडे. मध्यंतरी खाऊ बटाटेवडे.
-----------------------

पण

तरीही बायोपिक्स हवेत. मराठीत पूर्वी शिवाजी महाराजांवरच किंवा इतिहासकालीनच चित्रपट निघत. आता बायोपिक्समुळे गाडीपुढे आली आहे.
कदाचित आपल्याला जगन्नाथ शंकरशेट किंवा पी. विठ्ठल वगैरेंवर काढलेले चित्रपट पहायला मिळतील.

शिवाय माझ्या मते बायोपिक्स अजून जर तरल वगैरे करता आले तर कदाचित कुणी सांगावं, मराठीत डॉक्युमेंटरीसुद्धा बनवतील लोकं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्ढेकरांवर बायोपिक आला तर फार बरं होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>> मराठी भावगीत हा एक भयावह प्रकार होता त्या खालोखाल समुहगीत एक तरी काटक्या शरीरयष्टीचा ,हमखास चष्मा घालणारा, छाती फुगवत हातवारे करत गर्जा जयजयकार च्या टीममध्ये सापडायचा

--- खी:, खी:, खी:!
तीच गत 'जगी दुम वारे (sic), दुम दुम वारे, भारतगौरवगाऽऽऽन; या रक्ताला, या मातीचा मृत्युंजय अभिमाऽऽन' सारख्या वीरश्रीयुक्त गाण्यांची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरवार-कुर्ता (कधी जाकीट, कधी फेटा) घातलेले, कुरळा केशसंभार असलेले, चश्मावाले, दूरदर्शनवरल्या समूहगीतांचे संयोजक म्हणजे सोमनाथ परब.

जगी दुम वारे (sic)
.....ते घुम आहे, दुम नाही (जगी घुमवा रे, दुमदुमवा रे)

जगी घुमवा रे.., छत्रचामरे ढाळी हिमालय.., उधळित शतकिरणा उजळित जनहृदया.. इ. गाणी 'इच्चाइध्धा इच्चाइध्धा' तालावर कायम वाजत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमूकराव, इच्चाइध्दा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ढिक्काचिक्का' म्हणा हवं तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यासारखा करेक्ट माणूस असं लिहायला लागला तर कसं व्हायचं ?
फार तर तींधा तींधा किंवा धिंता धिंता ... वगैरे म्हणाल वाटलं होतं..
( हलके घ्या हो अमूकराव , तुमच्या सारख्या स्कालर माणसांबद्दल भीतीयुक्त आदर किंवा आदरयुक्त भीती वाटते राव )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अण्णांसारख्या फुलब्राईट स्कॉलरला अमुक यांच्या सारख्या तशाच तोडीच्या स्कॉलरची भीती वाटत असेल तर आमच्यासारख्या पामरांवर फारफार दडपण आले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

या दोन वायल्या गोष्टी नील. अमूकरावांना भेटलेले (म्हणजे बॅटमन, आदु बाळ, अदिती, धनुष , जंतु वगैरे) आणि न भेटलेले अनेकजण साक्ष देतील की अमुकराव हे अत्यंत उच्च दर्जाचे संशोधक/स्कॉलर आहेत. त्यांची शुद्ध आणि प्रॉपा मराठी वाचा,त्यावरूनही हे लक्षात येईल.त्यांच्या लिखाणातील विनम्रपणा एकाच वेळी स्कॉलरली आणि भीतीदायक असतो
उपरनिर्दिष्ट मजकूर हा खोडसाळपणे, किंवा बदनामी करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही, याची दखल अमूकराव यांनी घ्यावी
त्यांनी 'अमूकची बदनामी थांबवा' असे लिहिले आहे ,त्याकडे त्यांचा विनय असे समजून दुर्लक्ष करावे.
तक्रार एकच आहे त्यांच्याबद्दल , आणि ती म्हणजे ते बहुश्रुत , बऱ्याच विषयातील सखोल वाचन /ज्ञान असूनही ऐसी वर काहीही लिहीत नाहीत , फक्त प्रतिसाद मात्र असतात.एवढे त्यांनी बदलावे , आणि ऐसीवर लेखनास सुरुवात करावी अशी त्यांना नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुकची बदनामी थांबवा!! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुकशी प्रत्यक्ष आयुष्यात आधी ओळख, मैत्री झाली आणि नंतर आंजा घडलं. इतर अनेक मित्रांच्या बाबत उलट घडलं.

बरेच मित्र-मैत्रिणी हुशार आहेत आणि त्यांनी लिहायलाच पाहिजे असा आग्रह माझाही असतो. हे लोक बोलले नाहीत तर उलट फार बोलण्यासारखं नसलेल्या लोकांचा गोंगाट वाढतो, गोंगाट असतो म्हणून हे लोक लिहीत नाहीत, असं दुष्टचक्र सुरू होतं.

पण त्यासाठी अमुक (किंवा कोणालाही) भीतीदायक का समजता? अहो, गरीब इसम आहे हो तो! माझ्यासारख्या चाबरटांसमोर अगदीच बिचारा गप्प असतो. त्याला कसला घाबरता! असेल तो अमुक, पण आपल्या घरचा वगैरे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही ट्रोलांना , दादागिरी करणार्यांना घाबरत नाही, पण विद्वान सभ्य गृहस्थांना घाबरतो , म्हणजे त्यांचा आदर 'करतो 'वगैरे असे विनम्रपणे सांगून मी खाली बसतो वगैरे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गप्प असणे हे अमुकरावांचं डिफॉल्ट सेटिंग आहे. पण भीतीदायक अजिबात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

की अदिती सारख्यांबरोबर राहून आमचे अमुकराव बिघडायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पोहता न येणाऱ्याने काय करावे?
जवळच्या पोहोणाऱ्याचे पाय धरावे.
--
पोहोणारे लोक आपली फळी होऊ देत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साने गुरुजी उद्यान
फुले मंडई
महात्मा गांधी रोड
पटेल स्टेडियम / क्रीडांगण

अशी वाटणी जास्त प्रमाणात दिसते. साने गुरुजी मंडई किंवा फुले उद्यानं कमी असावीत.

हुतात्म्यांना जास्तकरुन चौक मिळतो. हुतात्मा रस्ता किंवा बाग कमी दिसतात.

काही अलिखित वाटणीचे नियम असावेत. किंवा निरीक्षण कमी पडत असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहीद मंगल पांडे रोड- ठाणे
शहीद भगतसिंग रोड- फोर्ट मुंबई

साळसकर उद्यान आहे बहुधा जे व्ही एल आर वर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हुतात्मा निरीक्षण रद्द.

फुले, गांधी, पटेल इतके मर्यादित. अपवाद असणारच अर्थात. पण ट्रेंड दिसतो हेही खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरनेटवर रस्त्यांची नावं सहज शोधता आली तर एक बारका डेटा अनालिटिक्स प्रकल्प होऊन जाईल. गविंचं निरीक्षण रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हुतात्मा हा शब्द हुताशनी संबंधित आहे, शहीद हा शब्द शहादत संबंधित आहे*. खंप्लीट धर्म बदलतोय. थत्ते यांनी शहीद या पदवीच्या वापराची उदाहरणे दिली आहेत, त्याने हुतात्मा निरीक्षण कसे रद्द होते?

*एका महाशयांनी (मराठी आंतरजालावर) शहीद हा शब्द वापरणे हे कसे देशद्रोही वगैरे आहे यावर बराच काथ्याकूट केला होता असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फाळणीपूर्व कराचीत एक महात्मा गांधी बाग होती. म्हणजे, बाग अजूनही आहे, परंतु फाळणीनंतर तिचे पुनर्नामकरण 'कराची प्राणिसंग्रहालय' असे करण्यात आले.

तसे खरे तर ती बाग कराचीत गांधींच्या जन्माच्याही कितीतरी अगोदरपासून, पार कंपनी सरकारच्या अमलाच्या काळापासून आहे म्हणतात. आणि तेथील ते प्राणिसंग्रहालयसुद्धा गांधीजींच्या बालपणीच्या काळापासूनचे आहे. १८६९मध्ये बागेचे अधिकृत नामकरण 'व्हिक्टोरिया गार्डन' असे (किंवा स्थानिकांच्या भाषेत - मुंबईतल्याप्रमाणेच - 'रानी बाग' असे) करण्यात आले होते, परंतु १९३४ साली कराची महानगरपालिकेने तेथे आयोजिलेल्या महात्मा गांधींच्या स्वागतसमारंभानंतर बागेचे अधिकृत पुनर्नामकरण 'महात्मा गांधी बाग' असे करण्यात आले. परंतु पुढे मग पाकिस्तान घडले. असो चालायचेच.

अधिक माहिती इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

हुतात्म्यांना जास्तकरुन चौक मिळतो. हुतात्मा रस्ता किंवा बाग कमी दिसतात.

कोल्हापुर चे हुतात्मा पार्क फेमस होते आमच्या लहानपणी.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहरु स्टेडियमं देखील असतात अनेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हुतात्म्यांना जास्तकरुन चौक मिळतो. हुतात्मा रस्ता किंवा बाग कमी दिसतात.

हुतात्म्यांना शक्यतो भर चौकात टांगण्याचा संकेत असल्याकारणाने असे असू शकेल काय?

पण निदान मुंबईतल्या हुतात्मा चौकाच्या बाबतीत तरी, त्या हुतात्म्यांना (किंवा बळीच्या बकऱ्यांना - विचेवर वे यू प्रेफर टू सी इट) चौकच मिळाला, याला तितकेच सबळ कारण आहे. म्हणजे, मोरारजीने त्यांना (फ्लोरा फाउंटनच्या) भर चौकात जर गोळ्या घातल्या, तर त्यांचे स्मारक ऑन द स्पॉट त्या चौकातच होणार ना! उगाच वीसपंचवीस किलोमीटरवर जुहू चौपाटीवर बांधण्यात काय हशील आहे?

म्हणूनच, 'हम स्मारक वहीं बनाएंगे' असा निर्णय ज्यांनी कोणी घेतला त्यांनी घेतला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्ताजी साळवी (कोण होते?)उद्यान,कोपरी ,ठाणे.
कोतवाल उद्यान मुलुंड,कोतवाल मार्केट माथेरान.
हुतात्मा डॅाक नसावा घाबलतील ना. भाउचा धक्का - भाऊ कोण? बाबलो किते नाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाउचा धक्का - भाऊ कोण?

लक्ष्मणराव अजिंक्य अर्थात भाऊ यांनी ही जेटी बांधली. म्हणून हे नाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दत्ताजी साळवी (कोण होते?)उद्यान,कोपरी ,ठाणे.

मला वाटते भारतीय कामगार सेना या शिवसेनेच्या कामगार संघटनेचे नेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हापूर विभागात सर्वकाही शाहू असतं.

आणि शिर्डी एरियात अर्थात साई.

पण साई याबाबत एक खास गोष्ट. अन्य कोणत्याही नावाला इतके विविध प्रिफिक्स आणि पोस्टफिक्स दिसत नाहीत.

साईराम, साईगणेश, साईप्रेम, प्रेमसाई, साईमंगल, साईआशीष, साईप्रार्थना.. शिर्डीच्या बाहेरुन जाताजाता हायवेवर खेळ म्हणून मोजले तर शंभरहून जास्त दुकानं, हॉटेल, रिसॉर्ट, पानवाले, केशकर्तनालये, फूटवेअर, मेडिकल.. सर्व सर्व साईयुक्त आढळले.

शहराच्या आत साईमयच असावं सगळं.

ठाण्यात साईप्रणय या नावाचं हॉटेल पाहिल्याचं आठवतं (चुभूदेघे).

इतकं वैविध्य म.गांधी किंवा फुलेंच्या बाबतीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यात साईप्रणय या नावाचं हॉटेल पाहिल्याचं आठवतं (चुभूदेघे).

हाहाहा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तीन हात नाक्यावरून रघुनाथनगरला जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीसच आहे/होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या तेलुगू सहकाऱ्यांमध्ये साईसंदीप, साईसुधीर, साईपवन वगैरे नावे आहेत! आंध्रात हे नाव/प्रीफिक्स खूपच प्रसिद्ध असल्याचे कळले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय करेक्ट - सत्यसाई, साईशरत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

काल (अर्थात वीकेंड = ग्रंथालयात जाउन, पुस्तके वाचण्याचा दिवस) एका 'इमिग्रंटस लिटरेचर अँथॉलॉजी' पुस्तकात मेक्सिकन लोकंचे अनुभव वाचत होते. बाप रे! त्यात पैसे मिळवणे, विशेषत: डॉलर, याबद्दल इतके कळवळुन, कळकळीने, आणि कसे कष्ट पडतात, लोक काय वाट्टेल ते करायला तयार असतात - हे सर्व वाचले. आणि वाटले आपण कोणत्या सुरक्षित जगात रहातो? खरच पैसा न पैसा मिळवायला लोक इतके जीवावर (स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही) उदार होतात? पैसा हाच देव मानतात?
.
त्या भू:, भुव:, स्व: वगैरे लोकांचे समांतर अस्तित्व असो वा नसो, पण या जगात, वास्तवतेमध्ये, खरच किती लहान जग/ विश्व नांदत आहेत. काही जण पैशाला गरजेपुरता महत्व देतात तर काहींकरता पैसा ये न केन प्रकारेन मिळवणे हेच ध्येय असते, मग त्यात ना नैतिकता आड येते ना अन्य काही.
___________________________
जगात स-र्व!!! अगदी सर्व प्रकारचे लोक आहेत. आपण खरच भाग्यवान आहोत निवडीचे आपल्याला स्वातंत्र्य आहे.

संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोय। सूत दारा धन लक्ष्मी पापी घर भी होय।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

https://www.cnn.com/2012/08/27/health/health-teen-pot/index.html
हा रद्दड, अतिशय घाणेरड्या वासाचा मेर्वाना प्रकार, काही काही देशात, कायदेशीर कशाला करतायत देव जाणे. इतका घाणेरडा वास येतो ना बसमध्ये एक जरी फुंकाड्या आला तर. याइक्स!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

घरातून दिसलेली गंमत. नरानं आधी खाल्लं, मादीनं नंतर खाल्लं. लोक मात्र पक्ष्यांच्या एकनरव्रताबद्दल बोलतात.
नर

मादी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या नरानी रिस्क उचलली गं. त्याला काही इजा नाही झालेली पाहून ती आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टूरिस्टांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इराणी इमिग्रेशनवाले पासपोर्टवरती स्टॅम्प उमटवणार नाहीत म्हणे. पण त्यांचा स्टॅम्प उमटला नाही तरी देशाबाहेर जाताना भारतीय इमिग्रेशनवाले आपला स्टॅम्प उमटवतीलच! तेव्हा अन्य कुठल्या देशाचा शिक्का नाही परंतु भारताचा शिक्का आहे हे पाहिल्यावरती कुणा चौकस इमिग्रेशन ऑफिसरला डाउट येऊन तो प्रॉब्लेम करू शकेल का? हा चौकस ऑफिसर म्हणजे अभारतीय, स्पेसिफिकली ट्रम्पिस्तानी असल्यावर काय होऊ शकेल याबद्दल कुणी काही सांगू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकूण एक शिक्का तपासून पहायला वेळ नसतो. आणखी एक गम्मत म्हणजे माझ्या पासपोर्टवर असलेले भारतीय इमिग्रेशनचे शिक्के अगदी पुसट किंवा ओली शाई पसरून गिचमीड झालेले असे वाचता न येणारे आहेत.

खरी अडचण म्हणजे विमान कंपनी ही माहिती देऊ शकेल + खोटे बोललेले पकडला गेला तर आहे. अगदीच अंडर रडार राहण्याची पराकाष्ठा करावी लागेल.

पण इराणवाले पासपोर्टवर चिकटणारा व्हिसा देत नाहीत का?

अधिक विचार केला तर तुमचे ip addresses, credit cards वगैरे Iran मधून असतील तरी पकडले जाल. उदा. मागे slack या कंपनीने अशी कारवाई केली होती. किमान यू एस मध्ये प्रवेश करताना मोबाईल, लॅपटॉप वगैरे घेऊन त्याची तपासणी केल्याचेही ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...पासपोर्टावर नेमका कोठे शिक्का मारावा, यामागे काही लॉजिक अथवा आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन वगैरे असावे काय? की दिसेल ते रँडम पान खराब करायचे, एवढीच मेथड इन द मॅडनेस आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी..

.. पूर्ण कोरे स्वच्छ पान आगोदर हाती आल्यास तेही एका शिक्क्यासाठी वाया घालवतात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांकरिता काम करणाऱ्या पायलट तथा फ्लाइटक्रूला दर महिन्यास नवीन पासपोर्ट लागत असावा काय?

नाही म्हणजे, प्रत्येक उड्डाणाबरोबर जिथेजिथे म्हणून इमिग्रेशन कौंटर ओलांडण्याची वेळ येत असेल, तिथेतिथे एक शिक्का म्हटल्यावर पासपोर्ट त्वरित भरून जात असला पाहिजे.

की त्यांच्यासाठी काही वेगळा प्रोटोकॉल असतो?

(खलाश्यांसाठी वेगळे दस्तावेज असण्याबद्दल ऐकलेले आहे. विमान कर्मचाऱ्यांबद्दल कल्पना नाही. तसेही, जहाजाची अंगभूत गती लक्षात घेता, खलाशी किती वारंवार सीमोल्लंघन करीत असतील याबद्दल साशंक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जहाजाची अंगभूत गती लक्षात घेता, खलाशी किती वारंवार सीमोल्लंघन करीत असतील याबद्दल साशंक आहे.

तरी भारत ते दुबई प्रवास जहाज चार पाच दिवसात करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थेट अनुभव नसला तरी बहुसंख्य देशांत क्रूच्या पासपोर्टवर प्रत्येक वेळी स्टॅम्प केला जात नाही असं ऐकिवात आहे. काही थोडे देश करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही कळत नाही ब्वा. किमान माझ्या अनुभवात, रिकामे पान सापडले तरी दुसरे एखादे रिकामे पान नेहमीच शोधणारे अधिकारी आले आहेत. याउलट काही अधिकार्‍यांनी रिकामे पान असले तरी आधीच चार शिक्के असलेल्या पानावर पाचवा शिक्का adjust केल्याचेही पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेपाळ-भूतानला जाताना पासपोर्टांवर ठप्पे मारतात का? या दोन्ही देशांत जायला आपल्याला (भारतीयांना) व्हिजे लागत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नसावेत, कारण त्या दोन्ही देशांत जायला (किमान नेपाळला) व्हिसा लागत नाही आणि पासपोर्टदेखील लागत नाही. म्हणजे, कंपल्सरी नाही. अन्य नागरिकत्व पुरावा चालतो. व्होटर आयडी वगैरे. चुभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेपाळला जायला व्हिजा नाही लागत, पण पासपोर्टवर येण्या - जाण्याच्या नोंदीचे शिक्के दोन्ही देशांत पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद सर्वांना उत्तरांबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं