कविता कशा पाडाल?

आज कोजागिरी पौर्णिमा आहे. दोन आठवड्यांत दिवाळी! दिवाळीच्या आधी दिवाळी अंकही येतील. ऑनलाईन अंकांसाठी लेखांच्या मागण्या येतील, "लेखन द्या". हे लोकं पक्के डांबिस हो, एक काहीतरी डेडलाईन देतात आणि पुन्हा ती वाढवतात. सेलमधे कसं, आधी किंमती वाढवतात आणि वरून मग डिस्काऊंट देण्याचा हरिश्चंद्री आव आणतात तसं. तर अशा वाढीव डेडलायनींच्या दिवाळी अंकांसाठी कविता पाडण्याचा एक उपाय आज सुचला. त्यासाठी आधी आभारप्रदर्शन. मा. श्री. मार्क झुकरबर्ग, हे आत्ता आपल्यात हजर नाहीत. बाकी आभार फेसबुकावर माझा बकवास ऐकून घेणार्‍या माझ्या मित्रयादीतल्या लोकांचे, ज्यांच्यामुळे मला हा धडा लिहीता येत आहे.

कविता लिहीण्यासाठी सर्वप्रथम एक विषय घ्या. आज कोजागिरी आहे तेव्हा चंद्र, जाग्रण, दूध, असे विषय 'आजचे' आहेत. उद्या लिहायचं असेल तर जाग्रणाचा त्रास, दूधाचे दुष्परिणाम किंवा वीकडेला रात्री का जागू नये असे असतील. पण परवापासूनमात्र दिवाळी, दिवाळीशी जोडला गेलेला नॉस्टॅल्जिया, लहानपणी बनवलेले कंदील, लोकांच्या दारांना लावलेले फटाके, अर्धवट लक्ष असताना चालल्यामुळे फतारलेली रांगोळी, त्यामुळे पडलेला मार किंवा ओरडा असे विषय 'आजचे' होतील. असो. तर असा एक ताजा, आजचा विषय निवडा. त्यासंबंधी प्रेमळ, लाडीक तक्रार करणारं एखादं स्टेटस बनवा. आता मात्र परीक्षेचा काळ आहे. तुमची प्रतिमा स्वच्छ हवी. टवाळ अशी प्रतिमा असेल तर कोणी भाव देणार नाही, फारतर लाईक करून पुढे जातील. तर आधी काही दिवस स्वच्छ प्रतिमा ठेवा किंवा स्वच्छ प्रतिमावाल्यांच्या भिंतीवर नजर ठेवा. असं स्टेटस आलं की चार बुकं वाचलेले, रसिक, जाणकार लोकं तिथे मान्यवर कवी, लेखक यांचे संदर्भ देतात. कोणी डायरेक्ट कवितेतल्या ओळीच देतात. काही हुशार लोकं परभाषेतल्या, परलिपीतल्या किंवा अगदी परदेशातल्या कविता, लेखन, कादंबर्‍या यांच्या आठवणी काढतात.

अशा गोष्टी वाचायला आदल्या रात्रीची कमी झोप किंवा आत्ता लागलेली भूक किंवा काढून ठेवलेला (खराखुरा, लाक्षाणिक नव्हे) चष्मा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशेषतः कविता, लेखन गुलजार टाईप आर्त आणि हलकंफुलकं लिहीणार्‍या लोकांचे संदर्भ आले तर उत्तमच. तर फेसबुकाच्या स्टेटसवर आलेल्या अशा सर्व कॉमेंट्स अर्धवट लक्ष देऊनच वाचा म्हणजे मूळ कल्पनेतला ट्विस्ट काय तो सापडेल. आता इथे मात्र उदाहरण देणं आवश्यक आहे.

फेसबुकावर एक मजेदार तक्रार दिसली, "चंद्रावर आधीच्या लोकांनी लिहीलेलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी हवं". तक्रारदार व्यक्ती तशी सज्जन आणि व्यासंगी असल्याचं माहित असल्यामुळे 'चंद्रावर' या शब्दाचा अर्थ मी 'चंद्राबद्दल' असाच लावला. (गुर्जी* असतात तेव्हा शंकाच फार येतात हो!) तिथे लगेच इतरांच्या चंद्राबद्दल चर्चा सुरू झाल्या. (हे चर्चा करणारेही व्यासंगी आणि सज्जन असल्याची शंका असल्यामुळे ती चर्चा आकाशातल्या चंद्राबद्दलच सुरू आहे असं समजले.) कोणाला गुलजारच्या "चांद परोसा है"ची आठवण झाली. आता मात्र पोटात कावकावणारे कावळे कामास आले. ते मला दिसलं "चांद पारोसा आहे". तर हे झालं मूळ कवितेचं बीज. चंद्राला आंघोळ घालणं हे पण तसं पुरेसं विक्षिप्त असल्यामुळे कविता करायला चालून जावं. आजकाल लोकं काय वाट्टेल त्या कविता लिहीतात, आठवणी इंजिनीयर करणं फक्त आर्नीचे मारधाड पिक्चर आणि लॅबमधेच नाही तर कवितांमधेही दिसतं तर मग चंद्राला का आंघोळ घालू नये? तर आज आपण चंद्रालाच आंघोळ घालू.

कवितेचं नावः (चंद्र पारोसा)**

एक चंद्र
पारोसा
तिरका
थोडासा
कधीचा

आंघोळ कधी करत नाही

हे पहिलं कडवं झाल्यावर आता पुढे कविता रोम्यांटीक बनवायची, साय-फाय, वैज्ञानिक का मूळ तक्रारीत सुचवल्याप्रमाणे कंटेंपररी हे कवीवर अवलंबून आहे. साय-फाय कविता हवी असेल तर चंद्रावर वातावरण निर्माण करायचं. रोम्यांटीक हवी असेल तर चंद्राला 'बाथ'मधे बसवायचं. वर्तमानातली हवी असेल तर चंद्रावरचा बाथटब घोटाळा निर्माण करायचा. वैज्ञानिक हवी असेल तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या नावाने सुरू असणारी दुर्बिण आहेच. आता कविता तुमची तुम्हीच करून घ्या की. हा पुढचा माझा प्रयत्न.

कधी गोल गुट्टू
चिखलातही
दिसलेला
पारोसा
टबात
डुबुक

...

विरघळतोय
माझा ... साबण

...

आंघोळ करावी
शांपू लावावा

...

आईच्ची कटकट!

=============================

धड्याखालची प्रश्नोत्तरे:
१. हे एवढे कष्ट का?

उत्तरः 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाच्या घोषणेच्या धाग्यात ३१ ऑक्टोबर ही डेडलाईन म्हटलेली आहे. ती अगदीच दोन दिवसांवर आलेली आहे. मुदतवाढ हवी असेल तर अजून एक आठवडा घ्या. लिहा. एवढंच सांगायला.

=============================

* "कोण गुर्जी? धन्यवाद." या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल.
** मूळ कविता: चंद्र प्यावा - जुई कुलकर्णी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कोणाला गुलजारच्या "चांद परोसा है"ची आठवण झाली. आता मात्र पोटात कावकावणारे कावळे कामास आले. ते मला दिसलं "चांद पारोसा आहे". तर हे झालं मूळ कवितेचं बीज. चंद्राला आंघोळ घालणं हे पण तसं पुरेसं विक्षिप्त असल्यामुळे कविता करायला चालून जावं.

'चाँद परोसा है' या टंकनदोषाची 'चाँद पारोसा है' ही दुरुस्ती ठीकच आहे, परंतु 'चाँद पारोसा है'ची चुकीची फोड केल्यामुळे भलताच अर्थ घेऊन कविता केलेली आहे, असे वाटते. सबब नापास.

'चाँद पारोसा है'ची फोड 'चाँद पारो-सा है' अशी फोड करून पहावी. यातील 'पारो' ही 'देव-डी'मधील पारो असून, 'चाँद'चा अर्थसुद्धा 'चंद्र' असा सरळसोट नसून, (पुन्हा 'देव-डी'मधल्याच) चंद्रमुखीस अत्यंत खुबीने सूचित करणारा असा काहीसा गहन आणि अतिसटलसूचक असा आहे, हे लक्षात घेऊन आपल्या रचनेचा पुनर्विचार करावा. पुढील प्रयत्नांस शुभेच्छा.

(तसेच पहायला गेले, तर 'चाँद परोसा है' या टंकनदोषावरून प्रेरणा घेऊन 'चंद्र वाढतो*' अशा विडंबनाचाही प्रयत्न करून पाहण्याजोगा आहे. किंबहुना, कदाचित श्री. गुलज़ार यांचीही अशीच काही कल्पना असावी, अशी आम्हांस दाट शंका आहे.)
===
* तेच ते, 'चंद्र वाढतो कलेकलेने, अमूकतमूक वाढतो किलोकिलोने' या पारंपरिक काव्याच्या धर्तीवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकन दोष फारच दिसायला लागलेत.
"अतिसटलसूचक" हा शब्द टंकनदोष सुधारून मग वाचला गेला.."सटल" टंकन दोष म्हणता येईल ह्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अतिशय सटलपणे सूचक' अशी फोड करून पहावी.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. आम्ही 'अतिसल' आणि 'टसूचक' अशी फोड केली होती !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांद पारोसा आहे?
अहो, परोसा नव्हे, परसों आहे.
आज चौदहवी. उद्या अमुशा. मग डायरेक्ट परसों चांद दिसेल.
हिरॉईन वीकेंडनंतर हापिसात पुन्हा गेल्यावर दिसेल, मग माझे लाईन मारणे पुनः सुरू होईल अशी ती कन्सेप्ट आहे. पण कुण्या गरीब मराठी कवीने चंद्र भाकरीसारखा दिसतो असे म्हटल्यावर भाकरी परोसावी तसे परोसणे हीच टायपिंग मुरावि झाली.. अन तुम्ही त्याचा मुराविविवि केली.

पारोसा म्हणे. जा पाहू, आंघोळ करून या. परसो दिसेल ती. आंघोळ रोज करावी जुम्मेके जुम्मे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पण कुण्या गरीब मराठी कवीने

नेमके मर्मावर बोट ठेवलेत. गरीब मराठी कवी!!! (गरीब, की दळभद्री?)

अशाच कोण्या एका 'गरीब' मराठी कवीने आपल्या एका (अरुण दातेंनीच* गायलेल्या) कवितेत** 'स्मित-चाळ त्यास बांधून पहा' की कायसेसे शब्द फेकलेले आहेत.

आता काय बोलायचे? 'गरीब' मराठी कवीच तो, कविकल्पनेतसुद्धा कधी ताजमहाल वगैरे तर सोडाच, पण साधे बंगलेसुद्धा बांधायच्या गोष्टी त्याला सुचणार नाहीत. बांधून बांधून कल्पनाशक्तीच्या परिसीमेतसुद्धा तो चाळच बांधण्याच्या बाता करणार! 'माझ्या लाडक्या शेजारणी, (जेथे तू आल्याने) बर्‍याच काही गमतीजमती घडतात***, त्या माझ्या शेजारच्या जागेत एकदा तुझे स्मित-रूपी एखादी चाळ बांधून पहाच"?????? शी! काय कल्पना आहे! (नशीब, त्यापुढे 'म्हणजे त्यातून कित्येकजणांचे संसार उभे राहतील' वगैरे काहीबाही नाही बोलला! हा काय शेजारणीला पटवण्याचा डायलॉग झाला?) म्हणजे, नेमक्या कोणत्या कोनातून पाहिले असता स्मित हे चाळीसारखे दिसते? किंवा चाळ ही स्मितासारखी? पण नित्यपरिचयातील प्रतिमाचिन्हांचाच वापर करायचा अट्टाहास धरला, की अशा मर्यादा आड यायच्याच!

असो चालायचेच.
===
*अतिअवांतर: हा अरुण दाते एक 'गरीब' मराठी गायक आहे.
**'सखी शेजारिणी, तू हसत रहा, हास्यात फुले गुंफीत रहा'. शेजारणीवर लायनी मारणे म्हणजे बरोबर आहे, चाळीतल्या 'गरीब' मराठी कवीचेच लक्षण ते, नाहीतर काय? टिपिकल मध्यमवर्गीय/कनिष्ठमध्यमवर्गीय छापाची कविता!
***हे गोषवाराछाप शब्दांकन माझे. कवितेतले मूळ शब्द असे आहेत: "मूक जिथे स्वरगीत होतसे, हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे, जीवन नाचत गात येतसे, स्मित-चाळ त्यास बांधून पहा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुसका बार

माझ्या बोटांच्या
झाल्या आहेत काटक्या
टंकून टंकून
फुलबाजीच्या काडीसारख्या.

कविता मागतेस?
तीही दिवाळी अंकासाठी?
पेटवू म्हणतेस फुलबाजी?
वाजवू फटाके
या पाची बोटांनी?
तारेच तारे दिसतील मग
थुईथुई उडणारे
भुईनळ्यातल्यासारखे.

पण कसचे काय
नि कसचे काय?
जळून संपलेल्या फुलबाजीतून
आता कुठल्या ठिणग्या?
आता बोलाचेच फटाके
नि बोलाचेच भुईनळे.
आता नुस्ता धूर
माझ्याच एकेकाळच्या
जळत्या शब्दांचा
आता धडाका हरवून बसलेल्या
'फुस्स' करून बाहेर येणार्‍या
गोळीतल्या काळ्या नागोबासारख्या.

(हात् साला!
हादेखील फुसका बारच निघाला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवडणूकीत जसे उमेदवार पडतात तशा अर्थाने 'कविता कशी पाडावी?' हे लिहिलस की काय असं आधी वाटलं होतं !
तू तर खरोखरीच 'पाडलीस' कविता. पुढे आणि इतरांनीही 'पाडायला' सुरुवात केलेली दिसत्ये.
आता कशा "पाडाव्यात" या कविता याचा विचार करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे आज सगळीकडे वादळाबद्दल गप्पा आहेत. मुंबईत पावसाचा कहर असला की कसं आख्खा महाराष्ट्र पाण्याखाली गेल्यासारख्या गप्पा सुरू होतात तसंच. मग उर्वरित देशात ६०% भागात दुष्काळ वगैरे आहे हे विसरायचं. असो. तर तुमच्याकडे सध्या बर्लुस्कोनीला शिक्षा झाल्याची गंमत असेल. तू माजी पंतप्रधानाला वर्षभर तुरूंगात टाकण्यावर कविता लिहू शकतेस.

पाडापाडी सोपी असते, त्यातून डॉमिनो इफेक्ट वगैरे सुरू झाला तर उत्तमच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाडलीस तू कविता टिचभर, फेसबुकाचा खचला पाया....

असंच म्हणावंस वाटतं ही कविता वाचून.

मला खरं तर असं वाटलं की कविता कशी पाडावी, यापेक्षा दोन छोट्या ओळी ताणून मोठ्ठ्या करून कविता कशी करावी याचं हे उदाहरण आहे. याच तंत्राने या लेखाचं एक महाकाव्यही होऊ शकेल. उदाहरणार्थ,

आज...
कोजागिरी.

पौर्णिमा....

लवकरच दिवाळी.
दिवाळीत अंक...

मागण्या
लेखांच्या...

मागण्या
कवितांच्या
---
हे नक्षत्रांचं देणं चुकवायचं (म्हणजे देणेकऱ्यांना चुकवायचं नाही, देणं फेडायचं या अर्थाने) तर एका कवितेच्या सहा कविता करता येणं आवश्यकच आहे. हा धडा सर्व अपकमिंग कवींना मार्गदर्शक ठरावा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाडलीस तू कविता टिचभर, फेसबुकाचा खचला पाया....

धन्य ROFL Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पाडलीस तू कविता टिचभर, फेसबुकाचा खचला पाया....

धन्य ROFL Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वस्तुतः, 'टीचभर' म्हणून हा प्रस्तुत महान कवितेचा घोर अपमान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसा काय घोर अपमान???? ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह गॉट ईट

पण कवितेत तीन कडवी आहेत त्यामूळे ती पूर्णत टीचभर होऊ शकत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मोल्सवर्थ म्हणतो -
टीच [ ṭīca ] Give rose A span measured by the thumb and forefinger.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके दिवस आमची सगळीच नक्षत्रांची देणी 'चुकत' होती. पण आपले हे मासलेवाईक 'महाकाव्य' पाहून वाटले की आजपर्यंत आम्हांस उगाच वाटत होते की काही तरी चुकते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही गोष्टी आवडल्या..!:) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटलं होतं
आजची कविता
पाडेन जाग्रणावर

पण हाय दैवा, काय झाले, झोपली का क्रिएटीव्हीटी?

कविता पाडल्या
दोन
लेख मात्र
आलेच नाहीत

कोरड्या आश्वासनांचाही दुष्काळच आहे आमच्याकडे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोरड्या आश्वासनांचाही दुष्काळच आहे आमच्याकडे!

बहुधा ओल्या शपथा घालायचे आमच्याकडच्या कोणाचे वय न राहिल्यामुळे हा दुष्काळ असावा काय?

(अवांतरः हा 'ओली शपथ' प्रकार नेमका काय असावा बरे? अनुभवी तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूण दातेंनी गायलेल्या कुठल्याशा गाण्यात 'घालावी शपथ ओली' हे शब्द आले आहेत. त्या कवींना विचारा. कदाचित तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घसा 'ओला' करून दिल्या/घेतल्या/घातलेल्या शपथा असाव्यात बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वाचून 'जुर्माना' मधे अमिताभ एक शीघ्र कविता करतो ती आठवली -

"दबे पाव चांद उतरता है जमीपर,
थुकता है बलगम और धोता है मैले कपडे और बर्तन."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किरमिजी गोळाबेरीज केल्यावर
हत्तीच्या तिसर्‍या पायावर बेदाणा ठेवून
शुक्राच्या चांदणीच्या प्रकाशात दाढी केली असता
चहात चिंचोके घालणं निकडीचं आहे
असं कोलंबस कुलकर्ण्यांच्या शकूला म्हणाला
पण शकूनं चहात सूचिपर्ण घातल्यामुळं
ती आमची जिराफ सुद्धा पिणं शक्य नाही
असं सुप्रीमकोर्टाचे सरन्यायाधीश कल्हईवाल्यास म्हणाले.

* - आमची म्हणजे, आम्ही टंकलेली. उगाच गैरसमज नको. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार धागा.

मराठीतल्या ब्लॉग/वेबसाईट्स वरून मी विनोदाच्या बाबत "हलके घ्या" नावाचा वाक्प्रचार शिकलो. आता कवितेच्या बाबत "जरा पडती घ्या" असा नवा वाक्प्रचार ठेवावा काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा धागा सुरू झाला.

आम्हाला कविता 'पाडण्याचा' देखील कंटाळा येतो. लोकांनी पाडलेल्या कविता आम्ही उचलून घेऊ आणि दुसरीकडे कुठेतरी पाडू. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज कोजागिरी आहे तेव्हा चंद्र, जाग्रण, दूध, असे विषय 'आजचे' आहेत. उद्या लिहायचं असेल तर जाग्रणाचा त्रास, दूधाचे दुष्परिणाम किंवा वीकडेला रात्री का जागू नये असे असतील. पण परवापासूनमात्र दिवाळी, दिवाळीशी जोडला गेलेला नॉस्टॅल्जिया, लहानपणी बनवलेले कंदील, लोकांच्या दारांना लावलेले फटाके, अर्धवट लक्ष असताना चालल्यामुळे फतारलेली रांगोळी, त्यामुळे पडलेला मार किंवा ओरडा असे विषय 'आजचे' होतील. असो. तर असा एक ताजा, आजचा विषय निवडा. त्यासंबंधी प्रेमळ, लाडीक तक्रार करणारं एखादं स्टेटस बनवा. आता मात्र परीक्षेचा काळ आहे. तुमची प्रतिमा स्वच्छ हवी. टवाळ अशी प्रतिमा असेल तर कोणी भाव देणार नाही, फारतर लाईक करून पुढे जातील. तर आधी काही दिवस स्वच्छ प्रतिमा ठेवा किंवा स्वच्छ प्रतिमावाल्यांच्या भिंतीवर नजर ठेवा. असं स्टेटस आलं की चार बुकं वाचलेले, रसिक, जाणकार लोकं तिथे मान्यवर कवी, लेखक यांचे संदर्भ देतात. कोणी डायरेक्ट कवितेतल्या ओळीच देतात. काही हुशार लोकं परभाषेतल्या, परलिपीतल्या किंवा अगदी परदेशातल्या कविता, लेखन, कादंबर्‍या यांच्या आठवणी काढतात.

च्यामारिकेच्या !

या ईथे पहिला प्रतिसाद, आणि तोही फतारलेल्या सहमतीचा !

पॅरा आवडेश !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0