गणितज्ञ श्रीराम अभ्यंकर यांचे निधन

गणितज्ञ श्रीराम अभ्यंकर यांच्या निधनाविषयी आलेले काही लेख -

गणितसूर्याचा अस्त - डॉ. श. अ. कात्रे

गणिताशी अद्वैताचे नाते! - प्रा. श्रीधर अभ्यंकर

गणितरत्न

गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला - मंगला नारळीकर

या विषयावर आणखी काही रोचक लेख मिळाले तर ते या धाग्यावर द्यावेत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

खूप ऐकून होतो आणि बरेच वाचले होते त्यांच्याबद्दल. वाईट झाले. आदरांजली.

आपले एक सन्माननीय सदस्य त्यांना प्रत्यक्षात भेटून आल्याचे जाणतो. या सदस्यांनी त्यांच्या आणि अभ्यंकर सरांच्या भेटीच्या आठवणी आपल्या सिद्धहस्त शैलीत येथे द्याव्यात अशी त्यांना विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठामधील गणित विभागाचे मार्शल प्राध्यापक डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचे नुकतेच निधन झाले. गणिताचे ते एक जगविख्यात प्राध्यापक होते. गेली कित्येक वर्षे ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. जगभरातील विविध सन्मान त्यांना मिळाले होते. माझ्या एका मित्राचे ते जवळचे नातेवाईक. त्यामुळे दोनेक वर्षांपूर्वी मला डॉ. अभ्यंकर यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची ख्याती मी ऐकून होतो, त्यामुळे थोडासा बिचकतच मी त्यांना भेटायला गेलो. वयोमानानुसार डॉ. अभ्यंकर थकले होते. काहीसे स्थूलही झाले होते. एक साधा सदरा आणि पायजमा घालून ते एका खुर्चीत बसले होते. त्या भेटीत ते काय बोलले ते मला आता आठवत नाही; पण मला वाटते ते फारसे बोललेही नाहीत. ते जे बोलले ते अगदी साधे आणि शुद्ध मराठी होते इतके बाकी नक्की. त्यांचा कोकणस्थी गोरा रंग आणि भीती वाटावी असे भेदक डोळे तेवढे माझ्या लक्षात आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या जर्मन पत्नी इव्हा (उषा) होत्या. ते दोघे एकमेकांशी आणि आमच्यांशी अस्खलित मराठीत बोलत होते. माझा मित्र नुकताच त्याच्या कुटुंबासोबत परदेशी जाऊन आला होता. त्याला इव्हा यांनी विचारले, "मग, कशी काय झाली तुमची सहल?" त्यांच्या 'सहल' या शब्दाने आम्ही थक्कच झालो.
त्यांच्या मुलांची नावे हरी व काशी अशी आहेत. आता त्यांना अमेरिकेत हॅरी व कॅथी म्हणत असतील तर कल्पना नाही. पण मराठी बोलणे, मराठी नावे असणे याविषयी कोणताही गंड नसलेल्या या विद्वानाबद्दल मला त्या वेळी फार आदर वाटला होता. अमेरिकेत गेल्यागेल्या अर्ध्या हळकुंडाने गोरेपिवळे झालेले काही लोक मी बघितले आहेत. (काही!) मराठी वर्डस रिमेंबर करायला डिफिकल्ट जाणार्‍या या काही लोकांना स्वतःच्या देशीपणाची वाटणारी लाजही मी पाहिली आहे. गणिताच्या चाळीसहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ते असणार्‍या आणि असे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणार्‍या डॉ. अभ्यंकरांच्या अस्सल मराठीपणाचे आणि साधेपणाचे मला विशेष वाटले ते त्यामुळे.
माहितीस्त्रोतः http://online2.esakal.com/esakal/20121105/5025724501613195509.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आपल्याकडून अभ्यंकर सरांबद्दल ऐकले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै ऐकून होतो अभ्यंकरांबद्दल, खतर्नाक मोठा माणूस. झारिस्कीच्या सुरुवातीच्या शिष्यांपैकी एक. त्यांचे कार्य समजण्याइतके गणित कळत नसले तरी एक मराठी माणूस इतका मोठा असल्याचा अभिमान आहेच.

रेस्टिन्पीस, अभ्यंकर सर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१ तंतोतंत सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बर्याच वर्षांपूर्वी (१५-१६ असेल) म.टा. मध्ये प्रा. अभ्यंकरांबद्द्ल एक लेख आला होता. त्यातून त्यांची माहिती पहिल्यांदा मिळाली होती. तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या एका लेखातून कळले की पुण्यातल्या "भास्कराचार्य प्रतिष्ठान"ची निर्मिती त्यांनीच केली.

त्यांना मनःपूर्वक आदरांजली. त्यांच्या संशोधनातून आणि त्यांनी उभारलेल्या संस्थांमधून त्यांची आठवण नेहमीच जिवंत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना मनःपूर्वक आदरांजली. त्यांच्या संशोधनातून आणि त्यांनी उभारलेल्या संस्थांमधून त्यांची आठवण नेहमीच जिवंत राहील.

+१
महाराष्ट्र टाईम्समधला अग्रलेखः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17094303.cms

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१
त्यांना मन:पूर्वक आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन:पूर्वक आदरांजली.
विकिपिडियात दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मोठे योगदान Algebraic Geometry ह्या विषयात आहे.७०च्या दशकातच त्यांच्याविषयी म्.टा.मध्ये वाचले होते.भारतात्,त्याहूनही महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच गणितात संशोधन करणार्‍याची वानवा आहे. गणित शिकून आयुष्यात काय उपयोग म्हणत टवाळकी करणार्‍यांची संख्या जास्त.जुन्याकाळात परदेशी जावून गणितात आपला ठसा उमटवणार्‍या अशा लोकांविषयी आदर वाढतो.
(म्याट्रिकपर्यंत गणित शिकलेली) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी पीएच. डी. परड्यूमधलीच अाणि गणितातलीच असल्यामुळे अभ्यंकरांशी अोळख होती. (पण ते माझे अॅडव्हायजर नव्हते.) मनात एखादी गोष्ट अाली तर ती बोलून टाकण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांची लेक्चर्स काहीशी विस्कळीत पण मजेशीर असत.

हा १९९३ सालचा प्रसंग. अँड्र्यू वाईल्स या संख्याशास्त्रज्ञाने केंब्रिजमधल्या एका कॉन्फरन्समध्ये 'फेरमाज् लास्ट थिअरम' ची सिद्धता सापडल्याचा दावा केला होता, पण नंतर या सिद्धतेत चूक निघाल्याची बातमी पसरली. (तीनेकशे वर्षं अनुत्तरित राहिलेला हा गणितातला फार मोठा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणाची चर्चा सगळीकडे होती.) त्यादिवशीच्या लेक्चरमध्ये अभ्यंकर मध्येच या विषयावर घसरले अाणि म्हणाले की 'If he keeps on making claims like this which turn out to be wrong, then nobody will take him seriously!' अाणि मग अचानक त्यांनी माझ्याकडे वळून 'लांडगा अाला रे अाला या गोष्टीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?' असं मला मराठीत विचारलं. मी 'crying wolf' इतपत शब्द तोंडातून काढताच त्यांची लिंक लागली अाणि मग ती सगळी गोष्ट त्यांनी अाम्हाला लेक्चरमध्ये रंगवून सांगितली. (अवांतर भाग असा की ही चूक नंतर दुरुस्त झाली, अाणि अाता त्या प्रमेयाला 'फेरमा-वाईल्स थिअरम' म्हणतात.)

एकदा लेक्चरमध्ये 'अाजकालची मुलं कॅल्क्युलेटर्स वापरतात, पण अाम्हाला शंभरपर्यंत पाढे पाठ करावे लागले' असा त्यांनी सूर लावला होता. मी त्यांना विचारलं: 'Did you have to memorize the autki as well?' ते लगेच उत्साहाने हो म्हणाले, अाणि 'अौटं एके अौटं, झाडाला अाली कवठं' अशी लहानपणची कविता त्यांनी म्हणून दाखवली.

त्यांच्या स्थूलपणाचा उल्लेख अाधीच इथे होऊन गेलेला असल्यामुळे पुन्हा झाला तर बिघडत नाही. विद्यार्थ्यांतलं त्यांचं टोपणनाव S^2 (एस-टू) असं होतं. (ते त्यांना माहित होतं असा मला संशय अाहे.) एकतर S^2 म्हणजे 'श्रीराम शंकर', पण टोपॉलॉजीमध्ये त्याचा अर्थ होतो: two-dimensional sphere (म्हणजे गोल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

प्राध्यापक श्रीराम अभ्यंकरांविषयीचा एक ऐकीव किस्सा येथे सांगितल्याशिवाय राहवत नाही.

पुण्यात एका कॉलेजच्या गणितविभागाने प्रा. अभ्यंकरांचे "नंबर थिअरी" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान द्यायला अभ्यंकर पोचले आणि आयोजकांपैकी कुणी स्वागत करायला उपस्थित नव्हते म्ह्णून आवरातले सूचनाफलक वाचत उभे राहीले. अभ्यंकर आलेले कुणाच्याही लक्षात आले नाही कारण ते घरच्या कपड्यात म्हणजे चुरलेला सदरा, लेंगा, सदर्‍याच्या बाह्यांमधून डॊकावणारा बनियन अशा वेषात आले होते.

हळुहळु गर्दी जमली आणि कुणितरी त्यांना ओळखले आणि सभास्थानाकडे घेऊन गेले. कार्यक्रम सुरु झाला. सभागार तुडुंब भरले होते. आयोजकानी प्राध्यापक श्रीराम अभ्यंकरांची ओळख करून दिली (पण इंग्रजीतून!). प्रा. अभ्यंकर बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, "I am going to deliver this whole lecture in Marathi. Those of you who dont understand Marathi may please leave the hall".

सुरुवातीलाच अशी घोषणा झाल्यामुळे बरेचजण नाराजीने चालते झाले. पण काही जण मराठीत तर मराठीत असा विचार करून हट्टाने बसून राहीले. निम्मे लोक निघून गेल्यावर प्रा. अभ्यंकर म्हणाले, "आता मी माझे सर्व व्याख्यान इंग्रजीतून देणार आहे".

आणि नंतर सर्व कार्यक्रम इंग्रजीतून पार पडला.

माझी स्वत:ची त्यांच्याबद्दलची एक मजेशीर आठवण आहे पण त्याबद्दल पुढे कधितरी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0