थुंके

थुंके

सक्काळ सक्काळी कॉलेजला पाळायची घाई त्यात सिग्नलवर कारमधून सद्गृहस्थाने थेट गुटखासदृश पदार्थ खाऊन पिचकारी मारली आणि नेमका मी त्याच्या कारजवळून पास झालो. साहजिकच पिचकारीने खेटरावर नेम साधला. कॉलेजात मशीन वाट बघत होती म्हणून (जल्ला तसली मशीन नै काई, थंब मशीन) मनातल्या मनात त्याचं शब्दसुमनांनी स्वागत करून तसाच निघालो. हे भिकारचोट थुंके कधी, कुठं आणि कसं पचकतील सांगता येत नाही.
असले मूर्ख रोजच्या प्रवासात खूपदा भेटतात. निवांत वेळ असला कि मग पंगा घ्यायला जमतो, कारण चूक त्यांची असते. असंच एकदा एक थुक्कड म्हतारा रोडच्या डाव्याबाजूनं गाडी चालवताना उजव्या बाजूला रोडच्या मध्यभागी पाचकल. मी मागेच होतो थोडक्यात चुकामुक झाली, पण मला वेळ होता. मी चिंगाट गाडी पळवून त्याला ओव्हरटेक केलं आणि त्याच्यासाखी कृती केली, पण त्याच्या अंगावर जाईल असं. म्हातारं चिडलं आणि जोरजोरात हॉर्न वाजवायला. मी स्पीड कमी करून पुनरावृत्ती केली. बहुतेक त्याच्या लक्ष्यात आलं, ते गपचूप निघून गेलं.
असले थुक्कड लोकं समाजात सगळीकडे दिसतात किंवा त्यांच्या असण्याचा पुरावा तरी मागे सोडतात. त्यात विविध पदार्थ वापरले जातात जस कि तंबाखू, गुटखा, मावा, पान, पाणी...
ह्यांची आवडते ठिकाणं
१. बस मध्ये डाव्या बाजूच्या पत्र्यावर थुंकणारे
२. चालत्या बस मधून बाहेर थुंकणारे
३. दुचाकी वरून कुठेही थुंकणारे
४. कार मधून थुंकणारे
५. जिन्यात/ जिन्याच्या कोपऱ्यात थुंकणारे
६. ऑफिसात थुंकणारे
७. काहीतरी खाऊन थुंकणारे
८. काहीही न खाता उगीच खाकरून थुंकणारे (सर्दी झाल्यास तर विचारायलाच नको)
९. क्रिकेट खेळताना थुंकणारे (क्रिकेट पाहताना सगळ्यात गचाळ वाटणारा प्रकार, कॅम्रामन थॉय थॉय)
१०. एखाद्याच नाव काढलं कि त्याच्या नावानं थुंकणारे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्याचयी राहून जात होतं. कारण ह्या वृत्तीबाबतची माझीही आठवण कटूच आहे.
२०११ साली अजून ओला, उबर पुण्यात नव्हतं तेव्हा रेडिओ विंग्ज ही एक कंपनी होती. नात्यातल्या एकांचा मुलगा JEE परीक्षा देण्यासाठी पुण्यात आला होता आणि त्याचा नंबर आकुर्डीच्या कॉलेजमधे लागला होता. तिथे जाण्यासाठी रेडिओ विंग्जची गाडी केली. तो ड्रायव्हर सारखा थुंकत होता. थुंकू नका म्हटलं तरी ऐकत नव्हता. संचेती हॉस्पिटलपासून तर मी मोजलंच, आकुर्डीपर्यंत तो सात वेळा थुंकला.
दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या ऑफिसला फोन करून त्याची तक्रार केली तर नंतर कधीतरी पुन्हा त्यांची सेवा घ्यायची वेळ आली तेव्हा माझा नंबर त्यांनी ब्लॉक केलेला आढळला !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वजनिक मूत्रकूपात थुंकायला लोकांना फार आवडते. त्या शिवाय मुत्रविसर्जन झाल्याचा फीलच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/