टाकसाळ निर्माण - उदय कुलकर्णी

टाकसाळ निर्माण - उदय कुलकर्णी - आवृत्ती पहिली: ऑक्टोबर २०१३ - तुळजा प्रकाशन - पृष्ठं: ५६ - किंमत: रु.५०/- मुखपृष्ठ: मनोज आचार्य

माणसाच्या मूलभूत गरजा अन्न-वस्त्र-निवारा ह्या आहेतच आणि त्या मिळवण्यासाठी हवा पैसा. म्हणजेच पैसा हीदेखील मूलभूत गरजच आहे. त्यासाठी किती पैसा पुरेसा असतो? पैशाने माणूस सुखी होतो का? पैशामुळे माणसाला सुरक्षित वाटतं का? भविष्याची तरतूद म्हणून किती पैसा जमवला पाहिजे? आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील असो वा गडगंज संपत्ती असलेला अतिश्रीमंत असो, प्रत्येकजण पैशासाठी, नसलेला मिळवण्यासाठी आणि असलेला टिकवून ठेवण्यासाठी, धडपडत असतो, तो नक्की कशामुळे?
उदय कुलकर्णी यांच्या ‘टाकसाळ निर्माण’ ह्या कथेच्या वाचनानंतर हे प्रश्न पुन्हा नव्याने मनात येऊ लागतात. हे पुस्तक केवळ एकाच कथेचं आहे. त्यामुळे ते वाचून संपलं की तुमचं मन ह्याच प्रश्नांभोवती रेंगाळत रहातं.

सोपान चिरे ह्या सर्वसामान्य माणसाची ही गोष्ट आहे. शिक्षण-हुशारी बेतास बात, साधीसुधी पत्नी आणि एकुलता एक मुलगा असं छोटं कुटुंब. इमाने-इतबारे नोकरी करत मिळालेल्या मोजक्या पगारात घर चालवणारं, म्हटलं तर सुखी कुटुंब. नुकतंच सुरू झालेलं एक नवीन वर्तमानपत्र चिरे नेमाने घ्यायला लागतात व अथपासून इतिपर्यंत, सगळ्या बातम्या वाचतात. त्यात त्यांना आर्थिक सल्लाविषयक सदर दिसतं आणि आपली स्वत:ची माहिती ते पाठवतात. पण बरेच दिवस त्यावर काहीच सल्ला मिळत नाही व तो विषय मागे पडतो. चारेक महिन्यांनंतर नेहमीप्रमाणे एका निवांत रविवारी एकेक बातम्या वाचता-वाचता एका ठिकाणी अचानक त्यांना स्वत:चं नाव दिसतं. त्या सदराच्या आर्थिक सल्लागाराने त्यांच्या प्रश्नावर सविस्तर दिलेलं उत्तर त्यात असतं. आजच्या त्यांच्या पगाराच्या व सांसारिक गरजा भागवून शिल्लक रकमेच्या हिशोबाने निवृत्तीनंतर त्यांना किती रकमेची गुंतवणूक करणं आवशयक आहे ह्याचा तपशील त्यात असतो, अगदी रुपये आणि पैशांसह! आपलं नाव वर्तमानपत्रात आलेलं बघून चिरे हरखून जातात. बारकाईने तो सल्ला वाचतात. त्यांच्या लक्षात येतं की इतकी रक्कम साठवायची तर ते आपल्याला अशक्य आहे. पण त्यातल्या त्यात काय जमू शकतं ह्याचा ते विचार करतात आणि त्याप्रमाणे पैशांची बचत करणे, सुट्टीच्या दिवशी जास्तीची कामे करणे सुरु करतात. बायकोलाही ह्यात सामील करून घेण्यासाठी आग्रहाने सांगतात. ती बिचारी नवर्‍याला ह्यापासून रोखू बघते पण नाईलाजाने काही मदत करतेदेखील.
चिरेंना जास्तीची कामे शोधताना साखळी पध्दतीने वस्तू विकणारे, वास्तूच्या सुयोग्य रचनेने अधिकाधिक आर्थिक लाभ कसा होऊ शकेल असे वेगवेगळे मार्ग सांगणारी माणसं भेटतात. त्यांनी खुलवून सांगितलेल्या ह्या अशा विक्रीत मुद्दल घालण्याइतकंही आपल्याकडे काही नाही याने चिरे खट्टू होतात. पण तरीही आपण जास्त पैसा कमवायचाच ही जिद्द मनात असतेच. दिवसरात्र फक्त अशा गोष्टींचा विचारांत ते वहावत जातात. बायकोला हे लक्षात येऊनदेखील ती त्यांना थांबवू शकत नाही. आणि शेवटी.....
हे सगळं वाचताना आपण त्यात इतके गुंगून जातो की चिरेंचं काय होतं हे वाचल्यावर थबकतो.
चिरेंसारखा पापभिरू आणि निम्न आर्थिक स्तरातील माणूस आज खरंच कसा जगत असेल? पैसा कसा मिळवत असेल? कसा साठवत असेल? आणि कसा गमवतही असेल अशा प्रश्नांत आपण पडतो. मॉल, मल्टिप्लेक्स, जाहीराती, अपरिमित वस्तू अशा प्रलोभनांमध्ये आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी, किती प्रमाणात आणि खरंच किती हव्यात असा विचार कोण करत असेल? प्रसारमाध्यमांकडून, वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनेल्स ह्यांच्याकडून, होणारा आर्थिक बाबींमधला माहितीचा विस्फोट आणि भुलभुलैय्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर कशा प्रकारे विपरित परिणाम करत असेल हे ह्या कथेच्या ओघात वाचताना आपणही थक्क होतो.

आर्थिक सल्ला देण्याच्या मिषाने आपल्या जाळ्यात ओढून मूर्ख बनवणारे लोक काय काय क्लुप्त्या लढवतात, आपली जाहिरात करण्यासाठी आपल्या मनाप्रमाणे कथा लिहून द्यावी म्हणून लेखकाला काय काय अफलातून पर्याय सुचवतात. लेखक त्यांना भुलतात का? मराठी लेखक आणि इंग्रजीत लिहिणारा भारतीय लेखक ह्यांच्यात काय तफावत आहे? अशाही काही गोष्टी जाता-जाता ह्यात आल्या आहेत.

विनोदी अंगाने लिहिलेली चिरे कुटुंबाची ही कथा वाचताना आधी हसू येतं आणि नंतर वाटतं,
सगळ्याच सर्वसामान्य माणसांचं असं होतं का? तीदेखील चिरेंप्रमाणे पैशाच्या मागे लागतात का? भविष्याचा अनाठायी विचार करणारी, मनाने कमकुवत, घाबरट माणसं ह्या मोहमयी दुनियेचा बळी ठरतात. ‘आपला देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे’ हे सतत वर्तमानपत्रात वाचून, चॅनेल्सवरच्या चर्चा ऐकून आजची आपली स्वत:ची आर्थिक परिस्थिती काय आहे ह्याचा सारासार विचार हरवून बसतात. भविष्याचा विचार केलाच पाहिजे, पण तो करताना आपली आजची सुखशांती किती पणाला लावायची हेदेखील त्यांना समजेनासं होतं. आणि ह्या अशा माणसांची शिकार करून आपला फायदा करून घेणारी माणसं तर जागोजागी असतातच.
मुखपृष्ठावरच्या साध्या माणसाप्रमाणे पैसा-अधिक पैसा ह्या चक्रात किती भोवंडत रहायचं, कोणाच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.

चित्रा राजेन्द्र जोशी.
३०.६.२०१९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरंय.
अशी आर्थिक सल्ला देणारी सदरं टाईम्स,मटामध्ये येत ,नंतर लोकसत्तेतहीही. गम्मत म्हणून ठीक. पण हे वाचून काही तरुण नोकरदार मुलं मुली पेटतात आणि सेविंगच्या मागे लागतात. मुलांसाठी, नातवांसाठी सेविंग हे नवीन फ्याड असावे. यावर पुस्तक गमतीदार असणार.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर मागे कुणी उदय याने सेविंग/ खर्च app वर लेख लिहिलेले तेच नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय उदय यांनी लेख लिहीले होते. फार आवडले.
'मी एक चिवित्र मुलगी' अशी सही असलेल्या एका आय डी ने ही लिहीले होते. तिचा आय डी मी विसरले.
___________
आठवला - सविता
http://www.aisiakshare.com/node/2985

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओन्ली गॉड नोज विच उदय विच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोघांचे विषय सारखेच आहेत म्हणून वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचायच्या लिस्ट मधे आले हे पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच आणि असंच ज्या-ज्या गोष्टींचा लोकांना मोह असतो त्यात दिसतं. इन्स्टाग्राम वापरणाऱ्या लोकांत सुंदर दिसण्याची धडपड, फेसबुकावर लोकप्रिय असण्याची.

पैशांचा मोह, पुढे प्रसिद्धीचा ह्याची गोष्ट ब्रेकिंग बॅडमध्येही आहे. ती अजिबात 'ममव' नाही; त्यामुळे बघताना आणखी करमणूक होते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.