"झेंडूची फुले" हा सुप्रसिद्ध कवितासंग्रह रचणार्‍या प्र. के. अत्रेंच्या स्वर्गस्थ आत्म्याने मला स्फुरवलेले मनाचे श्लोकाष्टक

"झेंडूची फुले" हा सुप्रसिद्ध कवितासंग्रह रचणार्‍या प्र. के. अत्रेंच्या स्वर्गस्थ आत्म्याने मला स्फुरवलेले मनाचे श्लोकाष्टक -

-----------------------------

मना, सज्ज्ना, श्लोक तू मनाचे लिहावे

मनी धारिष्ट्य बेलाशक पुरेपूर धरावे

वाचोनी श्लोक तव जन बहुश्रुत होती

नि गुणगान तुझे ते जाणी बहु करीती ॥

.................................

मना, सज्ज्ना, ऐशा विचारा धरावे

तुझ्यासारिखा भूमंडळी कोण आहे?

ज्ञानोबा, तुका, एकनाथ, रामदास,

सर्वांहून आहेस तू श्रेष्ठ खास ! ॥

.................................

मना, उपदेश तू करावास सर्वां

न त्यां तथ्य जरी, न करावीस पर्वा

मना, ठेवी आदर्श भोंदूजनांचा

घ्यावास मानसन्मान सर्वां जनांचा ॥

...............................

मना, सज्ज्ना, तू चकाट्या पिटाव्या

न भेद करावा त्या उजव्या की डाव्या

ज्ञानार्जन कोण्याही मार्गे करावे

महत्त्व ज्ञानाचे मनी तू धरावे ॥

................................

मना, शेख महंमदी स्वप्ने पहावी

स्वप्नांमधेची तुझी बुद्धी रहावी

सत्सृष्टीत तू जर का रहाता

ने येईल तुझ्या काहीही हाता ॥

..............................

खाण्यातले सौख्य, मना, तू जाणी

सौख्य ते न घेती जे असती अडाणी

कडबोळी, लाडू, करंज्या नि चिवडा

असता पुढ्यात का फुका वेळ दवडा? ॥

..............................

मना, सज्ज्ना, दुर्जना तू द्याव्या

शिव्या, पण त्याच्या शिव्या तू न घ्याव्या

होई जरी तुंबळ युद्ध तुमचे

हार घेणे शोभे, सांग, त्वां कैंचे? ॥

................................

मना, एक योगासन त्वां करावे

"शवासन" नाम त्याचे तू ध्यानी धरावे

बिछान्यावरी पडोनी डोळे मिटावे

सुखस्वप्न निद्रेमधे त्वां पहावे ॥

...............................

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नाही म्हणजे, मनाच्या श्लोकांचे विडंबन पाडायला हरकत काहीच नाही, परंतु पाडायचेच झाले, तर गेला बाजार तेवढ्या त्या भुजंगप्रयाताचा तोल सांभाळायचे पाहाल काय प्लीज? रसभंग होतो.

प्राथमिक चाचणी म्हणून पुढीलपैकी कोणत्याही गाण्याच्या चालीवर म्हणून पाहाता येईल. म्हणताना ओढाताण झाली, तर निश्चित चुकले, असे समजायचे.

- अकेले अकेले कहाँ जा रहे हो
- ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है
- जिन्हें नाज़ है हिन्द पर, वो कहाँ हैं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

नबा मालक, तुम्हीच का नाही हो पाडत? गेलाबाजार ह्या भुजंगाला परत परडीत बसवत?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

मना, सज्ज्ना, श्लोक तू मनाचे लिहावे
मनी धारिष्ट्य बेलाशक पुरेपूर धरावे

हे बरोबरच आहे .
मोजमापे बरोबर केली तर अजून बहार येईल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

अक्षांशाचे, रेखांशाचे - उभे आडवे गुंफुन धागे |
विविध रंगी वसुंधरेचे - वस्त्र विणीले पांडुरंगे |
विश्वंभर तो विणकर पहिला - कार्यारंभी नित्यं स्मरूया |
धागा धागा अखंड विणुया .....