नको उदास बसू

नको उदास बसू

नभ रंगले रंगांत, सांज उतरे डोळ्यांत
हुरहुरत मनात, नको उदास बसू

अशा कातर अवेळी, हळव्या गीतांच्या ओळी
गुणगुणत ओठांत, नको उदास बसू

पुन्हा लालस पानांनी, झाड सजले अंगणी
भिरभिर पाचोळ्यात, नको उदास बसू

रात्र विषण्ण अंधारी आता परतेल माघारी
नवी पहाट दिशांत, नको उदास बसू

बाण जिव्हारी विसर, होती मायेची फुंकर
आठव एखादे स्मित, नको उदास बसू.

कांचन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नको उदास बसू.

श्री. उदास चंद्र बोस इतके का बुवा नकोसे झाले?

(आणि तेही दोनदोनदा छापण्याइतके?)
..........

जोकिंग अपार्ट, ही कविता (तुलनेने) आवडली. कल्पना छान आहे. मात्रांचा हिशेब जरा जास्त काटेकोरपणे पाळला, तर सुंदर होईल.

अशा कातर अवेळी, हळव्या गीतांच्या ओळी
गुणगुणत ओठांत, नको उदास बसू

'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी'मधल्या 'कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, तेव्हा नको स्मरू तू माझी उदास गाणी'ची (का कोण जाणे, पण) आठवण झाली. असो.

..........

तरी या कवितेत बऱ्यापैकी पाळलाय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा, चक्क तुमच्याकडून? पण खरंच छान वाटलं! Thanks!
दोन वेळा प्रकाशित का झाली मलाही कोडं आहे. प्रकाशित होण्याची वेळही एकच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सामो. तुम्ही नेहमी तत्परतेने प्रतिसाद देता त्याबद्दल thanks a lot.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0