'विज्ञानाचे बिनरहस्य' - भाग ३

केपलर १६३०मध्ये मरण पावला. आयझॅक न्यूटन १६४२मध्ये जन्मला. मानवाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी जगातल्या थोर वैज्ञानिकांना विचारण्यात आला होता. त्यात न्यूटन पहिला आणि आईनस्टाईन दुसरा आला होता. तर, त्या आयझॅक न्यूटनने ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या कक्षांचं रहस्य उलगडलं. त्या रहस्याचं नाव अर्थात गुरुत्वाकर्षण. अवकाशातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकींना आकर्षित करतात आणि ते आकर्षण त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात असतं; तर त्या वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. सूर्याच्या आकर्षणामुळे ग्रह सरळ सूर्यावर जाऊन आदळत नाहीत, कारण ते गतिमान असतात. दगड हातात घेऊन सोडला तर तो सरळ रेषेत जमिनीकडे जातो. पण तोच दगड जर वेगाने भिरकावला, तर ताबडतोब खाली न जाता वक्र मार्गाने प्रवास करतो; तसंच.

केपलरच्या गणिती मांडणीने इतिहासातल्या एका महान शोधाला प्रेरणा दिली होती.

विज्ञानातल्या शोधाला कोणीही, तुम्ही किंवा आम्ही आव्हान देऊ शकतं. न्यूटनच्या शोधाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा ज्ञात असलेल्या प्रत्येक ग्रहाच्या कक्षेचं बारीक निरीक्षण करून न्यूटनच्या गणिताने येणाऱ्या उत्तराशी ते निरीक्षण ताडून बघण्यात आलं. शनी की युरेनस, माहीत नाही; पण कुठल्यातरी एका ग्रहाचं भटकणं (planet या शब्दाचा अर्थ भटक्या, असा आहे, हे सांगितलंच) न्यूटनच्या गणिताशी जुळेना. उत्तर न जुळण्याची दोन कारणं शक्य होती. एक म्हणजे, गणित चुकीचं आहे. पण बाकीच्या ग्रहांच्या बाबतीत न्यूटन इतका बरोबर होता, की त्याचा नियमच चुकीचा आहे, असं ठरवण्यापूर्वी दुसरं कारण तपासणं गरजेचं होतं. ते जरा गोंधळाचं होतं. म्हणजे असं की शनीच्या पलीकडे आणखी एक वस्तू आहे, जिच्या आकर्षणामुळे शनी / युरेनस यांच्या फिरण्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे शनीची कक्षा गणितापेक्षा थोडी वेगळी सापडते आहे. समजा, असली काहीतरी वस्तू असलीच, तर ती नेमकी कुठे असेल? न्यूटनचं गणित जर पक्कं असेल, तर हेसुद्धा कळायला पाहिजे! किचकट गणित करून त्या अज्ञात वस्तूचं स्थान निश्चित करण्यात आलं. मग त्या दिशेने दुर्बीण लावली गेली.

हो, तिथे एक ग्रह होता. तोवर माहीत नसलेला. सूर्याभोवती फिरणारा. स्वतःच्या वस्तुमानामुळे जवळच्या फिरत्या वस्तूंच्या कक्षांवर सूक्ष्म का होईना, परिणाम घडवून आणणारा. त्याला नाव देण्यात आलं, नेपच्यून.

हा नवीन ग्रह अगोदर कागदावर आणि मग अवकाशात शोधण्यात आला. एका नवीन ग्रहाचा शोध एका वैज्ञानिक मांडणीच्या अचूकपणामुळे लागला.

नेपच्यूनचा शोध
नेपच्यूनचा शोध

तर लोकहो, विज्ञानात शोध हे असे लागतात. एक जण उभा रहातो. त्याच्या खांद्यावर दुसरा चढतो. त्या वरच्याला जास्त दूरवरचं दिसतं. हे दोघे स्थिर झाले की मग तिसरा येतो आणि दुसऱ्याच्या खांद्यांवर उभा राहतो. आपोआप आणखी दूर पाहतो. हे अर्थात चटपट होत नाही. सहज होत नाही. खांद्यांवर चढताना अनेक जण धडपडतात. ठेचकाळतात. पडतात. वर चढून दूर पाहणाऱ्याचं नाव होतं. पण त्याच्या यशामागे अनेकांनी ‘काय केल्याने यश मिळत नाही,’ हे सांगणाऱ्यांचं योगदान असतं.

तर लोकहो, एक कोणीतरी सकाळी उठला आणि संस्कृतात काहीतरी महान महत्त्वाचं बडबडला आणि झोपी गेला आणि ते बडबडणं म्हणजे वास्तवात एक महान शोध होता, असं जर कोणी सांगू लागला तर तो तुम्हाला मूर्ख समजतो आहे, असं समजा. न्यूटन होण्यासाठी अगोदर केपलर होऊन गेलेला असावा लागतो. केपलर शक्य होण्यासाठी कोपर्निकसची गरज असते. कोपर्निकस, केपलर, न्यूटन सगळ्यांनी आपापलं संशोधन लॅटिन या भाषेत मांडलं. युरोपभर सगळे असंच करत होते. त्यामुळे पोलिश कोपर्निकस, जर्मन केपलर आणि इंग्लिश न्यूटन अशी एक परंपरा घडू शकली. स्वतःला लागलेला शोध सर्वांच्या माहितीसाठी खुला करण्यातून. माहिती सर्वत्र पसरण्यातून. विचारांची देवाणघेवाण होण्यातून.

कोणीही स्वयंभू नसतो. आमचे पूर्वज स्वयंभू होते, कोणत्याही पूर्वपरंपरेविना, अगोदरच्या कोणीही पायाभरणी केलेली असल्याविना त्यांनी महामहान शोध लावून ठेवले आहेत आणि ते शोध संस्कृत पोथ्यांमध्ये घोरत पडले आहेत, असं सांगणारा मूर्ख आहे, असं निःशंकपणे समजा.
विज्ञान असं नसतं. ते मुळात महानतेत गुंडाळलेलंच नसतं.

आणखी उदाहरणं पाहू.

या देशात श्रद्धेचं, विचारशून्यतेचं इतकं स्तोम माजलेलं आहे की आपली जशी धर्मावर, धर्मग्रंथातल्या वचनांवर श्रद्धा असते; अगदी तशीच श्रद्धा विज्ञान मानणाऱ्यांची विज्ञानावर असते. या विज्ञानाला श्रद्धेचा विषय बनवणाऱ्यांचा देव असतो, आइनस्टाइन. कारण त्याने ‘सापेक्षता’ नावाची अद्भुत गोष्ट शोधून काढली. आजवरचा सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण, ही पहाणी भारतात केली असती, तर आइनस्टाइनला न्यूटनपेक्षा खूप जास्त मतं मिळाली असती, यात शंका नाही. कारण न्यूटनचं गुरुत्वाकर्षण, त्याचे गतीचे नियम, प्रकाशाचं पृथक्करण, वगैरे गोष्टी ‘कळतात’, जगताना त्यांची प्रचिती घेता येते. सापेक्षता म्हणजे निव्वळ गूढ. (ही भावना सार्वत्रिक आहे. किती? एडिंग्टन नावाच्या फिजिक्सच्या वैज्ञानिकाला एकदा कोणीतरी विचारलं, ‘का हो, सापेक्षता समजणारे जगात फक्त तीनच लोक आहेत, असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?’ अहंकारी एडिंग्टन उत्तरला, ‘एक आइनस्टाइन, एक मी; तिसरा कोण असावा बुवा?’ असो.) तर आइनस्टाइनने सापेक्षतेचा शोध कसा लावला, याची सर्वसामान्य कल्पना अशी असते की स्वित्झर्लंडमधल्या एका पोस्ट ऑफिसात कारकुनी करत असताना आइनस्टाइन चिंतन करत असे. त्यातून सुचलेलं कागदावर उतरवत असे. आणि असं करताकरता एके दिवशी त्याला साक्षात्कार झाला आणि सापेक्षतेचं समीकरण त्याच्यासमोर उभं राहिलं! जवळ जवळ दैवी देणगी म्हणावी अशी गोष्ट त्याला प्राप्त झाली! पण स्वर्गातली गंगा अंगावर घेणं जसं एका शंकरालाच शक्य होतं, तसंच आइनस्टाइनचं होतं. त्याच्या अचाट बुद्धिमत्तेमुळेच हे शक्य झालं. दुसऱ्या कुणाला हे ज्ञान झेपलंच नसतं.

असं काय जगावेगळं होतं सापेक्षतेत?

पदार्थ वेगाने प्रवास करू लागला की पदार्थाची लांबी कमी होऊ लागते!

पदार्थ वेगाने प्रवास करू लागला की कालप्रवाह मंद होऊ लागतो!

याचा अर्थ गणितात लागत असेल, विज्ञानकथांमध्ये दिसत असेल; पण तुम्ही आणि आम्ही कसं काय हे पचवायचं?

असो. आपण सापेक्षतेचा सिद्धांत कसा घडला, याविषयी विज्ञानाचा इतिहास काय सांगतो, हे पाहू.

(क्रमशः)

भाग १ - दुवा
भाग २ - दुवा

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

मालिकेतील सर्व भाग आवडत आहेत.,
वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी हेच म्हणतो.

लेख उत्तम. आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडे नव्याने विस्तृत लेख अपेक्षित आहेत.
-------
>>> पण कुठल्यातरी एका ग्रहाचं भटकणं (planet या शब्दाचा अर्थ भटक्या, असा आहे, हे सांगितलंच) न्यूटनच्या गणिताशी जुळेना. उत्तर न जुळण्याची दोन कारणं शक्य होती. एक म्हणजे, गणित चुकीचं आहे. पण बाकीच्या ग्रहांच्या बाबतीत न्यूटन इतका बरोबर होता, की त्याचा नियमच चुकीचा आहे, असं ठरवण्यापूर्वी दुसरं कारण तपासणं गरजेचं होतं. ते जरा गोंधळाचं होतं. म्हणजे असं की शनीच्या पलीकडे आणखी एक वस्तू आहे, जिच्या आकर्षणामुळे शनी / युरेनस यांच्या फिरण्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे शनीची कक्षा गणितापेक्षा थोडी वेगळी सापडते आहे. समजा, असली काहीतरी वस्तू असलीच, तर ती नेमकी कुठे असेल? न्यूटनचं गणित जर पक्कं असेल, तर हेसुद्धा कळायला पाहिजे! किचकट गणित करून त्या अज्ञात वस्तूचं स्थान निश्चित करण्यात आलं.
- ते किचकट गणित कोणतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राचीन भारताबद्दलचा तंत्रविद्याविषयक सर्वांत जुना पुरावा हडप्पा काळच्या वैशिष्ट्यपूर्ण शहरांच्या रचनेच्या रूपातील आढळतो. त्या काळी तांबे व कासे (ब्राँझ) या धातूंचीच हत्यारे वापरात होती, असे अनुमान करता येते. त्या काळी शेतीच्या मशागतीकरिता नांगर वापरण्यात येत नव्हता व लोखंडाचा वापर पण माहीत नव्हता. यानंतर आर्य लोकांचे आगमन भारतात झाले. ऋग्वेदामध्ये तांदळाचा उल्लेख आढळत नाही. यजुर्वेदामधील मजकूरावरून त्या वेळच्या गणितात एक सहस्त्र अब्जापर्यंतची मोठी संख्या मोजण्याची क्षमता होती, असे सूचित होते. लोखंडाचा वापर भारतामध्ये इ. स. पू. १००० च्या सुमारास सुरू झाला असावा, असा अंदाज आहे. पोरस राजाने सम्राट अलेक्झांडर यास भेट म्हणून पोलाद दिल्याचा उल्लेख (इ. स. पू. ३२६) मिळतो. काच तयार करण्याची कला इ. स. पू. १००० पासून, तर मृत्तिकावस्तू तयार करण्याची कला इ. स. पू.६००-५०० पासून सुरू झाली असावी, असा पुरावा मिळतो.

प्राचीन काळात भारतात ज्योतिषशास्त्र, गणित व वैद्यक या विषयांकडे विशेष लक्ष दिले गेले. चंद्र व सूर्य यांच्या गतींच्या आवर्तकालाचे (एका प्रदक्षिणेस लागणाऱ्या कालाचे) गणन करण्याकरिता अंशतः वैज्ञानिक व अंशतः अनुभवजन्य ठोकताळ्यांवर आधारलेली अशी एक गणितीय रीत प्राचीन भारतात शोधून काढली गेली होती. वैदिक काळी अवकाशातील ग्रहांच्या स्थानांचे निर्देशन करण्याकरिता नक्षत्रांचा उपयोग करीत असत. त्यानंतर काही काळाने या कार्याकरिता राशिचक्र वापरावयाची पद्धत भारतीयांनी ग्रीक व बॅबिलोनियन लोकांपासून घेतली असावी. आकाशात सूर्य व चंद्र जेव्हा एकमेकांच्या अगदी समोर येतात तेव्हा पौर्णिमा होते, हे भारतीय लोकांस माहीत होते. अवकाशातील संपातबिंदूला परांचन गती आहे [→ संपात-चलन], हे ज्ञानही त्यांना होते. दीर्घ कालमापनाकरिता कृत, त्रेता, द्वापर व कली या चार युगांनी निश्चित झालेला कालखंड भारतामध्ये वापरला जात असे. या कालखंडानंतर विश्वाचा नाश व उत्पत्ती या क्रिया आवर्ती (ठराविक कालखंडानंतर पुनःपुन्हा घडून येणाऱ्या) प्रकारे परत परत घडून येतात, असा त्यांचा विश्वास होता. सध्या चालू असलेले कलियुग इ. स. पू. ३१०२ या वर्षी १० फेब्रुवारीला रात्री १२ वाजता सुर झाले, असे गणन करण्यात आले आहे.
टीप
ही माहिती मराठी विश्वकोश मधून कॉपी पेस्ट केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://aisiakshare.com/comment/182484#comment-182484

वरील अक्षर अन अक्षर दुसऱ्या साईट वर मिळालं मला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

वरील अक्षर अन अक्षर दुसऱ्या साईट वर मिळालं मला..

प्रतिसाद समजला नाही. तुम्ही दिलेल्या विश्वकोशाच्या दुव्यावर काही वेगळंच दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राजेश यांना उद्देशुन आहे ते वाक्य असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

proof

काही कारणामुळे मला होस्टेड इमेज डकवता येत नाहीये.
ही लिंक
https://ibb.co/thRZGwP

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

गौराक्का, कुठे ट्रोलाशी सभ्यपणे वागता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्हीही ट्रोल आहोत! आमच्याशीही सभ्यपणे वागायचे नाही म्हणता???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणीही स्वयंभू नसतो. आमचे पूर्वज स्वयंभू होते, कोणत्याही पूर्वपरंपरेविना, अगोदरच्या कोणीही पायाभरणी केलेली असल्याविना त्यांनी महामहान शोध लावून ठेवले आहेत आणि ते शोध संस्कृत पोथ्यांमध्ये घोरत पडले आहेत, असं सांगणारा मूर्ख आहे, असं निःशंकपणे समजा.
विज्ञान असं नसतं. ते मुळात महानतेत गुंडाळलेलंच नसतं.

आणखी उदाहरणं पाहू.

या देशात श्रद्धेचं, विचारशून्यतेचं इतकं स्तोम माजलेलं आहे की आपली जशी धर्मावर, धर्मग्रंथातल्या वचनांवर श्रद्धा असते; अगदी तशीच श्रद्धा विज्ञान मानणाऱ्यांची विज्ञानावर असते. या विज्ञानाला श्रद्धेचा विषय बनवणाऱ्यांचा देव असतो, आइनस्टाइन. कारण त्याने ‘सापेक्षता’ नावाची अद्भुत गोष्ट शोधून काढली. आजवरचा सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण,.

मग त्याच विज्ञान विषय असलेल्या धाग्यावर ही टीपणी कशा साठी .
त्या मुळे भारतीय संस्कृती विषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे हे objectonal नाही का?
पण ह्या विषयी कोणालाच ऑब्जेक्शन नाही.
वर ज्या शोधाचे वर्णन केले आहे ते शोधा कोणीतरी दुसऱ्याने लावले मग त्याची माहिती त्यांच्याच शब्दात हवी म्हणजेच त्याची मूळ लिंक देणे गरजेचे आहे.
झेरॉक्स काढणे आणि बघून लिहणे ह्या दोन्ही गोष्टी एकचं असतात.
बघून लीहताना दोन चार आपले शब्द टाकले म्हणून ते आपलेच ज्ञान आहे असे म्हणता येत नाही.
मग मी विश्वकोश मधून उतारा घेतला म्हणून काही ही वेगळे केले नाही.
वैयक्तिक टीका करायची नाही असा नियम आहे .
मग वरच्या दोन प्रतिसाद मध्ये वैयक्तिक टीका नाही का ?
का नियम व्यक्ती नुसार लागू होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या मुळे भारतीय संस्कृती विषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे हे objectonal नाही का?

संस्कृती वाहत्या नदीसारखी असते तात्या.
आता समजा आपले ऋषी वेदांनाच "यू आर द बेष्ट" म्हणत राहिले असते तर मग वेदांत जन्माला आला असता काय?
हे असं चालायचंच. मनावर घेऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्हीच आधीच्या प्रतिसादात परवानगी वगैरे विषय काढलेत म्हणून चवकश्या केल्या.

हा तुमचाच आहे ना प्रतिसाद ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मी माझ्या प्रतिसाद खाली हे मराठी विश्कोश मधून कॉपी पेस्ट केले आहे असा बदल केला आहे.
Stephan sir cha photo cha वापर स्वतःची मते समाज मनावर बिंबवण्यासाठी केला जात आहे .
त्या मधून राजकीय,धार्मिक,वैयतिक स्वार्थ साधण्याच्या हेतू आहे.
विश्वकोश ची माहिती वापरण्यात असा माझा कोणताच हेतू नाही.
देव नाही हे Stephan sir बोलले असतील .
पण आपल्याला हवं तेवढं च वापरलं जातं आहे हे सुद्धा चुकीचं नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्वकोशाचे ओनलाइनकरण कधी झाले माहीत नाही, मात्र अमच्याकडे गणेशमंदीर वाचनालयात दोन्ही ज्ञानकोश वाचायला मिळत. मी ते घेऊन नोंदी लिहून घेत असे.(२०००).संदर्भ ग्रंथ पाहायवा मिळतात हेच भाग्याचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rajesh188 व गोल्डन ब्राऊन यांचे अवांतर आणि व्यक्तिगत टीका करणारे काही प्रतिसाद अप्रकाशित केलेले आहेत. हा अखेरचा इशारा आहे. यापुढे वर्तन सुधारले नाही तर खाती गोठवण्यात येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण सर तुम्ही त्याला बॅन का करत नाहीत? सदस्यांचा सरळसरळ अपमान करतो तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

सदस्यांचा सरळसरळ अपमान करतो तो.

आपण असे म्हणावे हे रोचक आहे.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलंच होतं. तसाच प्रतिसाद आला. पण मी ऐसी मालकांना विनंती केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मायबोलीवरचा दु आयडींचा थयथयाट आता इथे सहन करायचा अन काय Sad जे जे होते ते उगी बघत रहाण्याखेरीज पर्याय नाही. मायबोलीची कचरापेटी केलीये , इथेही तोच नंगा नाच. कंटाळा येतो या रिकामटेकड्या लोकांचा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामो असं घडणार नाही. कृपया काळजी करु नका. मी इकडून चाललो. टाटा. बाय बाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

दोन पाउलं माघार घेणारा लवकर पुढे जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय आबाबा. आपल्या सामो आजी चांगल्या च आपटल्या तोंडावर तिकडं मायबोली वर. बरेच दिवस तिकडे वाट वाकडी केली नव्हती त्यांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ1

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

फार सुन्दर सरळ आणि इन्टरेस्टिन्ग लेख आहेत हे.
वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0