महायुद्धांतली भावनिक आवाहनं

(धाग्यावरची चर्चा मोठी झाल्यामुळे वेगळा धागा केला आहे.)

गूगलबाबा आपला जिगरी दोस्त, लंगोटीयार वगैरे जरी नसला, तरी कधीकधी हातचे राखून थोडी वरवरची का होईना, परंतु मदत करतोसुद्धा.

हे घ्या: (पहिल्या + दुसऱ्या महायुद्धांतली. विविध जालस्रोतांतून साभार.)

ब्रिटनमध्ये:

तुमची बायको काय म्हणेल?

"सैन्यात भरती व्हा. नाहीतर तुमची बायको तुम्हाला काय म्हणेल?"

तुमच्या मुलाबाळांना काय जाब द्याल?

"तुमच्या मुलाबाळांना काय जाब द्याल?"

या! जागा आहे अजून.

(गच्च भरलेल्या गाडीत) "या! जागा आहे अजून."

(कशाला या? मरायला?)

कोण रे तो? आँ?

"कोण रे तो? आँ?"

(सभ्यतासंकोचास्तव शब्दरचना आवरती घेतली आहे. दामाजीचा घोडा, वगैरे...)

या रे या! सारे या!

"या रे या! सारे या!" (साम्राज्याकरिता लढायला सर्व अंकितांना अगत्याचे आमंत्रण.)

ब्रिटिश हिंदुस्थानात:

महाराजांच्या आशीर्वादाने...

टोपीकरांच्या शिपायांना वरून छत्रपती शिवाजीमहाराज आशीर्वाद देत आहेत, ही मोठी मौजेची गोष्ट आहे, नाही?

आणि, अकबर आणि राणा प्रताप यांचे एकसमयावच्छेदेकरून आशीर्वाद परस्परांना कॅन्सलौट नाही का करणार?

मराठा तितुका...

मराठ्यांचा जय... इंग्रजांच्या छत्राखाली! वरच्याप्रमाणे छत्रपतींच्या आशीर्वादानेच असणार बहुधा.

दखनी लोकांचे नांव

दखनी लोकांचे नांव ते नांव, नि वर पुन्हा दक्षिणा! वर बक्षीस, नि कपडे आणि घर फुकट! आणखी काय पाहिजे?

तलवार

युद्धकर्ज

असो.

field_vote: 
0
No votes yet

त्यात अमचीही घंटा. आणि शंख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्येक कोरोना रुग्ण बरे झाले ना ते अमच्या घंटानादाने,शंखध्वनीने, थाळ्यांना पोचे पडेपर्यंत पिटल्याने. असा सहभाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भारतीय चित्रं जालावर सापडली ह्याबद्दल अंमळ अभिमानच वाटला ... आपले लोक माहिती जमा करून, ती लोकांना वाटण्यात फार कंजुषी करतात.

शिवाय 'तिकडे सीमेवर सैनिक मरत आहेत... ' हे पालुपद जुनंच दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही भारतीय चित्रं जालावर सापडली ह्याबद्दल अंमळ अभिमानच वाटला ... आपले लोक माहिती जमा करून, ती लोकांना वाटण्यात फार कंजुषी करतात.

लिखाण आवडलं.

ही भारतीय (ब्रिटिश) हिंदुस्थानी चित्रे जालावर सापडली तर खरीच, परंतु यांपैकी बहुतांश चित्रे एका ब्रिटिश संस्थळावर सापडली. (पहिले चित्र रेडिटवर सापडले. आणि ते "मराठे लोकांचा जय"वाले पीबीएसच्या संस्थळावर सापडले. तर ते एक असो.) त्यामुळे, या माहितीच्या संगोपन-संवर्धनात भारतीयांचा सहभाग तो काय, नपक्षी त्या (नसलेल्या) सहभागाबाबत अभिमान बाळगण्यासारखे नक्की ते काय, असा प्रश्न पडतो.

(शिवाय, ही चित्रे वसाहती सरकारच्या प्रचारात्मक आहेत. पक्षी, यांच्या निर्मितीमागील इंपेटस हे अंतिमतः ब्रिटिश साम्राज्यशक्तीचे आहे, हिंदुस्थानी नव्हे. हं, आता, साम्राज्यातील एका स्थानिक भाषेत जाहिरातबाजी करण्याकरिता जाहिरातींच्या निर्मितीत नेटिवांचा (कॉपीरायटर म्हणून) सहभाग हा अपरिहार्यच असावा, परंतु म्हणून, त्या निर्मितीचे श्रेय भारतीयांना हिंदुस्थान्यांना खचितच देता येणार नाही. त्यांची भूमिका ही फार फार तर हुकुमाच्या ताबेदारांची मानता येईल.

मात्र, कोणाच्या हुकुमाखाली का होईना, परंतु नेटिवांनी या जाहिराती बनविल्या, हे लक्षात घेता, या जाहिरातींची सो-बॅड-दॅट-दे-आर-गुड भिकारता अधिकच डोळ्यांत भरते. बोले तो, कोठला इंडियन (आणि त्यातही मराठा! - मराठीभाषक/महाराष्ट्रीय अशा तत्कालीन प्रचलित अर्थाने) वर्थ हिज़ नेम शिवाजीमहाराजांना टोपीकरांच्या साम्राज्याच्या सैन्यास आशीर्वाद देताना दाखवेल? आणि, हैट-ऑफ-हैट्स, अकबर आणि राणा प्रताप हे आपसांतले हाडवैर विसरून कॉमन कॉज़ करून करून करतील, तर कशासाठी? इंग्रजांच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी??? ही कल्पकता म्हणावी, की क्लूलेसनेस? (आणि तोही आपल्याच इतिहासाबद्दल?) परकी सत्तेच्या चाकरीत मस्तके गंजलेल्या का होईना, परंतु हिंदुस्थान्यांकडून ही अपेक्षा करावी काय? नेमक्या कशाच्या अंमलाखाली असल्या कॉप्या बनवीत असावेत?

आणि, जाहिराती बनविणाऱ्यांचे एक वेळ जाऊ द्या. जाहिरातींतल्या "(इंग्रजी सत्तेखालील) मराठा तुकडीने एखाद्या लढाईत मिळविलेली सरशी म्हणजे 'मराठ्यांचा जय'" वगैरे spielला भुलून सैन्यात भरती होणाऱ्या मराठी मंडळींना (म्हणजे, अशी मंडळी असलीच तर) काय म्हणावे?)

शिवाय 'तिकडे सीमेवर सैनिक मरत आहेत... ' हे पालुपद जुनंच दिसतंय.

जुने तर आहेच. मात्र, त्याच्यात क्विंटेसेंशियली भारतीय/हिंदुस्थानी/दक्षिण आशियाई असे काही असावे, याबाबत साशंक आहे.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साप्ताहिक मार्मिक मधील स्व. बाळासाहेबांनी काढलेल्या कार्टून मध्ये दिल्लीकर औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील सरदारांना मारण्यासाठी उभ्या असलेल्या मावळा शिवसैनिकाला ढगातून शिवाजी महाराज आशीर्वाद द्यायचे.
मुद्दा काय की तेव्हा संयुक्तिक वाटले असेल.
आत्ता नव्हे तर फार काही विशेष नाही. विनोदी वाटते तेही काळाचा महिमा.
.
जाहिरातींचा खर्च करणारा आणि आर्टिस्ताची तेव्हाची जाण. बास्स.
.
आजच्या कोरोना वॉरियर्स च्या जाहिराती थोड्या वर्षांनी अशाच हास्यास्पद ठरतील.
पण नबा मालक तुमचे कलेक्शन आवडले खूप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साप्ताहिक मार्मिक मधील स्व. बाळासाहेबांनी काढलेल्या कार्टून मध्ये दिल्लीकर औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील सरदारांना मारण्यासाठी उभ्या असलेल्या मावळा शिवसैनिकाला ढगातून शिवाजी महाराज आशीर्वाद द्यायचे.

आशीर्वाद मावळ्यालाच द्यायचे ना? औरंगजेबाच्या सरदाराला तर द्यायचे नाहीत?

आणि, महाराज नि औरंगजेब एकत्र येऊन पोर्तुगीजाच्या सैन्याला तर आशीर्वाद द्यायचे नाहीत ना?

फरक तेथे आहे.

पण नबा मालक तुमचे कलेक्शन आवडले खूप.

छे हो! माझे कसले कलेक्शन? सगळी इकडून तिकडून उचललेली जालसंपत्ती, झाले. तिच्यावर माझे कोणत्याही प्रकारे स्वामित्व नाही. इदं न मम|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवसेना ही शिवाजीमहाराजांच्या नावावर काढलेली संस्था, म्हणजे तत्त्वत: (बरोबर की चूक ते सोडून द्या, परंतु) महाराजांचा/शिवशाहीचा वारसा सांगणारी. (किमान तसा दावा करणारी.) त्यामुळे, शिवाजीमहाराजांनी शिवसैनिक मावळ्याला जर आशीर्वाद दिला, तर ते एक वेळ निदान लॉजिकली कन्सिस्टंट म्हणून समजण्यासारखे आहे.

(हिंदुस्थानातले) इंग्रज सरकार हिंदवी स्वराज्याचा वारसा सांगत होते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ठाकर्यांच्या चित्रात औरंगजेब नेहरू किंवा इंदिराबाई असायच्या. मोगली सरदार मोरारजी किंवा सका पाटील असायचे. मग ते औरंगजेबाचा वारसा चालवत काय?
.
नबा हे म्या लावलेले उगीच आहे. तुमचा मुद्दा कळलाय मला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाकरे हे हिंदुत्व वादी आणि इंदिरा,नेहरू धर्मनिरपेक्ष(ते ह्यासाठी की हिंदू ची सरळ बाजू घेणारा पक्ष अस्तित्वात होता त्यांना शह देण्यासाठी)
आणि मोरारजी,आणि स का पाटील महाराष्ट्र च्या
मुळावर उठलेले .
हे सर्व औरंगजेब चे वारस च .
कारण औरंगजेब हिनुस्थान,आणि महाराष्ट्र ह्या दोघांचा नालायक दुश्मन होता.
हे अभ्या ला माहीत आहे तरी
वेडा बनतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

यांपैकी बहुतांश चित्रे एका ब्रिटिश संस्थळावर सापडली. (पहिले चित्र रेडिटवर सापडले. आणि ते "मराठे लोकांचा जय"वाले पीबीएसच्या संस्थळावर सापडले.

म्हणजे भारतीयांचं भारतीयपण अबाधित आहे. हुष्ष!

जाहिरातींचा इतिहासाच्या दृष्टीनं अभ्यास म्हणून मला काहीच माहीत नाही. तुम्ही काढलेले मुद्दे रोचक आहेत. तसा अभ्यास करून, वरवर दिसणाऱ्या विरोधाभासाबद्दल, त्याच्या तत्कालीन अपरिहार्यतेबद्दल कोणी लिहिलं असेल तर (माझ्यासमोर लिंक आणून टाकल्यास) वाचायला मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@नबा -
महा महा मार्मिक!! महा रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्य संपण्याआधी एकदा तरी नबा भेटावेत अशी इच्छा आहे. विश लिस्ट मध्ये टाकून ठेवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हजारो साल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या प्रकारची चित्र/जाहिराती आधी कधीच पाहिली नव्हती.
शिपायाचा पगार ११ रुपये, हमाल, कुली वगैरेंंचा १२ रुपये, पण त्यांना पर्क्स कमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संशोधनासाठी न'बांना १० क्रॉसां माझ्याकडून लागू.
पण -

'मनातले छोटे मोठे प्रश्न' धाग्यावर
पैचान कौन?

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on शुक्रवार, 19/06/2020 - 07:50.

मित्रों ..
*उद्या रात्री ठीक 11:०० वाजता* घरातील सर्व लाईट
बंद करून आपापल्या बाल्कनीत,
किंवा घराच्या मुख्य दरवाजात उभे राहून
तोंडाने

*ठो.. ठो.. ठो... असा* *बंदुकीच्या गोळीचा आवाज*
*आवाज काढून चीनला* *घाबरवायचे आहे.*
------------
दुसऱ्या महायुद्धात अशी भावनिक

Submitted by शरद गाडगीळ on शुक्रवार, 19/06/2020 - 09:34.

दुसऱ्या महायुद्धात अशी भावनिक आवाहनं केली जात नव्हती का?
-----------------
इथून सुरुवात झाली होती हे सांगायचे राहिले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वेगळा केला, ते ठीक, परंतु शीर्षकात दुरुस्ती हवी.

ही सगळीच आवाहने दुसऱ्या महायुद्धातली नसावीत. काही पहिल्या महायुद्धातलीसुद्धा असावीत.

प्रतिसादाच्या/(वेगळ्या केलेल्या) लेखाच्या सुरुवातीला तसे स्पष्ट म्हटलेले आहे.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लढाई मध्ये जीव जातो,म्हणजे माणूस मरतो परत कधीच येत नाही.
हुतात्मा ही उपमा देवून त्या मध्ये काही फरक पडत नाही.
आणि ते सुद्धा ज्याच्या शी कसलेच शत्रुत्व नसते.अशा लोकांशी लढाई करायची त्याचा जीव ghayacha
मग असे बलिदान देण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी हुतात्मा बनवले जाते .
त्या साठी विविध युक्त्या केले जातात त्या मधील ही एक युक्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

भारतात (ब्रिटिश ईस्ट इंडिया काळापासून ते आजतागायत) बहुतांश* सैनिक हे न'वी बाजू यांनी दाखवलेल्या चित्रातील बाबींसाठी भरती होत असावेत. (अमूक पगार, जेवण आणि अ ब क गोष्टी मोफत).

पंचवीसेक वर्षापूर्वीपर्यंत सर्व रेल्वेगाड्यांमध्ये "फौजी जवानों के लिये आरक्षित" डबा असे. दुष्ट काँग्रेस सरकारने कधीतरी ती पद्धत बंद केली.

*बहुतांश हा त्यातील महत्त्वाचा शब्द आहे. अन्यथा देशासाठी बलिदान** करायला जाणारे काही लोक असू शकतील हे मान्य आहे.
** मी इंजिनिअर झालो तेव्हा मला अनेक बुजुर्ग हितचिंतकांनी "परदेशात जा" असा सल्ला दिला होता. तो धुडकावून मी "देशात राहूनच देशाचा फायदा करून देईन" असा निश्चय करून देशातच राहिलो होतो. मी देशात राहिल्यामुळे देशाचा काय फायदा झाला किंवा मी करून दिला हा संशोधनाचा विषय होऊ शकणार नाही. त्या संशोधनाचा "काहीही फायदा*** झाला नाही" हा निष्कर्ष आधीच माहिती आहे. पण याचा उल्लेख करण्याचे कारण असेही वेडपट लोक असू शकतात तसेच सैन्यात बलिदान करायला जाणारे लोकही असू शकतात हे मान्य आहे हे सांगणे हा आहे.
*** माझ्याकडून इतक्या वर्षात सरकारला आयकर वगैरे मिळाला आहे पण तो "मी करून दिलेला फायदा" म्हणून मोजता येणार नाही तर "सरकारने करून घेतलेला फायदा" म्हणून मोजता येईल. कारण तो कर मी "भरलेला" नसून दीवार चित्रपटातील "सामंत के आदमी" प्रमाणेच पगार माझ्या हाती येण्यापूर्वीच सरकारने वसूल केला. खरे तर सरकार सामंत के आदमी पेक्षाही एक पायरी पुढे होते. निदान गोदी कामगारांना पूर्ण पगार हातात मिळायचा आणि नंतर त्यातून "सामंत के आदमी"ना द्यायला लागायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पंचवीसेक वर्षापूर्वीपर्यंत सर्व रेल्वेगाड्यांमध्ये "फौजी जवानों के लिये आरक्षित" डबा असे.
काही वर्षांपूर्वी तरी पाहिला आहे. पण त्यांत चुकून जरी प्रवेश केला तरी, आतले फौजी तुम्हाला उचलून प्लॅटफॉर्मवर फेकून देत, हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे एरवी दादागिरी करणारे अप-डाऊन करणारेही त्या डब्यांत जाण्याचं डेअरिंग करत नसत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आवाहने आणि जाहिराती.

म्हणजे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे तर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||