"रेलचेल"

अमेरिका ही एक तरल व्हिस्की असेल असे समजून
येथे आलो होतो, प्रत्यक्षात ती निघाली एक
मोठ्ठी हिरवट बियर पॅक, पगार झालेल्या दिवसाची .
बाहेर पोलिसांच्या गाड्या वेगाने, सायरन वाजवीत
फिरतच आहेत, गुन्हा झालेलाच आहे, कोणाला तरी
त्याची पगाराच्या दिवसाची बियर मिळालेली दिसत
नाही. असे वारंवार का होते हे विचारायचे नसते.
अमेरिकेत ते अंगभूतच असते. पण इतकी तरी बियर
आम्ही गुन्हेगारांनी इतिहासकाळात कधी प्यायली होती,
तिच्यायला? अमेरिकचे हेही उपकार लक्षात ठेवा.
तुमहाला हवी असो वा नसो, अमेरिका बियर पाजतच
रहाते . तुम्हाला नको असलेल्या वस्तूंची रेलचेल!
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छे हो! ती तरी कुठे राहिलीये आता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0