ब्रिटिश राजघराणं, मेगन मर्कल, ओप्रा, वंशवाद, "शार्लि एब्दो" इत्यादिवगैरे

गेल्या आठवड्यात ओप्रा विन्फ्रे या सुप्रसिद्ध अमेरिकन बाईने मेगन मार्कल आणि तिचा नवरा आणि (एकेकाळचा) ब्रिटिश राजपुत्र हॅरी यांची मुलाखत गेल्या आठवड्यात घेतली. तिच्यात ब्रिटिश राजघराण्यातल्या व्यक्तीने केलेलं वंशवादी स्वरूपाचं मतप्रदर्शन उघडकीस आलं.

"शार्लि एब्दो" म्हणजे फ्रान्समधलं व्यंगचित्रांचं नियतकालिक. गेल्या आठवड्यातल्या त्या सुप्रसिद्ध मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रकाशित केलेलं हे व्यंगचित्र. व्यंगचित्रात मेगनला(ही मिश्र वंशाची स्त्री आहे) जमिनीवर झोपवण्यात आलेलं असून ब्रिटनच्या राणीने तिच्या मानेवर गुडघा ठेवलेला आहे असं चितारलेलं आहे. It is titled "WHY MEGHAN QUIT BUCKINGHAM," with Meghan drawn to say: "Because I couldn't breathe anymore!"

व्यंगचित्राला जॉर्ज फ्लॉईड नावाच्या अमेरिकन ब्लॅक माणसाला मिनिसोटा राज्यात - त्याचा कसलाही गुन्हा नसताना, केवळ संशयावरून - एका व्हाईट पोलिस अधिकार्‍याने गुडघा मानेवर ठेवून दाबलं - आणि त्या घटनेत जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू ओढवला - या घटनेचा संदर्भ आहे. Floyd begged them not to, repeatedly saying "I can't breathe". या घटनेने अमेरिकेत वंशवादाविरोधातल्या निदर्शनाचं रान पेटलं. "I can't breathe" हे घोषवाक्य Black Lives Matter या चळवळीतलं एक महत्त्वाचं वाक्य ठरलं. हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे.

शार्लि एब्दोने या सर्व घटनेची पार्श्वभूमी मेगन मार्कलच्या मुलाखतीला वापरून हे व्यंगचित्र छापलेलं आहे.

शार्लि एब्दोचं हे व्यंगचित्र बर्‍यापैकी वादंग निर्माण करतं आहे. कारण उघड आहे. ब्रिटिश राणी, राजघराण्यावरचं हे फार सणसणीत, कदाचित क्रूर म्हणता येईल असं चित्रण आहे.
शार्लि एब्दो हे नियतकालिक महत्त्वाचं प्रतिष्ठेचं मानलं जातं. मात्र त्यांची कुठलीही टिप्पणी अशीच, जरादेखील दयामाया न दाखवणारी असते. मागे काही वर्षांपूर्वी याच, शार्लि एब्दोच्या एका कार्टूनिस्टची, प्रेषित महंमदाला घेऊन व्यंगचित्र काढण्यावरून पॅरिसमधे मुस्लिम दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याच्या नंतर लगेच याच शार्लि एब्दोने आणखी एक कार्टून छापलं. त्यात आपल्याच कार्टूनिस्टाच्या हत्येचं चित्रण आहे. मुस्लिम अतिरेकी गोळी घालतो आहे. आणि त्याचवेळी म्हणतोय "Oh but he drew first!" (पिस्तुल बाहेर काढताना "ड्रॉ" करणं असा त्या "ड्रॉ"चा अर्थ. आणि त्याचबरोबर "ड्रॉइंग काढणं" असा दुसरा अर्थ. असा साधलेला श्लेष.)

म्हणजे शार्लि एब्दो हे किती पराकोटीचं दयामाया न दाखवणारं, कितीही भीषण, असंगत - अ‍ॅबसर्ड - वाटेल त्या परिस्थितीतसुद्धा आपलं व्यंगचित्रांवाटे विद्रोह नोंदवण्याचं काम करत राहातं - आणि राहाणार याचं याहून मोठं उदाहरण दुसरं काय देणार.

तस्मात् शार्लि एब्दो जे आणि जसं काम करतंय ते मला बरोबर वाटतं. म्हणजे जगात इतक्या भीषण, असंगत वाटतील अशा घटना घडतात. त्यावर ही व्यंगचित्रं म्हणजे उमटलेल्या सर्वात प्रामाणिक प्रतिक्रिया आहेत असं मला वाटतं. "कलेने काय काम करायला हवं" ही चर्चा अनादि काळापासून जगभर चालू आहे. शार्लि एब्दोने त्या प्रश्नाला जे उत्तर दिलेलं आहे तितकं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ उत्तर क्वचित सापडेल.

ते उत्तर प्रेरणादायी आहे.

I stand with Charlie ebdo. I think Charlie ebdo is right. I think it is the perfect response Art can produce against the seemingly unending absurdity of this world.

field_vote: 
0
No votes yet

मला ह्या चित्रातून मेगनचीही टिंगल केली असावी असं वाटतंय. राणी तिच्या मानेवर गुडघा दाबत्ये तरी मेगनची बत्तिशी दिसत्ये, तोंड उघडायचा प्रयत्न नाही... आणि मला ते तसं बघायचं आहे म्हणून ते तसं दिसत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्यंगचित्रकार कितीदा तरी इतकं मार्मिक, चपखल चित्र काढुन जातात. लहानशा चित्रातून आणि वाक्यातून (व्यंगचित्रात तर निबंध लिहीता येत नाही) खूप काही सांगीतलेलं असतं.
हे चित्रंही त्यापैकीच एक,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उप्र सरकारने बळजबरीने धर्मांतर विरोधी कायदा केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शार्ली एब्दोने या आधी ब्लॅक लोकांना, आफ्रिकन मुस्लिम लोकांना त्यांच्या चित्रांमध्ये कसे रंगवले आहे ते बघितलं तर मला हे व्यंगचित्र अजिबात तुम्हाला अभिप्रेत असलेला आर्थ दाखवत नाही.
आपण ज्याला रेसिस्ट म्हणू ते सगळे बारकावे वापरून त्यांची कार्टून काढली जातात (आफ्रिकन लोकांचें ओठ प्रचंड मोठे काढणे, बायकांचे हिप प्रचंड मोठे काढणे,ज्यू लोकांची नाकं मोठी काढणे, गरीब लोकांचे अतिशय exaggerated चित्रण करणे) आणि जरी वरकरणी आम्ही सगळ्या धर्मांची थट्टा करतो असा त्यांचा हेका असला, तरी ते फ्रान्स मधल्या एलिट लोकांसाठीच चित्र काढतात आणि त्यांना खुश ठेवतात कारण ते त्यांचे गिऱ्हाईक आहेत. फ्रान्स मधल्या गोऱ्या नॉन मुस्लिम लोकांच्या मते तिथले काळे, अरेबिक,.आफ्रिकन आणि मुस्लिम (फ्रान्स मध्ये ही सगळी विशेषण एकच माणसाला लागू होतील असे लोक बरेच आहेत) कधीही फ्रेंच होऊ शकत नाहीत. त्यामुळे तिथे रेसिझमच्या आधी खरा फ्रेंच कोण असाही वाद असतो. आणि रेसिझमही प्रचंड आहे.
त्यात फ्रान्सची secularism ची व्याख्या या अशा भेदभावास अजून हवा देणारी आहे असे माझे स्पष्ट मत आहे. "आपण सगळे एकसारखे आहोत" असा विचार कितीही आदर्शवादी असला तरी जमिनीवर तो तसा राहतो का?
Charlie Hebdo claims they offend everybody equally. But in an unequal society it doesn't work that way. त्यामुळे मला त्यांची आधीचीही चित्र सडेतोड वगैरे अजिबात वाटली नाहीत. I find them racist and insensitive.
I also think that they are mocking Meghan in this cartoon. इथे त्यांना त्यांचा आद्य शत्रू इंग्लंड, अमेरिका आणि रेस असे तीनही आवडते मुद्दे मिळालेले आहेत. त्यामुळे मला ही black lives matter या चळवळीची खिल्ली वाटते.
जरी त्यांना benefit of doubt दिला, आणि माझी Meghan ला पूर्ण सहानुभूती आहे, तरी, मेगन आणि जॉर्ज फ्लॉइड यांची तुलना मला टोकाची वाटते. त्यामुळे मला इथे त्यांच्या दोघींच्याही प्रिवीलेजची देखील खिल्ली उडवली आहे असं वाटतं.
आणि मला Charlie Hebdo सारख्या रेसिस्ट नियतकालिकाचे कार्टून इतके सोपे सहज रेस विरोधी आवाज उठवणारे असेल असे अजिबात वाटत नाही.
I think this cartoon does disservice to George Floyd and the movement that rocked The United States after his death.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

आफ्रिकन लोकांचें ओठ प्रचंड मोठे काढणे, बायकांचे हिप प्रचंड मोठे काढणे,ज्यू लोकांची नाकं मोठी काढणे,

व्यंगचित्र म्हणजे काय असतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यंगचित्र असा शब्द आता रूढ होत चालला आहे सगळीकडे, परंतु मूळ शब्द व्यंग्यचित्र असा आहे. एखाद्याच्या किंवा एखादीच्या व्यंगाचे अतिशयोक्त चित्रण करणे हे मुख्य वैशिष्ट्य नसून व्यंग्यार्थ सांगणारे ते व्यंग्यचित्र.

व्यंग्यार्थ म्हणजे काय? तर सरळ दिसतोय तसा व तेवढाच (शब्दशः) अर्थ नसून आणखी काहीतरी अर्थ प्रतीत होतो. उदा. 'आला मोठा शहाणा' या वाक्यात शहाणाचा वाच्यार्थ अभिप्रेत नसून त्याउलट काहीतरी म्हटले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सईबाईंशी सहमत व्हावे लागत आहे.

पूर्वी फक्त (अधूनमधून) चिंजंशी सहमत व्हावे लागे. किंवा (क्वचित्प्रसंगी) Rajesh188शी. परंतु हे म्हणजे फारच झाले!

हे असेच जर चालू राहिले, तर एखादे दिवशी सामोंशी, नाहीतर - गॉड फॉरबिड - प्रभाकर नानावटींशी सहमत होताना आढळेन. कसे व्हायचे!

('मार्मिक' दिली आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐय्या थँक्यू!
मी पण तुम्हाला विनोदी दिलं (खवचट नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणायची काय?
--------------
एकमेकांची पाठ थोपटणाऱ्यांच्या जोड्या वाढत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर एखादा माणूस कोणत्याही गोष्टीच्या अधीन गेला की बुद्धी खुंटते. मग अशी गोष्ट धर्म, अस्मिता, विचारसरणी, संस्कृती, राजघराणे किंवा महापुरुष काहीही असू शकते. मग अशी टिका झाली की अमुक तमुक भावना दुखावल्या जात असतील तर वैचारिक मागासलेपणाचे लक्षण आहे हे सिद्ध होते. मुळात अस्सल अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाळगायची असेल तर जे जे पुजनीय असेल वा नसेल त्याला प्रश्न विचारण्याचे वा टिका करण्याचे, चिकित्सा करण्यासाठी धारिष्ट्य असायला हवे. परदेशात असे स्वातंत्र्य पराकोटीचे आहे. आपल्या देशात असे शक्य नाही. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयीस्कर अंगिकारले जाते. आपल्याकडे गुलामगिरी रक्तात मुरलेली आहे. मग अशी गुलामी कोणत्याही गोष्टींची असू शकते. विवेकी असणे सध्याच्या काळात इसापनितीच्या गोष्टीसारखे झाले आहे. तसही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सॉफ्ट टार्गेट आणि हार्ड टार्गेट ठरवले जातात. टिंगलटवाळी दुसऱ्यांची केलेली चालते मात्र स्वतःची झालेली चालत नाही असा एक खुप मोठा वर्ग आहे. हलक्या झालेल्या भावना आणि अस्मिता लगेच दुखवतात. हे सरसकटपणे सगळ्यांनाच लागू होते. कोणतीही चिकित्सा, टिका, टिंगलटवाळी जेवढ्या खुलेपणाने, खेळकरपणे स्विकारताय त्यावर सद्सद्विवेक बुद्धी किती जागरूक आहे ते कळते. मात्र हल्ली अशी चिकित्सा, टिका केवळ नावे ठेवण्यासाठी किंवा नीचपणा दाखवून उपजिविका करणाऱ्यांची संख्या पण वाढलीय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

'शार्ली एब्दो'चे (फॉर्दॅट्मॅटर कोणाचेही) अभिव्यक्तिस्वातंत्र्य अर्थातच मान्य आहे. बोले तो, त्यांनी काय वाटेल ती चित्रे काढली, तरी त्यांना गोळ्या घालू नयेत, त्यांच्यावर हिंस्र हल्ले होऊ नयेत, त्यांच्या नावाने फतवे निघू नयेत, त्यांना कोणी (रस्त्यात गाठून वा अन्यत्र) मारहाण करू नये, वा त्यांच्यावर या कारणास्तव कायदेशीर कारवाई होऊ नये, इथवर सहमत होण्यासारखे आहे.

हॅविंग सेड दॅट, 'अशा व्यंगचित्रांची गरज आहे' इज़ अ बिट ऑफ अ स्ट्रेच. बोले तो, पोटापाण्याच्या कारणांस्तव 'शार्ली एब्दो'ला (आणि आपापले गंड कुरवाळण्यासाठी त्यांच्या वाचकवर्गाला - ॲडिक्शन इज़ अ बिच!) अशा व्यंगचित्रांची गरज असेलही कदाचित, परंतु, व्यापक समाजात इतर कोणाचे (१) अशा व्यंगचित्रांवाचून काही अडते, वा (२) अशा व्यंगचित्रांमुळे (एरवी नीरस) आयुष्य समृद्ध होते, हे म्हणणे काहीही आहे.

अशा व्यंगचित्रांची समाजास गरजबिरज मुळीच नाही. टॉलरेट करणे वेगळे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यंगचित्रांमुळे जर कोणाच्या भावना अस्मिता दुखावत असतील तर त्या फारच तकलादू आहेत हे सिद्ध होते.
व्यंगचित्रकार व्यंग हेरून चित्र काढतो हास्यकवी वगैरे व्यंगावर भाष्य करताना विडंबन करतो. जो तो कलाकार व्यक्त होण्यासाठी जे हुकमी माध्यम असेल त्याचा वापर करतो.
राहिला प्रश्न हिंसेचा. तर खून करून, हिंस्र हल्ले करून किंवा गोळ्या घालून विचार संपवता येत नाही. कोणत्याही खुनाचे समर्थन करणारा समाज मागासच असतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

अशा व्यंगचित्रांची रिकामटेकड्या नसलेल्या समाजास गरजबिरज मुळीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

व्यंगचित्र काय असतं असं विचारण्यापेक्षा रेसिझम काय असतं असं विचारा आणि उत्तर शोधा.
तुम्हाला नक्की मिळेल. विकिपीडियावरही मिळेल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

तसं बऱ्याच लेखकांनी त्यांच्या समाजातील वरच्या/खालच्या आळींंबद्दल लिहिलं आहे.

होमो इरेक्टस/ निअनडर्थल ते अगदी ऋषीकुलोत्पन्न ते सिने सेलब्रीटींची मुलं इथपर्यंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. मला हे मान्य आहे. आणि मला जुन्या पुस्तकातले racist references काढून टाकणं, जिथे त्यांचा हेतू स्वतः च्या किंवा इतरांच्या बाबतीत झालेलं रेसिझम दाखवण्याचा आहे पटत नाही. पण डिस्नीची अनेक लहान मुलांची कार्टून त्यांनीच काढून टाकली आहेत. जिथे इंडियन किंवा लॅटिन अमेरिकन लोकांचे racist वाटेल असे चित्रण आहे.
रेसीझमच काय, १९८०-२००० मध्ये तयार झालेल्या अनेक सिट कॉम मालिका सौम्य किंवा तीव्र स्वरूपात होमोफोबिक किंवा racist आहेत. माझी अत्यंत आवडती Seinfeld सुद्धा याला अपवाद नाही. कदाचित ती परत बनवायला घेतली तर त्यातले काही एपिसोड गाळले जातील.
पण आज आपण वेगळ्या जगात राहतो आहोत. आजचे सामाजिक प्रश्न रेस आणि citizenship बद्दल अधिक दाहक झाले आहेत. त्यामुळे आज जे मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत काही पोहोचवतात त्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

जुन्या सिरियल आणि त्यातील रेसीझम वगैरे चर्चा वाचून हा व्हीडो आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आज अस्तित्वात असलेल्या कोणत्याही राजघराण्याप्रमाणेच ब्रिटिश राजघराणे हे सुद्धा कालबाह्य झालेल्या सरंजामी कल्पनांचे “जिवंत जीवाश्म” आहेत. त्यातल्या लोकांकडून आधुनिक मूल्यांची अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे. हॅरीची लायकी काय आहे हे सुद्धा जाहीर आहे. सगळाच मूर्खपणा!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Nil

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0