'गावगाडा' - शतकानंतरचा

त्रिंबक नारायण आत्रे यांचं 'गावगाडा' हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राविषयी रुची असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं असं पुस्तक आहे. कालमानानुसार महाराष्ट्रातलं गाव बदललं तसा गावगाडादेखील पूर्वीसारखा राहिला नाही. आजच्या महाराष्ट्रातल्या गावाचं चित्र कसं आहे, ते सांगणारं 'गावगाडा - शतकानंतर' हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. अनिल पाटील (सुर्डीकर) हे त्याचे लेखक आहेत. मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलं आहे. सदानंद मोरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्याविषयीचा 'सकाळ'मधला हा वृत्तांत :
http://online2.esakal.com/esakal/20121203/5708538891245803521.htm

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्रोटक असली तरी पुस्तकाची ओळख रोचक वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुस्तक पाहिलेलं नाही, पण त्याचे लेखक अनिल पाटील (सुर्डीकर) यांचं बदलत्या गावाविषयीचं लिखाण पूर्वी 'आजचा सुधारक'मध्ये अनेकदा वाचलेलं आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद. ही दोन्हीही पुस्तकं कुठे मिळतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

आत्रे यांच्या मूळ 'गावगाडा'ची वरदा प्रकाशननं काढलेली आवृत्ती कित्येक वर्षांपासून उपलब्ध आहे. नवं पुस्तक 'मनोविकास'चं आहे. त्यामुळे तेदेखील सर्वत्र उपलब्ध असावं. 'बुकगंगा'वर दोन्ही दिसताहेत.
http://www.bookganga.com/eBooks/Book/5277121729773331555.htm?Book=Gavgada
http://www.bookganga.com/eBooks/Book/5661176301800138254.htm?Book=Gavgad...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काही वेळा मराठी पुस्तकांची खरेदी हा पोपट करणारा अनुभव असतो (अनेक जण 'काही वेळा' या शब्दाशी सहमत असणार नाहीत याची कल्पना आहे). काल दापोलीत कोमसापच्या संमेलनावेळचा अनुभव. सकाळी साडेदहाला ग्रंथदालनाचे उद्घाटन व्हावयाचे होते. नेहमीप्रमाणे ती घटिका चुकली होती. मी तरीही आशावादी; साडेदहा झालेलेच आहेत, स्टॉल लागला असेल असे म्हणत आत गेलो. अनेक सटॉल लागलेले नव्हते. 'मनोविकास'च्या स्टॉलवर गेलो. बाहेर या पुस्तकाची पत्रके लागली होती. स्टॉल लावण्याचे काम चालू होते. तरीही, चिकाटी होती. 'मनोविकास' पुण्याचे आहे, हे माहिती असूनही पुस्तकाची चौकशी केली. मला उत्तर मिळाले, "माहिती नाही, अजून आम्ही पुस्तकं काढतो आहोत, असेल कुठं तरी..."
एकूण मराठी प्रकाशन व्यवसायाचा 'जुना गावगाडा' तसाच आहे, हे कळले. शांतपणे ग्रंथदालनातून (च्यायला, काय पण शब्द आहे...) बाहेर पडलो. उद्घाटन कार्यक्रम ऐकला. सरळ घरचा रस्ता पकडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक नुकतंच वाचलं. फारच दिलचस्प आहे.

महाराष्ट्रातल्या दुष्काळी प्रदेशातल्या एका सर्वसामान्य गावाचं स्वरूप आज कसं आहे याचा आढावा यात वाचायला मिळतो. मुख्य भर शेती आणि शेतकर्‍यांची परिस्थिती यावर आहे. त्याच्या अनुषंगानं गावाची संस्कृती, खाणंपिणं, जत्रा, मनोरंजन, रोजगार आणि शिक्षणाची परिस्थिती, राजकीय बदल, सिंचन आणि इतर जोडधंदे यांचं वर्णन आहे.

गावागावांत कॉम्प्युटर आणि ट्रॅक्टर आणि लाउडस्पीकर आले म्हणजे गावात प्रगती पोचली असं म्हणायचं का? गावातल्या व्यवस्थेचा कणा पूर्वी शेतकरी असे. आता नोकरदाराला ते स्थान मिळालं आहे. त्याचे कोणते बरेवाईट परिणाम दिसतात? गावातले मागासवर्गीय या व्यवस्थेत कुठे बसतात? त्यांनी या बदलांचा फायदा करून घेतला आहे का? हा फायदा दीर्घजीवी आहे का? यावर काय उपाय करावेत? असे अनेक विचार करायला लावणारे प्रश्न यात लेखकानं विचारले आहेत.

त्याहून भारी म्हणजे शैली. सोप्पी, लहान वाक्यं आहेत. प्रमाण मराठीतले जड जड शब्द वापरण्यापेक्षा सहजगत्या इंग्रजी शब्दाचं मराठीकरण करून वापरण्यावर भर आहे. शहरी वाचकाला संकल्पनाच माहीत नसल्यामुळे अपरिचित असलेले अनेक अस्सल मराठी शब्द आहेत. गाव आणि शेतकरी या विषयाकडे बघताना दृष्टिकोन अगदी नाकासमोर पाहण्याचा नाही. लेखक सहज त्याच्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती नोंदत पुढे जातो. पुरेसं आणि इंट्रेष्टिंग विषयांतर करतो. त्यातून वेगळा अँगल पुरवतो आणि पुन्हा विषयावर येतो.

फार फार आवडलं हे पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्रिंबक नारायण आत्रे लिखित 'गावगाडा' पुस्तक येथून उतरवून घेता येईल. ते पूर्ण आहे काय हे कोणाजवळ छापील प्रत असल्यास कळवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद कोल्हटकर. पुस्तक अतिशय रोचक वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हपिसातून दुवा पाहता येत नाहीए. छापील प्रत घरी आहे. संध्याकाळी पडताळून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आताच ताडून पाहिले.

वरील आवृतीत छापील पुस्तकातील बव्हंशी मजकूर आहे परंतु, प्रस्तावना नाही तसेच तळटीपाही दिसल्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.
कोल्हटकरांचे लाख लाख आभार.
मागेही जालावर glimpses of world history , discovery of india अशी पुस्तकं त्यांनीच दिलेल्या लिंकामधून मिळाली आणि वाचणं झालं.
काका, तुमच्याकडे इतरही काही महत्वाचे दुवे असतील तर द्या ना प्लीझ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काका!! ते ही जाहिर!!
कॅपिटल ऑफेन्स! Wink
आता फक्त तोंडी दुवे (आशिर्वाद) मिळतील बघ! Blum 3

(समस्तांनी हलके घेणे Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डिसेंबर १९१५ मध्ये त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले हाेते. त्याला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने अाज या ग्रंथाची नवीकाेरी अावृत्ती वाचकांच्या हातात येत अाहे.
अात्रे यांनी या ग्रंथाचे वर्णन ‘नाेट‌्स अाॅन रुरल साेशलाॅजी अॅण्ड व्हिलेज प्राॅब्लेब विथ स्पेशल रेफ्रन्स टू अॅग्रिकल्चर’ असे केलेले अाहे.
या अापल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या अार्थिक व्यवहारातील शेतकऱ्याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती अाणि तत्कालीन गावगाड्याची काेसळू लागलेली अवस्था
इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली अाहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न अाजही जसेच्या तसेच अाहेत. मग शंभर वर्षांपूर्वीचा शेतकरी असाे व अाजचा. म्हणूनच मग ‘गावगाडा’सारखे एखादे साहित्य अाजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे ठरते. हीच बाब हेरून राजहंस प्रकाशनाने त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पुस्तकाला नव्या स्वरूपात साहित्यरसिकांसाठी साहित्य जत्रेत अाणले अाहे.
डिसेंबर १९१५ मध्ये त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले हाेते. डिसेंबर २०१५मध्ये या पुस्तकाला १०० वर्षे पूर्ण झाली अाहेत. अात्रे यांनी या ग्रंथाचे वर्णन नाेट‌्स ‘अाॅन रुरल साेशलाॅजी अॅण्ड व्हिलेज प्राॅब्लेब विथ स्पेशल रेफ्रन्स टू अॅग्रिकल्चर’ असे केलेले अाहे. या अापल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या अार्थिक व्यवहारातील शेतकऱ्याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती अाणि तत्कालीन गावगाड्याची काेसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली अाहे. या विशेष अावृत्तीमध्ये लेखक अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाच्या पहिल्या अावृत्तीची मूळ संहिता, त्याच्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्याेत्तर काळात केलेली सामाजिक-अार्थिक चिकित्सा अाणि ग्रंथ शताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बाेकील व नीरज हातेकर, राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद माेरे यांचाही लेख समाविष्ट अाहे. पुस्तकाचे संपादक द. दि. पुंड यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना अाणि परिशिष्ट यातूनही अात्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य हाेणार अाहे. ‘गावगाडा’ची ही शताब्दी अावृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान या क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त अाहेच, पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी अाहे.
नवीन ‘गावगाडा’ पुस्तकाचे संपादन केले अाहे ते द. दि. पुंडे यांनी. ‘गावगाडा’ या पुस्तकाचा गेल्या शंभर वर्षांतील सगळाच लेखाजाेखा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला अाहे. खरंतर ते संपादकीय नसून, ती उत्तम प्रस्तावना अाहे. त्यात ते लिहितात की, ‘गावगाडा’ या ग्रंथाबाबत
अाधुनिक मराठी वाङमयाच्या सर्व इतिहासग्रंथांमध्ये थाेडक्यात पण सर्वसाधारणपणे गाैरवानेच माहिती दिलेली अाढळते. सर्व वाङमय काेशांमध्ये ‘गावगाडा’वर नाेंद अाढळते. या संदर्भात अाणखी मिळणारी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे हे पुस्तक मुंबई विद्यापीठाने काही काळ अभ्यासाकरिता
क्रमिक पुस्तक म्हणून नेमलेले हाेते. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या व तालुक्याच्या सरकारी कचेऱ्यांतून हे पुस्तक पाहिले
जात हाेते. अाचार्य अत्रे व ह. वि. माेटे यांच्या प्रयत्नाने पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन झाले हाेते, तर राम देशमुख यांनी या पुस्तकाचे भाषांतरही केले हाेते, असे त्यांनी नमूद केले अाहे. एवढे महत्त्वाचे हे पुस्तक असून, यात त्रिंबक अात्रेंची चरित्ररेखा व जीवनदृष्टी, त्यांचा सुधारणावाद, ‘गावगाडा’च्या लेखनाची पूर्वतयारी, ‘गावगाडा’चे स्वरूप विवेचन या भागात त्यांनी पुस्तकाच्या स्वरूपावर भाष्य केले अाहे. तर, हिंदुस्थानातील शेती व्यवसाय अाणि नवे अर्थशास्त्र, ‘गावगाडा’च्या श्रेष्ठतेचे भावपूर्ण दर्शन, अाचार्य अात्रे अाणि ह. वि. माेटे, गावगाडाचा शब्दकाेश : एक शाेकांतिका, समीक्षेचा अाढावा, डाॅ. सदानंद माेरे यांचे विचार अाणि ‘गावगाडा’चे इतिकथन अशा विविध विभागांतून हे पुस्तक प्रस्तावनेच खूप सुंदर उलगडते.

पुनर्मुद्रणामागील उद्देश
काही साहित्य असे असते की ते कधीही उपयुक्त ठरते. ज्या पुस्तकांनी त्या-त्या काळात अापला ठसा उमटवला अाहे अाणि त्या पुस्तकांचे संदर्भ अाजही लागू पडतात, ती पुस्तके वाचण्यात अाजही वाचकांना रस अाहे अशी पुस्तके पुन्हा त्यांच्या हातात दिली तर वाचन संस्कृती वाढण्यास हातभार लागेल, असे त्यामागील एक मत अाहे.
अशा अनेक पुस्तकांचे अाम्ही रसिकांसाठी पुनर्मुद्रण केले अाहे. त्यातीलच ‘गावगाडा’ हे त्या काळात अत्यंत गाजलेले असे पुस्तक अाहे. अाम्ही त्याचे पुन:प्रकाशन करताना केवळ पुस्तकच नाही दिले तर त्यावर संशाेधनात्मक विवेचन दिले अाहे. पुस्तकात पुस्तक असे म्हटले तरी हरकत नाही. जुनी प्रत जशीच्या तशी या पुस्तकात वाचायला मिळते. स्त्रीमुक्ती वगैरे या गाेष्टी जेव्हा मनातही नव्हत्या अशा काळातील अाणखी एक पुस्तक म्हणजे ‘अनसुयाबाई अाणि मी’. एक पती अापल्या पत्नीबद्दल त्या काळात एवढं लिहिताे जे अाजच्या काळातील वाचकांनाही वाचायला नक्कीच अावडतं. शिवाय, अाणखी एक पुस्तक अाहे ते पुस्तक म्हणजे तर एखादी हिंदी चित्रपटाची मसाला स्टाेरीच अाहे. त्यात रहस्य अाहे, अाैत्सुक्य अाहे. श्री. र. भावे यांची त्या पुस्तकाला प्रस्तावना अाहे. जुन्या पुस्तकांतील वेगळेपण, त्याचा वाचकांवर पडणारा प्रभाव अशा अनेक गाेष्टी या बाबतीत लक्षात घेतल्या जातात. सगळीच पुस्तकं काही अार्थिक गणितांसाठी नसतात. काही पुस्तके ही वाचकांसाठी, प्रसिद्धीसाठीही असतात. ‘गावगाडा’ हे त्यापैकीच एक. तेव्हाचा गावगाडा अाणि अाजचा गावगाडा सारखाच अाहे. म्हणूनच हे पुस्तक अाजही वाचकांना वाचावेसे वाटते.
डाॅ. सदानंद बाेरसे
संपादक, राजहंस प्रकाशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक संस्थांनी अनेक वेळा केलेल्या, विसाव्या शतकातील सर्वोत्तम शंभर मराठी पुस्तकांच्या प्रत्येक यादीत ह्या पुस्तकाचे नाव सापडतेच सापडते. मलाही या पुस्तकाची ओळख अशाच एका जुन्या यादीतून झाली. मला वाटते शतकाची साठी, पंचाहत्तरी, शतक या निमित्ताने अशा याद्या काढल्या गेल्या होत्या. ललित मासिक, महाराष्ट्र टाइम्स या संस्था आठवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रिं.ना. आत्रे ह्यांच्याबद्दल अजून काही माहिती गं.दे.खानोलकर-संपादित 'अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक - भाग १' ह्या पुस्तकामध्ये आहे. ती येणेप्रमाणे:

Atre 1
Atre 3
Atre 2
Atre 4
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत इंटरेस्टींग पुस्तक . वारंवार वाचलं तरी दAर वेळेस नवीन वाटेल असं. (माझी ओरिजिनल प्रत ( वरदा प्रकाशन ) कोणीतरी गायब केलीय. आता राजहंस च घेऊन बघायला पाहिजे . )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0